रविवार, दि. १२.१०.२००८ रोजी प्रभू साहेबांनी माझ्या घरी येउन इ. १२वी तील माझ्या मुलासहीत काही विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पद्धती विषयी समुपदेशन केले.
प्रत्येक विद्यार्थी हा बुद्धिमत्तेत वेगवेगळ्या पातळीवरचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे आकलन करुन त्यानुसार त्यांनी प्रत्येकास मार्गदर्शन दिले.
त्यांचे समुपदेशन हे कोठेही क्रिप्टिक नव्हते. विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात ते होते.
उत्तम विद्यार्थी निवडुन त्यांच्या कडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेणारे मार्गदर्शक अनेक आहेत. ते वृत्तपत्रादि माध्यमात झळकतात.
परंतु, प्रभू साहेबांचे वैशिष्ट्य असे की हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या समस्या समजून मार्गदर्शन केले, ह्यात माझ्या मुलासारखा सामान्य विद्यार्थी होता तसेच काही उच्चपातळीवरचे विद्यार्थीही होते. आता पर्यंत त्यांनी विविध स्तर व बुद्धिमत्तेच्या विद्यार्थांना मार्गदर्शन केल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
समुपदेशनातुन पुढे आलेले काही मुद्दे:
१. समुपदेशनाच्या २-१/२ तास चाललेल्या कार्यक्रमात किमान एका पालकाचा सहभाग प्रभूसरांनी अनिवार्य ठेवला होता.
२. आम्हा उभयतां सहीत अनेक पालकांना, पाल्याच्या अभ्यासा विषयी बर्याच गोष्टी नव्याने समजल्या. केवळ प्रथितयश क्लासमधे पाल्याला पाठवुन भागत नाही, तर त्याची अभ्यासाची समुळ पद्धत बदलणे आवश्यक आहे हे जाणवले. मुलांच्या अभ्यासाच्या पद्धतीवर तसेच, घरातील एकंदर वातावरणाचा मुलाच्या कामगिरीवर काय परीणाम होतो, ते जाणवले.
३. हल्लीचे क्लास चालक व शिक्षक अतिशय जागरूक आहेत. ते आपल्या क्लासच्या नांवाला जपतात. तरिही, पाल्य व पालकांच्या भिडस्तपणा मुळे, पाल्यास अनेकदा योग्य मार्गदर्शना पासुन वंचित रहावे लागते. त्यामुळे क्लासला भरलेल्या पैशाच्या बदल्यात योग्य मार्गदर्शनाला पाल्य मुकतो. असेहि प्रश्न प्रभूसरांनी उपस्थित केले. पैसे भरल्यावर पाल्य तसेच पालकांची जबाबदारी संपत नसुन ती सुरु होते. आपला पाल्य योग्य प्रगती करीत नसेल तर, त्या त्या विषयांच्या शिक्षकांकडून जास्तीचे मार्गदर्शन आपला पाल्य मिळवतो का? एखादा शिक्षक जर मुलांना दाद देत नसेल तर पालक अशा शिक्षकाला भेटतात का? असे अनेक प्रश्न नव्याने उभे राहीले.
४. समुपदेशनातुन जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, मुलाच्या अभ्यासाच्या पद्धती विषयी नियोजन फार आधी म्हणजे शालेय जीवन सुरू झाल्या बरोबर व्हावयास हवे. इयत्तेनुसार त्यात वेळोवेळी योग्य बदल होणे आवश्यक आहे. इ. १०वी बोर्डाला वापरलेली अभ्यासाची पद्धत, इ. ११वी पासुन अमुलाग्र बदलायला हवी हे पाल्य व पालकांना जाणवत नाही. त्या वर उजेड पडला.
५. कोणीही व्यक्ती साधारणतः ४५ मि. हुन जास्तकाळ एकाग्रतेने कार्य करु शकत नाहि. ह्या ४५ मि. नंतर किमान १५ मिनिटे विश्रांती आवश्यक आहे. विध्यार्थ्यांनाही हा नियम लागू होतो. त्यामुळे माझा पाल्या ३-४ तास सतत अभ्यास करतो, हे सत्य नव्हे. किंवा पालकांनी पाल्यावर तशी सक्ती करणेही चुक आहे.
६. केवळ वाचन नव्हे तर लेखन केल्याशिवाय अभ्यासीलेला मुद्दा नीट कळत नाही. त्यामुळे लेखन आवश्यक.
हे सारे मिपावर लिहिण्यामागे, प्रभूसरांचे आभार मानणे हा हेतू नाही. मला ते शक्यही नाही. मिपा ह्या संकेतस्थळावर केवळ सभासदच नव्हे, तर अनेक लोक भेट देतात. अलीकडे वृत्तपत्रेही मिपाची दखल घेउ लागली आहेत. ह्या लेखनाद्वारे प्रभूसरांचे कार्य बहुतांपर्यंत पोहोचवणे, तसेच प्रभूसरां सारखे अनेक मार्गदर्शक पुढे यावेत असे काही हेतु आपल्यापुढे मांडण्यासाठी हे लेखन करीत आहे.
वाचने
5460
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
स ह म त
In reply to सहमत by टारझन
स्थळ आणि काळ लिहिला असता तर,
स्थळ आणि काळ लिहिला असता तर,
In reply to स्थळ आणि काळ लिहिला असता तर, by कलंत्री
आवश्यक
धन्यवाद..
शुभेच्छा
+१
In reply to शुभेच्छा by अवलिया
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
असेच म्हणतो
In reply to +१ by सहज
+१
In reply to असेच म्हणतो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वप्रथम
नाही!
In reply to सर्वप्रथम by रेवती
अरे वा संजयराव छान!
छान...
पुढाकार
In reply to छान... by फटू
आभार!