गोवा पर्यटन जून महिना माहिती

saumitrasalunke's picture
saumitrasalunke in जनातलं, मनातलं
6 Jun 2017 - 1:00 pm

नमस्कार मंडळी,

या आठवड्यात (१० ते १४) कुटुंबासोबत (ज्यात लहान मुले आहेत - वयोगट ३ त ५ वर्षे) गोव्याला (प्रथमच) जायचा विचार आहे.
शाकाहारी सदस्यसुद्धा संख्येने जास्त आहेत. या मोसमात कुठे राहणे योग्य राहील, ४-५ दिवसात कुठे भेटी देता येतील याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. लहानग्यांची मौज होणार असेल तर बजेट लवचिक ठेवायची तयारी आहे.

कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद,
सौमित्र

प्रवासचौकशी

प्रतिक्रिया

गोव्याला मोठ्यांचीच जास्त मौज होते.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 2:16 pm | मुक्त विहारि

एक घंटा म्हणजे १ वर शंभर शुन्ये.

(एकम, दहम, शतं........घंटा)

अश्श नाइ बोलायचं परचुकाका, आमी शगळी गम्मत पातो शिनिमात.

फक्त बायकोला घेवून जाणे... असे माझे मत. (मुंबईत असाल तर, कुटुंबाबरोबर फार तर राणीच्या बागेत जावे आणि पुण्यात असाल तर रेल्वे म्युझियम बघायला.असे माझे मत.)

शिवाय गोव्याला गेलात की दोनच सूत्रे...

१. भाड्याने बाईक किंवा कायनेटिक होंडा घेणे.

२. गोव्याचा रोड मॅप विकत घेणे.

आणि ह्या आधारावरच भटकणे.

मी २-३ वेळा गोव्याला गेलो आहे आणि प्रत्येक वेळी वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी भटकलो आहे.

प्रीत-मोहर's picture

6 Jun 2017 - 7:28 pm | प्रीत-मोहर

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो.समुद्रावर गेलात तर समुद्राकडे जास्त मस्ती करू नका.

बीचेस सोडूनही खूप काही पाहू शकता गोव्यात.
मंदिरं फोंडा तालुक्यात खूप सुंदर अशी, शांतादुर्गा, मंगेश,महालसा यांची देवळं आहेत. शिवाय नेत्रावळीला गेलात तर गोपिनाथाचं देऊळ, बुडबुड तळी आहे. नार्व्याला श्री सप्तकोटीश्र्वराचं देऊळ आहे, श्री रुद्रेश्वर हरवळे , तिथे जवळच पांडवांच्या गुहा म्हणून फामात असलेल्या गुहा आहेत.

नेत्रावळी वाईल्ड लाईफ सेंच्युरी ही फिरु शकता

चर्चेस ओल्ड गोव्याची चर्चेस प्रसिद्ध आहेतच. तिथेच बायपास रस्त्याला हातकात्रा खांब आहे. तिथुनच एक खूप जुनी आणि मोडकळीला आलेली चर्च दिसेल, ही गोव्यातील सर्वात पहिली चर्च होती. नक्की बघा.

अजून काही दिवसांनी दूधसागर ही मनोरम दिसेल.

किल्ले: तेरेखोल, शिवोली(शापोरा), बेती(रेईश मागुश), आग्वाद, काब द राम , हळदोणा इतकेच आठवत आहेत.

अजून आठवल की लिहिते

अनुप ढेरे's picture

7 Jun 2017 - 11:36 am | अनुप ढेरे

काबो द रामा हा किल्ला भारी आहे. त्याला जायचा रस्ता पण बेष्ट! दोनचाकीवरुन हुंदडायला मज्जा येते.

प्रीत-मोहर's picture

7 Jun 2017 - 2:37 pm | प्रीत-मोहर

काब द राम च्या आजुबाजुला खूप सुंदर आणि कमी गर्दीचे बीच आहेत. त्याशिवाय तुम्हाला ईंटरेस्ट असला तर तिथली आजुबाजुची गावं फिरु शकता.

तसच केळशी(queloshi), माजोर्डा हे गाव ही दृष्ट लागण्याइतक्या सुंदर किनारपट्टीचे आहेत.

नोंद घेतली आहे. खूप आभारी आहे.

गोव्याला शक्यतो लहान मुलांना घेवून जावू नये.....

नॉट रियली.

गोव्याच्या किमान पस्तीसचाळीस टूर केल्या आहेत. पोरांसहित सर्वांना मजा करता येते.

बादवे. पावसाळ्यात बीच हट्स ( अगदी वाळूत असलेले रिसॉर्ट) बंद असतात.

