क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
19 Jan 2017 - 6:39 am

भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.

सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.

तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले.

जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या.

तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे.

तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते.

अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले.

एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले.

आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले.

पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून).

तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत.

अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात.

अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो.

हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा ....

जीवनमानदेशांतरअर्थव्यवहारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

20 Jan 2017 - 9:26 pm | गॅरी ट्रुमन

बँकबाझारवर चुकूनही तुमचा खरा मोबाईल नंबर देऊ नका. ते फोन करून फार पिडतात.

चिनार's picture

21 Jan 2017 - 9:42 am | चिनार

धन्यवाद !!

संदीप डांगे's picture

20 Jan 2017 - 9:04 pm | संदीप डांगे
धर्मराजमुटके's picture

20 Jan 2017 - 9:38 pm | धर्मराजमुटके

इकडे बरेच जण अमेरिका निवासी असल्यामुळे एक बाळबोध प्रश्न विचारतोय. अमेरीकेत दोन किंवा जास्त मोबाईल नंबर वापरणारे लोक्स आढळतात काय ? भारतात तरी दोन नंबर वापरणे काळाची गरज बनली आहे असे वाटतेय.

ट्रेड मार्क's picture

20 Jan 2017 - 9:59 pm | ट्रेड मार्क

इथे २-२ मोबाईल वापरणारे फार बघितले नाहीत. अगदीच स्वतःचा एक आहेच पण ऑफिसने अजून एक दिलाच तर. पण त्यातही भारतीय लोक्स जास्त आहेत. सहसा अमेरिकन्स २ मोबाईल वापरताना मी बघितले नाहीत. एवढंच काय इथे ड्युअल सिमचे फोनसुद्धा सहज मिळत नाहीत.

तसंही फोन सर्व्हिस बरीच महाग आहे, त्यामुळे स्वतःहून २ फोन आणि नंबर्स वापरणारे कमीच असतात.

अमेरिकेत एखादं कार्ड जर काही फायद्यांसाठी घेतलं आणि वर्षभर वापरून बंद केल तर क्रेडिट स्कोअर वर याचा वाईट परिणाम होतो का.मी सध्या BOA च कार्ड काही फायद्यांसाठी घ्यायचा विचार करत आहे.
तसच एका पेक्षा अनेक कार्ड असण्याचा सुद्धा परिणाम स्कोअर वर होतो का? (गृहीत धरलंय कि मी सगळ्या कार्ड्स च पेमेंट वेळेत करत आहे)

बटाटा१'s picture

23 Jan 2017 - 7:31 am | बटाटा१

क्रेडीट कार्ड, सेविंग खाते बंद केले तर क्रेडीट स्कोर वर वाईट परीणाम होतो.

गॅरी ट्रुमन's picture

23 Jan 2017 - 9:50 am | गॅरी ट्रुमन

क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या नावावर किती एन्क्वायरीज आहेत आणि तुमच्या सर्वात जुन्या अकाऊंटचे वय किती हे दोन मुद्दे असतात. समजा तुम्ही वर्षभर एखादे कार्ड वापरलेत तर सुरवातीला तुमच्या नावावर एक एन्क्वायरी येईल आणि भविष्यात नवे क्रेडिट कार्ड हवे असेल तर दुसरी एन्क्वायरी येईल. त्यातून सर्वात जुने कार्ड बंद केलेत तर दिसताना सर्वात जुन्या अकाऊंटचे वय कमी दिसेल. म्हणजे समजा दोन कार्डे असतील---एक १० वर्षे जुने आणि दुसरे ४ वर्षे जुने. त्यातील १० वर्षे जुने कार्ड बंद केले तर सर्वात जुन्या कार्डाचे वय ४ वर्षे दिसेल आणि त्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होईल.

ट्रुमन यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिले कार्ड बंद केले तर स्कोअरवर परिणाम होतो कारण क्रेडिट हिस्टरीचा कालावधी कमी दिसतो. पण नंतर घेतलेले कार्ड बंद केले तर स्कोअरवर परिणाम होणार नाही. स्कोअरवर परिणाम करणाऱ्या प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे

१. क्रेडिट हिस्टरीचा कालावधी किंवा वय - सगळ्यात जुन्या क्रेडिट कार्डचे वय २ वर्षांपेक्षा कमी असेल तर स्कोअर वर परिणाम होतो.

२. किती टक्के वेळा सगळ्या कार्डचे बिल वेळेत आणि पूर्ण भरले - म्हणजे वेळेवर तुम्ही स्टेटमेंट बॅलन्स भरला तर स्कोअरमध्ये वाढ होते. पण जर का तुम्ही मिनिमम बॅलन्स भरत असाल तर ते रिवोलविंग क्रेडिट मध्ये धरले जाते, ज्यामुळे स्कोअर कमी होतो. थोडक्यात घेतलेले कर्ज (कार्डवर) वेळेत पूर्ण भरायची तुमची कपॅसिटी नाही असा अर्थ धरला जातो.

३. एकूण कार्ड लिमिटच्या किती टक्के खर्च करता - उदाहरणार्थ जर का एखाद्याच्या सगळ्या कार्ड्सच्या लिमिटची टोटल $५०००० आहे. जर का खूप चांगला क्रेडिट स्कोअर ठेवायचा असेल तर कुठल्याही महिन्यात त्याने या लिमिटच्या १०% वर म्हणजे $५००० च्या वर खर्च करू नये. जसा जसा हा खर्च वाढत जातो तसा तसा स्कोअरवर परिणाम होतो. जर का $१०००० खर्च करून तो वेळेत पूर्ण भरत असेल तर फारसा परिणाम होणार नाही. पण मग एवढे उत्पन्न कुठून येते याचा शोध घेतला जाईल.

४. सतत नवीन कार्ड्स घेत राहिलं तर - जर कोणी एकसारखं क्रेडिट कार्ड साठी अर्ज करत असेल तर त्या व्यक्तीला पैश्यांची गरज आहे असे समजले जाते. जेव्हा अर्ज केला जातो तेव्हा ती कार्ड कंपनी क्रेडिट रेटिंग एजेन्सीकडे चौकशी करते याला हार्ड inquiry म्हणतात, ज्याने स्कोअर कमी होतो.

५. एखादं बिल भरलं नाही तर - फक्त क्रेडिट कार्ड्सचेच नव्हे तर बाकी कुठलेही बिल जर भरले नाही तर ३ रिमाइंडर नंतर ते कलेक्शनला जाते व हे लगेच क्रेडिट रिपोर्टवर दिसते. याचा खूप मोठा परिणाम रेटिंगवर होतो तसेच नवीन कर्ज मिळायला त्रास होतो आणि जे मिळते ते बऱ्याच जास्त टक्के व्याजाने मिळते. या बिलांमध्ये युटिलिटी बिल्स, मेडिकल बिल्स, क्रेडिट कार्डची बिले तसेच कर्जाचे हप्ते यांचा समावेश होतो.

पण क्रेडिट कार्ड्स बंदच करु नयेत असे नाही. काही वेळेला दुसरं एखादं कर्ज (कार, घर) घेण्यासाठी तुम्हाला एखादं कार्ड बंद करायला लागू शकतं. एखाद्याला जास्तीत जास्त कर्ज किती मिळू शकतं हे त्याच्या उत्पन्नावर आधारित आहे. वरील उदा. मध्ये जर का त्या व्यक्तीची कमाल कर्ज मिळण्याची क्षमता $६०००० आहे त्यातले त्याने $५०००० क्रेडिट कार्डच्या स्वरूपात आधीच घेतलेले आहेत. समजा त्याला $२०००० वाहन कर्ज घ्यायचे असेल तर त्याला $१०००० चे कार्ड्स बंद करायला लागू शकतात.

सही रे सई's picture

24 Jan 2017 - 3:27 am | सही रे सई

धन्यवाद. खुप चांगली महिती दिलीत. याचा नक्कीच उपयोग होईल.
माझ्या नवऱ्याच DCU च कार्ड आहे आणि त्याच्या मते मी पण तेच घ्याव. तर DCU च्या कार्ड बद्दल काही माहिती मिळेल का.

ट्रेड मार्क's picture

24 Jan 2017 - 8:12 pm | ट्रेड मार्क

DCU चे क्रेडिट कार्ड ठीकठाक आहे. तुम्ही DCU कडून कार लोन घेतलं आणि त्यासाठी तिथे चेकिंग अकाउंट उघडलं असावं असा माझा अंदाज आहे. माझ्या मते जास्त फायदे देणारी बरीच कार्ड्स आहेत. ज्या बँकेत तुमचं चेकिंग अकाउंट आहे त्या बँकेचं एक कार्ड असावं आणि ते कायम ठेवावं (म्हणजे बंद करू नये). बाकी चांगल्या ऑफर्स देणारी कार्ड्स म्हणजे -

BOA: Cash Rewards व better balance rewards - दोन्हीला वार्षिक फी नसते

Chase: Freedom (वार्षिक फी नाही) व
Saffire - $९५ वार्षिक फी पण पहिले वर्ष माफ, $३००० पहिल्या ३ महिन्यात खर्च केला तर ५०००० पॉईंट्स मिळतात. बाकी पण बरेच फायदे आहेत.

United Mileage Plus - $९५ वार्षिक फी पण पहिले वर्ष माफ, $३००० पहिल्या ३ महिन्यात खर्च केला तर ५०००० पॉईंट्स मिळतात. बाकी पण बरेच फायदे आहेत जसे की United च्या flights ला preference, No Foreign Transaction Fee ई. ई.

Citi Thank you Rewards - वार्षिक फी नाही

Discover - वार्षिक फी नाही

तुमच्या क्रेडिट स्कोअर प्रमाणे तुम्हाला कुठली कार्ड्स मिळू शकतात आणि त्यांची तुलना creditkarma वर मिळते.

अनन्त अवधुत's picture

27 Jan 2017 - 8:39 am | अनन्त अवधुत

चेस आणि United Mileage Plus हे दोन कार्ड्स खूप छान आहेत पण त्यांची वार्षिक वर्गणी अंमळ जास्त वाटते. जे लोक सतत प्रवास करतात त्यांच्या साठी हे दोन्ही कार्ड्स फार उपयुक्त आहेत.
ह्या दोन शिवाय कॅपिटल वन व्हेंचर पण खूप उपयुक्त आहे.
वार्षिक फी $५९ (पहिल्या वर्षी फी नाही),
प्रत्येक डॉलर मागे २ माइल्स मिळतात. आता माइल्सचा हिशोब हा १०० माइल्स म्हणजे १ डॉलर असा आहे. म्हणजे एक माईल = १ सेंट
पहिल्या तीन महिन्यात मिळून $३००० जर बिल झाले तर ४०००० माइल्स मिळतात जे कि $४०० आहेत.
हे माइल्स हॉटेल बुकिंग, विमानाचे तिकीट, आणि कार रेंटलसाठी वापरता येतात.
कॅपिटल वनचे अजून एक क्विकसिल्व्हर कार्ड (नो फी) पण आहे. ह्या दोन कार्ड्स च्या तुलनेसाठी हा दुवा पहा.

