ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in राजकारण
22 Sep 2017 - 9:34 pm

ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....

तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.

कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्‍यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

13 Oct 2017 - 6:08 pm | सुबोध खरे

@तर्राट जोकर
एखाद्याच्या विचारसरणी बद्दल आदर नसेल तरी त्याला आदरार्थी संबोधावे अशीच आमची शिकवण आहे. डॉ मनमोहन सिंह यांच्या काळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली ज्याला ते अप्रत्यक्ष पणे जबाबदार(act of omission) आहेत तरीही त्यांच्या बद्दल कधीही अनादराचा शब्द मी उच्चारलेला नाही.
एवढेच नव्हे तर श्री राहुल गांधी किंवा श्रीमती सोनिया गांधी (जे केवळ खासदार आहेत घटनात्मक पदावर नाहीत) यांच्याबद्दलही असे उद्गार कधीही काढल्याचे मला स्मरत नाही.
भाजपच्या खासदार आमदारांचे आर्थिक व्यवहार हे सार्वजनिक नसताना(श्री मोदी यांनी ते पक्षाध्यक्षांकडे देण्याची घोषणा केली आहे० त्यांनी ते व्यवहार पक्षाध्यक्षांना दिले कि नाही हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे याचा जनतेशी (किंवा गोडसेंशी) संबंध नाही. एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करायची गोडसेंची सवय आहे. गोडसे उगाच त्यावर आपला माहितीचा अधिकार आहे( जो अजिबात नाही पण ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा गोडसेंकडे नाही) हि दर्पोक्ती करत आहेत. याच लेखात गोडसे स्विस बँकेतील पैसे आपले नाहीत असा दावा करतात आणि त्याबद्दल वारंवार विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र देत नाहीत
मुळात आपल्याशी संवाद होत नसताना ( हा माझ्या आणि गोडसेंमध्ये चालू असलेल्या) संवादात आपण आगंतुक पणे भाग घेतलात.
कारण नसताना श्री मोदींबद्दल गरळ ओकलीत हेही ठीक आहे.
यानंतर आपण आमच्या पिताश्रींवर घसरलात यावरून आपली पातळी आपण दाखवून दिलीत.
असो.
यापुढे आपल्याशी प्रतिवाद करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही.
धन्यवाद
आपले कल्याण होवो.

मी शाकाहारी आहे म्हणून माझ्या आसपास ठराविक लोकांनी चिकन खायचे नाही असा हट्ट झाला हा. तुमचे एक मत आहे आणि मी त्याच्याशी काही अंशी सहमत देखील आहे. पंतप्रधानच काय कुठल्याच व्यक्तीला अपमानास्पद किंवा हीन विशेषणे देणे मला पटत नाही. पण म्हणून मी एका ठराविक विचारसरणीच्या लोकांना तुम्ही कसे बोलायला हवे याचे डोस देत फिरत नाही, खास करून आपल्या विचारसरणीचे लोक तशाच प्रकारचे वर्तन करत असताना कानाडोळा करत तर नाहीच नाही.

सुबोध खरे's picture

13 Oct 2017 - 9:15 pm | सुबोध खरे

आपले म्हणणे बरोबर आहे.
मी त्यांच्या पातळीवर येऊ शकत नाही.
म्हणूनच मी माझ्या बाजूने वाद थांबवला आहे.

मार्मिक गोडसे's picture

13 Oct 2017 - 11:11 pm | मार्मिक गोडसे

मी त्यांच्या पातळीवर येऊ शकत नाही.
तुम्ही तर माझी लायकी काढली, पगार काढला, लाडाने उपटसुंभही म्हणाले. एकदा नव्हे तर दोनदा नथुराम नावाने संबोधले , हे सर्व कोणत्या पातळीवर केले?

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Oct 2017 - 2:41 pm | श्री गावसेना प्रमुख

खरे साहेब पिसाळलेल्या कुत्र्याला बघुन तुम्ही जवळ जाता कि त्याच्यापासुन लांब जातात हो.ह्यांच्यासारख्या (संपादित) लोकांना भ्रष्टाचार चालतो पण पुढच्या भविष्यासाठी घेतलेले निर्णय चालत नाहीत.हे लोक्स खाजगी व्यापार्या कडे कपडे सोडुन येतील पण ह्यांना पेट्रोल चे भाव कमी पाहीजे, देवदर्शना साठी रात्र भर उभे राहतील पण बँकेच्या लायनीत ह्यांचे सांधे दुखायला लागतात.

ओम शतानन्द's picture

13 Oct 2017 - 6:34 pm | ओम शतानन्द

मी मुंबईत राहतो. मला मागील नोटाबंदी चा काहीही त्रास झाला नाही . मी २,3 महिन्यात मुंबई किंवा डोम्बिव्लीच्या ज्या ज्या ATM मधून बँके मधून पैसे काढले तिथे रांग होतीच पण पैसे पैसे करीत कुणी गतप्राण किंवा मूर्च्छित झाल्याचे पाहायला मिळाले नाही , माझ्याकडे ज्या जुन्या नोटा होत्या - बर्याच होत्या - त्याही बँकेत भरायला दर वेळी साधारण १५ ते २० मिनिटे रांगेत उभे राहलो , पण तेथेही कुणी चक्कर येऊन पडला, attack ने मेला असे बघायला मिळाले नाही.
एक मनात शंका येते की सिनेमा , concert इ तिकिटाच्या रांगेत, रेल्वे रिझर्वेशन रांगेत,मंदिरात , अन्य अनेक ठिकाणच्या रांगेत माणसे खूप वेळ उभी राहतात ,पण कुणीही मेल्याचे ऐकले नाही . पण नोटा बंदीच्या काळात अचानक माणसे कशी काय मरू लागली ?

