म टा, "म", "मा", "मि" आणि "उ" - काही सैल विचार

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
9 Dec 2007 - 8:02 pm

मटाच्या (त्यांच्या दाव्यानुसार) पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकावरून जवळपास सर्वच मराठी संकेतस्थळांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. या निमित्ताने मटाच्या बदललेल्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या अतिरंजीत दाव्याविषयी मनात आलेले काही सैल विचार (stray thoughts).

बदललेले स्वरूप
आमच्या घरी मटा येत असे. मटा वाचण्याची सवय बालपणापासूनच. त्यामुळे आजदेखील जालावर मटा वाचला जातोच पण तो केवळ एक सवय म्हणून. त्यात पूर्वीची मजा नाही. त्यावेळच्या छापील मटाचे स्वरूप आणि भाषा एखाद्या घरंदाज स्त्रीसारखी असे. आजच्या मटाचे स्वरूप आणि भाषा ही मुंबईच्या बार डान्सरसारखी आहे!

पण अधिक विचार करता हे असे होणे अपरिहार्यच आहे, हे लक्षात येते. मटाचा बहुतांश वाचकवर्ग हा मुंबई आणि परिसरातील. या भागातील बर्‍याच मराठी भाषी मध्यम/उच्च-मध्यम वर्गाच्या घरातील मुले ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. जेव्हा मराठी माध्यमातून शिकलेली मटा वाचणारी पिढी अस्तंगत होईल तेव्हा मटाला वाचकवर्गच उरणार नाही. तेव्हा उद्याचा वाचकवर्ग निर्माण करायचा असेल तर त्यांना जे हवे ते त्यांच्याच भाषेत द्यायला हवे (अन्यथा त्यांना इंग्रजी पर्याय उपलब्ध आहेतच!).

हा विचार केला तर मटा (किंवा लोकसताचा विवा) यांची मिंग्लिश वापरण्यामागची अगतिकता लक्षात येईल. त्यांच्या संपादक मंडळींना हे जरूर खटकत असेल पण मार्केटींगवाल्यांपुढे त्यांचे काही चालत नसावे.

सकाळ, लोकमत इ. वर्तमानपत्रे ज्या भागात वाचली जातात तेथे परिस्थिती इतकी भीषण नसावी. म्हणून त्यांची भाषा अद्याप "बिघडलेली" नाही.

अतिरंजीत दावा आणि अन्य मराठी संकेतस्थळे
आता मटाच्या दाव्याविषयी. साधारण ३ वर्षांपूर्वी माझी "मा" या मराठी संकेतस्थळाशी ओळख झाली. तोवर मराठी लिहिण्याची सवय पार गेली होती. शाळा संपल्यापासून मराठीचा संबंध केवळ वाचण्यापूरताच राहिला होता. अशावेळी मराठीतून टंकण्याची सुविधा देणारे हे स्थळ फार आवडू लागले. "मा"चे गणपती आणि दिवाळी अंक हे निश्चितपणे पहिले ऑनलाईन आहेत यात शंका नाही.

"मा" नंतर ओळख झाली ती "म" शी, ती सुमारे दोन वर्षांपूर्वी.

"उ" आणि "मि" येथे त्यामानाने मी नवखाच. त्यामुळे "उ" आणि "मि" विषयी मी फार काही बोलणे योग्य होणार नाही.

आजही कचेरीत संगणकावर दर्शनी भागात एखादी prj किंवा xls नाहीतर ppt चालू ठेऊन अंतर्भागात "म", "मा", मि" आणि "उ" असे उड्या मारणे चालू असते!

"म" हे थोडेसे शिष्ठ. यावर वावरताना दिवाणखान्यात पाहुण्यांशी बोलत असल्यासारखे वाटते. "मा" हे बरेचसे अनौपचारीक. म्हणजे संध्याकाळी नाक्यावर उभे राहून शिग्रेटी फूंकत इकडे-तिकडे (म्हणजे कुठे ते जाणकारास सांगण्याची गरज नाही) पाहत गप्पा हाणणार्‍या टोळक्यासारखे! शिव्या तर इथे खुल्लमखुल्ला दिल्या जातात - घेतल्या जातात. उगाचच "ह घ्या" चा औपचारीकपणा नाही!
अर्थात कोणत्यायी प्रकारच्या गंभीर लिखाणासाठी "मा" हे काही योग्य स्थळ नव्हे. पण गप्पा-टप्पा करायला त्यासारखे दुसरे काही नाही!