पैसा's picture

25 Jan 2017 - 10:33 am | पैसा

ज्यांना कोणाला क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नको असतील त्यांनी आपापली कार्डे मला पाठवा बघू! =)) (पिनसकट)

गॅरी ट्रुमन's picture

25 Jan 2017 - 11:15 am | गॅरी ट्रुमन

पैसाताई,

माझ्या प्रतिसादात मी अमेरिकन एक्सप्रेसचे कार्ड वापरतो असे म्हटले होते. ते कार्ड इथे देत आहे. ते पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे वापरा. वेळ मिळेल त्याप्रमाणे एच.डी.एफ.सी चे कार्डही देतोच.

card

पैसा's picture

25 Jan 2017 - 11:22 am | पैसा

=)) ठँक्यु! तेवढं CVV आणि पिन सांग की! =)) =))

सुनील's picture

26 Jan 2017 - 6:16 pm | सुनील

कार्ड इम्मॉर्टल आहे वाट्टं???? ;)

अमेक्स कार्डाचा CVV चार आकडी असतो "छोट्याश्या" तृटीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे!! ;)

धनावडे's picture

26 Jan 2017 - 12:02 pm | धनावडे

बचतवर balance जर minus असेल तर सिबील वर काय परिणाम होतो का?

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 12:00 am | संजय क्षीरसागर

उदा. द्यायचं झालं तर मी पण नोकरी करत असूनही मनाला येईल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो.

प्रश्न सुट्टी घेता येण्याचा नाही, काम न करण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे का ? असा आहे. सकाळी उठल्यावर जर अनिवार्यपणे कामाचे वेध लागत असतील तर जीवन स्वच्छंद होत नाही. कर्ज घेतलेली व्यक्ती काम न करण्याचा विकल्प डेली रुटीनमधे आणू शकत नाही. रीतसर रजा घेऊन ( शक्यतो बॉसच्या मर्जीनं) ती लिमीटेड स्वातंत्र्य घेऊ शकते.

त्यामुळे कर्ज घेतलं, इएमआयचं शुक्लकाष्ठ मागे लागलं म्हणजे आयुष्याची वाट लागली असं काही नाहीये.

काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो.

बाकी पैसा हा भाग सोडून जबाबदारी हा एक मोठा फॅक्टर आहे.

स्वच्छंदी व्यक्ती जवाबदारी सहज पेलू शकते. कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते.

कारण छंद म्हणा वा सवय, आपण सर्व मिपावर वेळ घालवतो, ज्यातून पैसे मिळत नाहीत.

इथे केलेला टिपी हा संपूर्ण दिवसाच्या पाच टक्के पण नसेल त्याची तुलना स्वच्छंदाशी होऊ शकत नाही. स्वच्छंद हे दिवसभरासाठी आणि सदैव उपलब्ध असलेलं स्वातंत्र्य आहे.

ट्रेड मार्क's picture

27 Jan 2017 - 1:02 am | ट्रेड मार्क

काम न करण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे का ?

म्हणजे तुम्ही १२ ही महिने एकही दिवस काम न करण्याबद्दल बोलताय का? तर माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत.
कारण मधेच १ दिवस ते काही दिवस सुट्टी घेण्याचा विकल्प मलाही उपलब्ध आहे आणि बहुतांशी लोकांना असतो. माझा छंद म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन विविध ठिकाणांना भेटी देणे, वेगवेगळे Cuisines खाणे आणि मित्रांबरोबर पार्टी करणे. हे सर्व मी मनाला येईल तेव्हा करतो.

काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो.

माझे पण इएमआय चालू आहेत. पण ते चालू आहेत म्हणून मी माझ्या जीवनाचा आनंद घेण्याचं सोडलं नाहीये. काम न करणे म्हणजे आयुष्यात अजिबात कामधंदा न करणे म्हणताय का? बाकी इएमआय आहे म्हणून मला काम करणं बंद करता येणार नाही असं वाटत असेल तर मी ते घर कधीही विकून कर्ज फेडू शकतो. माझ्या मते हे सगळं तुमची पार्श्वभूमी काय आहे त्यावर अवलंबून आहे. आधी सांगितल्याप्रमाणे २००१ साली मला १८ लाख एकरकमी भरणे शक्य नव्हते आणि आता १.२५ कोटी भरणे पण शक्य नाही.

कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते
.

असं सरसकट तुम्ही म्हणू शकत नाही. प्रत्येकाचं आयुष्य, त्यांचे प्रॉब्लेम्स; प्रेफरन्सेस, त्यांचा आवडीनिवडी हे वेगळं असतं. आता एखाद्याचा काम करणं हा छंद असू शकतो. जबाबदारी फक्त इएमआय फेडायचाय ही नसून एक मुलगा, पती व पिता या नात्यांमुळे येणाऱ्या कर्तव्यांमुळे पण आहे. याचबरोबर हाती घेतलेले कार्य व्यवस्थित पूर्णत्वास नेणे हे पण जबाबदारीत मोडते.

मी तुम्हाला माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणलं त्याप्रमाणे तुमच्याशी क्लायंट महत्वाच्या विषयावर बोलत असताना मूड नाही म्हणून तुम्ही उठून जाऊ शकत नाही. ऍडव्हान्स टॅक्सेस assess करायच्या व भरायच्या आणि टॅक्स रिटर्न्स फाईल करायच्या वेळेत तुम्ही ४ महिने तुमचं ऑफिस बंद करून बसू शकत नाही. आणि याचा इएमआयशी संबंध येत नाही.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 11:37 am | संजय क्षीरसागर

म्हणजे तुम्ही १२ ही महिने एकही दिवस काम न करण्याबद्दल बोलताय का?

नाही. मी रोज सकाळी उठल्यावर असणार्‍या ऑप्शनबद्दल बोलतो आहे. नोकरी करणार्‍याला तो नसतो आणि त्या उप्पर इएमआय असेल तर विषयच संपला ! (खरं तर सगळ्या उहापोहाचा इतकाच साधा मुद्दा आहे)

बाकी इएमआय आहे म्हणून मला काम करणं बंद करता येणार नाही असं वाटत असेल तर मी ते घर कधीही विकून कर्ज फेडू शकतो.

हे कधीही कुणी करत नाही.

आता एखाद्याचा काम करणं हा छंद असू शकतो

ज्याला काम न करण्याचा विकल्प आहे तोच काम स्वच्छंदानं करु शकतो. कोणतंही काम निर्वैयक्तिक आहे. स्वछंद वैयक्तिक आहे आणि तो कामात मजा आणतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2017 - 12:35 pm | हतोळकरांचा प्रसाद

व्यवसायामुळे (आणि खासकरून नॉन-इमर्जन्सी स्वरूपाचा) मिळालेली मोकळीक यामुळे पर्यायाने जोपासायला मिळालेला स्वछंदीपणा आणि ईएमआय यांचा काही संबंध नसावा असं वाटतं! जर स्वछंदी आयुष्य जागण्याचीच मानसिकता असेल तर मग ईएमआय वगैरे गोष्टी त्यात खोडा घालतील असं वाटत नाही. शिवाय स्वछंदी जीवनाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकत नाही काय? मला ऑफिसला दांडी मारायला अजिबात आवडत नाही (दुर्दैवाने यामुळे माझ्या बऱ्याच राजा वर्ष अखेरीस वाया जातात). त्यामुळे माझ्या ऑफिसला जाण्याचा आणि स्वछंदी असण्याचा किंवा ईएमआयचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नसावा. "घर घेणे" हे आयुष्यातलं नोकरी, लग्न, संतती यासारखंच एक स्वप्न किंबहुना टप्पा आहे. ते घेण्याचा सध्याचा एकमेक उपलब्ध मार्ग ईएमआय आहे हे उघड आहे (तुम्ही याव्यतिरिक्त घर रोखीत कसे घेतले किंवा घेण्याचे सुचवत आहात ते काही कळले नाही). आता ईएमआय चं म्हणाल तर कुठलीही बँक पगाराच्या 60% च्या वर ईएमआय असेल असं लोन देत नाही. त्यामुळे दर वर्षीची पगारवाढ गृहीत धरली तर साधारणपणे दोन वर्षं ईएमआयमूळे ओढाताण होते. त्यांनतर हा विषय फक्त २०/२५ वर्षे लोन चालू द्यायचं कि लवकर उरकायचं ह्या मुद्द्याभोवती फिरतो. आणि आजकालतर लोन सेवर अकाउंट्स मूळे तोही मुद्दा फारसा महत्वाचा नाहीये.

थोडक्यात आर्थिक नियोजन आणि स्वछंदी जीवन याचा प्रत्यक्ष संबंध फारसा नसावा असे मला वाटते. उलटपक्षी असलाच तर तो प्रत्येकाच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर असावा.

ट्रेड मार्क's picture

28 Jan 2017 - 3:15 am | ट्रेड मार्क

मी रोज सकाळी उठल्यावर असणार्‍या ऑप्शनबद्दल बोलतो आहे. नोकरी करणार्‍याला तो नसतो आणि त्या उप्पर इएमआय असेल तर विषयच संपला !

माझा पण एक ईएमआय चालू आहे पण मी याच आठवड्यात एक दिवस मला वाटलं म्हणून काम केलं नाही. वाटलं असतं तर अजून १-२ दिवस सुट्टी घेऊ शकलो असतो. हातात असलेलं आणि ते सुद्धा मी स्वीकारलेलं काम पूर्ण केलं की झालं, मग काही प्रॉब्लेम नाही.

हे कधीही कुणी करत नाही.

पाहिलं घर सुद्धा २००९ साली कर्ज काढून घेतलं. कुठलाही ताण न घेता आणि इतर खर्चात कपात न करता ते कर्ज ४ वर्षात फेडून टाकलं. मग दुसरा फ्लॅट पण कर्ज काढून घेतला आहे. या दुसऱ्या घराचा ईएमआय चालू आहे. जर मला वाटलं की तो डोईजड होतोय तर ते घर मी विकून कर्ज फेडूनसुद्धा हातात पैसे राहतील.