पावसाळ्यासाठी एक सजेशन:

http://www.csmgoa.com

पावसाळ्यात गोव्याचं एक वेगळंच अतिसुंदर रुप दिसतं.

saumitrasalunke's picture

7 Jun 2017 - 8:13 pm | saumitrasalunke

http://www.csmgoa.com बद्दल धन्यवाद. गेला दीड वर्ष ४-५ दिवसांची सलग सुट्टी मिळाली नव्हती ती आत्ता मिळाली म्हणून चाललो आहे. ४ दिवस निवांत घालवावेत आणि मुलाला काहीतरी नवीन पाहायला मिळावं (नव्या वास्तू, रस्ते, माणसे, रंग इत्यादी) हा साधा हेतू आहे. हा गोव्याला जाण्याचा सर्वोत्तम ऋतू नाही याची कल्पना आहे मात्र त्यातल्या त्यात जवळ आणि मुंबईहून वेगळा म्हणून गोव्याला जात आहे.

रघुनाथ.केरकर's picture

6 Jun 2017 - 4:18 pm | रघुनाथ.केरकर

त्यामानाने कमी वर्दळ, पावसाळ्यात आता आतला गोयं खुप छान दिसेल, देवळे फिरा एखाद दिवस,

बाकी गोवा म्हणजे फक्त दारु आणी समुद्र एवढाच विचार केला असेल तर मात्र कठीण....

माझ्या मते समुद्र काठच्या गोया पेक्षा आतला इंटीरीयर मधला गोया खुप सुंदर आहे.

दोन एक वर्षापुर्वी कुक्क्ळीहुन पोणजी येताना वाटेत एक चर्च (मिलागर) लागला होता, तसे खुप लाग्तात पण हा विषेश वाटला.... पाउसामुळे काळाकुळकुळीत डांबरी रस्ता अजुन छान दिसत होता, त्या समोर पांढराशुभ्र चर्च त्याच्या डार्क नीळ्या खीडक्या (बार्‍या). मिलागरीच्या बाहेर विकायला ठेवलेला पिवळाढ्म्म्क झेन्डु (गोंडा), त्याशेजारी सुबक मांडणी केलेला एक पिकलेल्या केळ्यांच्या घडांचा स्टॉल, डोक्यावर दाट गडद आभाळ. ती फ्रेम अजुनही मनात साठवुन आहे.

इथे बरेच गोयंकार आहेत ते अधिक छान सुचवतील.

प्रीत-मोहर's picture

6 Jun 2017 - 7:19 pm | प्रीत-मोहर

ते मिलागरी म्हणजे चर्च नव्हे. चर्च ला ईंगर्ज म्हणतात.
मिलाग्रीच चर्च आहे म्हापसात. ही मुळची हिंदु देवता होती तिला बाटवुन ख्रिश्चन केली अशी मान्यता आहे. तिच चर्च अर्ध ख्रिश्चन पद्धतीच आणि अर्ध हिंदु देवळासारखं आहे. तिच्याबद्दल अजून लिहित नाही.

तिच्याबद्दल अजून लिहित नाही. >>>>>> अहो लिहा कि ताई आम्हाला पण माहिती मिळेल, नेहमीच्या गोव्यापेक्षा खरा गोवा फिरायला खूप उत्सुक आहे.

रघुनाथ.केरकर's picture

7 Jun 2017 - 11:27 am | रघुनाथ.केरकर

मला वाटत होतं की मिलागरी म्हणजे चर्च.....

पण ईंगरज हा शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.....

ह्यावर पण लीहा की.

छान वाटलं. नोंद घेतली आहे. खूप आभार.

कृपया तुमचा ई-मेल आयडी द्या. ३-४ दिवसात पॕकेज पाठवतो.

मला तर गोव्यात दोनच बीच आवडतात, एक म्हणजे आरंबोल हा जो महाराष्ट्र गोवा हद्दीवर आहे. आणि दुसरा पालोलीन बीच जो गोवा कर्नाटक हद्दीवर आहे, तिथे फॉरेनर पर्यटक च ८०% असतात आणि आपले भारतीय पर्यटक खूपच कमी असतात त्यामुळे डोळ्याचे "पारणे फिटते" व गोवा ट्रिप केल्याचे सार्थक होते पण ह्या पावसाच्या दिवसात काय मजा नाही तिथे....

रघुनाथ.केरकर's picture

7 Jun 2017 - 2:52 pm | रघुनाथ.केरकर

हरमळ च्या शेजारी अजुन एक कमी वर्दळीचं बिच आहे ते म्हणजे केरी (माझं मुळ गाव). केरी हुन फेरी बोटीने तेरेखोल ला जाता येते, तेथे तेरेखोल किल्ला आहे.
बर केरीच्या सड्यावर ( डोंगरावर पॅराशूट वाले पण असतात. पण पावसात शक्यता कमीचाहे.

मित्रहो's picture

8 Jun 2017 - 9:52 am | मित्रहो

आम्ही मार्च महिन्यात साउथ गोव्यात होतो. बीचेस, चर्च (ओल्ड गोवामधले मोठे प्रसिद्ध चर्च) मंदिरे आणि नातेवाइक येवढेच केले. मंगेशी आणि शांता दुर्गा दोनही मंदिरे खूप सुंदर आहेत. दोनही चर्च आधी बघितले होते. यावेळेला गर्दी कमी होती त्यामुळे जेंव्हा से कॅथेड्रील चर्चच्मया आत गेल्यावर जाणवले का चर्च केवढे भव्य आहे.