नावात (असे) काय आहे?

भोचक's picture
भोचक in काथ्याकूट
11 Oct 2008 - 6:36 pm
गाभा: 

मराठीत लिहिताना काही गावांची किंवा काहींची नावं, आडनावं तशी का लिहितात हा प्रश्न पडतो. उदा. हिंदी भाषेत 'ळ' नाहीये तरीही भोपाळ असं आपण का म्हणतो? आख्ख्या हिंदी प्रदेशात ग्वालियर म्हणतात मग आपणच ग्वाल्हेर का म्हणतो? बडोद्याला तिथे वडोदरा म्हणतात. मग आपणच बडोदा का म्हणतो? शंकर दया'ळ' शर्मा कसे होईल? मग 'कमल' किशोर कदमचे 'कमळ' किशोर कदम असे का लिहिले जात नाही? अशी बरीच उदाहरणं देता येतील. तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

11 Oct 2008 - 8:43 pm | सखाराम_गटणे™

नावात बरेच काही आहे,
समजा, शेक्सपियरच्या बायकोने शेक्सपियर येबजी माझे नाव लावले तर शेक्सपियर ला चालेल का?

-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
:)

टारझन's picture

13 Oct 2008 - 5:45 pm | टारझन

समजा, शेक्सपियरच्या बायकोने शेक्सपियर येबजी माझे नाव लावले तर शेक्सपियर ला चालेल का?
गटण्या त्या साठी तुला तुझं नाय "सॅखी गंटलमन" करायला हवं .
"जेन शेफर्ड डॅव्हेनंट" हे तिचं नाव .. आता तुच पहा ... जेन सखाराम गटणे कसं वाटतं ?आणि त्याच्या बायकु नं तुझं नाव लावलं असतं तर अंमळ खुष होउन त्याने तुझ्यावर १-२ कादंबर्‍या लिहील्या असत्या . ...
"टु बी ऑर नॉट टू बी " हा प्रश्न त्याच्या पोरांना पडला असता हे वगळंच

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

अवलिया's picture

13 Oct 2008 - 5:49 pm | अवलिया

समजा, शेक्सपियरच्या बायकोने शेक्सपियर येबजी माझे नाव लावले तर शेक्सपियर ला चालेल का?

अरे गटण्या त्याच्या बायकोने फक्त तुझे नाव लावले अन बाकी कामाला शेक्सपिअरलाच धरले तर तुला चालले असते का याचा पण जरा विचार कर.

अंमळ लहानच आहेस. नावात काही नसते रे बाबा... नाव काढुन टाक सगळ सारखच.
मग माधुरी असो की हेमा की रेखा की ऐश्वर्या की प्रियांका की मागल्या गल्लीतील गंगी..सेम टु सेम

कधी कळणार या पोराला?

जैनाचं कार्ट's picture

15 Oct 2008 - 3:33 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>कधी कळणार या पोराला?

=))

नायच कळणार... अजून लहान आहे बाळ्या :D

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2008 - 12:05 am | पिवळा डांबिस

अंमळ लहानच आहेस. नावात काही नसते रे बाबा... नाव काढुन टाक सगळ सारखच.
मग माधुरी असो की हेमा की रेखा की ऐश्वर्या की प्रियांका की मागल्या गल्लीतील गंगी..सेम टु सेम
कधी कळणार या पोराला?

गटण्या, लेका, गेले सहा म्हयने क्लासला येतोयस आणि अजून इतकंपण कळत नाही? गॄहपाठ वेळच्यावेळी केला असतास तर अशी वेळ आली नसती!! अरे बाबा, आपल्या क्लासचं नांव बदनाम नको करू!!:)