"मि" ने किंचित "मा" कडे झुकलेला, "म" आणि "मा" यांतील मध्यममार्ग स्वीकारावा

आणि "उ" ने किंचित "म" कडे झुकलेला, "म" आणि "मा" यांतील मध्यममार्ग स्वीकारावा असे मात्र वाटते.

मौजमजालेख

प्रतिक्रिया

राजे's picture

9 Dec 2007 - 8:28 pm | राजे (not verified)

अहो असे काय कोड्यात लिहल्यावानी करताय... सरळ नाव घ्या की...

"आता मटाच्या दाव्याविषयी. साधारण ३ वर्षांपूर्वी माझी "मा" या मराठी संकेतस्थळाशी ओळख झाली. तोवर मराठी लिहिण्याची सवय पार गेली होती. शाळा संपल्यापासून मराठीचा संबंध केवळ वाचण्यापूरताच राहिला होता. अशावेळी मराठीतून टंकण्याची सुविधा देणारे हे स्थळ फार आवडू लागले. "मा"चे गणपती आणि दिवाळी अंक हे निश्चितपणे पहिले ऑनलाईन आहेत यात शंका नाही."

येथे पर्यंत एकदम ठीक ठाक वाचत होतो पण मध्येच तुमचे म, मा, मि व उ चालू झाले व मी गडबडलो थोडा विचार केल्यावर समजले.
;}

बाकी मी एक अफलातून शोध लावला आहे तो असा...

मायबोली
मराठीवर्ड
मनोगत
एमआर.उपक्रम
मिसळपाव
माझे शब्द

ही सर्व मराठी संकेतस्थळे म "M" ह्या अक्षरांनेच चालू होतात का बरे ? सांगा सांगा.... उतर द्या... समजा हे देखील कोडे आहे एक प्रकारचे.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

देवदत्त's picture

9 Dec 2007 - 8:55 pm | देवदत्त

अहो असे काय कोड्यात लिहल्यावानी करताय... सरळ नाव घ्या की..
सहमत. इथे काही त्याला बंदी नाही.

अहो राजे,
ह्याव्यतिरिक्त आणखी ही म ची स्थळे (संकेतस्थळे हो) आहेत की...
मायमराठी
मी मराठी
मराठीमती (की मराठीमाती ? )

असो...

सुनील's picture

9 Dec 2007 - 11:44 pm | सुनील

ही सर्व मराठी संकेतस्थळे म "M" ह्या अक्षरांनेच चालू होतात का बरे ? सांगा सांगा.... उतर द्या... समजा हे देखील कोडे आहे एक प्रकारचे.

अहो "म" मराठीचा!!

आजानुकर्ण's picture

9 Dec 2007 - 8:42 pm | आजानुकर्ण

आजच एका स्नेह्यांशी चर्चा झाली आणि त्यांचे माझे मत बर्‍याच अंशी जुळले.

मिसळपाव आणि उपक्रमावरील लेख इतर संकेतस्थळांच्या तुलनेत अधिक वाचनीय असतात. मिसळपाव किंवा उपक्रमावर प्रसिद्ध झालेला लेख हा अधिक वाचनीय असण्याची शक्यता ही ०.७६ पेक्षा जास्त आहे अशी आमची आकडेवारी सांगते.

मटाने चालवलेला आक्रस्ताळेपणा पाहता त्यांना अशा संकेतस्थळांकडून मोठाच धोका निर्माण झाला आहे हे नक्की. मागेपुढे मिपा किंवा उपक्रम खरेदी करण्यासाठी बेनेट कोलमन कंपनी किंवा अगदी गूगल पुढे आली तरी आश्चर्य वाटायला नको.

- (आकडातज्ज्ञ)आजानुकर्ण

राजे's picture

9 Dec 2007 - 9:06 pm | राजे (not verified)

"मागेपुढे मिपा किंवा उपक्रम खरेदी करण्यासाठी बेनेट कोलमन कंपनी किंवा अगदी गूगल पुढे आली तरी आश्चर्य वाटायला नको.
"

ही शक्यता एकदम कमी आहे.. ०.९९% पर्यंत कमी आहे कारण...
जेव्हा त्यांना असे संकेतस्थळ विकत ह्यावे असे वाटेल तेव्हा दोन गोष्टीवर विचार करतील.
१. हे संस्थळ एका फ्री प्रणालीवर तयार केलेले आहे.
२. उपलब्ध सुविधा ... जेव्हा ते करु शकतात तेव्हा आपण का नाही[आपण म्हणजे तेच ते गुगलबाबा] मेरे पास पैसा है..|

