पाचोळा
तुझी एखादी आठवण,
जशी अलगद वाऱ्याची झुळूक यावी
पसरलेल्या जुन्या पाचोळ्यावर
एखादं अलगद हिरवंगार पान पडावं
अगदी तस्संच .....
हुरहूर लागलेल्या मनातला पाचोळा उडू लागतो काय
अन सैरभैर आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो काय .....
कुणाची चाहूल लागावी ना
अगदी तस्संच .....
पाचोळ्यातली जुनाट दुःखं ,
नवीन पडलेल्या पानाला पाहून सुखावतात काय
अन टचकन आलेल्या पावसाने, परत भिजतात काय .....
एखाद्याला डोळे भरून पाहावं ना
अगदी तस्संच .......
आता पाचोळा काय कि हिरवं झाड काय
पावसात सगळंच ओलं चिंब ......
हा ऋतू संपला ना, कि परत सगळं पूर्ववत !
नेहमी होतं ना
अगदी तस्संच ........
--------------फिझा
प्रतिक्रिया
30 Jan 2017 - 9:11 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा! अतीशय सुंदर.
7 Feb 2017 - 11:13 pm | Snow White
खूप सुंदर :)