बाकी नांवात राडा तर विचारू नका. आमचं नांव, शिलेस, शॅलिस, च्यॅलिस (हे खास लुईझियानामधंलं केजन नांव!) सायलीस, शेलेस!!!!
राज्य बदललं की नांव बदलतं!!!
कधीकधी वाटतं की आपलं नांव बदलून नील, आदि, तेज असं काहीतरी सोपं (पक्षी या मठ्ठांच्या डोक्यात फिट होणारं!!!) नांव घ्यावं!
माझ्या एका मराठी मित्रानं खरंच आडनांव बदललं!! त्याचं मूळ आडनांव होतं, "दिक्षित"! किती छान नांव आहे की नाही! पण इथल्या लोकांनी त्याचं केलं "डीप्-*ट"!!! आणि वर एक मिस्किल हसू!! वैतागला बिचारा!!!
आणि एक गंमत! आमच्या बायकोला नेहमी प्रश्न विचारला जातो...
"तुझं मेडन नेम (मधलं नांव) आणि तुझ्या नवर्‍याचं फर्स्ट नेम सारखंच कसं? तुमच्यात पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी नांवं नाहियेत का?"
आता बोला...

धमाल मुलगा's picture

16 Oct 2008 - 9:56 am | धमाल मुलगा

बाकी नांवात राडा तर विचारू नका. आमचं नांव, शिलेस, शॅलिस, च्यॅलिस (हे खास लुईझियानामधंलं केजन नांव!) सायलीस, शेलेस!!!!
राज्य बदललं की नांव बदलतं!!!

मग आमचं कसं व्हायचं? 'कैवल्य विश्वास देशमुख' ह्याची प्रत्येक राज्यात कशी आणि किती वाट लावतील हे लोक?

त्याहुन गंम्मत, जर एखादा 'हव्यवाहन प्रद्युम्न क्षीरसागर' तिकडे आला तर त्याच्या नावाचं काय भजं होईल हो?

पण इथल्या लोकांनी त्याचं केलं "डीप्-*ट"!!!

=))
ह्यामुळेच माझा मावसभाऊ त्याच्या नावाचं स्पेलिंग Dicksheet करायला लागला आणि त्याला भयानक पश्चाताप झाला !

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 9:08 am | विसोबा खेचर

भोचकगुरुजी,

आपला मुद्दा रास्त आहे.

शिवाय जिथे 'ळ' च्या ऐवजी 'ल' आहे ते हिंदी उच्चार जसे छान वाटताततसे 'ळ' असलेले मराठी उच्चार छान वाटत नाहीत..

भोपाल आणि ग्वालियर म्हणताना जो गोडवा वाटतो तो भोपाळ आणि ग्वाल्हेर म्हणताना वाटत नाही! अगदीच मराठी वाट्टात बॉ ते उच्चार आणि त्यातला ढंग निघून जातो..! :)

आपला,
(ग्वालियरप्रेमी) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Oct 2008 - 5:12 pm | llपुण्याचे पेशवेll

जुन्या काळातही मराठी माणूस महाराष्ट्रातून बाहेर पडून कर्तृत्व गाजवित होता. आठवा हिमालयात रुपकुंडावर सापडलेली ८ व्या शतकातील गोठलेली प्रेते.
हैद्राबादेच्या प्रयोगशाळेत डी एन ए चाचणी केल्यावर असे लक्षात आले की ते लोकांचे डी एन ए महाराष्ट्रातल्या कोकणस्थांची साम्य सांगणारे होते. तिथे मिळालेले इतर पुरावे म्हणजे कोल्हापूरी चप्पल जी हे निर्देशित करते की कोल्हापूरी चप्पलेची निर्मीती ८ व्या शतकापासून चालू आहे आणि या लोकांनी ती महाराष्ट्रातूनच ती चप्पल घेतली असावी. आता अशाप्रकारे मराठी लोक सर्वदूर फिरत असल्याने त्यानी त्या गावांची नावे स्वतःच्या भाषेत ठेवणे अगदी साहजिकच आहे.
उदा. इंदूर (हिंदी उच्चार इंदौर), पतियाळा (पटियाला), झाशी (झाँसी)

आता झाशीच्या राणीला 'झाँसी की रानी' म्हणा बरे. साला मराठमोळा ढंगच निघून गेला त्यातला. ग्वाल्हेरचे शिंदे ऐवजी 'ग्वालियार के सिंधिया' म्हणा गेला की नाही मराठमोळा ढंग निघून त्यातला?
त्यामुळे ळ च्या ऐवजी ल आवडणे मला तरी जरा वैयक्तिक आवडीचाच भाग वाटतो.

