नवी बाटली, जुनी दारु ...

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
6 Oct 2008 - 6:16 am
गाभा: 

एकदा एक कोंबडा उंच झाडावर आरामात शीळ घालत मजेत बसला होता. एक भुकेलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. आता ह्या कोंबड्याची शिकार करून टाकू असा विचार करीत कोल्हा त्याला म्हणाला, "मित्रा, तुला जंगलातला 'सर्वंकष शांती आणि एकोपा' हा नवा नियम कळला का? अरे, आता नव्या तहानुसार, कोणीही कोणाची शि़कार करणार नाही आणि या जंगलातील सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहतील. आता तू मला तुझा मित्रच मान आणि इथे खाली ये. आपण एकत्र इथेच गप्पा मारू."

कोंबडा यावर काहीच बोलला नाही. त्याला कोल्ह्याच्या लबाड स्वभावाची कल्पना होती. कोंबड्याने मान उंच करून दूरवर बघत असल्याचा बहाणा केला.

ते पाहताच कोल्हा म्हणाला, "तुला काय तिकडे काय दिसत आहे?"

यावर कोंबडा म्हणाला, "कोल्हेबुवा, ते पहा काही शिकारी कुत्री तिकडून येत आहेत. मला वाटते, ती टोळी इकडेच आपल्यालाच भेटायला येत आहे".

हे ऐकताच कोल्हा म्हणाला, "अरे बापरे,,मग मला आता निघायला हवं... पुन्हा भेटू!"

कोंबडा म्हणाला, "अहो हे काय? थोडे थांबा, मी खाली येतो, आपण दोघेही त्या टोळीची इथे वाट बघू आणि या शांतता-एकोप्याच्या नव्या तहावर गप्पा मारु .. "

कोल्हा त्यावर म्हणाला, "नको नको, मला जायलाच हवं, त्या कुत्र्यांच्या टोळीने या तहाबद्दल काहीच ऐकलेले नाही" आणि तो शक्य तितक्या वेगाने तिथून सटकला.

मोराल ऑफ द श्टोरी - अचानक उसळून आलेल्या मित्रप्रेमाला भुलून जावू नये.

इसापनीतीतली ही गोष्ट आठवली ती वॉल स्ट्रीट जर्नल मधे प्रसिद्ध झालेली ही मुलाखत वाचून ...

पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे पती असिफ झरदारी हे सध्या फारच फॉर्मात आहेत. भ्रष्टाचाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांची ख्याती आहे. बेनजीर भुट्टो पंतप्रधान असताना ह्या महाशयांनी भ्रष्टाचाराचे नवे नवे विक्रम प्रस्थापित केले. सध्या ते पाकिस्तानचे अध्यक्ष आहेत.

या साहेबांना सध्या भारतप्रेमाचे भलतेच उमाळे फुटत आहेत.

भारताच्या विकासात ते हातभारही लावणार आहेत!

'पाकिस्तानी सिमेंटवर भारतीय लोक आपले रस्ते, पूल वगैरे बांधत आहे', 'पाकिस्तानच्या मिल्समधे बनलेले जीन्सचे कपडे भारतात वापरले जात आहे'; 'मुंबई, कांडला, कोची वगैरे पोर्ट वर जागा न मिळाल्या मुळे जहाजे कराचीच्या धक्क्याला लागत आहेत' वगैरे स्वप्नरंजन करून त्यांनी आपली अक्कल या मुलाखतीत पाजळली आहे.

तालिबानी दहशतीचा सामना करण्यासाठी अमेरिका आता पाकिस्तानात घुसून हल्ले करीत आहे आणि यातल्या बर्‍याचश्या हल्ल्यांची पाकिस्तानी सरकारला कल्पनाही दिली जात नाही हे आता उघड सत्य आहे. अशा नामूष्कीजनक स्थितीतही हे महाशय "आमचे अमेरिकेबरोबर मैत्रीचे संबंध आहेत" हे तुणतुणे वाजवत आहेत.

असो.
आता ही मुलाखत वाचून आपल्याकडे काही जणांना परत दिल्ली ते लाहोर-इस्लामाबाद--रेल्वे-विमान वगैरेची स्वप्ने पडू लागतील. पाकिस्तानात निवडून येणारा प्रत्येक पंतप्रधान/अध्यक्ष हे असे मनसुबे जाहीर करतो आणि नंतर ते फुसके बार आपल्याला महाग पडतात हा अनुभव लक्षात घेता या बडबडीकडे विश्वास ठेवणे शक्यच नाही हे नक्की...