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 9:22 am | सुबोध खरे

कर्ज घेतलेली व्यक्ती काम न करण्याचा विकल्प डेली रुटीनमधे आणू शकत नाही
साफ चूक
मी कर्ज घेतलेले असले तरी ते फेडण्यासाठी अतिरिक्त तरतूद केली असली म्हणजे झालं. अशी तरतूद मी केलेली आहे. कारण जर मला मिळणाऱ्या व्याजापेक्षा कर्जाचे कर वजा जात लागणारे व्याज कमी असेल तर पैसे दुसरीकडे गुंतवून त्याच व्याजात इ एम आय भरता येतो.
मी घेतलेल्या घरांबाबत काही वर्षात अशी परिस्थिती होती तेंव्हा घरभाड्याचे धनादेश कर्जाचा हप्ता असलेल्या खात्यात भरून मी शांत बसलेला असे.
काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो.
हे विधान आपोआपच चूक ठरते. जर मला अगोदर तयार केलेल्या ऍसेटमधून इ एम आय आणि माझ्या दैनंदिन गरजेला पुरेल इतके धन उपलब्ध होत असेल तर स्वच्छंद जोपासण्यात काय अडचण आहे? आजमितीला मी अशी तरतूद करून ठेवलेली आहे आणि हे सर्व मी कर्ज घेऊनच केलेले आहे( एक राहत्या घराचे सोडून सर्व कर्जे फेडून झालेली आहेत)
कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते.
काही लोक आपला छंद हाच आपला व्यवसाय म्हणून जगत असतात. उदा. एखादा चित्रकार जर आपल्या कलेवर भरपूर पैसे मिळवून सुखात जगात असेल तर त्याला इ एम आय ची चिंता नसते.
मला आयुष्यात डॉक्टरच व्हायचे होते आणि पुनर्जन्म असेल तर मी परत डॉक्टरच होईन त्यामुळे मला दवाखान्यात जाण्यास आनंदच होतो. आजच माझ्याकडे माझ्या दैनंदिन गरजा आयुष्यभर भागतील इतका पैसा आहे.
उद्या माझ्याकडे पैसे अतिरिक्त झाले तर मी फुकट रुग्ण सेवा करेन. मग मी माझ्या दवाखान्यात रोज येतो म्हणजे मी स्वच्छंदी नाही असा अर्थ काढून आपण मोकळे होता हेच आश्चर्य आहे.
मी जगतो तेच "खरे आयुष्य" आणि मी करेन तोच व्यवहार बरोबर हा आपला दुराग्रह आहे हेच मी परत म्हणेन.

पैसा's picture

27 Jan 2017 - 9:49 am | पैसा

मला आयुष्यात डॉक्टरच व्हायचे होते आणि पुनर्जन्म असेल तर मी परत डॉक्टरच होईन त्यामुळे मला दवाखान्यात जाण्यास आनंदच होतो. आजच माझ्याकडे माझ्या दैनंदिन गरजा आयुष्यभर भागतील इतका पैसा आहे. उद्या माझ्याकडे पैसे अतिरिक्त झाले तर मी फुकट रुग्ण सेवा करेन.

हे अतिशय आवडलं.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 11:25 am | संजय क्षीरसागर

मी जगतो तेच "खरे आयुष्य" आणि मी करेन तोच व्यवहार बरोबर हा आपला दुराग्रह आहे हेच मी परत म्हणेन.

असं माझं म्हणणं नाही आणि प्रश्न तुमच्या आणि माझ्या जगण्याचा नाही. आजच्या किंमतीत फ्लॅट घेऊन सत्तर/ ऐंशी हजार रुपये इएमआय बसला तर आयुष्य स्वच्छंदपणे जगता येईल का? हा मुद्दा आहे.

तुम्ही कर्ज काढूनही मोकळीक मिळवली कारण तुमचा दुसरा फ्लॅट बूमपूर्वीच्या किंमतीत मिळाला त्यामुळे हप्ता कमी बसला आणि समहाऊ भाड्याचं गणित जुळून गेलं. हा उघड नशीबाचा भाग आहे . माझ्या वहिनीला याच लाईन्सवर ७,००० रुपये पगार होता आणि ४,००० हप्ता होता तेंव्हा सॉलीड गोची झाली होती. पुढे वेतन आयोगामुळे पगार भरमसाठ वाढला आणि ग्लोबलायझेशनमुळे फ्लॅटची किंमत बेफाम वाढली, परिणामी भाडं हप्त्याच्या तिप्पट झालं. हे नशिब आहे. ते स्वच्छंद जगण्यासाठी केलेलं साहस नाही.

मुद्दा इतका उघड आणि साधा आहे > उत्पन्नाच्या ६० / ६५ टक्के भाग जर इएमआय मधे गुंतला असेल तर इएमआय व्यक्तीला लाईनवर ठेवतो .

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 11:34 am | संदीप डांगे

अपवाद हाच नियम समजून बहुसंख्यकांच्या समस्यांकडे पाहणे योग्य नाही असे डॉक्टरसाहेबांना सांगायला जावे तर त्यांना तो आकस वाटतो ब्वॉ!

बाकी, संक्षि, तुम्ही जे सांगू पाहताय तेही थोडं कठिण होतंय.. जरा फिलॉसॉफी बाजूला ठेवून प्रॅक्टिकली सांगता येईल काय...?

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 11:44 am | संजय क्षीरसागर

कर्ज घेतल्यानं वर्तमान भविष्यकाळाकडे गहाण पडतो

दॅटस ऑल !

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 11:54 am | संदीप डांगे

काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे

गणामास्तर's picture

27 Jan 2017 - 11:58 am | गणामास्तर

प्रॅक्टिकली विचार करायचं म्हणालं तर हे जरा विचित्र वाटतंय. जरी काही कर्ज वा इएमआय डोक्यावर नसले तरी उद्या उठल्यावर काम न करण्याचा विकल्प या जगात अत्यंत तुरळक लोकांकडे उपलब्ध आहे असे वाटते.
म्हणजे ज्या लोकांकडे अमाप पैसे गाठीला आहे तिचं लोकं भविष्याची चिंता सोडून वर्तमानात स्वच्छंदी जगू शकतील असे आपल्या प्रतिसादांतून ध्वनित होऊ शकते.

गॅरी ट्रुमन's picture

27 Jan 2017 - 12:12 pm | गॅरी ट्रुमन

म्हणजे ज्या लोकांकडे अमाप पैसे गाठीला आहे तिचं लोकं भविष्याची चिंता सोडून वर्तमानात स्वच्छंदी जगू शकतील असे आपल्या प्रतिसादांतून ध्वनित होऊ शकते.

हो ना. कर्ज घ्यायचे नाही तर घराची किंमत असेल तितकी सगळी (भले आय.टी मुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ती किंमत अवास्तव वाढलेली असू दे) आपल्याकडे असायला हवी. माझ्यासारखे अनेक लोक असे असतात की आपल्याकडे आहे नाही ते सगळे विकले तरी कसेबसे मुळातले २०% उभे करता येतात. मग उरलेल्या ८०% साठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ई.एम.आय शिवाय पर्याय नाही. तेव्हा कर्ज घ्यायचे नसेल तर घराचे स्वप्न विसरायचे हा एकच पर्याय. आणि मग "आपल्या नावावर आपले स्वतःचे घर नाही" या बोचर्‍या जाणीवेसह आयुष्यभर जगायचे. अशा बोचर्‍या जाणीवेसह स्वच्छंदीपणे कसे जगता येणार आहे कोणास ठाऊक.

आणि भरपूर पैसे गाठीला असतील तर कोणीही स्वच्छंदीपणे जगेल. किंबहुना स्वच्छंदीपणे नाही जगले तरच नवल.

हे स्वच्छंदी जगण्यासाठी ई.एम.आय नको वगैरे नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jan 2017 - 1:54 pm | अप्पा जोगळेकर

हे स्वच्छंदी जगण्यासाठी ई.एम.आय नको वगैरे नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत.
एखाद्याला काहीच करायचे नसेल तर तो 'स्वच्छंदी जगतो' अशी बिरुदे चिकटवून घेता येतात.
कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.
त्याच्यासाठी ओशो, दीड कोटींचा फ्लॅट, संगीत, रिसॉर्ट कशाला पाहिजे ?
स्वच्छंदी जीवन म्हणजेच आनंदी जीवन हा एक मोठाच गैरसमज आहे.
कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे.

आणि कर्जाचे इएमाय भरणारे बिझनेसमन किंवा नोकरदार सुद्धा आनंदी असू शकतात.
कर्ज काढावे किंवा न काढावे हा पर्सनल चॉईस आहे पण जे इएमाय भरतात ती सगळी ओझ्याची गाढवे असे एखाद्याचे मत असेल तर......
संक्षी सरांना कोण समजावणार ?

अप्पा जोगळेकर's picture

27 Jan 2017 - 1:58 pm | अप्पा जोगळेकर

भविष्याचे ओझे नको, कशाला उगाच समुद्र ओलांडायचा, इथे काय वाईट आहे म्हणणारे भारतीय दिडशे वर्ष पारतंत्र्यात सडले.
निधड्या छातीने समुद्र पादाक्रांत करणार्‍या गोर्‍या साहेबाने जगावर राज्य केले.

गॅरी ट्रुमन's picture

27 Jan 2017 - 2:23 pm | गॅरी ट्रुमन

कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.

हहपुवा

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 2:24 pm | संजय क्षीरसागर

कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.

मवालीपणा आणि स्वच्छंदीपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

स्वच्छंदी जीवन म्हणजेच आनंदी जीवन हा एक मोठाच गैरसमज आहे.

स्वच्छंद हाच आनंद आहे !

कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे.

खरं साहस पैश्यावर किंवा कर्ज घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून नाही. भविष्यकाळापासून मुक्त होण्यात आहे. आणि खरी कर्तबगारी मन मानेल तेव्हा काम करण्यात आहे.

जे इएमाय भरतात ती सगळी ओझ्याची गाढवे असे एखाद्याचे मत असेल तर......

गैरसमज होतोयं ! कर्जमुक्त व्यक्तीला कर्जदार व्यक्तीपेक्षा मनमोकळं जगता येतं इतका साधा मुद्दा आहे.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jan 2017 - 3:33 pm | अप्पा जोगळेकर

गैरसमज होतोयं ! कर्जमुक्त व्यक्तीला कर्जदार व्यक्तीपेक्षा मनमोकळं जगता येतं इतका साधा मुद्दा आहे.
ओके. इथवर ठीक आहे.

तुमची खालील खालील वाक्ये तुमच्याच एका प्रतिसादात वाचली.
इएमआयचं ओझं असणारा दिवसाच्या प्राईम टाइममधे कर्ज फेडण्याची भ्रांत सोडू शकत नाही. त्याचा काल, आज आणि उद्या अगदी एकसारखा असतो. तो फक्त सुट्टीच्या वाटेकडे डोळे लावून खाली मान घालून ते ओझं ओढत राहातो. तो लाईन क्रॉस करायचा विचार सुद्धा करु शकत नाही.
त्यावरुन माझा आणखीन काय वेगळा समज होणार ? असो. थांबतो.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 12:46 pm | संजय क्षीरसागर

जरी काही कर्ज वा इएमआय डोक्यावर नसले तरी उद्या उठल्यावर काम न करण्याचा विकल्प या जगात अत्यंत तुरळक लोकांकडे उपलब्ध आहे असे वाटते.

अर्थात ! बँकात आणि इतरत्र वॉलंटरी रिटायरमेंटची सुरुवात झाल्यावर तो ऑप्शन अनेकांनी निवडला. मजबूत पैसे मिळाले पण मोकळ्या दिवसाचं काय करायचं यानं सॉलीड घुसमट होऊन पब्लिकनं परत इकडेतिकडे नोकर्‍या धरल्या आणि पुन्हा तेच रुटीन चालू केलं !

