विनायक प्रभू, एक समुपदेशक....

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in काथ्याकूट
14 Oct 2008 - 10:06 am
गाभा: 

रविवार, दि. १२.१०.२००८ रोजी प्रभू साहेबांनी माझ्या घरी येउन इ. १२वी तील माझ्या मुलासहीत काही विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पद्धती विषयी समुपदेशन केले.

प्रत्येक विद्यार्थी हा बुद्धिमत्तेत वेगवेगळ्या पातळीवरचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे आकलन करुन त्यानुसार त्यांनी प्रत्येकास मार्गदर्शन दिले.

त्यांचे समुपदेशन हे कोठेही क्रिप्टिक नव्हते. विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात ते होते.

उत्तम विद्यार्थी निवडुन त्यांच्या कडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेणारे मार्गदर्शक अनेक आहेत. ते वृत्तपत्रादि माध्यमात झळकतात.

परंतु, प्रभू साहेबांचे वैशिष्ट्य असे की हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या समस्या समजून मार्गदर्शन केले, ह्यात माझ्या मुलासारखा सामान्य विद्यार्थी होता तसेच काही उच्चपातळीवरचे विद्यार्थीही होते. आता पर्यंत त्यांनी विविध स्तर व बुद्धिमत्तेच्या विद्यार्थांना मार्गदर्शन केल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

समुपदेशनातुन पुढे आलेले काही मुद्दे:

१. समुपदेशनाच्या २-१/२ तास चाललेल्या कार्यक्रमात किमान एका पालकाचा सहभाग प्रभूसरांनी अनिवार्य ठेवला होता.

२. आम्हा उभयतां सहीत अनेक पालकांना, पाल्याच्या अभ्यासा विषयी बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या. केवळ प्रथितयश क्लासमधे पाल्याला पाठवुन भागत नाही, तर त्याची अभ्यासाची समुळ पद्धत बदलणे आवश्यक आहे हे जाणवले. मुलांच्या अभ्यासाच्या पद्धतीवर तसेच, घरातील एकंदर वातावरणाचा मुलाच्या कामगिरीवर काय परीणाम होतो, ते जाणवले.

३. हल्लीचे क्लास चालक व शिक्षक अतिशय जागरूक आहेत. ते आपल्या क्लासच्या नांवाला जपतात. तरिही, पाल्य व पालकांच्या भिडस्तपणा मुळे, पाल्यास अनेकदा योग्य मार्गदर्शना पासुन वंचित रहावे लागते. त्यामुळे क्लासला भरलेल्या पैशाच्या बदल्यात योग्य मार्गदर्शनाला पाल्य मुकतो. असेहि प्रश्न प्रभूसरांनी उपस्थित केले. पैसे भरल्यावर पाल्य तसेच पालकांची जबाबदारी संपत नसुन ती सुरु होते. आपला पाल्य योग्य प्रगती करीत नसेल तर, त्या त्या विषयांच्या शिक्षकांकडून जास्तीचे मार्गदर्शन आपला पाल्य मिळवतो का? एखादा शिक्षक जर मुलांना दाद देत नसेल तर पालक अशा शिक्षकाला भेटतात का? असे अनेक प्रश्न नव्याने उभे राहीले.

४. समुपदेशनातुन जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, मुलाच्या अभ्यासाच्या पद्धती विषयी नियोजन फार आधी म्हणजे शालेय जीवन सुरू झाल्या बरोबर व्हावयास हवे. इयत्तेनुसार त्यात वेळोवेळी योग्य बदल होणे आवश्यक आहे. इ. १०वी बोर्डाला वापरलेली अभ्यासाची पद्धत, इ. ११वी पासुन अमुलाग्र बदलायला हवी हे पाल्य व पालकांना जाणवत नाही. त्या वर उजेड पडला.

