कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे संपत्तीकडे

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जनातलं, मनातलं
14 Feb 2017 - 8:57 am

सध्या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत आहेत. त्यात देखील जे आधी पासूनच मान्यवर (?) आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या कार्यकाळात झालेली वाढ हि विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी आहे. केवळ पाच वर्षातील हि प्रचंड वाढ बघता हि सगळी मंडळी कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन वेगाने संपत्तीकडे झेपावत आहेत असे दिसून येते.

जेव्हा तुमच्या आमच्या सारखी सामान्य जन मंडळी (संक्षींच्या भाषेत ईएमआयग्रस्त) जेमतेम उत्पन्न मिळवत असताना या मान्यवर मंडळींची संपत्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें टॅक्स मंडळा अशी कित्येक पटीनी कशी काय वाढत आहे? काहींची संपत्ती केवळ पाच वर्षात अक्षरशः १०० पटीने वाढली आहे. आणि हि सगळी अधिकृत जाहीर केलेली वाढ आहे. या उत्पन्नाचा स्रोत काय असावा? या उत्पन्नावर रीतसर कर भरलेला असावा अशी अपेक्षा आहे. जाहीर न केलेली संपत्ती किती असावी? या मंडळींची गुंतवणूक सोने, ठेवी, शेत जमीन, प्लॉट्स, फ्लॅट, बंगले, गाड्या, रोख इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली दिसते म्हणजे गुंतवणुकीचे सगळी अंडी एकाच बास्केट मध्ये न ठेवण्याचे तत्व पाळलेले दिसते. या मध्ये महिला वर्ग देखील मागे नाही. कित्येक गृहिणी म्हणवणाऱ्या मान्यवर महिलांकडे देखील डोळे विस्फारणारी मालमत्ता आहे हे विशेष.

या सर्वां कडे काही विशेष नैपुण्य आहे, उच्च शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रता आहे असेही नाही. कित्येक मंडळी तर केवळ दहावी, बारावी किंवा जेमतेम पदवीधर आहेत. इतकेच नव्हे तर कित्येकांवर गुन्हे दाखल आहे आणि त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत, असे असूनही जर राजकारणात इतका पैसा मिळत असेल तर राजकारण हा करियर साठी चांगला पर्याय नाही का? एकंदरीत सध्या राजकारण आणि चांगले मार्केटिंग केले तर बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते.

या राजकारणामध्ये अगदी ग्रामपंचायती पासून ते थेट पंतप्रधानापर्यंत वेगवेगळ्या पातळीवर असंख्य संधी उपलब्ध आहेत. कदाचित केवळ हे एकच असे क्षेत्र असावे कि ज्याच्या साठी कुठल्याही शैक्षणिक किंवा इतर अर्हतेची गरज नसावी. एक टर्म जरी संधी मिळाली तरी ती पुढच्या सगळ्या आयुष्याची बेगमी करणारी असू शकते. या कारणामुळे सगळी राजकारणी मंडळी आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणण्यासाठी धडपडत असावीत का?

अर्थात यामध्ये काही सन्माननीय अपवाद असले तरी राजकारणात केवळ एखादे पद मिळाल्यामुळे होणारी संपत्तीतील वाढ हि भारतीय लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

मुक्तकविचारप्रतिक्रियामत

प्रतिक्रिया

कंजूस's picture

14 Feb 2017 - 11:07 am | कंजूस

सरकारी,मुन्शिपालटीतली कंत्राटे मिळतात. कंपन्यांना ,दुकानदारांना ,विक्रेत्यांना वाढीव माप टाकण्याचे पानसुपारीचे हिशेब दाखवत नसतील.

जर राजकारणात इतका पैसा मिळत असेल तर राजकारण हा करियर साठी चांगला पर्याय नाही का? एकंदरीत सध्या राजकारण आणि चांगले मार्केटिंग केले तर बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते.

असहमत. तुम्हाला त्यांचे कष्ट दिसत नाहीत असे दिसते. बाकी आशयाशी मात्र सहमत आहे.

आनन्दा दा,

जर तुम्हाला या लोकांच्या कष्टाची कल्पना असेल तर कृपया इथे सांगा म्हणजे ज्या कोणास माहित नाही त्यांच्या ज्ञानात भर पडेल.

मात्र या मंडळींच्या उत्पन्नाची पातळी आणि त्यात होणाऱ्या वाढीचा वेग बघता त्यांच्या एव्हढे कष्ट करायची सगळ्यांची तयारी असेल असे वाटते.

Sanjay Uwach's picture

15 Feb 2017 - 11:02 pm | Sanjay Uwach

"बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते."
आता यात देखिल खुप कॉपिडीशन (स्पर्धा) सुरु झाली आहे.