म्हणजे ज्या लोकांकडे अमाप पैसे गाठीला आहे तिचं लोकं भविष्याची चिंता सोडून वर्तमानात स्वच्छंदी जगू शकतील असे आपल्या प्रतिसादांतून ध्वनित होऊ शकते.

अजिबात नाही. भविष्याची चिंता सोडणं हा साहसाचा भाग आहे, पैश्यामुळे ते येईल असं वाटतं पण जोपर्यंत पैसा हाच आधार वाटतो तोपर्यंत साहस असंभव आहे.

स्वच्छंद जगण्यासाठी जीवनातल्या विविध व्यासंगात रस हवा. खेळ, साहित्य, संगीत, लेखन, चित्रपट, नाटकं, पत्नीबरोबर रमण्याची कला, योगासनं, प्राणायाम, भोजनाच्या वैविध्याचा आनंद, भटकंतीची आवड आणि हे सर्व करण्यासाठी भरपूर वेळ आणि माफक पैसा इतकं असलं की झालं.

मुख्य म्हणजे तुमचा इंटरेस्ट अ‍ॅक्टीव हवा, उदा. संगीताची आवड आहे आणि गाणी ऐकतो ही पॅसिविटी झाली. तुम्हाला स्वतःला गायन किंवा वादन जमलं तर मजा आहे. साहित्याची आवड आहे आणि वाचतो हे ठीके पण स्वतःच्या अनुभवाची किमान कविता तरी करता आली पाहिजे तर मजा. लोक रिसॉर्टला जातात आणि पंधराव्या मिनीटाला मोबाईलवर वॉटस अ‍ॅप बघायला लागतात किंवा टिवी चालू करतात, घरचंच रुटीन फक्त जागा बदलून सुरु होतं. रिसॉर्टला जाऊन पोहोण्यात मजा आहे, तिथल्या कराओकेवर पाच-सात गाणी म्हणण्यात आनंद आहे. तिथल्या पूल टेबलवर जमेल तसा स्नूकर खेळण्यात मजा आहे. जे येत नाही ते आत्मसात करत रोज काही तरी नवीन शिकलं तर जीवन बदलतं, स्वच्छंद जगण्यासाठी आवडीचे विकल्प उपलब्द्ध होतात.

गणामास्तर's picture

27 Jan 2017 - 3:03 pm | गणामास्तर

अर्थात ! बँकात आणि इतरत्र वॉलंटरी रिटायरमेंटची सुरुवात झाल्यावर तो ऑप्शन अनेकांनी निवडला. मजबूत पैसे मिळाले पण मोकळ्या दिवसाचं काय करायचं यानं सॉलीड घुसमट होऊन पब्लिकनं परत इकडेतिकडे नोकर्‍या धरल्या आणि पुन्हा तेच रुटीन चालू केलं !

हि नाण्याची एक बाजू झाली, अर्थात ज्या लोकांकडे भरपूर पैसा आहे त्यांची.
मला म्हणायचंय कि ज्यांच्यावर काहीही कर्ज नाही तरी पण उद्या कामावर जायला लागेलचं अशी परिस्थिती सुद्धा बऱ्याच लोकांवर असतेच.
व्हीआरएस घेतलेली लोकं सोडा, एखाद्या तरुणाला डोक्यावर कर्ज नाही म्हणून घरात बसून कसे चालेल? त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि इतर खर्च वा लाड पुरवण्यासाठी सकाळी कामावर जावेचं लागेल ना.
तस्मात, काम करण्याचा किंवा न करण्याचा विकल्प ९९% लोकांकडे नसतो. ते बाय डिफॉल्ट करावेचं लागते.

रिसॉर्टला जाऊन पोहोण्यात मजा आहे, तिथल्या कराओकेवर पाच-सात गाणी म्हणण्यात आनंद आहे. तिथल्या पूल टेबलवर जमेल तसा स्नूकर खेळण्यात मजा आहे. जे येत नाही ते आत्मसात करत रोज काही तरी नवीन शिकलं तर जीवन बदलतं, स्वच्छंद जगण्यासाठी आवडीचे विकल्प उपलब्द्ध होतात.

अमेनिटीज नि युक्त असलेल्या रिसॉर्टला जायला आणि नवनवीन गोष्टी शिकायला सुद्धा बऱ्यापैकी पैसा लागतो. पत्नीसोबत रमायला लग्न करावे लागते, ते झाले कि खर्च वाढतो,त्यामुळे मजबूत पैसे गाठीला झाल्यानंतरच तुमच्यासारखे जीवनमान प्रत्यक्षात आणणे शक्य आहे. एखाद्या तरण्याताठ्या नुकत्याचं उद्योगाला लागलेल्या माणसाला हे जमण्यासारखे नव्हे.

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 12:40 pm | सुबोध खरे

अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.हे आपले विधान आहे.
डांगे अण्णा
"आमच्यासारखे" लोक दुसरे घर घेतात त्यामुळे --बाजारातील घरांची मागणी अनावश्यक रित्या वाढते आणि गरजू लोकांना घर घेता येत नाही असा स्पष्ट अर्थ तुमच्या वरील वाक्यातून निघतो. आणि हे विधान आकसपूर्ण आहे हे स्पष्ट आहे.
असे तोंडावर सांगितले तर तुम्ही राजकारण्यांसारखे माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतो आहे, गोल गोल फिरवून "अपवाद हाच नियम समजून बहुसंख्यकांच्या समस्यांकडे पाहणे योग्य नाही हे सांगता आहात."
मला गोल बोलायची किंवा लिहायची सवय नाही म्हणून मी स्पष्ट आकस असा शब्द वापरला
किंवा
संक्षी सारख्या वित्त विषयातील तज्ज्ञांची मते सुद्धा स्पष्टपणे पुराव्यासकट चूक म्हणतो आहे. मला गुळमुळीत बोलायची सवय नाही ( लष्करात असे बोलणे भंपकपणा समजला जातो). आणि मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक नाही.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 1:04 pm | संजय क्षीरसागर

"आमच्यासारखे" लोक दुसरे घर घेतात त्यामुळे --बाजारातील घरांची मागणी अनावश्यक रित्या वाढते आणि गरजू लोकांना घर घेता येत नाही

यात काय चूक आहे ? असंख्य लोकांनी गरज नसतांना `इनवेस्टमेंट' म्हणून दुसरे फ्लॅट घेतले आहेत आणि त्यामुळेच तर बिल्डर्सचं फावलं आहे.

हे विधान आकसपूर्ण आहे हे स्पष्ट आहे

आकसाचा प्रश्नच नाही. गरज नसलेल्यांनी घेतलेले दोन/ तीन फ्लॅटस, आयटीवाल्यांनी हेवी इएमआय पत्करुन घेतलेली कर्ज आणि त्यातून बिल्डर्सची केलेली धन, एनारायजनी किंमती वाढतायंत म्हणून खेळलेला सट्टा यामुळेच तर फ्लॅट सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत.

मागच्याच महिन्यात परांजप्यांच्या फॉरेस्टट्रेल मधल्या क्लिफ रिसॉर्टला मी ट्रीपला गेलो होतो. सकाळी फिरायला गेलो तर इतक्या अफाट स्किममधे फक्त १०% लोक राहायला आले होते आणि ९०% बंगले बंद होते. आणि कहर म्हणजे परांजपे अजून कलोसल प्रमाणावर उरलेल्या जागेत नवे बंगले बांधत होते !

अप्पा जोगळेकर's picture

27 Jan 2017 - 2:04 pm | अप्पा जोगळेकर

असंख्य लोकांनी गरज नसतांना `इनवेस्टमेंट' म्हणून दुसरे फ्लॅट घेतले आहेत आणि त्यामुळेच तर बिल्डर्सचं फावलं आहे.
हे वाचून उगाचच जयवंत द्ळवींच्या 'सारे प्रवासी घडीचे' या पुस्तकातले डॉ. रामदास हे कॅरेक्टर आठवले.

दळवी लिहितात," मी डॉ. रामदासांच्या समोर बसून भाताची रास उठवू लागलो की ते धावत माझ्याकडे येत. बाळ आपू , गरगरीत फुगणे हा बटाट्याचा गुणधर्म आहे. माणसाचा नव्हे. तू चार घास कमी जेवलास तर २ गरीब माणसे आणखीन जेवू शकतील.".

हे म्हणजे सर्व मध्यम वर्गाने १० किलो तांदूळ घरी साठवून ठेवल्याने तांदुळाच्या किमती वाढून गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या म्हणण्यासारखे आहे.
१५ टक्के लोकसंख्या माध्यम वर्ग आहे जी थोडी थोडकी नव्हे तर २२ कोटी आहे.
हसून हसून पुरे वाट झाली.
लोकांनी घरे घेणे बंद केले तर गरिबांना घर घेणे सोडाच पण तीन कोटी दहा लाख कोटी गरीब लोकांना रोजगारही मिळणार नाही जे या घरबांधणी उद्योगात आणि त्याच्याशी संलग्न उद्योगात कामगार म्हणून काम करीत आहेत. http://planningcommission.nic.in/aboutus/committee/wrkgrp11/wg11_constrn...
हा २००७ चा अहवाल आहे आजमितीला यात अजूनच वाढ झालेली आहे
आपण "वित्त क्षेत्रात" तज्ञ आहात आपण आपला मुद्दा सिद्ध करायला इतक्या टोकाला जाऊ शकता हेच आश्चर्य आहे.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 6:28 pm | संजय क्षीरसागर

लोकांनी घरे घेणे बंद केले तर.....

मुद्दा वेगळा आहे आणि अगदी साधा आहे.

लोकांनी इनवेस्टमेंट म्हणून, गरज नसतांना दोनदोन ( किंवा काही केसेसमधे तर तीनतीन) फ्लॅटवर सट्टा खेळणं बंद केलं तर घराच्या किंमती वाजवी होतील.

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 7:15 pm | सुबोध खरे

गुंतवणूक आणि सट्टा यातील फरक काय हे माझ्या बाल बुद्धीला समजावून सांगाल का?

बाळ सप्रे's picture

27 Jan 2017 - 11:53 am | बाळ सप्रे

आजच्या किंमतीत फ्लॅट घेऊन सत्तर/ ऐंशी हजार रुपये इएमआय बसला तर आयुष्य स्वच्छंदपणे जगता येईल का? हा मुद्दा आहे.

मनासारख्या फ्लॅटमध्ये राहाताय या गोष्टीकडे पाहिलत तर स्वच्छंदीपणे राहू शकाल. ई एम आय कडे पहात रहाल तर नाही राहू शकणार.
कर्ज न घेता तेवढी रक्कम साठवून मग फ्लॅट घेणे यातही आयुष्य निघून जातेच..

