क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
19 Jan 2017 - 6:39 am

भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.

सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.

तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले.

जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या.

तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे.

तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते.

अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले.

एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले.

आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले.

पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून).

तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत.

अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात.

अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो.

हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा ....

जीवनमानदेशांतरअर्थव्यवहारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

3 Feb 2017 - 10:52 am | अप्पा जोगळेकर

इतकं साचेबद्ध जगणारे लोक सुद्धा आपण स्वच्छंदी जीवन जगतोयं आणि आनंदात आहोत या भ्रमात राहू शकतात.
हे तुम्ही माझ्याबद्दल लिहिले आहे का का ?
मी स्वच्छंदी जगत नाही, आनंदाने जगतो. मनात आले तर काम करायचे, मनात आले की झोपायचे असे वागणे मला मान्यच नाही.
आयुष्यात काही महत्वाकांक्षा आहेत, पुढेही असतील. काही पूर्ण केल्या आहेत, काही बाकी आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी मी स्वतःच्या चॉईसने एक रुटीन ठरवले आहे.
त्याबद्दल अधिक काही लिहू इच्छित नाही. खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडणे मला आवडत नाही. एखाद्याला आवडत असेल.
जर वरील वाक्य माझ्याबद्दल नसेल तर हा प्रतिसाद लागू नाही असे समजावे.

ट्रेड मार्क's picture

2 Feb 2017 - 7:57 pm | ट्रेड मार्क

एखादा अगदीच अडलेला असेल तर आणि २ दिवसात रोखीत व्यवहार होतोय म्हणून थोड्या कमी किमतीत तो फ्लॅट देऊ शकतो. पण मग त्यावेळेला बाकी फॅक्टर्स, म्हणजे तुम्हाला फ्लॅट आवडणे; एरिया चांगला असणे; विकणाऱ्याला निकड असणे; दुसऱ्या कोणी आपल्यापेक्षा मोठी ऑफर न देणे ईई सर्व जुळले पाहिजेत. इथे आमच्याकडे ९०% रोख तर सोडाच २०% पण कसेबसे जमा झाले.

तर बाकी तत्वज्ञान ठीक आहे, तुम्ही केलंत हे सर्व एकदम भारी आहे. पण तुम्ही आता जो स्पेसिफिक सिनॅरिओ विचारला आहे त्यात काय करता येईल, कश्याप्रकारे बिनकर्जाने फ्लॅट येईल हे कृपया सांगावे.

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 8:37 pm | पिलीयन रायडर

काही प्रश्नः-

१. तुम्ही १९९५ साली जे दागिने आणि भांडी विकली, ती सर्व तुम्ही स्वतःच्या पैशाने घेतली होती की वडिलोपार्जित / लग्नात आलेली होती? थोडक्यात ३.५ लाख, जे तुम्ही कॅशमध्ये उभे केलेत, ते तुमचे स्वतःचे होते की घरच्यांनी (आणि सासरच्यांनी) अप्रत्यक्ष का होईना, तुम्हाला मदत केली?

२. तुमचे १९९५ साली वय काय होते?
माझा अंदाज आहे की आज तुमचे वय ६०+ आहे. म्हणजे २५ वर्षांपुर्वी तुम्ही पस्तीशीत असाल. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. इथे लोक बहुदा नोकरी लागली की लगेच काही वर्षात, म्हणजे साधारण २५-३० मध्येच पुण्यात घर घ्यायचा विचार करत आहेत. साधारण नवी नोकरी + नवं लग्न + मुल + घरून आर्थिक मदत नाही (कदाचित त्यांचीच जबाबदारी आपल्यावर आहे) अशात घर घ्यायचे असेल तर लिक्विडेट करायलाही अ‍ॅसेट्स नसतात. अशावेळी कर्ज घेणे शहाणपणा आहे.