(भांडारकर ला 'भंडारकर' म्हणणार्‍या भैयांवर सटकणारा)
पुण्याचे पेशवे

प्रमोद देव's picture

12 Oct 2008 - 10:18 am | प्रमोद देव

सर्वसाधारण लोक आपल्याला जसे जमेल तसेच उच्चार करतात. ते चूक की बरोबर ह्याची तमा बाळगत नाहीत. असे उच्चार हळूहळू रूळत जातात आणि मग नेमके उच्चार काय? ह्याबद्दल कधी प्रश्न उभा राहीलाच तर मग खूपच मजेदार गोष्टी नजरेसमोर येतात.
कैक वेळेला तर लोक खरा आणि नेमका उच्चार काय आहे हे सांगितल्यावरही आपल्या तोंडात रुळलेला उच्चार बदलत नसतात.
उदा.एकच नाव आणि त्याचे विविध भाषिक उच्चारः
१)मराठीत...सचिन तेंडूलकर...आपल्या दृष्टीने हा योग्य उच्चार आहे.
हिंदीत ....सचिन तेंदूलकर(ह्या लोकांना ड म्हणायला का त्रास होतो कळत नाही)
इंग्लीशमध्ये असंख्य नमुने आहेत.....ब्रिटीश,ऑस्ट्रेलियन्,वेस्ट इंडीयन वगैरे... १)सॅशिन तेंडोलक(र अनुच्चारित)
सॅचिन तेंदूलकर, साचिन तेंडोलकर्..वगैरे वगैरे.
२) सुनील गावसकर
सुनील गवासकर,सुनील गॅवस्क,सुनाईल गॅवास्कर्.......असे काहीही उच्चार ऐकून घ्यायची तयारी ठेवावी लागते.
पुलं देशपांडे ह्यांनीच त्यांच्या अपूर्वाई मध्ये 'देशपांडे' ह्या त्यांच्या आडनावाचे ऐकलेले विविध उच्चार सांगितलेत, ते वाचले की कळते की सर्वसाधारणपणे कोणत्याही देशातले,भाषेतले लोक आपल्याला जसे जमेल तसेच उच्चार करत असतात. चूक की बरोबर ह्याची क्षिती ते बाळगत नाहीत. नेमका काय उच्चार आहे हे समजून घेऊन तसा उच्चार करणारे वा तसा प्रयत्न करणारे मात्र विरळाच .

अशी असंख्य गमतीदार उदाहरणे नेहमीच्याच जगण्यात आपण पाहतच असतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2008 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी कागदोपत्री संहिता, पण सायबाच्या देशात "सन्हिता" झाले. सुरुवातीला त्यांची चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, नंतर दगडावर डोकं आपटणं सोडून दिलं. आपल्या लोकांना तरी कुठे नीट संहिता म्हणता येतं असं स्वतःला समजावलं, आणि आता इंग्लीशमधे स्वतःची ओळख करून देताना माझ्याही तोंडात "सन्हिता"च येतं.
नावात काय आहे, माझ्या नावाने कोणी मला हाक मारत असेल आणि मलाच ते कळलं नाही तर मोठ्ठं अगदी "राजे भोसले" नाहीतर "महाराणी जोधाबाई" नाव जरी असलं तरी फायदा काय?