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 12:25 pm | सुबोध खरे

उत्पन्नाच्या ६० / ६५ टक्के भाग जर इएमआय मधे गुंतला असेल तर इएमआय व्यक्तीला लाईनवर ठेवतो .
परत चूक
कोणती पत संस्था उत्पन्नाच्या ६५ % इ एम आय असलेले कर्ज सर्वसामान्य माणसाला देते. तेंव्हा अशी परिस्थिती सामान्य माणसाच्या आयुष्यात येणे शक्य नाही.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 1:12 pm | संजय क्षीरसागर

उत्पनाच्या ६० ते ६५ % ही रिपेमेंट कपॅसिटी ग्राह्य धरली गेली आहे. घेतलेला फ्लॅट भाड्यानं लावायचा आणि त्यातून काही प्रमाणात इएमआय भागवायचा हाच फंडा पब्लिक वापरतं म्हणून घरखर्चाला पैसे पुरतात.

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 6:33 pm | सुबोध खरे

कोणती पत संस्था उत्पन्नाच्या ६५ % इ एम आय असलेले कर्ज सर्वसामान्य माणसाला देते तेवढे फक्त सांगा. गोल बोलू नका.
सरकारी माणूस ज्याला वरकड कमाई असली तरीही पगाराच्या ३५ % च्या वर कोणतीही संस्था कर्ज देत नाही.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 7:24 pm | संजय क्षीरसागर

But normally the lenders will assume that around 40%-45% of individual’s net salary is available for payment of EMI to serve all the loans. The figure can be higher if you are in a high-income bracket.

Home Loan Eligibility Calculator

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 7:49 pm | सुबोध खरे

डोंगर पोखरून उंदीर काढणे

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 12:44 pm | सुबोध खरे

तुमचा दुसरा फ्लॅट बूमपूर्वीच्या किंमतीत मिळाला त्यामुळे हप्ता कमी बसला आणि समहाऊ भाड्याचं गणित जुळून गेलं. हा उघड नशीबाचा भाग आहे
परत चूक
संक्षी साहेब हा फ्लॅट मी २०११ मध्ये घेतला तेंव्हा बूम वगैरे संपलेली होती उलट २००८-०९ च्या मंदीनंतर अर्थव्यवस्था खुरडत होती. मी फ्लॅट बुकिंग मध्ये घेतला म्हणून तो स्वस्त मिळाला आणि तो पुढे वाढ कुठे होईल हे गणित करून घेतला म्हणून त्याच्या किमतीत वाढ झाली.
ती गुंतवणूक बुडाली नाही हा नशिबाचा भाग आहे असे तुम्ही म्हणाल तर त्याला काय उत्तर? शेवटी आपण जिवंत आहोत तेच नशीब असेच म्हणावे लागेल.

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 12:51 pm | सुबोध खरे

मला संक्षी साहेबाना एकच प्रश्न विचारायचा आहे.
शेकडा किती लोक असे आहेत कि ज्यांनी एक पैसाही कर्ज न घेता स्वतःच्या पैशाने घर घेतले आहे?
याची आकडेवारी काढली तर माझ्या अंदाजाप्रमाणे असे लोक १ दशांश टक्के (०. १%) किंवा हजारात एक सुद्धा निघणार नाहीत.
वडिलोपार्जीत पैशावर घर बांधलेले लोक वेगळे.
अर्थात सर्वसामान्य माणसांपैकी ९९ . ९ % लोकांनी इ एम आय वर घर घेतले आहे म्हणजेच आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे आयुष्य हालअपेष्टात जाते आहे पण वस्तुस्थिती काही वेगळेच दिसते आहे. मिपावरीलच ९० % लोक( कदाचित ९९.९%) ज्यांनी इ एम आय वर घेतले आहे ते आनंदी आणि सुखात जगात आहेत असा माझा अंदाज आहे. स्वतःच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असणे याचा आनंद ज्याने घर घेतले आहे त्याला सांगण्याची गरज नाही.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 1:22 pm | संजय क्षीरसागर

मिपावरीलच ९० % लोक( कदाचित ९९.९%) ज्यांनी इ एम आय वर घेतले आहे ते आनंदी आणि सुखात जगात आहेत असा माझा अंदाज आहे.

लोक्स रुटीन जगतायंत ! जीवनाच्या प्राइम टाईमचा ९० % भाग जर ऑफिसमधे जातोयं तर स्वच्छंद कल्पनेत आहे, वास्तवात नाही. सुट्टीच्या दिवशी केलेली सहल म्हणजे आनंद नाही. सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं हा खरा आनंद आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2017 - 2:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं हा खरा आनंद आहे.

म्हणजे नेमकं काय करायचं रोज? आणि ऑफिसमध्ये दिवस आनंदात जात नाही हे गृहीतक कशाला? दिवसभर सलनारा एखादा कोडींग इशू सुटल्यावर जो आनंद मिळतो तो रिसॉर्टमध्येपण मिळणार नाही. आपलं तर बाबा सरळ मत आहे, काम करण्यात जेवढा आनंद गाठीला जमा होतो तो इतर कुठल्याही गोष्टीने होत नाही.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 2:31 pm | संजय क्षीरसागर

काम करण्यात जेवढा आनंद गाठीला जमा होतो तो इतर कुठल्याही गोष्टीने होत नाही.

स्वच्छंद आणि अकर्मण्य यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काम स्वेच्छेचं असेल तरच आनंद आहे. नाही तर बलात्कार आणि संभोग यात फरकच उरला नसता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2017 - 3:29 pm | हतोळकरांचा प्रसाद

कर्मण्य- अकर्मण्य असा विषयच नाही (खरंतर विषय काय आहे हेच आठवत नाहीये, आणि संभोग वि. बलात्कार मूळे कुठे जाईल तेही सांगता येत नाही ;);)). ईएमआय घेणे = कामावर जाणे = स्वछंदी जगू न शकणे असं तर्कट आपण मांडलं आहे. म्हणून सांगितलं की कामावर जाणे आणि स्वछंदी असणे याचा काही संबंध नाही. "स्वछंदी" याचे दोन अर्थ वरील प्रतिसादांमध्ये मांडले जात आहेत. एक "मन मानेल तसे वागणे" आणि दुसरा "हसत खेळत आनंदात जगता येणे". तुम्ही बहुतकरून पाहिल्याची भलामण करत आहात तर मी दुसऱ्याची. आता पहिला अर्थ जरी धरला तरी तसं वागण्यासाठी कर्ज असणं नसणं नौकरी असणं नसणं काही गरजेचं नाही, आणि दुसरा धरला तरी गरजेचं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की स्वछंदी जगणे हि एक वृत्ती आहे. त्याचा आर्थिकतेशी किंवा आर्थिक नियोजनाशी संबंध नसावा.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 7:15 pm | संजय क्षीरसागर

स्वछंदी जगणे हि एक वृत्ती आहे. त्याचा आर्थिकतेशी किंवा आर्थिक नियोजनाशी संबंध नसावा

स्वच्छंद जगण्यासाठी मोकळा वेळ हवा. जर इएमआयचं तुमचा महत्त्वाचा वेळ घेत असेल तर कसला आलायं स्वच्छंद ?

कामावर जाणे आणि स्वछंदी असणे याचा काही संबंध नाही.

स्वेच्छेनं केलेलं काम आणि कामावर जाण्यापरता पर्यायच नाही ही परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच बहुदा तुम्हाला बलात्कार आणि संभोग यातला फरक कळला नाही !

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2017 - 7:42 pm | हतोळकरांचा प्रसाद

नाक्यावरचे मवाली पोरं - दोन्ही अटींची पूर्तता होते. वेळी आणि कर्जही नाही. ती तुमच्या व्याख्येनुसार स्वछंदी असतात मग. बाकी ईएमआयमूळे मी (किंवा सगळे ईएमआयवाले) नौकरी करतो हे तुमचं गृहीतक भारी आहे. छोटासा फरक असा आहे की ईएमआयच्या बऱ्याच आधीपासून मी नौकरी करतो. वर म्हटल्याप्रमाणे ईएमआयच्या सुरुवातीच्या दोन वर्षात होते थोडी अडचण पण स्वतःच घर असल्याचं सुख "स्वछंदी" बनवते हा माझा स्वानुभव!

बाकी संभोग आणि बलात्काराचं म्हणाल तर अत्यंत निरर्थक तुलना आणि परत एकदा मला त्यातला फरक कळत नाही ही निरर्थक तुलना! आणखी एक, अगदी दळण आणणेदेखील उत्सवासारखे साजरा करता येत असताना नौकरीतला प्रत्येक दिवस बांधून ठेवणारा असतो असं का वाटावं? लिफ्टचा दरवाजा उघडणे आणि लिफ्ट खाली वर करण्याची नौकरीदेखील आत येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमुळे किती वेगळी ठरू शकते. पण असो, स्वछंदी असणे ही एक वृत्ती आहे हेच मान्य नाही तर मग पुढे काय बोलणे होऊ शकते.

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 8:25 pm | सुबोध खरे

ह प्र साहेब
अण्णासाहेब किर्लोस्करांनी जाळला तोच धूप, बाकी सब झूट आहे.
तद्वतच मी म्हणेन
बायको बरोबर १५ किलोचे दळण एक एक बंद हातात धरून घरी आणणे हाच उत्सव
बाकी सर्व कामाची ओझी
(कोण रे तिकडे म्हणतो आहे स्कुटर वरून दळण का आणत नाही?
किंवा पंधरा किलो गहू एकदम आणल्यामुळे गव्हाच्या भावात वाढ होऊन गरीब लोकांना त्रास होतो ते.)

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 10:15 pm | संजय क्षीरसागर

दळण आणणेदेखील उत्सवासारखे साजरा करता येत असताना नौकरीतला प्रत्येक दिवस बांधून ठेवणारा असतो असं का वाटावं? लिफ्टचा दरवाजा उघडणे आणि लिफ्ट खाली वर करण्याची नौकरीदेखील आत येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमुळे किती वेगळी ठरू शकते.

दळण आणणं माझा ऑप्शन आहे, मी जाईन न जाईन. लिफ्टमन लिफ्ट सोडू शकत नाही आणि नोकरादार खुर्चीवरुन हालू शकत नाही . आणि इएमायवाला तर शक्यच नाही.