३. आमचे घर २००३ साली ८ लाखाला घेतले. जे की सगळं लिक्विडेट करुन कॅशनी घेणंही आम्हाला कदाचित शक्य होतं. (सोन्याचे भाव तेव्हा कमी होते त्यामुळे साशंक आहे..). तेच बाजुला हिंजवडी आयटी पार्कची बुम आली आणि १० वर्षात किंमत ३५ लाख झाली. घरातल्या बाकी मालमत्तेची (दागिने, भांडी इ.) किंमत मात्र तितक्या पटीने वाढली नव्हती. तेच घर दहा वर्षानी आम्हाला कॅशने घेता आले नसते. (आई बाबांची नोकरी २०+ वर्ष झालेली असुनही..) तेव्हा वेळेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. मधल्या काळात घरांच्या किंमती खुप जास्त रेटने वाढल्या. पगार, सोनं, चांदी इ त्या वेगाने वाढले नसतील. तुम्ही त्या ग्राफमध्ये स्लोप कमी असताना घर घेतलंय आणि आम्ही स्लोप स्टिप होत असताना. काही आश्चर्य नाही की तुम्हाला कर्ज लागलं नाही. माझे वडील अत्यंत गरीब घरातुन आहेत. आणि २५ वर्षांपुर्वी फ्लॅट घायला "१ लाख" त्यांच्याकडे नव्हते. ( त्याच सुमारास तुमच्याकडे मात्र ३.५ लाख कॅश होते..) त्यांनी कर्ज घेतलं तेव्हा माझे आजोबा भयानक घाबरले होते आणि म्हणाले की आयुष्य जाणार तुझं ह्यात.. आज माझ्या वडीलांचे ३ फ्लॅट्स आहेत. कर्ज घेऊन. कॅशची वाट पहात बसलो असतो तर एकही झालं नसतं.

४. ज्यांचा बिझिनेस असतो त्यांना जनरलीच वीक डे आणि वीक एन्ड असा प्रकार नसतो. बिझिनेस करणारा माझा भाऊ सुद्धा अचानक उठुन बुधवारी महाबळेश्वरला जातो आणि कधी कधी ३ -३ दिवस न झोपता काम करत असतो. जे नोकरी करतात, त्यांना दोन्हीची गरज नसते. आणि दॅट्स ओके!
तुम्ही सुद्धा मागे एका चर्चेत "३१ जुन / जुलैच्या कामामुळे उत्तर देता येणार नाही." हे बोलला होतात. तेव्हा तुम्हाला अनेकांनी त्यावरुन डिवचलंही होतं. तेव्हा डेडलाईन्स तुम्हालाही आहेतच. पण बिझनेस असल्याने त्या तुमच्या हातात आहेत.

संक्षी तुम्ही बुद्धिमान आहातच. म्हणुन तुमच्याकडे उत्तम शिक्षण आहे, बिझनेस जोरात आहेत, पैसाही पुष्कळ असेल. सर्वांची हीच परिस्थिती नसते. सामान्य बुध्यांक आणि यथातथा शिक्षण असणारे लोक फारसा पैसा गाठीशी नसताना झगडत असतात. उगाच त्यांना हिणवु नये. लोक आपआपल्या पद्धतीने आनंद शोधत असतात.

संजय क्षीरसागर's picture

2 Feb 2017 - 9:09 pm | संजय क्षीरसागर

उगाच त्यांना हिणवु नये. लोक आपआपल्या पद्धतीने आनंद शोधत असतात.

तुमच्या याच अप्रोचमुळे चांगला मुद्दा कायम हरवत आला आहे. मी जगण्याचा एक वेगळा अंदाज़ मांडतो आहे. तुम्ही इतरांना कमी लेखतो हा स्टँड घेतला तर विषयच संपला.

कित्येक महिने मला अक्षरशः एक रुपया सुद्धा मिळत नाही कारण धंद्यात मीटर चालू नसतं त्यामुळे उगीच भलते कंपॅरिटीवज आणण्यात अर्थ नाही. शून्य कमाईत तर लोकांचे प्राण कंठाशी येतील पण माझ्या जगण्यात कणमात्र फरक पडत नाही . शिवाय माझ्याकडे झीरो स्टाफ आहे यावरनं व्यावसाय किती मोठा असू शकेल याची कल्पना करा.

पुन्हा आणि शेवटचं सांगतो

साहसाचा पैश्याशी काहीएक संबंध नाही. तुम्ही स्वतः ला पैश्यापेक्षा श्रेष्ठ समजत असाल तर स्वच्छंद गवसतो. त्याचा क्वालिफिकेशन आणि बुद्धिमत्ता याच्याशी देखिल संबंध नाही तर स्वतःच्या गौरवाशी आहे. आणि मी या मार्गानं गेलो आहे. बाकी तुमची मर्जी.

उद्या पुन्हा टेबलटेनीस टीमची पिकनिक आहे त्यामुळे उत्तरं द्यायला जमणार नाही.