देवदत्त's picture

12 Oct 2008 - 9:35 pm | देवदत्त

माझे ही नाव 'देवदत्त (इंग्रजीतः Devdatta)' उच्चारताना अमेरिकेन लोक वेगवेगळ्या प्रकारे उच्चारतात. त्यांच्यात बहुधा 'द' न वापरता 'ड'च वापरतात. त्यामुळे नेहमी डेवडाटा, डेव्डट्टा, डेवडॅटा असेही ऐकायला मिळायचे. माझ्या लहानशा अमेरीकावारीत क्लायंटच्या कार्यालयात मला ओळखपत्र मागविण्याकरीता दररोज त्यांना माझे नाव सांगावे लागत. त्यात त्यांचा उच्चार ऐकून माझा स्वतःचा माझ्या नावाचा उच्चार बदलतो की काय असे वाटले होते. :)

एकदा एका मित्रासोबत D&G संबंधी काहीतरी बोलणे चालू होते. तेव्हा मी G म्हणजे गॅबन्ना असे म्हणालो. तर मित्र म्हणाला, "ते 'गबाना' आहे.". मी म्हणालो," असेल. तेही कुठे माझे नाव बरोबर उच्चारतात?" ;)

देवदत्त's picture

12 Oct 2008 - 9:34 pm | देवदत्त

'ळ' चा मुद्दा पटला.
बाकी उच्चार आणि अपभ्रंश हेही कारणे असू शकतात.

प्राजु's picture

12 Oct 2008 - 9:45 pm | प्राजु

माझं संपूर्ण नाव उच्चारणं या म्हणजे या अमेरिकनांसाठी शिक्षा असते..दवाखान्यांमध्ये नाव पुकारताना हमखास नावाचं डिसेक्शन होतं..
प्राजक्ता जगदीश पटवर्धन... याचा उच्चार प्रजॅक्टॅ जॅगडीश पॅटवॅरडॅन... असा होतो . कान्ट हेल्प ईट..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

12 Oct 2008 - 10:17 pm | घाटावरचे भट

हम्म... हे विदेशी लोक 'घाटावरचे भट' कसे म्हणतील बरे :-?
माझ्या खर्‍या नावाची तर हे लोक इतकी वाट लावतात, की विचारता सोय नाही....बाय द वे माझं आडनाव भट नाहीये बरं का!!! :P

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

भडकमकर मास्तर's picture

13 Oct 2008 - 1:38 am | भडकमकर मास्तर

चायना ला मराठीत चीन असं का म्हणत असावेत?
इजिप्त ला हिन्दीत मिस्र ( की असंच काहीतरी ) म्हणतात ते का?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

13 Oct 2008 - 10:12 am | धनंजय

का म्हणत असावेत...

त्या देशाचे तेथील भाषेत नाव मिस्र असे आहे. पण कही युरोपियन भाषांमध्ये नाव ईजिप्त असे आहे.

चीन, रूस वगैरे इंग्रजीवेगळ्या युरोपियन भाषांमधले उच्चार आहेत.

तरी "चीन" बहुधा जुना भारतीय (संस्कृत) उच्चार आहे. (छिन साम्राज्यावरून.) त्या देशाचे तेथील हल्लीचे नाव "मध्य-राज्य"/"मध्य-देश" अशा अर्थाचे आहे. (तिथल्याच वेगवेगळ्या भाषांमध्ये या अर्थाच्या शब्दांचा वेगवेगळा उच्चार होतो.) सर्वच देश त्यांच्या त्यांच्या लोकांसाठी जगातले मध्यवर्ती राज्य असते, त्यामुळे त्यांचे नाव आपण अंगीकारण्याची गरज नाही.

शिवा जमदाडे's picture

13 Oct 2008 - 1:07 pm | शिवा जमदाडे

'चिन' (याच्या नावातला आधिचा भाग आठ्वत नाही) नावाचा सम्राट होवून गेला ज्यानी तिथली छोटी छोटी राज्ये जिंकून (जवळपास) सध्याचे चिन एकत्र आणले. म्हणून...