बळजबरी आणि स्वेच्छा हा फरक तुम्हाला समजावं म्हणून संभोग आणि बलात्काराचं उदाहरण दिलं. ते जर निरर्थक वाटत असेल तर बहुदा बलात्कारालाच तुम्ही संभोग समतायं.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Jan 2017 - 10:33 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही ज्याला स्वछंदीपणा म्हणत आहेत ती तुम्हाला तुमच्या नॉन-इमर्जन्सी प्रकारातल्या व्यवसायामुळे आलेली मोकळीक आहे एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. असलीच मोकळीक अजूनही बऱ्याच व्यवसायांमध्ये आहे/असते. मला ईएमआय आहे म्हणून मी खुर्चीवरून हलू शकत नाही हा दावा फोल आहे. मी स्वेच्छेने कामाला जातो, एन्जॉय करतो हे स्पष्ट वर सांगितलेले असतानाही त्याला बलात्कार प्रकारात ढकलायचं असेल तर त्याला काय उपाय असू शकतो? बाकी एक प्रश्न पडलाय - तुम्ही स्वछंदी जगायला केव्हा सुरुवात केली? म्हणजे कशी सुरुवात झाली? (ऑप्शनल प्रश्न अर्थातच)

अवांतर : माझ्याकडे उदंड पैसा असता आणि तुमच्यासारखा नॉन-इमर्जन्सी वैयक्तिक व्यवसाय असता तरी मी मला वाटलं तेव्हा दळण आणायला जाता यावं असा स्वछंद जोपासला नसता. कारण प्रत्येकाच्या स्वछंदी जीवनाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 11:55 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या नॉन-इमर्जन्सी प्रकारातल्या व्यवसायामुळे आलेली मोकळीक आहे एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे

तुम्ही लाईफ सेवींग व्यावसायात आहात काय ?

मला ईएमआय आहे म्हणून मी खुर्चीवरून हलू शकत नाही हा दावा फोल आहे. मी स्वेच्छेने कामाला जातो, एन्जॉय करतो

मग तुम्ही स्वच्छंदावर बोला ना ! काय असतं तुमचं रुटीन ? सकाळी ९ ते संध्याकाळी ५ मधे नोकरीच्या कामाव्यतिरिक्त काय छंद पुरवता ?

माझ्याकडे उदंड पैसा असता आणि तुमच्यासारखा नॉन-इमर्जन्सी वैयक्तिक व्यवसाय असता तरी मी मला वाटलं तेव्हा दळण आणायला जाता यावं असा स्वछंद जोपासला नसता.

तुम्हाला मुद्दा समजत असेल तर बघा. काम हे निर्वैयक्तिक आहे. तुम्ही कोड क्रॅकींकचा विषय काढला म्हणून मी दळणाचं उदाहरण दिलं. पुन्हा बघा : आनंद कामात नाही, काम न करण्याच्या विकल्पात आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Jan 2017 - 11:14 am | हतोळकरांचा प्रसाद

संक्षि, मी काय म्हणतो आपण आधी स्वछंदीपणाची एक दोघानाही मान्य असलेली व्याख्या ठरवू आणि मग प्रतिवाद करू कारण मुद्दे रिपीट होत आहेत, कसे? "मन मानेल तेव्हा (म्हणजे एखादया दिवशी नाही तर अगदी दिवसाच्या मध्येही) काम न करण्याचा पर्याय निवडणे/निवडता येणे म्हणजे स्वछंदी असणे" ही व्याख्या तुमच्या प्रतिसादातून दिसतेय. याविरुद्ध मला असे वाटते की "आपल्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट हसत खेळत आनंदाने उपभोगणे म्हणजे स्वछंदीपणा". आता जर आपल्या व्याख्याच सामान नसतील तर मते मांडून काय उपयोग? म्हणून मी नौकरीच्या 9 ते 5 च्या मधून (उदा.) दळण दळण्याचा उत्सव साजरा करू शकत नसणे हे मी गृहीत धरलेल्या व्याख्येला तडा देत नाही. याउलट तुम्ही मात्र म्हणू शकता कि मी स्वछंदी नाही.

जाताजाता - मी माझ्या व्याख्येनेदेखील पूर्णपणे स्वछंदी नाही कारण दिवसभरात बहुतांशी गोष्टी हसत खेळत घालवत असलो तरी सगळ्याच गोष्टी आनंदाने घेतो असा दावा नाही. बाकी ते लाईफ सेविंग काय कळलं नाही. मी व्यवसायच करत नाही शिवाय तुमच्या व्यवसायाला "नॉन-इमर्जन्सी" हे काही खोचकपणे म्हटलेले नाही.

संजय क्षीरसागर's picture

28 Jan 2017 - 12:28 pm | संजय क्षीरसागर

कोणतंही काम सुरु करण्यापूर्वी ते न करण्याचा असलेला ऑप्शन.

आपल्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट हसत खेळत आनंदाने उपभोगणे म्हणजे स्वछंदीपणा

प्रश्न समोर आलेलं काम आनंदानं करण्याचा नाही. त्याला हात घालण्यापूर्वी ते करु किंवा न करु ही असलेली आपमर्जी. ही आपमर्जी जर प्रामाणिकपणे उपलब्ध असेल तर कामाच्या प्रत्येक क्षणी ते केव्हाही थांबवण्याचा विकल्पही अनायासे उपलब्ध असतोच. या स्थितीत मन दुय्यम आणि आपण प्राथमिक असतो. असं काम अत्यंत सहजपणे पूर्ण होतं कारण मनाला सैरभैर व्हायला वावच नसतो. अशा कामातून कार्यपूर्तीचा आनंद मिळतो कारण फलप्राप्ती लक्ष वेधून घेत नाही तस्मात, आपला फोकस भविष्याकडे न लागता वर्तमानात स्थिर असतो. असं काम बहुदा वेळेपूर्वीच पूर्ण झालेलं असतं आणि त्याचा मोबदला अ‍ॅडीशनल बोनस मिळावा असं सुख देऊन जातो. माझ्या दृष्टीनं हा खरा कर्मयोग आहे.

मागच्या प्रतिसादात मी स्वच्छंद केव्हापासून जगतोयं असं तुम्ही विचारलं होतं. साधारण १९९७ च्या दरम्यान मी संपूर्ण क्षणस्थ झालो, तेव्हापासून वर्तमान हा एकच काळ रिलेवंट झाला. तस्मात, स्वच्छंद जगण्याचा वीस वर्षांचा अनुभवान या प्रतिसादामागे आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Jan 2017 - 1:09 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओके. म्हणजे आपल्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत , तेव्हा चर्चा करण्यात हशील नाही. तस्मात माझ्याकडून स्वछंदीपणावर पास! विषय अर्थकारणापासून तत्वज्ञानापर्यंत पोहोचला आहे म्हणून आठवण करू देऊ इच्छितो की "ज्याला कर्ज नाही त्याचीच पत जास्त" इथून विषय भरकटत या प्रतिसादापर्यंत पोहोचला आहे. तर परत ट्रॅकवर आणताआणता - याचा अर्थ भारतातील खूप मोठ्या लोकसंख्येची पत मूठभर श्रीमंत उद्योगपतींपेक्षा जास्त आहे असा अर्थ काढता येईल का?

अप्पा जोगळेकर's picture

29 Jan 2017 - 9:17 pm | अप्पा जोगळेकर

तस्मात, स्वच्छंद जगण्याचा वीस वर्षांचा अनुभवान या प्रतिसादामागे आहे.
हॅ हॅ हॅ. याचा अर्थ इतकाच की ९७ सालापासून तुमच्याकडे पैसा धो धो वाहतो आहे. बाकी सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. पैसे मिळवण्याची गरजच नसेल तर काम न करण्याचा ऑप्शन उप्लब्ध होतोच आपोआप. सगळेच जण तो वापरत नसतील इतकेच.
एखाद्याचे वडील आजारी आहेत, बायकोला एखादा विकार आहे किंवा मुला मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्याला असे स्वच्छंद जगणे अशक्य आहे.
२००७ ते २०१४ मधे अनैसर्गिक वाढ झाली घरांच्या किमतीची असे तुम्हीच म्हटले आहे बहुतेक.
म्हणजे तुम्ही सगळा पैसा लावून जसे घर घेतले तसे आज २०१७ मधे कोणत्याच मध्यम कींवा उच्च मध्यमवर्गीयाला अशक्य आहे. कारण २००७ ते २०१४ मधील अनैसर्गिक वाढ वगैरे.
माझ्या मते तरी असे बूम्स दर थोड्या वर्षांनी येतच असतात. त्याला अनैसर्गिक म्हणणे पटत नाही पण तो वेगळा मुद्दा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2017 - 1:31 am | डॉ सुहास म्हात्रे

खरंतर विषय काय आहे हेच आठवत नाहीये

हांग अश्शी ! म्हणजे तुम्हाला नक्की काय चालले आहे याचे पूर्ण ज्ञान झालेले आहेच की ;) =)) =))

(सर्वांनी हघ्या ! :) )

गॅरी ट्रुमन's picture

28 Jan 2017 - 11:20 am | गॅरी ट्रुमन

खरंतर विषय काय आहे हेच आठवत नाहीये

मिपावर असे होतेच. रच्याकने मागच्या वर्षीचा सुप्रसिध्द मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा धागा आठवतोय का? धाग्याचा मूळ विषय काय, जास्तीत जास्त चर्चा कशावर झाली-- कशाचा कशाशी पत्ता नव्हता :)

arunjoshi123's picture

28 Jan 2017 - 1:34 pm | arunjoshi123

मिपावर असे होतेच.

यास स्वच्छंदी लेखन म्हणत असावेत.

अप्पा जोगळेकर's picture

27 Jan 2017 - 5:30 pm | अप्पा जोगळेकर

म्हणजे रोज ह्पिसच्या बसमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळणे. डब्यात दररोज गोड शिरा, लोणचे आणि आईने कौतुकाने तळलेल्या पुर्या खाणे, साहेबाला गाणी म्हणून दाखविणे किंवा साहेबाबरोबर दमशेरा वगैरे खेळणे असे काही असावे.
निदान माझ्या तरी शाळेत असतानाच्या सहलीच्या एवढ्याच आठवणी आहेत. नंतर कधी सहलीला गेलो नाही आणि इच्छा पण नाही.
काय फँटसी असते एकेकाची. असो.

पैसा's picture

27 Jan 2017 - 5:35 pm | पैसा

=)) =)) =))

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 3:31 pm | संदीप डांगे

डॉक्टरसाहेब,

"आमच्यासारखे" लोक दुसरे घर घेतात त्यामुळे --बाजारातील घरांची मागणी अनावश्यक रित्या वाढते आणि गरजू लोकांना घर घेता येत नाही असा स्पष्ट अर्थ तुमच्या वरील वाक्यातून निघतो. आणि हे विधान आकसपूर्ण आहे हे स्पष्ट आहे.

>>> तसा अर्थ काढून तुमचा तुम्हीच वैयक्तिक त्रास करुन घेत आहात ज्याचा माझ्या जनरल निरिक्षणावरुन काढलेल्या मांडणीशी काडीमात्रही संबंध नाही.