मुलाखत वाचून तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

6 Oct 2008 - 11:35 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

6 Oct 2008 - 10:06 pm | भास्कर केन्डे

पाकिस्तानला दुर्दैवाने नेहमीच फसवे नेतृत्व मिळत गेलेले आहे. आपलेही काही फार उच्च कोटीचे असते अशातला भाग नाही. पण पाकचे नशीब यात अंमळ फुटकेच आहे. हा झरदारी त्याताला शिरोमणी म्हणायला हवा. घटनेतील पळवाटांचा फायदा घेऊन व कपटाचे राजकारण करुन हा व्यक्ती अध्यक्ष झाला आहे. त्याचे फुसके बार फुटायला वेळ लागणार नाही. एव्हाना खुद्द पाकिस्तानात तर ते फुटायलाही लागले आहेत. वाट पहा पुढे याचा काय खेळ खंडोबा होतो ते.

बाकी आपण "कुत्ता भोंकता है हाथी चला है "नुसार आपले मार्गक्रमण करत रहायला हवे.

आपला,
(जागरुक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मृदुला's picture

7 Oct 2008 - 4:15 am | मृदुला

पाकचे नशीब यात अंमळ फुटकेच आहे.

सहमत. त्यात आता अमेरिकेचे आणि तालिबान्यांचे युद्धपर्व सुरू असल्याने इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती.

अभिजीत's picture

7 Oct 2008 - 6:41 am | अभिजीत

>> पाकिस्तानला दुर्दैवाने नेहमीच फसवे नेतृत्व मिळत गेलेले आहे. आपलेही काही फार उच्च कोटीचे असते अशातला भाग नाही...
पाकिस्तानच्या बाबतीत आपल्या राजकीय नेतृत्वाने नेहमीच कचखाउ भूमिका घेतली आहे. काश्मिरचा प्रश्न युनो मधे येउ नये म्हणून पाकिस्तानवर दबाव टाकण्याचे एक(मेव) उदाहरण सोडले तर आपल्या राजकीय नेतृत्वाकडून काहीही भरीव काम झालेलं नाही.

बाकी आपली मदार नेहमीच आपल्या शूर आणि शक्तीशाली लष्करावर असते. पण राजकिय पातळीवर त्यातही आपण 'जशास-तसे' उत्तर देण्यात कमी पडतो. लष्कराने शौर्य दाखवून युद्धे जिंकायची आणि नेत्यांनी युद्धोत्तर तहात ती हारायची हा तर आपल्याकडचा शिरस्ताच आहे.

या बाबतीत आपण अमेरीका-इस्त्रायल ची उदाहरणे समोर ठेवली पाहिजेत. अमेरिकी नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी अगदी परक्या राष्ट्रातही घुसून हल्ले करायला अमेरिका मागे-पुढे पहात नाही. लष्कराने तशी परवानगी मागितल्यावर सरकारने ती नुसती मान्यच केली नाही तर अशा कारवाया यशस्वी होण्यासाठी लागणारी इंटरनॅशनल डिप्लोमसी ताकत ही पणाला लावली.

तसेच, दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण झालेला इस्त्रायल नष्ट व्हावा म्हणून कितीही प्रयत्न झाले तरी इस्त्रायलचे सरकार-लष्कर नेहमीच यशस्वीपणे त्याला उत्तर देत आहे.

अनिल हटेला's picture

7 Oct 2008 - 7:47 am | अनिल हटेला

अभिजीत राव !!

इथेच तर घोड पेंड खातय ना !!!

ईतक मोठ लष्कर असुन देखील फायदा काय ?

आज पार शहारा -शहरातुन बाँब स्फोट होतायेत !!

ह्या घडीला सांगता येत नाय कुठली रेल्वे ,कुठल्या बस मध्ये अचानक धमाका होइन !!!

आणी आमचे माननीय मंत्री- सन्त्री साले झेड प्लस सुरक्षे मध्ये बसून निषेध नोन्दवून मोकळे !!!

ह्यामुळे मानतो आपण इस्त्रायल ला !!!!!

छटाक भर मोठा देश नाय, पण हिम्मत बघा त्यांची !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..