हे थेंब नसूनी असती तारे

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
10 Oct 2008 - 9:49 pm

( अनुवादीत. कवी--मजरू )

हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे
एकावेळी शंभर शंभर उतरती
गगनामधूनी तुझ्याच अंगावरती

मोत्यापरी थेंब नभातूनी दमकत येती
वा कभिन्न रात्री काजवे चमकती
जसे पदरामधे शिरती तुफान वारे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे

जवळी बसून मला तू सुंदर दिसशी
हाताच्या विळख्यात तू तस्वीर होशी
जसे प्रतिबिंबामधे दिसती अनेक चेहरे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

फटू's picture

11 Oct 2008 - 10:50 am | फटू

काका, तुम्ही हिंदी गीतांना मराठी शब्दांचा साज खुप छान चढवता यात वादच नाही...

पण आता एखादी तुमचीच मराठी कविता येऊ द्या, अगदी तुमच्या अनुवादाइतकीच सुंदर...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Oct 2008 - 11:36 am | श्रीकृष्ण सामंत

सतीश,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपल्याला माझ्या अनुवादीत कविता वाचून आवडल्या हे वाचून तर खूपच आनंद झाला.
सतीश,
असं काय करता? मी अनेक माझ्या कविता लिहून मि.पा. वर पोस्ट केल्या आहेत.आपण जर का माझ्या पूर्वीच्या पोस्ट वर जाऊन पाहिलत तर ज्याचा टॅग "कविता" असा आहे त्या सर्व माझ्याच स्वतः केलेल्या कविता आहेत.ज्या माझ्या नाहित त्याला मी "अनुवादीत" असं म्हणून कवीचं नांव देतो
आठवते ते लिस्ट देतो
१ कालाय तस्मै नमः
२फादर्स डे
३ इश्वराचे कोडे
४ दातांची व्यथा
५ शुन्याची महती.
६ उद्धवा ! अजब तुझे सरकार
६ अरे संस्कार संस्कार
वगैरे वगैरे.....
आणि अश्या अनेक कविता माझ्याच लिहिलेल्या आहेत.
आपल्याला मात्र मि.पा.च्या जुन्या लिस्टवर जाण्याची तसदी घ्यावी लागेल.
आपण दाखविलेल्या स्वारस्या बद्दल आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com