माझे जे मत आहे ते एकतर माझ्या घरच्या व्यवसायावर आधारित आहे. माझे वडील गेले वीस वर्षे घरांच्या खरेदी-विक्रीत ब्रोकर म्हणून काम करत आहेत. तसेच दुसरं असं, मी स्वतः ठाण्यातल्या दिशा डायरेक्ट ह्या सेकंडहोम मार्केटींग मधल्या अग्रणी कंपनीत २०१०-२०१२ ह्या दोन वर्षात किएटीव हेड म्हणून काम केलंय. तेव्हा तिथले सर्व ३२ प्रोजेक्ट्स मार्केटींगच्या दृष्टीने अ‍ॅनालायज करणे, कस्टमरबेसचा सर्व प्रकारचा (डेमोग्राफिक, अर्निंग, अ‍ॅस्पिरेशन्स, ट्रिगर पॉइन्ट, इत्यादी इत्यादी) अभ्यास करुन मार्केटींग-अ‍ॅडवर्टायझिंगचे स्ट्रॅटेजी ठरवणे ह्यात अ‍ॅक्टीवली सहभागी होतो. ती नोकरी सोडल्यावरही ३-४ वर्षे मी मुंबईतल्या अनेक रिअल इस्टेट मार्केटींग कंपन्यांचे-बिल्डरांचे अ‍ॅडवर्टायझिंगचे काम करत होतो. त्यासोबत व्यवसायाची गरज म्हणून माझा ह्याच क्षेत्राचा अभ्यास चालूच होता - आजही आहे.

मी स्वत:ला तज्ञ म्हणत नाही तर अ‍ॅक्टीव पार्टीसिपंट समजतो. तेव्हा माझे जे मत आहे ते कुठल्याही आकसावर नाही. जास्तीत जास्त तुम्ही असे म्हणू शकाल की माझी गॄहितके चुकीची आहेत, अभ्यास गंडलाय, इत्यादी. पण थेट आकसच म्हणणे भलतंच. खुद्द माझे स्वतःचे घर ४ लाख गुंतवून २५ लाखाचे झाले आहे, त्यामुळे कोणा मिपाकराच्या पैशाकडे बघून मला आकस वाटण्याची तशी काही गरज तर नाही. बेटर, आपण आकडेवारी व तथ्यांवर आधारित मुद्द्यांवर चर्चा करावी.

असे तोंडावर सांगितले तर तुम्ही राजकारण्यांसारखे माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतो आहे, गोल गोल फिरवून "अपवाद हाच नियम समजून बहुसंख्यकांच्या समस्यांकडे पाहणे योग्य नाही हे सांगता आहात."

>> २००७ ते २०१३ ह्या दरम्यान झालेल्या प्रॉपर्टी, सोने इत्यादींमधली भाववाढ ही अनैसर्गिक होती हे काय मी शोधून काढलेले नाही. सर्व अभ्यासक तसंच म्हणतात. त्यामुळे आधीच मी सांगितले की आपल्या गुंतवणूकीबद्दल विचार करतांना हा कालखंड रेफरन्स पॉइन्ट म्हणून बघू नये, तो एक चमत्कार, अपवाद होता. आणि त्याला बरेच बरेच बरेच पैलू आहेत. त्यासाठी एक वेगळा लेख लिहायला लागेल. जमलं तर लिहिन..

मला गोल बोलायची किंवा लिहायची सवय नाही म्हणून मी स्पष्ट आकस असा शब्द वापरला
>> तथ्यांवर आधारित मुद्द्यांवर बोलल्यास सवयी सांगत बसायची गरज पडत नाही. बाकी काहीच कारण नसतांना आपण थेट आकस आहे असे म्हणता तेव्हा बहुदा इथल्या धाग्याशिवाय इतर ठिकाणी इतर कोणाच्या तरी आपल्याशी झालेल्या वार्तालापाचा ह्या प्रतिसादावर प्रभाव आहे की काय असे वाटते.

किंवा
संक्षी सारख्या वित्त विषयातील तज्ज्ञांची मते सुद्धा स्पष्टपणे पुराव्यासकट चूक म्हणतो आहे. मला गुळमुळीत बोलायची सवय नाही ( लष्करात असे बोलणे भंपकपणा समजला जातो). आणि मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक नाही.

>> तुम्ही काय आहात काय नाही हा चर्चेचा मुद्दा नाही. सध्या इतकेच दिसत आहे की एका सरळ साध्या निरिक्षणाला आपण सरधोपट आकसपूर्ण बोलून मोकळे झालात, तसेच तुमचेच गणित मी आजच्या किंमतीनुसार पुढच्या पंधरा वर्षांसाठी मांडून दाखवले आहे. तिथे ते गणित मोडून पडते, हवं असल्यास २००० सालाच्या आधी कोणत्याही १५-१५ वर्षांचे गणित पगार आणी जमिनीच्या किंमतींशी जुळवून बघा... २००४ ते २०१६ ह्या काळात जे भाव वाढून १८ लाखाचे सव्वाकोटी झाले असे उदाहरण सापडल्यास मला सांगा, माझ्या ज्ञानात भर पडेल.

संक्षी साहेब हा फ्लॅट मी २०११ मध्ये घेतला तेंव्हा बूम वगैरे संपलेली होती उलट २००८-०९ च्या मंदीनंतर अर्थव्यवस्था खुरडत होती. .

>> "२००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे. (निश्चलनीकरणामुळे कमी झालेली किंमत गृहीत धरून)"
डॉक्टर साहेब, हे वरिल वाक्य आपलेच आहे ह्या धाग्यावरचे ते कोणत्या फ्लॅटबद्दल आहे आणि आताचे बोल्ड केलेले तुमचे विधान कोनत्या फ्लॅट बद्दल आहे?

बरं, संक्षी जी बूम म्हणत आहेत ती आपण बेमालूम कॉर्नर करत आहात. अमेरिकेच्या सबप्राईम चा भारतावर काय परिणाम झाला ते जगजाहिर आहे. २००८ च्या मंदीने शेअरबाजार कोसळला, अनेक एमएनसी नोकरदारांच्या नोकर्‍या गेल्या वगैरे सत्य आहेच. पण २००७ ते २०१३ मधे जमीन-सोने-चांदी यातली फास्टेट दरवाढही सत्यच आहे. त्यालाच संक्षी बूम म्हणत आहेत. ज्या कोणी २०११ च्या आत घरे घेतली त्यांनाच बूमचा फायदा झाला व नंतर २०१३ च्या नंतर घेणार्‍यांची स्थिती खेळात आपल्या हाती बॉल यावा आणी म्युझिक थांबावे अशी झाली.

मी फ्लॅट बुकिंग मध्ये घेतला म्हणून तो स्वस्त मिळाला आणि तो पुढे वाढ कुठे होईल हे गणित करून घेतला म्हणून त्याच्या किमतीत वाढ झाली
फ्लॅट बुकींगमधे घेतले तर स्वस्त मिळतात आणि हार्डकॅश किंवा पूर्ण पेमेंट केले तर महाग मिळतात काय? तुम्ही 'गणित करुन घेतले' म्हणून किंमतीत वाढ झाली हे लॉजिकही मस्त आहे....

ती गुंतवणूक बुडाली नाही हा नशिबाचा भाग आहे असे तुम्ही म्हणाल तर त्याला काय उत्तर? शेवटी आपण जिवंत आहोत तेच नशीब असेच म्हणावे लागेल.
आधीच्याच वाक्यात आपण गणित करुन फ्लॅट घेतला म्हणून त्याच्या किंमतीत वाढ झाली असे म्हणताय तिथे दुसर्‍याच वाक्यात गुंतवणूक बुडाली नाही हे नशीब म्हणताय... म्हणजे फायदा झाला तर 'माझ्या निर्णयामुळे', नुकसान झाले तर 'नशिबामुळे' असे काही लॉजिक आहे काय? असो. तो काही माझ्या मांडणीचा भाग नाही, तुमची वैयक्तिक विचारसरणी आहे.

(परत वितंडवाद घालतोय म्हणून आरोप येणार असतीलच. तेव्हा असो.)

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 7:02 pm | सुबोध खरे

फ्लॅट बुकींगमधे घेतले तर स्वस्त मिळतात आणि हार्डकॅश किंवा पूर्ण पेमेंट केले तर महाग मिळतात काय?
मग निवेशक (investor) लोक प्रकल्प कागदावरच असताना का हो आपला पैसा त्यात टाकतात?
तुम्ही बांधकाम क्षेत्रात "इतकी वर्षे काढूनही" असे विधान करता हेच आश्चर्य आहे.
साधा माणूसही सांगू शकेल कि बुकिंगमध्ये घर स्वस्त मिळते.
हहपुवा
विसंगती दाखवायला इतकेच पुरे आहे.
बाकी मेगाबायटी प्रतिसादाला उत्तर देण्याची गरज नाही (कारण त्यातच इतका अंतर्विरोध आहे).
बाकी तुम्ही काय संक्षी काय आपला मुद्दा सिद्ध करण्याकरता किती टोकाला जाऊन हास्यास्पद वाद घालता हे दिसून येतच आहे.
परत हहपुवा

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 11:04 pm | संदीप डांगे

बिल्डींग कागदावर असो वा जमीनीवर, कॅशमधे किंवा चेकने पूर्ण अपफ्रंट पेमेंट केल्यावर कोणा बिल्डरने डिस्काउंट देण्याचा अनुभव तुम्हाला आला नाही यात माझा काय दोष?

तुम्हाला हसायचं असेल तर खुशाल हसा बुवा. विनाकारण आपल्याआपण हसत सुटणारांना जग काय म्हणतं ते जगजाहिर आहे.

भोंगळ युग्तीवात बाजारात उपयोगात येत नाहीत...

सुबोध खरे's picture

28 Jan 2017 - 7:47 pm | सुबोध खरे

भोंगळ युग्तीवात
हा आमवातापेक्षा खतरनाक असतो.
बुकिंग मध्ये घर अपफ्रंट पेमेंट पेक्षा भरपूर स्वस्त मिळतं हे तर बांधकाम व्यवसायातील मजूर सुद्धा सांगेल
असे असूनही केवळ आपल्या मताचे समर्थन करण्यासाठी फुकाचा "भोंगळ युग्तीवात" करत आहात हे पाहून
हा हा पु वा ( हा हा म्हणजे मोठ्याने हसून)

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 8:33 pm | संदीप डांगे

बुकिंग मध्ये घर अपफ्रंट पेमेंट पेक्षा भरपूर स्वस्त मिळतं हे तर बांधकाम व्यवसायातील मजूर सुद्धा सांगेल

अर्रर्र..... घर वगैरे घेण्याचे डिल साईटवरच्या मजूरांसोबत करता की काय डॉक्टरसाहेब?

चला, मला नाही माहीतीच नाही आता. मग तुम्हीच सांगा बुकींगमध्ये अपफ्रंट पेक्षा "भरपूर स्वस्त" कसं मिळतं ते... माझ्याही ज्ञानात भर पडेल तितकी...
हसायचं कुणी व कसं ते मग नंतर बघू...

-------------------------------------------------------
बाकी, ही खाली बातमी देऊन ठेवतो. :-)

If you have money in hand, realtors are ready to welcome buyers with heavy discounts and freebies. Inquiries made by this correspondent, who posed as prospective buyer, revealed that sellers were willing to offer up to 25% discounts if the payment was made within 48 hours.