- (तुतीची योग्य वाढ होण्यासाठी काय करावे याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

ऋचा's picture

13 Oct 2008 - 9:20 am | ऋचा

माझं नाव इंग्रजीच काय हिंदी आणि मराठीत पण घ्यायला लोक नेहमी चुकतात :(
कीती साधं नाव आहे "क्षितिजा" पण कायम वेगळाच उच्चार करतात.
माझी क्लायंट मिटींग असली की मला फार वैतागच येतो काहीही उच्चार करतात :(

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

13 Oct 2008 - 9:41 am | विजुभाऊ

हिन्दी भाषा उच्चारांच्या बाबतीत जरा च आहे
बॅन्क /टॅक्स चा उच्चार ते बैन्क टैक्स असा करतात.
रॉबर्ट चा उच्चार राबर्ट असा करतात. हे इंग्रजी शब्दांच्या बाबतीत नाही तर अस्सल संस्कृत च्या बाबतीत सुद्धा अशीच रड आहे.
ऋचा चा उच्चार रीचा
ऋषी चा उच्चार रीषी
ऋतेश = रीतेश ( अर्थ किती बदलाला लक्षात आला?)
हिन्दी भाषेत काही मुळाक्षरेच नाहीत उदा: ळ
द्रवीड मुनेत्र कळघम चे स्पेलिंग ते कझघम अशा प्रकारचे करतात.
हिन्दी लोकांची नावांची गम्मत वेगळीच असते
जवाहरलाल मोतिलाल नेहरु यांच्या नावाची आद्याक्षरे म्हणे जे एल नेहरु
मराठी पद्धती प्रमाण एखरे तर तर ती जे एम नेहरु अशी हवीत. ( स्वतःचेह नाव + बापाचे नाव + आडनाव)
कित्येक बीहारी भय्ये तर आडनावे लावतच नाहीत
उदा: नीतीषकुमार.
या हिन्दी भाषिकांचे तर ऐकावे ते नवलच.
आमच्या गृप ( हिन्दी प्रमाणे "ग्रीप" )मध्ये एक जण होता त्याने नावापुढे फक्त जी असे लावले होते. आणि आडनाव म्हणून तेच लावायचा.
"विजयकुमार" या माझ्या नावातला "कुमार" स्वतन्त्र न लिहिता एकत्र लिहा म्हणून प्रत्येक वेळा ओरडुन सांगावे लागते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2008 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> हिन्दी भाषा उच्चारांच्या बाबतीत जरा ढ च आहे
थोडी असहमत

>> बॅन्क /टॅक्स चा उच्चार ते बैन्क टैक्स असा करतात.
माझ्या माहितीत "बैन्क"मधल्या बै चा उच्चार बैलातल्या "बै"सारखा नसून "बॅ"च्या जवळपासचा आहे.

>> रॉबर्ट चा उच्चार राबर्ट असा करतात.
तरीही काही इंग्लीश शब्दांचे उच्चार हिंदीतून मराठीपेक्षा जास्त इंग्लिश होतात असं वैयक्तिक मत! उदा: बम (bomb) इंग्लिशमधे याचा उच्चार बॉम असा होतो बॉम्ब असा नाही. आणि "mb" असलेले अनेक शब्द तसेच, उदा: plumber, bomber.
अमेरीकन इंग्लीशमधे water चं "वाटऽ" होतं, आणि ब्रिटनमधे "वॉट~" .. कोण बरोबर कोण चूक?
(काही सज्जन मी त्यांना उच्चार कसे करायचे हे शिकवत आहे असं समजतात पण माझा असा हेतू नाही आहे. फक्त ब्रिटीश लोक त्यांच्या मायीच्या भाशेत कसे बोलतात त्याची माहिती देणे हा एकमेव हेतू आहे.)

द्रवीड मुनेत्र कळघम चे स्पेलिंग ते कझघम अशा प्रकारचे करतात.
हाच प्रकार केरळातही आहे. अळेप्पी/आळप्पुषा या पर्यटनासाठी प्रसिद्ध केरळी गावाचं नाव रोमन लिपीत Allapuzza / Alappuzza असं काहीसं होतं. या तमिळ/मल्याळी भाषेची मूळ लिपी रोमन नाही, त्यामुळे हा प्रकार होतो. मला तमिळ किंवा मल्लू येत नाही, पण मूळ भाषा-लिपी वापरली असता असंच होईल का?

