मागच्याच आठवड्यात मी माझ्या "ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली" उपक्रमाबद्दल लिहिले होते (http://www.misalpav.com/node/41267). मला सांगायला आनंद होतो की एका आठवड्याच्या आतच मराठी शिकणाऱ्यांसाठी अजून एका सुविधेला मी सुरुवात केली आहे .
मराठी ते रोमन लिप्यंतरण !
http://learnmarathiwithkaushik.com/transliteration_parentpage.html
आता मराठी(देवनागरी) लिपी नीट वाचता येईपर्यंत शिकणाऱ्यांचे मराठी वाचन अडून राहायला नको. मराठीत जे वाचत असतील ते इथे कॉपी पेस्ट करून रोमन लिपीत ते शब्द वाचू शकतील आणि सराव करू शकतील.
इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला मराठी शिकताना याचा फायदा होऊ शकतो.
जर तुम्ही कोणाला मराठीत ई-निरोप पाठवत असाल आणि काही कारणाने त्या व्यक्तीकडे मराठी नीट दिसत नसेल तर, तुमचा निरोप रोमन लिपित लिप्यंतरित करून त्याला पाठवू शकता. पूर्ण निरोप पुन्हा रोमन मध्ये टाईप करायची गरज नाही
ही सुविधा कशी वाटली सांगा; वापरताना काही समस्या आली तरी कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवा.
धन्यवाद,
कौशिक लेले
(LearnMarathiFast@gmail.com)