माझा मुद्दा मांडून झाला आहे आणि धागा ही नेहेमीच्या वळणावर चाललेला दिसतो त्यामुळे या धाग्यावर पुन्हा उत्तर देईन असं ही नाही.

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 9:15 pm | पिलीयन रायडर

हे तर आपलं नेहमीचं झालं. स्टँडर्ड भांडण आहे ते आपलं. ते राहु दे बाजुला.

साहस वगैरे सगळं खरं आहे. तुम्ही कर्ज काढणारे आनंदात राहु शकत नाहीत असं म्हणताय आणि मुद्दा केवळ तोच आहे की निव्वळ साहसाची तयारी असणं पुरेसं आहे का. मुळात आनंदाचा, स्वच्छंदी रहाण्याचा कर्जाशी काही संबंध नाही.

सध्या तुम्ही माझ्या प्रश्न १ आणि २ ची उत्तरं द्या. तितकं पुरे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 9:34 pm | हतोळकरांचा प्रसाद

स्वच्छंदी रहाण्याचा कर्जाशी काही संबंध नाही.

हेच मत जवळजवळ सगळ्या प्रतिवाद करणाऱ्या सदस्यांनी वर मांडले आहे पण संक्षिना ते पटले नाही. संक्षिची स्वछंदी असण्याची व्याख्या खूप सोपी आहे - कुठलंही काम न करण्याचा पर्याय. स्वछंदीपणा हि वृत्ती आहे हेच त्यांना मान्य नाही त्यामुळे खाली जमिनी सत्यता, वर तत्वज्ञान आणि मधे अर्थकारण असं एक स्वादिष्ट सँडविच तयार झालेले आहे :):).

ट्रेड मार्क's picture

2 Feb 2017 - 9:24 pm | ट्रेड मार्क

१००% सहमत

पिराताई, हा मिपावरील सर्वात आवडलेल्या प्रतिसादांपैकी एक.. फार संयमी, चपखल मांडणी केलीत तुम्ही.

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 6:48 pm | सुबोध खरे

हांगाशी. आता हे स्वच्छंदाचे सत्य बाहेर आले.
२५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ साली ३. ५ लाख रूपये होते म्हणजे संक्षी श्रीमंतच होते. साडेतीन लाखात तेंव्हा लॉ कॉलेज रॉड वर किंवा पार्वती पायथ्याशी झकास २-३ बेडरूमचे घर मिळत असे.
त्यामुळे त्यांनी सांगितलेली गृहीतके मध्यमवर्गीयांसाठी नाहीतच.
मी १९८८ साली पहिला पगार घेतला तो ३६००/- होता. त्यातील २६००/- मला हातात आले. (माझा भाऊ व्हीजेटीआय मधून इंजिनियर होऊन १९८५ साली नोकरीला सिमेन्स सारख्या कंपनीत लागला होता जी एक उत्तम पगार देणारी कंपनी होती त्याचा १९८८ साली पगार ४०००/- होता.)
१९९२ साली मी लग्नासाठी रोहिणीत जाहिरात दिली तेंव्हा माझा पगार ६४००/- होता. म्हणजे माझा एक पैसा सुद्धा ना कापता पाच वर्षाचा सर्वच्या सर्व पगार बँकेत टाकला असता तरीही साडे तीन लाख जमले नसते.माझ्या मूळ पगाराच्या स्लिप्स आजही माझ्याकडे आहेत.
लक्षात घ्या डॉक्टरला मूळ पगारात (बेसिक मध्ये) २५ % जास्त non practising allownce मध्ये भर असते त्यामुळे त्यावेळेस चार वर्षे नोकरी असलेल्या कोणत्याही सरकारी प्रथम वर्ग राजपत्रित अधिकाऱ्याच्या पेक्षा(आय ए एस पेक्षाही) लष्करात डॉक्टरला पगार जास्त असतो. असे असून मला साडे तीन लाख रुपये स्वकष्टाचे जमा करणे अशक्य होते.
किंवा सोन्याच्या भावाशी तुलना केली तर तेंव्हाच्या सोन्याच्या भावापेक्षा आजचा भाव ७ पट आहे म्हणजेच आज कोणालाही स्वबळावर घर घ्यायचे असेल तर जवळ जवळ २५ लाख रुपये राख शिल्लक असावी लागेल.
थोडक्यात संक्षीनि हि जी काही स्वच्छंदाची टेप लावली आहे त्याचा मूळ आधार त्यांच्या श्रीमंतीत होता किंवा आहे. साधारण उच्च मध्यम वर्गास सुद्धा स्वबळावर घर घेणे अशक्य आहे.