हा.. पण, परंतु... मिसळपाव / उपक्रम ते जरुर विकत घेतील जेव्हा ह्या संकेतस्थळांचा आकडा एखाद्या मोठ्या संकेतस्थळाला साजेल असा होईल तेव्हा... उदा. कुठले ही दैनिक पत्राचे संस्थळ ह्या. कारण पुढारीवर मनोगत पेक्षाजास्त वाचक उपलब्ध असतील. हे उदा. मात्र आहे शक्यतो उलटे असु शकते. पण व्यक्तीगत स्वरुपामध्ये सांगायचे तर ....

मराठी संकेतस्थळ वाचक हा जास्तीत जास्त ३५०० च्या आसपासच आहे [नक्कीच.]

पाहा...
मनोगत चालू होऊन वर्षापेक्षा जास्त वेळ झाला पण सदस्य ? ---- > ८००० / ९००० च्या आसपास. [ही सदस्यांची पुन्हा पुन्हा सदस्य नोंदणी आहे .. पाहिजे तर सर्कीट रावांना विचारा,.. ;} माझेच कमीतकमी दोन सदस्य नाव आहे येथे... एक चा पासवर्ड विसरलो आहे]

माझे शब्द ... जेव्हा जोरात चालू होते तेव्हा.... ३१०० सदस्य होते [ मनोगत व माझे शब्द वर तेच सद्स्य... कधी हा हाथ तर कधी तो हात.... जेव्हा येथे ३१०० सदस्य होते तेव्हा मनोगत वर ६५०० च्या आसपास सद्स्य होते.]

उपक्रम वर आज कीती सदस्य आहेत हे पाहीले नाही पण शक्यतो १५०० च्या आसपास.

मिसळपाव वर १००० च्या आसपास सदस्य शक्यतो.

मायबोलीवर कधीच गेलो नाही, कारण त्याचे लुक मला कधीच मराठी वाटले नाही.. पण असतील १०००० सदस्य जास्तीत जास्त.

पण कार्यरत सदस्य कीती ?
उदा. तर माझे च संकेतस्थळ माझे शब्द वर आज ८० सदस्य आहेत ... पण कार्यरत सद्स्य हे फक्त १५ ते वीस आहेत.

मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळाले असेल् ही अपेक्षा.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

देवदत्त's picture

9 Dec 2007 - 8:58 pm | देवदत्त

बाकी मटा चे नवे स्वरूप आधीपेक्षा चांगले आहे. आता आधीपेक्षा भरपूर जास्त मजकूर चाळता येतो.
पण त्याने वाचकाला फायदा. मराठीला जास्त नाही. का ते आता पुन्हा सांगायची गरज नाही असे मला वाटते :)

इतर म स्थळांचे तुम्ही केलेले विश्लेषण पडताळायला मला तरी वेळ लागेल :(

सुनील's picture

9 Dec 2007 - 11:43 pm | सुनील

आता आधीपेक्षा भरपूर जास्त मजकूर चाळता येतो

मला "बहुतांची अंतरे" कुठे सापडले नाही. सांगाल का कसे जायचे तिथे? तसेच रविवारचा अंक (संवाद्/खास बात) ह्या गोष्टीदेखील मिळाल्या नाहीत.

वर्षा's picture

10 Dec 2007 - 4:02 am | वर्षा

नवीन मटाचं रुपडं बरं आहे.
मीसुद्धा शोध शोध शोधलं...'बहुतांची अंतरे' कुठेही दिसलं नाही..आणि रविवार पुरवणीसुद्धा.
-वर्षा

देवदत्त's picture

10 Dec 2007 - 9:32 pm | देवदत्त

मलाही नाही मिळाले हो.
बाकी मी त्यातील नियमित सदरे नियमितपणे वाचत नव्हतो. त्यामुळे असे काही विभाग बंद झाले ह्याचा अंदाज नाही.
माझे म्हणणे होते की आता त्यांनी जे टॅब टाकले आहेत त्या प्रत्येकात आधीपेक्षा जास्त बातम्या(आणि त्यांची सुरूवात) लगेच दिसतात. त्यामुळे एका नजरेत जास्त मजकूर चाळता येतो असे मला वाटते.

