संस्था स्थापन करणे योग्य की ट्रस्ट?

सुचिकांत's picture
सुचिकांत in काथ्याकूट
1 Mar 2017 - 4:29 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो.

मी आणि माझे काही सहकारी, मराठीचं ज्ञानभाषा म्हणून संवर्धन व्हावं, ज्ञान-विज्ञान मराठीतून उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या उद्देशाकडे प्रभावीपणे वाटचाल करण्यासाठी केवळ सोशल मिडीयावरील समूह बनून न राहता, संस्थास्थापना करून कार्य करत राहणे हा निर्णय आम्ही घेतला आहे.

उद्देश : मराठी शाळांचा प्रचार, प्रसार, मराठीतून ज्ञानाची निर्मिती-त्यासाठी लोकांना प्रोत्साहन, उपलब्ध ज्ञानाचा प्रसार, मराठीच्या वापराला प्रोत्साहन.

आत्तापर्यंत संस्थास्थापनेसाठी काय हवे? ही मिळालेली माहिती खालीलप्रमाणे :

- संस्थेचे नाव
- संस्थेचा उद्देश
- कार्यालय पत्ता - tax पावती, घरपट्टी
- कमिटी मेंबरचे संपूर्ण नाव, पत्ता, वय, व्यवसाय/नोकरी
आधार कार्ड, pan कार्ड, २ फोटो, मोबाईल नंबर-इमेल आयडी
- घटनेतील मुद्दे
- ७०% सदस्य संस्थानोंदणी ज्या शहरात होणार त्या शहरातील असावेत.

या सर्व बाबींची पूर्तता केल्यावर, वकील कागदपत्रे बनवतील. त्या कागदपत्रांवर प्रत्येक सदस्याची सही असायला हवी. ही कागदपत्रे आमच्याकडून इनपुट्स मिळाल्यावर वकील २ दिवसात तयार करतील आणि एका आठवड्यात संस्था स्थापना होऊ शकते.
एकूण खर्च - साधारण २० हजार रुपये.
-------------------------------------------------------------------------------
कृपया वरील माहिती बरोबर आहे का? अजून त्यात कोणत्या बाबी आवश्यक असतात ? हे जाणकारांनी तपासून सांगावे.
-------------------------------------------------------------------------------

आता पुढचा मुख्य प्रश्न :

संस्था स्थापन करणे योग्य की ट्रस्ट?
=======================

- संस्था स्थापन केल्यास, दर ५ वर्षांनी निवडणूक /कमिटी बदलणे/सदस्यांची आदलाबदली करणे/आहेतीच कमिटी पुढे घेऊन जाणे ही प्रक्रिया करावी लागेल. संस्था स्थापनेला साधारण १५ दिवस लागतील.

- ट्रस्ट मध्ये असं करायची गरज लागणार नाही. पण ट्रस्ट स्थापनेला ३ महिने लागतील.

आम्हाला या २ फरकांशीवाय इतर कोणते फरक आहेत त्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे. ज्या वकिलांशी बोललो त्यांनी एवढ्याच २ गोष्टी सांगितल्या आहेत.

संस्थास्थापनेचे फायदे/तोटे
ट्रस्टस्थापनेचे फायदे/तोटे
निधी स्वीकारताना संस्था/ट्रस्ट मध्ये काय अडचणी, काय फायदे असतात?
सरकारकडून संस्था/ट्रस्टला काय मदत मिळू शकते?

असे विविध प्रश्न मनात आहेत. कृपया मार्गदर्शन करा.

प्रतिक्रिया

जवळच्या रेजिस्ट्रार सहकारी संस्था यांचे मार्गदर्शन घ्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2017 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. संस्था (कंपनी) स्थापण्यासाठीची सर्व माहिती : http://www.mca.gov.in/MinistryV2/homepage.html
संस्था स्थापन करण्याचे नियम : वरच्या संस्थळावरच्या "ATCS & RULES" पर्यायाखाली मिळतील

२. धर्मदाय विश्वस्त संस्था (Charitable Trust) संबंधीची मराठीतून सर्व माहिती : https://charity.maharashtra.gov.in/mr-in/

अधिकृत कार्यालयांना भेट देऊन किंवा वरील अधिकृत संस्थळावर चौकशी अधिक माहिती करून मिळू शकेल.