आदूबाळ's picture

3 Feb 2017 - 6:55 pm | आदूबाळ

+१

यहीं तो मै (और चिंगी मिंगी केशव हमीद और ग्राम मिपा से हमारे बहुत सारे साथी) कह रहा हूं मालिक...

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 12:23 am | संजय क्षीरसागर

थोडक्यात संक्षीनि हि जी काही स्वच्छंदाची टेप लावली आहे त्याचा मूळ आधार त्यांच्या श्रीमंतीत होता किंवा आहे.

थोडा गैरसमज दूर करतो. मी मोठा मुलगा असल्यानं आई, वडील आणि धाकटा भाऊ प्लस माझी पत्नी आणि मुलगा यांची जवाबदारी पहिल्यापासून माझ्यावर आहे. घर एकत्र कुटुंबाचं असल्यानं सर्व पैसे माझे नव्हते. वडीलांचाही त्यात मोठा वाटा होता प्लस आम्ही दागिने आणि घरातली सर्व चांदीची भांडी विकून ती रक्कम उभी केली होती.

पुढे तर आणखी मजा आहे. माझी पत्नी क्वालिफाइड असून आणि घरातून कोणताही विरोध नसतांना सुद्धा तीनं आयुष्यात कधीही नोकरी केली नाही आणि करणारही नाही. ती माझ्यासारखीच आणि माझ्याबरोबरीनं मजेत जगते.

आज वडीलांच्या पश्चातही सर्व कुटुंबाची जवाबदारी माझ्या एकट्यावर आहे. मी श्रीमंत वगैरे काही नाही पण जो शौक केवळ संपन्न आणि बुद्धिमान लोक करु शकतात तो अध्यात्माचा शौक मी ऐन तारुण्यात केला . जो काही स्वच्छंद गवसला आहे तो त्या अध्यात्मिक साधनेचा परिपाक आहे.

माझ्यापेक्षा तुम्ही जास्त संपन्न आहात (दोन प्लॅटस, कमावती पत्नी, सुनियोजित इनव्हेस्टमेंटस, नियमीत पेन्शन आणि विभक्त कुटुंब ). देअर इज नो कंपॅरिजन अ‍ॅट ऑल !

तुम्ही विषय काढलायं म्हणून लिहीलं पण स्वच्छंद जगणारा कधीही दुसर्‍याशी तुलना करत नाही कारण त्याचा स्वच्छंद सांपत्तिक स्थितीवर अवलंबून नसतो. तो सांपत्तिक स्थिती ही स्वतःची कर्तबगारी समजत नाही. असेल त्या सांपत्तिक स्थितीत आणि परिस्थितीत कोणतीही सबब न देता तो 'दि ऑप्शन नॉट टू वर्क' आयुष्यातल्या हरेक दिवशी आणण्याचं साहस करतो आणि ही त्याची एकमेव कर्तबगारी असते.

वरचे तुमचे अनेक प्रतिसाद वाचले, फक्त वर्तमानात जगणे, भविष्याचा कोणताच विचार न करणे इ. त्तुंम्ही अगदी स्वेच्छेने सगळे व्यक्तीगत तपशील शेअर केलेत. त्यामुळे विचारावेसे वाटले - तुंम्ही १९९७ नंतर काही विमा पॅालिसी घेतलीय का? अारोग्य विमा वगैरे? विमा व्यवसायच तुंम्हाला इन् व्हॅलीड व्यवसाय अाहे, असे वाटते का? तसेच गुंतवणूकही तुंम्ही करत नाही असे म्हणता. ते सल्ले तर तुमचे ग्राहक मागतच असणार. शेअर बाजार ही एक अनावश्यक व अनुत्पादक गोष्ट अाहे असे अापण मानता का?

संजय क्षीरसागर's picture

1 Feb 2017 - 11:49 pm | संजय क्षीरसागर

तुंम्ही १९९७ नंतर काही विमा पॅालिसी घेतलीय का? अारोग्य विमा वगैरे? विमा व्यवसायच तुंम्हाला इन् व्हॅलीड व्यवसाय अाहे, असे वाटते का?