मुक्तसुनीत's picture

9 Dec 2007 - 10:53 pm | मुक्तसुनीत

(इंग्रजी शब्दाने मथळा दिल्याबद्दल माफ करा...चांगले मराठी शब्द हवेत)
मला असे दिसते की, एखादे वृत्तपत्र असो की एखादे संकेतस्थळ असो , त्याना वर उल्लेखिलेल्या दोन मूल्यांचा/उद्दिष्टांचा मेळ घालावा लागतो. लोकांचा आश्रय नसेल तर वृत्तपत्र बंद पडेल ; आणि लोकांचा अनुनय करण्याच्या प्रवृत्तीपायी उथळपणा येतो. (आणि तो फार चटकन् येऊ शकतो.) गोविंद तळवलकरांच्या काळात त्यानी ठरवून दिलेल्या "एलिटिस्ट्" मूल्यांवर त्यांचे वृत्तपत्र चालू शकले याचा कुठेतरी संबंध "मार्केट इकॉनॉमी"शी येतो असे मला वाटते. नव्वदीच्या दशकात तळवलकर निवृत्त झाले. ते तसे झाले नसते तर ९१च्या उदारीकरणानंतर आणि विशेषतः चालू दशकातील अतितीव्र अशा शर्यतीमधे , अतिवेगवान जगात त्यांचे स्थान टिकवता आले असते किंवा कसे , हा मोठा कुतुहलाचा विषय आहे.

सुनील's picture

9 Dec 2007 - 11:40 pm | सुनील

उच्चभ्रू आणि जनता हे प्रतिशब्द कसे वाटतात?

तुमचे म्हणणे खरे आहे. आता केवळ मुंबईतच खपणार्‍या नवाकाळला आपली भाषा बदलण्याची आवश्यकता वाटली नाही कारण त्याचा वाचकवर्ग हा "जनता" श्रेणीत मोडतो. ज्याची येणारी पिढीदेखील मराठीतच शिकत आहे.

आता "उच्चभ्रू" समाजानेच आपली भाषा बदलली तर त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या वृत्तपत्रांना (मटा/लोकसत्ता) आपली भाषा बदलावीच लागेल. मग जुने वाचक किती का बोंबाबोंब करेनात!

विसोबा खेचर's picture

10 Dec 2007 - 1:23 am | विसोबा खेचर

"म" हे थोडेसे शिष्ठ. यावर वावरताना दिवाणखान्यात पाहुण्यांशी बोलत असल्यासारखे वाटते.

हा हा हा! अहो ते सुशिक्षित, सुसंस्कृत, आणि सभ्य मंडळींचे संकेतस्थळ आहे! :))

सुशिक्षित आणि सुसंस्कृत! घ्या घालून तिच्यायला! :))

(सभ्यता आणि संस्कृतीला नव्हे, पण त्याचे लब्धप्रतिष्ठित आणि पांढरपेशे बुरखे पांघरणार्‍यांना फाट्यावर मारणारा!) तात्या.

सर्किट's picture

11 Dec 2007 - 1:46 am | सर्किट (not verified)

सिंह राशीच्या सर्वांची जन्मनावे "म मा मि मी मो टा टि टू टे" ह्या अक्षरांनी सुरू होतात. वरील स्फुटाचे शीर्षक वाचून ह्या सर्व स्थळांची रास सिंह आहे, हे लक्षात आहे. सध्या सिंह राशीला साडेसाती सुरू आहे. त्यामुळे सध्या वाचकसंख्या कमी आहे. अडीच वर्षांनी ही वाचकसंख्या वाढेल, हे नक्की. साडेसातीत विदागाराला अपघात, मिथुन राशीच्या (शिव्यादेऊ) लोकांशी तीव्र मतभेद, वाचक संख्येत घट, कंटाळवाणे लेख वगैरे संभवतात.

विशेषतः ज्या संकेतस्थळाचे नाव आणि मालकाचे नाव दोन्ही "म" पासून सुरू होते, त्यांना तर डब्बल धोका !

अशा वेळी गजाननाला (पोष्ट्या नाही, सोंड असणार्‍या) पाण्यात ठेवून साकडे घालावे.

- (सिंह राशीचा) सर्किट

किमयागार's picture

13 Dec 2007 - 7:56 pm | किमयागार (not verified)

आपले ते सभ्य आणि सुसंस्कृत आणि दुसर्‍याचे ते असभ्य आणि किळसवाणे. हा नियम सगळ्या
'म' ना लागू आहे.
-किमयागार