महत्वाची सूचना : कोणतीही संस्था स्थापणे आणि ती चालवणे हे सर्व काम त्या त्या संबंधीच्या कायद्याच्या कक्षेत येत असल्यामुळे, विश्वासू तज्ञ सोडून इतर कोणत्याही स्त्रोताच्या माहितीनुसार काम करणे पुढे समस्या निर्माण करू शकते. तेव्हा त्या बाबतीत सावधान.

सुचिकांत's picture

2 Mar 2017 - 3:27 pm | सुचिकांत

आभारी आहे. ही संकेतस्थळे माहिती नव्हती. तपासतो माहिती.

संस्था म्हणजे नेमका कोणता 'लीगल फॉर्म' अभिप्रेत आहे?

कंजूस's picture

1 Mar 2017 - 10:30 pm | कंजूस

"संस्थेचा उद्देश" रेजिस्ट्रारला सांगून त्याच्याकडूनच संभाव्य पर्याय मिळतील.
तुम्हाला अपेक्षित संस्था - त्याला दिलेली देणगी इंन्कम टॅक्स 80G चे रिबेट मिळणारी असे असेल तर त्याची नोंदणी लवकर होत नाही. असे रिबेट न मिळणाय्रा "सहकारी संस्था मर्यादित"चे मात्र लगेच होते.

समाधान राऊत's picture

2 Mar 2017 - 2:17 pm | समाधान राऊत
समाधान राऊत's picture

2 Mar 2017 - 2:18 pm | समाधान राऊत

संस्था/ट्रस्ट काढण्या अगोदर पहिला महत्वाचा मुद्दा -

तुम्ही मराठी संवर्धनासाठी संस्था काढताय हे ठीक आहे पण तुमची मुले कोणत्या मध्यमा मध्ये शिकतात/ शिकवणार ते पहिले सांगा.

नाहीतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

बाकी शुभेच्छा..!!

सुचिकांत's picture

2 Mar 2017 - 3:22 pm | सुचिकांत

सगळ्यांची मुले मराठी शाळेतच शिकतात.

विशुमित's picture

2 Mar 2017 - 3:32 pm | विशुमित

आरे वाह...!!

माझी ही ३ वर्षाची मुलगी zp च्या अंगणवाडीतच जातेय. गावाजवळ ३ इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून सुद्धा. पुढे मी तिला इंग्रजी माध्यमात टाकेल की नाही याचा निर्णय अद्याप घेतला नाही.

अंगणवाडी मध्ये खूप सुधारणा झालेल्या पाहत आहे. ती अंगणवाडीत जात असल्यापासून तिच्या मध्ये कमालीची प्रगती झाली आहे. सर्वात महत्वाचे तिच्या मध्ये टीम स्पिरिट (संघभावना) ची बीजे लवकर रुजायला लागली आहेत, याचे विशेष कवतुक करावे वाटते.

पुन्हा एकदा तुमच्या स्तुत्य उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा..!!

पुणे सहकार नगरमध्ये एक "विज्ञानवाहिनी"चे एक कार्यालय आहे. तुम्ही म्हणता त्याच उद्देशाने या संस्थेने कार्य सुरू केले. ( डॅा देशपांडे अमुरिकेतून फंडाची व्यवस्था करतात, श्री जयंत फाळके इथली व्यवस्था पाहतात.) त्यांचे काम पाहून टाटा कंपनीने त्यांना बस दिल्या आहेत.संस्थेचा आता ट्रस्ट झाला आहे. देणग्या करमुक्त आहेत. ते मार्गदर्शन करतील. आपल्या जिल्ह्याचा सब रेजिस्ट्रार - धर्मादाय संस्था/charitable trusts इथे नोंदणी होते. स्वत: जाऊन लागणारे अर्ज भरून नोंदणी करा. फारच कमी पैशात काम होईल ( फक्त शुल्क ,नोंदणी कोर्ट फी स्टँप्स).

[ हौझिंग सोसायटीच्या रेजिस्ट्राकडे पाचदहा रुपयांच्या स्टँम्प्समधये होते ते वकील लोक अडिच हजारात करतात.]