पर्सनल अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्स आणि मेडीक्लेम आहे. तो काहीसा जुगार आहे हे मान्य पण स्टेक ठीक वाटतो. अर्थात, बँक ऑफ इंडीयाची एनायसिएलशी टाय-अप असलेली मेडीक्लेम पॉलीसी आहे त्यामुळे प्रिमीयम किरकोळ आहे. पर्सनल अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्सचा प्रिमियम ही शुल्लक आहे. वर्षाला एक प्रिमीयम भरला की विषय संपला. जीवन बीमा कधीच नाही.

तसेच गुंतवणूकही तुंम्ही करत नाही असे म्हणता. ते सल्ले तर तुमचे ग्राहक मागतच असणार. शेअर बाजार ही एक अनावश्यक व अनुत्पादक गोष्ट अाहे असे अापण मानता का?

शेअर बाजार हा प्रतिष्ठितांचा जुगार आहे तस्मात मी एकही पैसा शेअरमधे गुंतवलेला नाही आणि कोणतीही इनवेस्टमेंट कन्सलटंसी करत नाही.

स्वधर्म's picture

2 Feb 2017 - 11:33 am | स्वधर्म

वरील दोन्ही गोष्टी न करणारा एक तरी भेटला! माझी मते टोकाची नसली, तरी मी याच ट्रॅकवर अाहे.

ट्रेड मार्क's picture

2 Feb 2017 - 9:36 pm | ट्रेड मार्क

माझी आणि कदाचित बऱ्याच जणांची ही अपेक्षा होती की कर्ज न घेता किंवा गेलाबाजार कमीतकमी कर्ज घेऊन घर कसे घेता येईल याचे मार्गदर्शन तुमच्याकडून मिळेल. कर्ज घेऊ नये हे तत्वज्ञान आपले सगळ्यांचे वाडवडील सांगत आलेच आहेत. त्यामुळे तो विचार आपल्यासाठी नवीन नाहीये, फक्त एखाद्या अर्थविषयातल्या तज्ज्ञाने हे कसं साध्य करावं हे सांगितलं असता तर बरं झालं असतं.

पण एवढ्या काथ्याकुटातून आपण हे मात्र नक्की म्हणू शकतो की कर्ज असायला हरकत नाही पण ते डोईजड होईल एवढे नसावे. आयुष्यातल्या छोट्यामोठ्या घटनांचा आनंद घ्यावा की घेऊ नये किंवा कसा घ्यावा हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर आणि मानसिकतेवर ठरते. एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया कोण कशी देईल हे त्या व्यक्तीच्या जडणघडणीवर, पार्श्वभूमीवर आणि अनुभवांवरून ठरत असते. तसेच एकाच घटनेला त्या व्यक्तीची प्रतिक्रिया प्रत्येक वेळी अगदी सेम टू सेम असेल याची पण खात्री नाही. असो!

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 12:36 am | संजय क्षीरसागर

माझी आणि कदाचित बऱ्याच जणांची ही अपेक्षा होती की कर्ज न घेता किंवा गेलाबाजार कमीतकमी कर्ज घेऊन घर कसे घेता येईल याचे मार्गदर्शन तुमच्याकडून मिळेल.

तुम्ही पहिल्यापासनं एकच ठेका लावला आहे. तुम्हाला घराच्या मालकीची पडलीये आणि मी जगण्यावर हुकूमत मिळवण्याची गोष्ट सांगतोयं. कर्ज घेऊन घर कसं करावं हे सांगणारे अनेक आहेत किंवा थोड्या फार कॅलक्युलेशन्सनी कुणीही ते स्वतःचं स्वतः करु शकेल. जर तुमचा तोच हेका असेल तर माझे प्रतिसाद तुमच्यासाठी निरुपयोगी आहेत.

ट्रेड मार्क's picture

4 Feb 2017 - 2:50 am | ट्रेड मार्क

तुम्ही पण पहिल्यापासून एकच हेका लावून धरलाय की कर्ज असेल तर मनुष्य स्वच्छंद जीवन जगू शकत नाही. तुम्ही ज्या प्रकारचे स्वच्छंद जीवन म्हणताय ते कर्ज असूनही बहुतेक करून सगळेच मिपाकर जगत आहेत. इच्छा नसेल तर काम न करण्याचा विकल्प सगळ्यांनाच उपलब्ध आहे. पण मग तरीही तुम्ही एकटेच स्वच्छंद जीवन जगताय असे तुम्हाला का वाटते?