५. कोणीही व्यक्ती साधारणतः ४५ मि. हुन जास्तकाळ एकाग्रतेने कार्य करु शकत नाहि. ह्या ४५ मि. नंतर किमान १५ मिनिटे विश्रांती आवश्यक आहे. विध्यार्थ्यांनाही हा नियम लागू होतो. त्यामुळे माझा पाल्या ३-४ तास सतत अभ्यास करतो, हे सत्य नव्हे. किंवा पालकांनी पाल्यावर तशी सक्ती करणेही चुक आहे.

६. केवळ वाचन नव्हे तर लेखन केल्याशिवाय अभ्यासीलेला मुद्दा नीट कळत नाही. त्यामुळे लेखन आवश्यक.

हे सारे मिपावर लिहिण्यामागे, प्रभूसरांचे आभार मानणे हा हेतू नाही. मला ते शक्यही नाही. मिपा ह्या संकेतस्थळावर केवळ सभासदच नव्हे, तर अनेक लोक भेट देतात. अलीकडे वृत्तपत्रेही मिपाची दखल घेउ लागली आहेत. ह्या लेखनाद्वारे प्रभूसरांचे कार्य बहुतांपर्यंत पोहोचवणे, तसेच प्रभूसरां सारखे अनेक मार्गदर्शक पुढे यावेत असे काही हेतु आपल्यापुढे मांडण्यासाठी हे लेखन करीत आहे.

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Oct 2008 - 10:39 am | टारझन

हे सारे मिपावर लिहिण्यामागे, प्रभूसरांचे आभार मानणे हा हेतू नाही. मला ते शक्यही नाही. मिपा ह्या संकेतस्थळावर केवळ सभासदच नव्हे, तर अनेक लोक भेट देतात. अलीकडे वृत्तपत्रेही मिपाची दखल घेउ लागली आहेत. ह्या लेखनाद्वारे प्रभूसरांचे कार्य बहुतांपर्यंत पोहोचवणे, तसेच प्रभूसरां सारखे अनेक मार्गदर्शक पुढे यावेत असे काही हेतु आपल्यापुढे मांडण्यासाठी हे लेखन करीत आहे.

सहमत ...

प्रभुसाहेब मुलांना क्रिप्टिक वापरत नाहीत ही फार मोठी गोष्ट आहे .
नाय तर पोरं मनोरुग्न विभागात दिसली असती (ह घ्या)
सर किप इट अप ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

घाटावरचे भट's picture

14 Oct 2008 - 2:20 pm | घाटावरचे भट

टारुबाबांशी सहमत!!!! भावी वाटचालीसाठी (की वाढदिवसानिमित्त? :-?) प्रभूसरांना (क्रिप्टिक) शुभेच्छा!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

कलंत्री's picture

14 Oct 2008 - 7:23 pm | कलंत्री

प्रभू सर हे आमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील का? असा प्रश्न मनात आला.

संजय अभ्यंकर's picture

14 Oct 2008 - 11:25 pm | संजय अभ्यंकर

तारिख वर दिलेली आहे.
स्थळ: बोरीवली, मूंबई.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

14 Oct 2008 - 7:30 pm | भास्कर केन्डे

श्री. संजय,

प्रभु साहेबांच्या प्रत्यक्ष समुपदेशाचे मुद्देसुद उदाहरण दिल्याबद्दल आभार!

विप्रंच्या मागील काही लेखावर काही जिज्ञासू मिपाकरांनी प्रश्न उपस्थित केले होते. जसे की क्रिप्टिक भाषा, समुपदेशन की आणखी काही, वगैरे. त्यांच्या प्रश्नांना/शंकांना या लेखाने उत्तरे मिळतील अशी अपेक्षा.

विप्र सारख्या समुपदेशकांची आपल्या समाजाला फार आवश्यकता आहे. माझे भाचे मराठवाड्यातल्या गावांत असतात. त्यांना विप्रंच्या समुपदेशनाचा लाभा द्यायचा प्रयत्न चालला आहे. पण शाळा/कॉलेजांचे वेळापत्रक, पालकांच्या सुट्या, सण-वार, हे सगळे सांभाळून मुंबईला येणे किती पालकांना शक्य आहे. आणि विप्रंना तरी २४ तासांपेक्षा जास्त वेळ कुठे आहे?

