१९७७-७९, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि इतर

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
3 Jan 2018 - 8:08 pm
गाभा: 

वर्तमान राजकारणापेक्षा साधारणतः ४० वर्षापुर्वी झालेल्या सामाजिक-राजकीय घटनांचे पुनरावलोकन सोपे जाते. जे व्हायचे ते होऊन
गेलेले असते आणि मध्ये दोन पिढ्यांचे अंतरपडल्याने घडून गेलेलेल्या घटनांकडे शांतपणे पहाणे सोपे जाते.

१९७८ मध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर सोव्हिएत आणि यूएसए चे कोल्ड वॉर अद्याप चालू आहे. त्यातच इंग्रज ज्या गोष्टीस २० व्या शतकाच्य सुरवाती पासून भीत होते ते रशियाचे सैन्य एकदाचे अफगाणिस्तान मध्ये पोहोचले आहे. पुढे पाकिस्तानातं भुट्टोची उचला बांगडी करून जनरल झिया उल हक लष्करी उठाव करून सत्ता ताब्यात घेतात, पुढे वर्षाभरात इराण मधील धार्जिण्या शहांची सद्दी संपून खोमेनींची शिया इस्लामिक कट्टर लोकशाहीची नवी व्हर्शन इराण मध्ये उदयास येते.

भारतात आणीबाणी संपून मोरारजींचा कारभार चालू आहे. महाराष्ट्रात हेडमास्तर मुख्यमंत्री अशी प्रतिमा झालेले शंकर चव्हाणांची जागा वसंत दादा पाटील जागा घेतात नंतर शरद पवारांची पुलोद सत्तेवर येते. विद्यापीठ नामांतर आंदोलन आणि शिक्षणाच्य खासगीकरणाची नांदी महाराष्ट्राच्या क्षितिजावर होणार असते.

उपरोक्त क्रम अचूक नाहीत अचूक माहिती देण्यात सर्वानी सहभागी १९७७- १९७९ हा काळाचा आढावा घेणे वसंत दादा पाटील आणि शरद पवारांचे तत्कालीन राजकारण आणि त्याचा आजच्या महाराष्ट्रावरील शिल्लक प्रभाव तसेच ज्यांना आवडेल त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचाही आढावा घेतला जावा अशी या धागा चर्चेतून अपेक्षा आहे.

काही इंग्रजी विकिपीडिया दुवे

* अफगाणीस्तान घटना

* झिया उल हक

* इराणी क्रांती
* मोरारजी देसाई

* वसंतदादा पाटील

* शरद पवार
* नामांतर आंदोलन