मी तर नुसता कर्ज मिळण्याचा (क्रेडिट कार्ड) विकल्प खुला ठेवून माझा किती फायदा करून घेतला हे आकडेवारीसकट सांगितले आहे. बऱ्याच प्रतिसादकर्त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले. पण तरीही तुम्हाला आम्ही कोणीच आम्हाला पाहिजे तसं स्वच्छंद जीवन जगतो हे पटत नाहीये.

कर्ज घेऊन घर कसं करावं हे सांगणारे अनेक आहेत किंवा थोड्या फार कॅलक्युलेशन्सनी कुणीही ते स्वतःचं स्वतः करु शकेल.

कर्ज घेऊन घर कसं घ्यायचं याचा आम्हा सगळ्यांना फर्स्टह्यांड अनुभव आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय की कर्ज घेता घर कसं घ्यायचं ते सांगा.

आम्ही तुम्हाला सांगतोय की कर्ज न घेता घर कसं घ्यायचं ते सांगा.

+ अद्ध्यात्म मधे न आणता व्यावहारीक उपायांनी पैसा कसा उभा करावा हे सांगणे अपेक्षित आहे + जवळ काही अति किंमती अ‍ॅसेट्स नाहीत विकायला हे गृहीत धरा.

संजय क्षीरसागर's picture

4 Feb 2017 - 10:55 am | संजय क्षीरसागर

इच्छा नसेल तर काम न करण्याचा विकल्प सगळ्यांनाच उपलब्ध आहे.

खरं की काय ? मग स्वच्छंद जगायला काय अडचणे ? मला वाटेल तेव्हाच काम करीन हा विकल्प असलेली व्यक्ती प्रश्न विचारत नाही तर स्वच्छंद जगते.

कर्ज न घेता घर कसं घ्यायचं ते सांगा.

हवेतून पैसे कसे काढावेत याची मला कल्पना नाही. घर नसतांना सुद्धा स्वछंद जगता येतं, त्यासाठी वर्तमान भविष्याकडे गहाण ठेवायची गरज नाही असा माझा मुद्दा आहे. शिवाय घर तर तुमच्याकडे आहेच आणि तुम्ही तर स्वेच्छेनं काम करता असं म्हणतायं तर मग प्रश्न काये ?

पण तरीही तुम्हाला आम्ही कोणीच आम्हाला पाहिजे तसं स्वच्छंद जीवन जगतो हे पटत नाहीये.

स्वच्छंद जगणारा प्रश्न कशाला विचारेल ? तो म्हणेल येस ! स्वच्छंद जगणं हा माझा शौक आहे. घराची मालकी माझा स्वच्छंद हिरावून घेऊ शकत नाही. मी काहीही झालं तरी माझा वर्तमान भविष्याकडे गहाण ठेवणार नाही. कृष्ण म्हणतो तसा मी स्वतःच सनातन वर्तमान आहे. जी गोष्ट मला वर्तमानाच्या स्वछंदाशी तडजोड करायला लावेल ती मी कदापिही करणार नाही.

घरासाठी वेगळा आखाडा लाऊ , जरा कार्ड बद्दल बोला ना..

अमेरिकन एक्ष्प्रेस्स ची चार्जे कार्ड्स आहेत. https://www.americanexpress.com/in/content/charge-cards/?linknav=in:acq:...
ती पण चांगली आहेत.

मी सिटी प्रेस्टीज पासून sbi, स्तन्देर्त चार्तेअर्द पर्यंत बरीच कार्ड गेल्या १४+ वर्षात वापरली आहेत. एकदाही दंड / व्याज भरले नाही. जर या कार्डांचा योग्य वापर केला तर नक्की १-६% बचत होते. साधारण ३० दिवसांचे क्रेडीट मिळते ते निराळेच. हेच पैसे मी ३० दिवस लिक़ुइद फुंड मध्ये ठेवतो त्यावर साधारण १% मिळतात.
थोड्यात कार्डवर होणार्या सर्व खर्चावर वार्षिक साधारण ३-४% बचत होऊ शकते.

पण हेच कार्ड जर फुल पेमेंट न करता वापरले तर तुमची नक्की वाट लागते. या अश्या लोकांवरच क्रेडीत कार्ड चा धंदा चालतो.

तुमच तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या प्रकारात जायचे आहे आणि मग कार्ड वापरा.