वैद्यकीय सल्ला हवा आहे.
(प्रश्नोत्तरे मध्ये लिहावयाचे होते परंतु Access denied असा संदेश प्रकट होत आहे त्यामुळे चर्चे मध्ये लिहीत आहे. क्षमा असावी).
माझ्या भावाच्या मुलीला (वय वर्षे ५) गेले १ ते दीड महिना कोरड्या खोकल्याचा त्रास होत आहे.
दिवसा जास्त खोकला नसतो परंतु रात्री विशेषतः झोपताना खोकला उफाळून येतो. आठवड्यातून ३-४ दिवस तरी असा त्रास होतोच. २-३ वेळेस खोकल्यामुळे उलटी सुद्धा झाली.
जेवणामध्ये सुद्धा बदल करून पहिले. २ स्पेश्यालिस्ट DR. दाखवून झाले आहे. निदान सापडत नाही आहे. २ आठवढ्यापूर्वी आयुर्वेदिक उपाय चालू केले होते थोडा फरक पडलेला पण अजून खोकला पूर्णपणे जात नाही आहे. कालच आणखी एका child specialist ला दाखवून आलो. त्यांचे असे म्हणणे आहे कि allergic cough आहे पण तो कश्यामुळे होतोय हे सांगू शकले नाही. त्यांचे म्हणणे आहे कि आई वडिलांनाच माहित असले पाहिजे होते कि कसली allergy आहे ते.
भाऊ पनवेल (नवी मुंबई) ला वास्तव्यास आहे.
प्रतिक्रिया
6 Feb 2018 - 7:16 pm | कंजूस
खोकला दाबून टाकणारी औषधे आयुर्वेदिक/ इंग्लिशही नकोच.
खोकला बाहेर पडणारी बेहडा उपयुक्त. इं इक्स्पेक्टोरंट प्रकारची कफ सुटणारी हवी. कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या उत्तम.
6 Feb 2018 - 8:01 pm | मुक्त विहारि
डॉ.भालेराव, कस्तुरी पार्क, डोंबिवली.
आम्हाला तरी उत्तम अनुभव आला.
त्यांचा मोबाइल नंबर देतो.
९८२००५००७६
उगाचच औषधे देत नाहीत.
त्यांना आधी फोन केलात तर उत्तम.
एक खरोखर घडलेला किस्सा,
मध्यंतरी आमच्या सौ.च्या घशाला त्रास होत होता.त्यांनी औषध न देता, मौनव्रत करायला सांगीतले.जे काम मला २५ वर्षात जमले नाही ते डॉ.नी, एक १०-१५ मिनिटात करून दाखवले.अर्थात बायकोचा घसा बरा झाला आणि आता पुढील २५ वर्ष कान बंद करायची आमची मानसिक तयारी पण झाली.
असो,
6 Feb 2018 - 9:22 pm | चौथा कोनाडा
भारी ! :-)
माझ्या जवळची एक केस:
आमच्याही एका लांबच्या ताईंना डॉक्टरांनी "मौन-व्रता"नी बरं केलं.
नेहमी बेंबीच्या देठापासून बोलायच्या, त्यांना ऐकताना ज्याम इरिटेट व्ह्यायचं, बेक्कार खोकायच्या कायम. बरेच डॉक्टर अन औषधे झाली,
एका डॉक्टरांनी पर्फेक्ट निदान केले. स्वरयंत्राचा चुकीचा वापर !
त्यांनी या ताईंची वाचाही जायची भिती व्यक्त केली. पहिले काही आठवडे स्टरिक्ट "मौन-व्रत" अन मग काही महिने स्पीच थेरेपी !
6 Feb 2018 - 9:32 pm | मुक्त विहारि
.... मौनव्रत धारण केले की बरेच प्रॉब्लेम्स दूर होतात...
6 Feb 2018 - 11:01 pm | चौथा कोनाडा
+१११
6 Feb 2018 - 8:37 pm | रुस्तम
खरच पनवेलला बरेच जण या त्रासातून जात आहेत.
6 Feb 2018 - 11:10 pm | manguu@mail.com
पेडियाट्रिकला दाखवा ... लोफ्लर सिंड्रोम / इओसिनोफिलिया / allergic cough वगैरे आहे का बघा.
7 Feb 2018 - 9:14 am | shashu
allergic cough आहे पण तो कश्यामुळे होतोय हे DR सांगू शकले नाही. त्यांचे म्हणणे आहे कि आई वडिलांनाच माहित असले पाहिजे होते कि कसली allergy आहे ते.
7 Feb 2018 - 12:29 pm | सस्नेह
अॅलर्जी टेस्ट करून घ्या. अलीकड याचे स्पेशालीस्ट भरपूर झालेत.
7 Feb 2018 - 11:53 am | रुपी
खरं तर पनवेलच्या हवामानात गरज आहे का माहीत नाही, पण मी राहते तिथे माझ्या मुलांना खोकला झाला तर humidifier मुळे खूप आराम पडतो.
7 Feb 2018 - 12:00 pm | जागु
तुम्ही डॉ. चा सल्ला घ्याच पण दोन घरगुती उपाय जे मी माझ्या मुलिंसाठी आणि मोठ्यांसाठीही करते.
काढा.
१ चमचा आळशी, अर्धा चमचा बाळशोपा, काळे मिरे ३-४ कुटून, अर्धा चमचा धणे, जेष्टीमध (पावडर असल्यास अर्धा चमचा) आल्याचा एक तुकडा ठेचून, गवती चहा, पांढरा कांदा घरात असल्यास त्याचा एक तुकडा, तिन-चार काळ्या मनुका, १०-१५ जास्त मिळत असतील तर २५-३० तुळशीचे पाने घेऊन १ ग्लासभर पाण्यात उकळवा. काढा चांगला उकळवून पाऊण कप तरी होऊ द्या. हा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायचा. जिन्नसाच प्रमाण थोडं इकडे-तिकडे झाल तरी चालेल.
हळद-गुळाच्या गोळ्या.
गुळ चुरून त्यात थोडी मध व चमचाभर हळद घालून त्याच्या गोळ्या करायच्या व त्या मधून मधून खायला द्यायच्या.
7 Feb 2018 - 12:02 pm | जागु
काढ्यामध्ये शेवटी गुळ किंवा खडीसाखर घालायची हे लिहायचे विसरले.
7 Feb 2018 - 3:26 pm | शिवाय
आपण मुलीचे ब्लड प्रोफाइल चेक करावे असे विज्ञान सांगते . हिमोग्लोबिन कमी असल्यानेसुद्धा रात्री खोकला उफाळून येऊ शकतो . डॉक्टरचा सल्ला त्वरित घ्यावा हि नम्र विनंती .
7 Feb 2018 - 10:34 pm | डॉ श्रीहास
नेमकं काय करायचं आहे ह्याबद्दल ....
7 Feb 2018 - 11:36 pm | रुस्तम
Dr कृपया मला पण सांगा...
8 Feb 2018 - 10:25 am | डॉ श्रीहास
अजून काही लागल्यास कळवा