आम्ही मराठी

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
11 Oct 2008 - 9:32 pm

शिवसेनेचा दसरा सोहळा निमित्ताने छोटा डॉन यांनी लिहीलेल्या लेखा वर अनेकांनी उद्धव आणि राज यांनी एकत्र काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या सर्वांसाठी ही कविता समर्पित........!

त्यांने करून ताठ कणा
हुंकारला मराठी बाणा
झक मरून मग याने
केला मराठी बहणा

दे माय धरणी ठाय
दुभंगली माझी
मराठी माय
सूचत नाही
करू मी काय......?

अरे! रक्ताची नाही..
पण ..मराठीची तरी चाड ठेवा..!
एक व्हा.. बाबांनो.. एक व्हा..!!

सोडा अहंकार ..घ्या तलवार...
एकच मूठ ..एकच वार...
होईल का असा चमत्कार....?

महाराष्ट्राला म्हणे ..
दूहीचा शाप
अरे खोडा बाबांनो..
खोडा हे साफ..

चला आपण नवे गीत गाउया
मी मराठी नव्हे..आम्ही मरठी म्हणूया...!

कविताप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

प्राजु's picture

11 Oct 2008 - 10:47 pm | प्राजु

एकदम आवडली कविता..
ही कविता तुम्ही एखाद्या पेपरमध्ये प्रकाशित करा. कदाचित ती वाचून तरी दोघे एकत्र येण्याचा प्रयत्न करतील.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कलंत्री's picture

12 Oct 2008 - 9:24 am | कलंत्री

अश्या कवितेने अथवा लेखाने कोणाचेही मतपरीवर्तन होत नसते. आहे तितकेच वैर राहुद्या.

माणसामध्ये उपजतच अथवा प्रसंगोपात्त चांगुलपणा असता तर, औरंगजेबाने आपल्या भावांची कत्तल केलीच नसती...सर्व भावांनी एकत्र येवुन भारताला मोगलांच्या वर्चस्वाखाली आणले असते. ध्येयवाद अथवा आदर्शाला एक जागा आहे. राज अथवा उद्धव वेळ आली तर एकमेकांच्या उरावरही बसु शकतात... हेच शिवाजी / पिलाजी भोसले, संभाजी / राजाराम, सातारा / कोल्हापुरची गादी या सर्वांना लागू पडते...

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Oct 2008 - 9:12 am | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 10:35 am | विसोबा खेचर

झक मरून मग याने
केला मराठी बहणा

हा हा हा! हे अगदी खरं! राजने मराठीचा आणि मराठी माणसाचा पुनरुच्चार केल्यावर आपली मराठीची पोळी राज पळवेल की काय अशी भिती वाटली असेल उद्धवला! :)

आपला,
(मराठीची पोळी भाजून सत्तेवर आलेली शिवसेना कालांतराने मराठी माणसाला विसरली असे मत असणारा) तात्या.

महाराष्ट्राला म्हणे ..
दूहीचा शाप

सहमत आहे... :)

रत्नांग्रीतली काणे वकिलांच्या तीन पिढ्या आमच्याच भाऊबंदकीवर गब्बर झाल्या आहेत! :)

(गेली तीन पिढ्या, मुंबईच्या हायकोडतात आंब्यावरून अन् बांधावरून चुलत्यांशी लढणार्‍या वडलोपार्जित परंपरेतला!) तात्या देवगडकर.

मराठी आंतरजालवरदेखील भाऊबंदकी आणि दुही माजली म्हणूनच आम्हाला "दुसरं संस्थळ काढून तुझी मोनॉपॉली संपवीन, तरच नावाचा तात्या अभ्यंकर..!" अशी घोषणा करून मिपा काढावे लागले! :)

आपला,
(वेगळी चूल मांडण्याच्या कोकणी भाऊबंदकीच्या परंपरेला जागलेला!) तात्या देवगडकर.

कलंत्री's picture

12 Oct 2008 - 1:12 pm | कलंत्री

मराठी आंतरजालवरदेखील भाऊबंदकी आणि दुही माजली म्हणूनच आम्हाला "दुसरं संस्थळ काढून तुमची मोनॉपॉली (वर्चस्व ) संपवीन, तरच नावाचा तात्या अभ्यंकर..!" अशी घोषणा करून मिपा काढावे लागले! Smile

तात्या,

आपण फारच रंजक माहिती दिली आहे, आमच्या सारख्या लोकांना आपण यापुढेही जाऊन मिपा निर्माण करताना काय अडचणी आल्या, सहकार्य आणि दुस्वास कसा सहन करावा लागला याबाबत लिहिले तर तो एक ऐताहासिक ठेवा निर्माण होईल.

आपल्या बखरीची वाट पाहत आहे

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 2:46 pm | विसोबा खेचर

आपण यापुढेही जाऊन मिपा निर्माण करताना काय अडचणी आल्या, सहकार्य आणि दुस्वास कसा सहन करावा लागला याबाबत लिहिले तर तो एक ऐताहासिक ठेवा निर्माण होईल.

सहकार्य निश्चितच मिळालं, अगदी अनेकांचं मिळालं! त्यांच्याच जिवावर तर मिपा आजही उभं आहे..

आणि दुस्वास? अरे यार पुछो मत! तो तर अजूनही होतो आहे! :)

ही पाहा कुणा एका मनोगतीची ताजी गरळ...:)

चालायचंच! :)

कलंत्रीसाहेब, तरीही एखाददा सवडीने केव्हातरी आपल्या आग्रहाखातर बखर लिहिनच.. :)

आपला,
(विरोधकांचे बारसे जेवलेला बखरकार) तात्या.

आपल्या प्रतिक्रिया माझ्या कविते पेक्षा झकास असतात
त्या वाचण्यासाठी मला रोज एक नवी कविता (लिहा )व्यायला लागते

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 2:48 pm | विसोबा खेचर

आपल्या प्रतिक्रिया माझ्या कविते पेक्षा झकास असतात
त्या वाचण्यासाठी मला रोज एक नवी कविता (लिहा )व्यायला लागते

अरे वा! मग चांगलंच आहे की! तुम्ही उत्तमोत्तम काव्ये लिहिलीत तर उत्तमोत्तम प्रतिसाद द्यायला हा तात्या कधीच चिंधीचोरी करणार नाही! :)

तात्या.