येत्या काळात विप्र सारख्या अनेक समुदेशकांची निर्मिती आपल्या समाजात व्हावी अशी अपेक्षा...

आपला,
(सहप्रवासी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्राजु's picture

14 Oct 2008 - 7:44 pm | प्राजु

प्रभूसाहेबांच्या समुपदेशनावर बरेच ऐकून होते. आज आपण मुद्दे मांडून व्यवस्थित माहिती दिलीत. प्रभू सरांचे मार्गदर्शन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभो हीच इच्छा आहे.
प्रभूसाहेब,
आपल्याकडे असलेल्या या कलेचा आपण जास्तित जास्त विद्यार्थांसाठी उपयोग करून घ्याल ही अपेक्षा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

14 Oct 2008 - 7:47 pm | अवलिया

प्रभु सरांना त्यांच्या कार्यासाठी अनेक शुभेच्छा व दिर्घायुष्यासाठी प्रार्थना

नाना

मुक्तसुनीत's picture

14 Oct 2008 - 8:20 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. प्रभु सरांना अनेकानेक शुभेच्छा. त्यांनी मिसळपाववर येत रहावे ; लिखाण करत रहावे असे वाटते. त्यांच्या लिखाणातून वेगवेगळ्या समस्यांना त्यांनी तोंड फोडले आहे. त्यामुळे येथे अनेक उद्बोधक चर्चा घडल्या आहेत.

प्रभूंच्या कामाची थोडक्यात आणि मुद्देसूदपणे ओळख करून देण्याबाबत संजय अभ्यंकरांचे अनेक आभार.

सहज's picture

15 Oct 2008 - 7:32 am | सहज

प्रभूंच्या कामाची थोडक्यात आणि मुद्देसूदपणे ओळख करून देण्याबाबत संजय अभ्यंकरांचे अनेक आभार.

असेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2008 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रभूंच्या कामाची थोडक्यात आणि मुद्देसूदपणे ओळख करून देण्याबाबत संजय अभ्यंकरांचे अनेक आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2008 - 2:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद.

रेवती's picture

14 Oct 2008 - 8:56 pm | रेवती

संजयजी आपले आभार.
मुद्दा क्र. ४ बद्द्ल एक गोष्ट विचारायची आहे ती अशी कि शालेय जीवनाच्या सुरूवातीपासून अभ्यसाची पद्ध्त कश्याप्रकारे विकसित करावी याबद्दल प्रभू सरांनी काही मार्गदर्शन केले का?

रेवती

संजय अभ्यंकर's picture

14 Oct 2008 - 11:23 pm | संजय अभ्यंकर

ते समुपदेशन इ. १२वी तील विद्यार्थ्यांसाठी होते.
तो २-१/२ तास प्रभू सरांनी केवळ इ. १२वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शना साठी उपयोगात आणला.

समुपदेशन संपल्या नंतर पालकांच्या अनौपचारीक चर्चेत मुद्दा क्र. ४ ही आम्हाला जाणवलेली गोष्ट आहे.

धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

15 Oct 2008 - 7:35 am | चतुरंग

चांगल्या कामाची जाहीर पावती ही ओळख दृढ करते आणि कामाचा विस्तार वाढवते!
विप्र आणि संजयरावांचे अभिनंदन.

चतुरंग

फटू's picture

15 Oct 2008 - 8:01 am | फटू

विप्र ना शुभेच्छा !!!

विप्रना येक रीक्वेश्ट... तुमचा कार्यशेत्र मुंबयपुर्ताच न ठेवता तो आगदी आम्च्या रायगड बियगड मदी पन जाव्दया...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विनायक प्रभू's picture

15 Oct 2008 - 3:34 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आपण पुढाकार घ्या, मी आहेच.

संजय अभ्यंकर's picture

15 Oct 2008 - 9:34 am | संजय अभ्यंकर

प्रतिक्रीयांबद्दल आपल्या सर्वांचे आभार.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/