जवाहरलाल मोतिलाल नेहरु यांच्या नावाची आद्याक्षरे म्हणे जे एल नेहरु
मराठी पद्धती प्रमाण एखरे तर तर ती जे एम नेहरु अशी हवीत. ( स्वतःचेह नाव + बापाचे नाव + आडनाव)
कित्येक बीहारी भय्ये तर आडनावे लावतच नाहीत

कारण उत्तर भारतीय लोकांमधे वडिलांचं नाव लावतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आपण "ढ" ठरतो.
आणि दक्षिण भारतातही काही लोक आडनावं लावत नाहीत.
युरोपात कोणीच वडिलांचं आणि/किंवा नवर्‍याचं नाव लावत नाहीत, प्रत्येकाची एक किंवा दोन नावं असतात. मार्क आणि स्टीव्ह वॉ हे जुळे भाऊ आणि अतिशय प्रसिद्ध क्रिकेटपटू, पण त्यांची दोघांची मधली नावं वेगवेगळी आहेत. ब्रिटीश लोकांना कितीतरी दिवस मनोहर हे माझं दुसरं नाव वाटायचं, शेवटी मी ते लावणंच सोडून दिलं, भानगड नको!

अवलिया's picture

13 Oct 2008 - 5:32 pm | अवलिया

(काही सज्जन मी त्यांना उच्चार कसे करायचे हे शिकवत आहे असं समजतात पण माझा असा हेतू नाही आहे. फक्त ब्रिटीश लोक त्यांच्या मायीच्या भाशेत कसे बोलतात त्याची माहिती देणे हा एकमेव हेतू आहे.)

कोण हो हे तथाकथित सज्जन? :?
जरा द्या बरे यादी आणि त्यांचे म्हणणे तरी काय ? ~X(
त्यांना जरा देतो मीच उत्तर एक फक्कडसा लेख लिहुन त्यांच्या म्हणण्याला खोडुन काढणारा! ;)

ऑ! तुम्हाला टोकतात ? छै छै छै धर्म काही उरला नाही हो या कलियुगात! 8}

(सज्जनतेची चिलिम करुन ओढणारा) नाना

विजुभाऊ's picture

13 Oct 2008 - 1:18 pm | विजुभाऊ

परवा एकाने मला कला नगर ला कसे जायचे हे विचारताना "इ बसवा कालानगर जावत है का" असे विचारले
वाई ला जाणार्‍या एकाने "हमे बाई जाना चाहते हय" असे विचारले होते.
हिन्दी ही एकुणच माठ लोकांची भाषा वाट्टे

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Oct 2008 - 5:24 pm | llपुण्याचे पेशवेll

:W हिन्दी ही एकुणच माठ लोकांची भाषा वाट्टे

एकदम सहमत..
साले गौरी ला गॉरी म्हणतात(स्पेलींग तर Gowry असे करणारे पण महाभाग आहेत ) आणि लॉरी ला मात्र लोरी म्हणतात.
आणि ते तसेच उच्चारतात काही ते कशाच्या जवळ लांब नसतात. त्यामुळे साला जास्त नुकसान होत आहे मराठी भाषेचे नुकसान हीदीमुळेच जास्त होत आहे असे मला तरी वाटते (पण राजभाषेविरुध्द बोलणार कोण?)
(भैय्ये राजवाड्याला 'रजवाडा' म्हणतात तर ते रजस्वलेला काय म्हणत असावेत :? )
पुण्याचे पेशवे

नितीनमहाजन's picture

13 Oct 2008 - 1:18 pm | नितीनमहाजन

याबाबत एक विश्लेषणः

प्रसिध्द लेखक व भाषा शास्त्री अविनाश बिनिवाले यांनी एका लेखात याचे उत्तर दिले आहे. खालील ओळ स्वतः वाचून पहा:

मैया मेरी मैने ही माखन खायो.

वरील ओळीत मै चा उच्चार वेगळा आहे, पहिला उच्चार "बॅन्क /टॅक्स " सारखा होतो.

