पाऊस

अनिरुध्द's picture
अनिरुध्द in जे न देखे रवी...
4 Oct 2008 - 7:23 pm

ग्रिष्माची ती अतिदाहकता
जाळून टाकी प्राणीमात्रा
पावसाची एक सर बरसता
क्षणात येई आल्हादकता

पा़ऊस आला पाऊस आला
सर्वांना भिजवून गेला
झाडे, वेली, पाने, फुले,
गाऊ लागती आनंदी गाणे

पाऊस ओला, पाऊस हिरवा
स्रुष्टी गाते एक मारवा
पाऊस थंडी, पाऊस धुकं
स्रुष्टीला त्याचं किती कवतीकं

हिरवी शेतं, हिरवी रानं
डोळ्याचं फेडती पारणं
डोंगरावरती हिरवी दुलई
आकाशाला इंद्रधनू झिलई

हिरवे डोंगर, वाहती निर्झर
तारुण्याला येई पुन्हा भर
नदी, नालेही भरून वाहती
सागरा मिळण्या अधीर असती

आला श्रावण, गेला श्रावण
भादव्यातले संपले सारे सण
वेद लागले जाण्याचे
वेळी अवेळी बरसण्याचे

पावसातले नक्षत्र हस्त
पाऊस येई गाठून सूर्यास्त
कधी कुठे, कधी किती
वेळी अवेळी पडत जाई

गेला गेला म्हणताना
गर्जत तो येई पुन्हा
गडगडाट अन् विजांचे तांडव
भिजून जाती सारे जीव

शेवटचा तो पडला पाऊस
दिसे न त्याचा काही मागमूस
गेला तो कायमचा आता
वर्ष भराची पुन्हा प्रतिक्षा

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

4 Oct 2008 - 8:28 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2008 - 8:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवटचा तो पडला पाऊस
दिसे न त्याचा काही मागमूस
गेला तो कायमचा आता
वर्ष भराची पुन्हा प्रतिक्षा

बाकी मस्तच आहे कविता खरोखर, पण या ओळींतला "कायमचा" हा शब्द जरा खटकला. अर्थात वर्षभराची प्रतीक्षा आहे पुढच्या ओळीत!

अवांतरः तू काय रे मी बोलले म्हणून लगेच कविता केली/पाडलीस की काय? बाप रे, हल्ली लोकं माझी मस्करी गंभीरपणानी घेतात.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:40 am | विसोबा खेचर

अतिशय सुरेख व बोलकी कविता...:)

जियो...!

तात्या.