ओम शतानन्द's picture

13 Oct 2017 - 6:39 pm | ओम शतानन्द

नोटा बंदी रद्द करून पुन्हा ५०० , हजार च्या नोटा चलनात आणल्या तर ???? सर्व प्रोब्लेम संपतील

थॉर माणूस's picture

13 Oct 2017 - 9:00 pm | थॉर माणूस

हा निष्कर्ष कुठून काढलात आता? इतके उद्विग्न होऊ नका होऊ हो. माझ्या माहितीत तरी कुणीही नोटा रद्द करण्याला विरोध केला नव्हता. उलट विरोध हा ज्या पद्धतीने ती राबवली गेली त्याला झाला होता. बर्‍याच लोकांना २००० ची नोट आणणेसुद्धा आवडले नव्हते. यावर भरपूर चर्चा झाली असल्याने इथे उगाच फाटे फोडण्यात अर्थ नाही.

ट्रेड मार्क's picture

13 Oct 2017 - 9:46 pm | ट्रेड मार्क

काय सांगता? कोणीच नोटबंदीला विरोध केला नव्हता? लोक अमर्त्य सेन, ममो सिंग, रघुराम राजन आणि जो कोणी विरोध करेल त्याचे दाखले देऊन विरोध करत होते.

ट्रेड मार्क's picture

13 Oct 2017 - 9:41 pm | ट्रेड मार्क

मोदींनी सरकार बरखास्त करावं. तसंही लोक मोदींना वैतागलेले असल्याने परत निवडून येणार नाहीतच. मग राहुल गांधी, ममो सिंग, ममता दीदी, मायावती, लालू, थरूर, दिग्विजय, केजरीवाल ईई लोकांपैकी जो नवीन पंप्र होईल त्याने सगळी नोटबंदीच रद्द करावी. म्हणजे पैसाच पैसा उपलब्ध होईल. सर्वांना आधी न मिळालेले १५ लाख वाटतं येतील. काय म्हणता....

नवीन सरकारने गेल्या ३-४ वर्षातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी आधारची सक्ती रद्द करावी, सबसिडी जी परस्पर खात्यात जमा होते ती पण प्रोसेस परत जाण्यासारखी करावी, समस्त जनतेला गॅस, धान्य, भाजीपाला वगैरे सगळंच सब्सिडाइज्ड रेट मध्ये किंवा फुकट देऊन टाकावं, सर्व एजंटांना व दलालांना मानाने परत बोलावून मुक्तपणे काम करण्याची मुभा द्यावी, काळाबाजारवाल्यांना पुनःप्रस्थापित करावे आणि गेल्या ३ वर्षात झालेले त्यांचे नुकसान भरून द्यावे. राफाएल, बुलेट ट्रेन, सध्याची रेल्वे सुधारण्यासाठी चालू असलेले काम, नद्या जोड प्रकल्प ई सर्व बंद करून टाकावे. ज्या बांग्लादेशींना भारताबाहेर काढलं होतं त्यांना सन्मानाने परत बोलावून त्यांना आणि रोहिंग्यांना भारताचे नागरिकत्व बहाल करावे. काश्मीरमधील शांतताप्रिय तरुणांना दगडफेकीचे प्रशिक्षण द्यावे तसेच दगडांचा पुरेसा पुरवठा सतत चालू राहावा यासाठी निविदा मागवाव्यात, त्याचबरोबर सैनिकांना पॅलेट गनच काय खेळण्यातलीही बंदूक या काश्मिरींवर रोखण्यास बंदी करावी. पाकिस्तानने कितीही हल्ले केले तरी त्यांच्याबरोबर शांततेची बोलणी करत रहावं. पाकिस्तान आणि चीनला त्यांना पाहिजे तो भूभाग देऊन टाकावा.

मी स्वता २०१४ मधे मोदीजीन्ची एवढी चाहती नव्हते!
पण ८ नोवेम्बेर २०१७ नन्तर झाले.. बेअक्कल भारतीयाना सरळ करायला एक हुकुम् शहाच हवा असे आपले माझे मत.
इन्दिरा गान्धी यासाठी आवडायच्या... पण त्यान्चे communist आणि मुस्लिम लान्गुलचालन आवडायचे नाही

आत्ता देखिल भारताचा पन्तप्रधान हा धर्म व जातीपलीकडे जाउन देश म्हणुन सर्वाना एकत्र आणणारा हवा असे अत्यावश्यक असताना
देशप्रेम या शब्दाची लोक थट्टा करतात.

भारतीयाना (सामान्य माणसाला) जगायला कसलितरी kick लागते, मग जात, धर्म, प्रान्त यापेक्शा देशप्रेमाची हाक बरी...

अहमदाबादला रहाणार्या माझ्या नातेवाइकान्कडुन तर positive feedback मिळाला मोदीनबद्दल (२ वर्षान्पुर्वी झाले होते बोलणे)

भारताचा पन्तप्रधान हा अस्सल भारतीय असावा, त्याने सर्व धर्माना समान वागवावे...व अतिरेकी आणि आततायी धार्मिक विचारधारान्चा नायनाट करावा..

आज मी एक भारतीय स्त्री जे स्वातन्त्र्य उपभोगते आहे ते माझ्या पुढच्या पिढ्याना देखिल मिळावे.

जेव्हा लोक बागुल्बुवा करतात परत मनुस्रुतितल्या वाइट प्रथा आचरणात येतिल, तर कस शक्य आहे ते? हिन्दु लोक सुधारलेले आहेत
पण मुसलमान राज्य/लान्गुल्चालन मात्र नको कारण त्यान्चा धर्म इतर धर्मियाना सम्पवायला सान्गतो..

तेव्हा लोकानो उगिच कशाला मोदीन्च्या नावाने गळे काढताय?