ठाणे जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयातून -
( जांभळी नाका ,अग्यारी लेन, कावसजी पटेल अग्यारी समोर )
Welcome to Charity Commisioner, Maharashtra. site:http://mahacharity.gov.in/

1) रेडिमेड बाइलॅाज नसतात.
नियम तुम्हीच बनवायचे ,दोन सेट्स सादर करायचे. एकावर शिक्का मारून नोंदणीसह महिन्याभरात परत देतात.
२) कोणते नियम करायचे याची थोडी कल्पना येण्यासाठी अगोदर अर्ज केलेल्या संस्थांचे ( सामाजिक संस्था) पाहू शकता.
३) नियम काळजीपूर्वक बनवा अन्यथा कायमच जबाबदारी(liability) पडेल.
४) काही इतर संस्थेचे सभासद होण्याचा नियम करताना त्यांच्या अटी ( वर्गणीची अर्धी रक्कम त्यांच्याकडे जमा करण्याची अट) तपासून पाहा.
५) या कार्यालयात सर्व माहिती देतात.
स्वत: जाऊन काम करून घेतल्यास अगदी कमी शुल्कात नोंदणी होते.

ठाणे जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयातून -
( जांभळी नाका ,अग्यारी लेन, कावसजी पटेल अग्यारी समोर )
Welcome to Charity Commisioner, Maharashtra. site:http://mahacharity.gov.in/

1) रेडिमेड बाइलॅाज नसतात.
नियम तुम्हीच बनवायचे ,दोन सेट्स सादर करायचे. एकावर शिक्का मारून नोंदणीसह महिन्याभरात परत देतात.
२) कोणते नियम करायचे याची थोडी कल्पना येण्यासाठी अगोदर अर्ज केलेल्या संस्थांचे ( सामाजिक संस्था) पाहू शकता.
३) नियम काळजीपूर्वक बनवा अन्यथा कायमच जबाबदारी(liability) पडेल.
४) काही इतर संस्थेचे सभासद होण्याचा नियम करताना त्यांच्या अटी ( वर्गणीची अर्धी रक्कम त्यांच्याकडे जमा करण्याची अट) तपासून पाहा.
५) या कार्यालयात सर्व माहिती देतात.
स्वत: जाऊन काम करून घेतल्यास अगदी कमी शुल्कात नोंदणी होते.
६) न्यास,ट्रस्ट,सामाजिक संस्था,नागरिक संघ वगैरे.

संस्था नोंदणीसाठी सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट १८६० नुसार नोंदणी होते. याला असोसिएशन ऑफ पर्सन्स (AOP) म्हणतात. नोंदणी अनिवार्य नाही. ऐच्छिक आहे. पण पॅनकार्ड काढणे, बँकेत खाते काढणे KYC आणि इतर कायदेशीर बाबींसाठी नोंदणी हवीच.

तसेच महाराष्ट्रात शैक्षणिक उद्देशाने काढलेली संस्था इंडियन पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १८८२ नुसारही रजिस्टर करावी लागते.
संस्थेचे नाव ऍप्रूव्ह व्हायलाच ३ महिने लागतात. नंतर AOP ची नोंदणी होऊन प्रमाणपत्र मिळते. नंतर पब्लिक ट्रस्ट नोंदणी साठी सुनावणी होऊन अजून ३ महिन्यात ट्रस्ट चे नोंदणी प्रमाणपत्र आणि घटना तसेच नियम मान्य होऊन मिळतात. संस्था आणि ट्रस्ट साठी एकाच मेमोरँडम आणि बायलॉज् असतात.
महाराष्ट्रात सर्व कायदेशीर आणि सरकारी कामांसाठी दोन्ही कायद्यांनुसार नोंदणी अनिवार्य आहे हे लिहिले आहेच.
मुंबईत वकील २०००० घेत असतील पुण्यात १० ते १५ हजार आणि राज्यात इतरत्र अधिक स्वस्तात होईल.

शाम भागवत's picture

26 Aug 2022 - 2:44 pm | शाम भागवत

पब्लिक ट्रस्ट प्रमाणे खाजगी ट्रस्ट असू शकतो का? त्यासाठी काय करावे लागते? किती खर्च येतो?

खाजगी ट्रस्ट स्थापन करण्यामागे काय उद्देश/उद्दिष्ट आहे ते कृपया सांगाल का?