उपाशी बोका's picture

15 Oct 2008 - 11:53 am | उपाशी बोका

बरोबर आहे. नावात काही नाही. गुलाबाला झेन्डू म्हणालो तरी त्याचा सुगन्ध गुलाबासारखाच असणार.
उपाशीबोका

अरुण मनोहर's picture

15 Oct 2008 - 3:12 pm | अरुण मनोहर

नावात काही नाही. उपाशीबोका असे न लीहीता upashiboka असे नाव घेतले त्यावरूनच ते कळले.

बाकी हिंदी उच्चार विचीत्र असतात हे खरेच. आपल्याला शिकवले असते, क, ख ग ही मूळ अक्षरे व बाकी बाराखडी. हे लोक का खा गा वगैरे का म्हणतात हे कळतच नाही. "का से कमल" ऐकायला पचत नाही.

उपाशी बोका's picture

15 Oct 2008 - 7:36 pm | उपाशी बोका

>> उपाशीबोका असे न लीहीता upashiboka असे नाव घेतले त्यावरूनच ते कळले.

शेवटी कुजकट लिहिण्याचा मान मिळवलातच.
माझा सदस्य क्रमान्क बघा जरा. मी इथे खाते उघडले तेव्हा इन्ग्रजीत नाव होते. त्यामुळे मला इन्ग्रजीत Login करावे लागते आणी ते नाव तसेच दिसते. जर काही उपाय असेल तर प्रेमाने सान्गा नाही तर सरळ "तिकडे" जाउन गरळ ओका. मि.पा.वर जरा प्रेमाने बोललात तर बरे होईल.
उपाशीबोका

उपाशी बोका's picture

15 Oct 2008 - 7:44 pm | उपाशी बोका

उपाशीबोका

विजुभाऊ's picture

15 Oct 2008 - 3:34 pm | विजुभाऊ

गुलाबाला झेन्डू म्हणालो तरी त्याचा सुगन्ध गुलाबासारखाच असणार.
खरे आहे
माधुरी दीक्षित ला निर्मिती सावन्त म्हणा आणि १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ गाण्यावर नाचताना इमॅजीन करुन बघा

सुनील मोहन's picture

15 Oct 2008 - 4:03 pm | सुनील मोहन

हे माठ लोक स्त्री हा शब्द
ईस्त्री असा उच्चारतात.

विजुभाऊ's picture

15 Oct 2008 - 4:54 pm | विजुभाऊ

एकदा एक स्वामिजी टीव्ही वर प्रवचन देताना म्हणाले होते
और रावणजी रामजी की इस्त्री लेके भाग गये

अरुण मनोहर's picture

15 Oct 2008 - 5:41 pm | अरुण मनोहर

खरी घटना-
टीव्ही वर Razzmatazz हा कार्यक्रम असायचा तेव्हा एका हिंदी भाषीक बाईने "पता है? आजकल वो एक "राजमाता" प्रोग्राम भी आता है" असे सांगीतले होते. तेव्हा आमची ह.ह.पु.वा झाली होती. =)) =))

कनपटात_भडकावणारा's picture

16 Oct 2008 - 12:22 am | कनपटात_भडकावणारा

नावात काय ...माझे नाव वाचुन समजले की नाही ?? .... :W

एकदा मला लोकल मध्ये एक हिंदी माणुस भेटला..विचारत होता. "अगला स्ठेसन कौनसे बाजु आएगा"..

आपली खोपडीच सटकली..मला प्रथम काहीच समजले नाही..मी त्याला ईंग्लिश मध्ये विचारले ..वॉट?..

स्ठेसन स्ठेसन...!! तो म्हणाला..मग लक्षात आले..पण हा सरळ स्टेशन म्हणाला असता तर बरे वाटले असते ..असेच वाटत होते मला त्यावेळी.
एखादा शब्द आपल्याला पुर्णपणे माहित आहे आणि तो कुणी वेगळ्या प्रकारे उच्चारला तर बरोबर वाटत नाही..

आपला ..
राम दादा..