शाम भागवत's picture

26 Aug 2022 - 4:44 pm | शाम भागवत

निरनिराळी पैशाची मदत आपल्याकडून वेळोवेळी केली जाते. त्यासाठी एक वेगळे स्वतंत्र अस्तित्व असावे असे वाटते. मात्र त्यावर संपूर्ण ताबा स्वतःचा किंवा माझ्या कुटुंबियांचा असला पाहिजे. काहीही सार्वजनिक करावयाचे नाही आहे. त्यामुळे माझ्या पश्चातही माझे कुटुंबिय ते कार्य चालू ठेवू शकतील, किंवा त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतील.
थोडक्यात मला माझे काही पैसे किंवा गुंतवणूकी वारसाहक्काच्या बाहेर काढायचे आहेत.

टर्मीनेटर's picture

26 Aug 2022 - 4:58 pm | टर्मीनेटर

निरनिराळी पैशाची मदत आपल्याकडून वेळोवेळी केली जाते.

अच्छा मग ट्रस्ट स्थापन केल्यावरही तुम्ही ही आर्थिक मदत स्वतःकडूनच करत राहणार आहात की त्यात अन्य व्यक्तींना सहभागी करून देणग्या वगैरे स्विकारल्या जाणार आहेत?

आणि हो, ट्रस्टच्या नावे केली जाणारी किमान रक्कम अंदाजे किती असेल?

शाम भागवत's picture

26 Aug 2022 - 6:25 pm | शाम भागवत

लोकांकडून देणग्या घ्यायचा विचार नाही आहे. कोणतीही आयकर सवलत वगैरेही नको आहे. लाँगटर्म गुंतवणूक करायचीय. पुढे मागे वाटले तर ही गुंतवणूक वाढवता येईलही. तसेच माझा उपक्रम समविचारी जवळचे मित्र, नातेवाईक वगैरेंना आवडला व ते स्वतःहून सामील व्हायचे म्हणत असतील तर माझी ना नसेल.
सुरवातीला १०-१५ लाख घालून सुरवात करायची म्हणतोय.

उत्तम! अजून फक्त एक प्रश्न विचारतो...
वेळोवेळी केली जाणारी निरनिराळी पैशाची मदत कोणत्या कारणांसाठी केली जाते? उदाहरणार्थ गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, दिव्यांग्यांना, समाजातल्या वंचित घटकांना की अन्य कुठल्या स्वरूपात.

शाम भागवत's picture

26 Aug 2022 - 6:46 pm | शाम भागवत

जवळपास असंच होत असतं. धार्मीक सुध्दा असू शकते. पण लोकं साधारणतः ओळखीची असतात. खूप वेळेस थेट मदत करता येत नाही. पण कोणतीतरी ट्रस्ट मदत करते आहे असे समजल्यास मदत घेणा-याला ऑकवर्ड वाटत नाही. काही वेळेस काहींना मदत नकोच असते तर अडचणीसाठी कर्जाऊ पैसे उभे झाले तरी खूप झाले असे वाटते.
अशा वेळेस नामानिराळे होऊन काम करता येते.

छान! थोड्याच वेळात तुमच्या मूळ प्रतिसादाला उपप्रतिसाद देतो कारण मोबाईल वर वाचताना चौकट लहान लहान होत चालली आहे त्यामुळे वाचायला त्रास होतोय 😀

डेस्कटॉप पेज उघडा.

जे इनपुट्स तुम्ही दिले आहेत त्यावरून असे सुचवावेसे वाटते कि 'ट्रस्ट' ह्या कालबाह्य संकल्पनेच्या फंदात न पडता तुम्ही 'सेक्शन ८' (Section 8) कंपनी स्थापन करण्याचा विचार करावा.
तुम्हाला अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी त्या माध्यमातून पूर्ण करता येतील. इथे मी जास्त तपशिलात न शिरता काही लिंक्स देतो ज्यावर तुम्हाला चांगली माहिती मिळू शकेल.

https://taxguru.in/company-law/comparative-analysis-trusts-societies-sec...

https://vakilsearch.com/blog/what-are-the-advantages-of-section-8-compan...

https://www.indiafilings.com/learn/section-8-company-registration/

https://www.indiafilings.com/learn/section-8-company/

शाम भागवत's picture

27 Aug 2022 - 2:55 am | शाम भागवत

बघतो.
धन्यवाद.
यासाठीच मला मिपा आवडतं.
_/\_

>>मुंबईत वकील २०००० घेत असतील पुण्यात १० ते १५ हजार आणि राज्यात इतरत्र अधिक स्वस्तात होईल.>>

-१) वकील कशाला/का लागतो? हे सांगाल काय?