For instance, an upcoming posh residential complex on the SP Ring Road near new Chandkheda is priced at 45 lakh for a two-bedroom flat. Offer to pay cash and the price is instantly scaled down by 22%.

http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Buying-house-Pay-upfro...

सुबोध खरे's picture

30 Jan 2017 - 9:12 pm | सुबोध खरे

माझ्या भावाने २०१० मध्ये बुकिंग मध्ये मुलुंडला फ्लॅट बुक केला तेंव्हा दर होता ५५००/-स्क्वेअर फुटाला आणि २०१६ मध्ये तो रहायला आला तर आता दर आहे २५०००/-. (हे सर्व चेकचे पैसे आहेत.)
किती टक्के डिस्काउंट झाला हे सांगायला कितवी पास असायला हवे. चौथी कि पाचवी?
आपला मुद्दा सिद्ध करायला किती टोकाला जाताय आणि स्वतःला हास्यास्पद करून घेताय?

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 9:31 pm | संदीप डांगे

तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला कळत असेल तर बघा बुवा... २०१० चा रेट आणि २०१६ चा रेट यातला फरक हा 'डिस्काउंट' सांगत आहात.

तुमचा भाऊ केव्हा राहायला आला ह्याच्याशी काय मतलब? ज्याने २०१० मध्ये पूर्ण अपफ्रंट कॅश/चेक देऊन ५००० हजार दराने फ्लॅट घेतला असेल त्याला तेव्हाच तुमच्या भावापेक्षा कमी किंमतीत मिळाला असेल, आणि त्याने तेव्हा पूर्ण पैसे भरले म्हणून २०१६ मध्ये त्याच्या फ्लॅट चा दर २५००० नसेन असे काही आहे काय?

तरी वर धडधडीत बातमीही दिली आहे, ती ही नाकारत आहात.

हास्यास्पद कोण होतंय हे दिसतंय स्पष्ट.

रच्याकने, ते डॉक्टर व्हायला कितवी यत्ता पास असायला लागतं?

सुबोध खरे's picture

31 Jan 2017 - 10:26 am | सुबोध खरे

भोंगळ युग्तीवात

वरुण मोहिते's picture

27 Jan 2017 - 4:42 pm | वरुण मोहिते

संक्षी सरांचे प्रतिसाद वाचून भारावून गेलो आज . कर्जमुक्त जीवन काय, स्वच्छंदी जीवनाची व्याख्या काय ..जबरदस्त अनोखं सरसकटीकरण . एखाद्यावर कर्ज नाही म्हणून तो आनंदी आणि ज्याच्यावर कर्ज आहे तो दु:खी??असं असतं का .? अस असेल तर कित्येक लोक दाखवतो कर्ज नाहीये पण दु:खी आहेत .तेव्हा सरसकटीकरण नको. स्वच्छंदीपणा म्हणजे मनात येईल तेव्हा काम करणे नाही तर योग्य जबाबदाऱ्या सांभाळून मिळालेला वेळ सत्कारणी लावणे . उद्या मी ठरवलं पैसे आहेत जाऊ पटकन गोव्याला तरी माझ्यावर माझ्या स्वतःच्या कंपनीची जबाबदारी आहे काही लोक अवलंबून आहेत ते राहूदे ते सोडूनही मी स्वतः नोकरीही करतो जिथे मला रोज जाण्याची गरज नाहीये कित्येकदा बाहेर मीटिंग असतात भरपूर वेळ असतो. वेळेची बंधन नसतात पण म्हणून डोळे उघडले की उठाव,खेळावा ,झोपावं ,मनात येईल तेव्हा काम कराव हा सल्ला कोणाला पटेल. अगदी भरपूर पैसे असले तरी नाही. कारण कामात मजा असते . टेन्शन मध्ये पण एक आंनद असतो . काहीतरी सध्या करण्याची आस असते जिद्ध असते. फार तर आपण इतका म्हणू शकतो कि काम आवडता हव. मनात येईल तेव्हा काम करणे हा उपाय नाही . असो आपली मत आपला जीवन . राहता राहिला मुद्दा कर्जाचा तर कर्ज घेऊन योग्य वापर करणे ह्यात हुशारी असते . कुठलाही धंदा कर्जविनं चालत नसतो.उदाहरणादाखल गुजराती आणि कच्छी समाजाचे व्यवहार पाहावेत किंवा शेट्टी समाजाचा हॉटेल व्यावसायिकांचा सिंडिकेट ..हि अत्यंत बेसिक उदाहरण आहेत बाकी व्यवसाय म्हटलं कि कर्ज आल व्यवसाय विस्तार म्हटलं तरी कर्ज आल ते फेडण्याचा विश्वास स्वतःवर असेल कि झालं. आणि सध्याच्या काळात मुंबई पुण्यात घर घेताना एखादा नोकरी करणारा माणूस कसं घर घेणार ह्याची युक्ती सांगावी सगळ्यांना कामाला येईल. कच्छी भाषेत एक म्हण आहे ज्याच्यावर कर्ज नाही त्याचा धंदा नीट नाही अश्या अर्थाची असो . त्यामुळे कसलही कर्ज असल तरी रात्रंदिवस लोक तोच विचार करतात स्वच्छंदी जगत नाहीत असं काही एक नाही आहे . ज्याचा त्याचा चष्मा . प्रत्येकजण आपल्या परीने आनंद शोधत असतो.
बाकी डांगे सर कोणी फ्लॅट जास्त घेतले किंवा अगदी कोणी ठरवलं कि एकच फ्लॅट घ्यायचा त्यामुळे गरिबांना घरे मिळतील हे गृहितीक मुळातच चुकीचा आहे .

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 4:58 pm | संदीप डांगे

बाकी डांगे सर कोणी फ्लॅट जास्त घेतले किंवा अगदी कोणी ठरवलं कि एकच फ्लॅट घ्यायचा त्यामुळे गरिबांना घरे मिळतील हे गृहितीक मुळातच चुकीचा आहे .

माझ्या प्रतिसादातली विधाने ही "श्रीमंतांनी उधळपट्टी केली नाही तर गरिबांना खायला मिळेल" ह्या विचारसरणीवर आधारित नाही. श्रीमंतांनी घरे घेतली म्हणून गरिबांना घरे मिळत नाहीत असे ते गृहितकही नाही.

माझे मूळ विधान खालीलप्रमाणे:

गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.

ह्यातील प्रत्येक बोल्ड शब्द महत्त्वाचा आहे. त्यात कोठेही श्रीमंत विरुद्ध गरिब वगैरे कोणत्याही इझमची मांडणी नाहीये. त्यामुळे माझे हे मत कुठल्याही इझममधे न बघता खोडून काढता येत असल्यास मलाही आनंदच होईल. कारण ह्याची दुसरी बाजू मांडलेली माझ्या वाचनात आलेली नाही. कोणी ती दिल्यास आभारी राहीन....

गणामास्तर's picture

27 Jan 2017 - 5:02 pm | गणामास्तर

डांगेअण्णा कधी कधी तुम्ही मला छुपे समाजवादी वाटता ब्वा ;)

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 11:28 pm | संदीप डांगे

=)) =))

फॉर सेक ऑफ क्लॅरिफिकेशन वन्स अगेनः (श्रीमंत आणि गरिब) व (परवडणारी किंमत आणि गरजू) ह्या दोन ठळक वेगळ्या बाबी आहेत एवढं परत एकदा स्पष्ट करतोय.

"गरजू, परवडणे" असे शब्द आले की लगेच रस्त्यावरचे गरिब- महालातले श्रीमंत वगैरे समाजवादी+साम्यवादी विचार आठवायला लागतात हा आपल्या सर्वांच्यावर झालेला संस्कार आहे. त्याला काय करु शकत नाही. नीड टू थिंक क्लिअर विदाउट बायस... :-)

संदीप डांगे's picture

27 Jan 2017 - 5:02 pm | संदीप डांगे

क्षमा असावी, बोल्ड सगळेच झाले :-)

गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 5:43 pm | संजय क्षीरसागर

गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.

शंभर टक्के बरोबरे ! पब्लिक हेवी इएमआय घ्यायला तयार आहे हे बघून बिल्डर्सनी रिवर्स वर्कींग करुन फ्लॅटच्या किंमती भडकवल्या आहेत. कंस्ट्रक्शन कॉस्ट इतकी बेफाट अजिबात वाढलेली नाही. त्यात लोकांचा फ्लॅटकडे इनवेस्टमेंट म्हणून बघण्याचा अँगल आणि गरज नसतांना दोनदोन फ्लॅट घेणं ही तर गरजूंच्या जीवावर केलेली सट्टेबाजी आहे. जर लोकांनी सूज्ञ विचार करुन ही सट्टेबाजी थांबवली तर बिल्डर्स झक मारत लाईनीत येतील आणि गरजवंतांना घरं मिळू शकतील.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 5:32 pm | संजय क्षीरसागर

स्वच्छंदीपणा म्हणजे मनात येईल तेव्हा काम करणे नाही तर योग्य जबाबदाऱ्या सांभाळून मिळालेला वेळ सत्कारणी लावणे

स्वच्छंद म्हणजे जवाबदारी वगैरे विचारच मनात न येणं ! मी स्वतः (वडीलांच्या रिटायरमेंटनंतर) एकत्र कुटुंबाचा कर्ता आहे आणि तरीही स्वच्छंद आहे.

कारण कामात मजा असते

मजा काम स्वेच्छेनं करण्यात असते. कोणतंही काम निर्वयैक्तिक आहे, त्यात मजा तुम्ही आणता. पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण आणायचा मी उत्सव करतो. दळणवाल्याशी गपा, मध्यंतरीच्या काळात तीच्याबरोबर घेतलेला कटींग चहा, चहा घ्यायला जातांना तिच्याबरोबर झालेली एक-दीड किलोमिटरची पायपीट आणि तीची केली छेडखानी, ओझं हलकं करण्यासाठी दोघांनी धरलेला पिशवीचा एकेक बंद....आणि लोक्स दळण आणणं जवाबदारी समजतात. सो द पॉइंट इज, इट इज नॉट द वर्क बट दि ऑप्शन नॉट टू वर्क इज द फन !

त्यामुळे कसलही कर्ज असल तरी रात्रंदिवस लोक तोच विचार करतात स्वच्छंदी जगत नाहीत असं काही एक नाही आहे .

इएमआयवाले झोप येत असली तरी हप्त्याचा विचाराचं हँडलच जोरदार फिरवून सकाळी उठतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.

गॅरी ट्रुमन's picture

27 Jan 2017 - 5:37 pm | गॅरी ट्रुमन

इएमआयवाले झोप येत असली तरी हप्त्याचा विचाराचं हँडलच जोरदार फिरवून सकाळी उठतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.

माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सी.ए आहात. मग तुमच्या क्लाएंटची गरज, त्यांनी दिलेली डेडलाईन इत्यादी विचारांचे हँडल जोरदार फिरवून तुम्ही सकाळी कसे उठत नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.

तुमच्यासारख्यांचे माहित नाही पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना हे नाहीतर ते असे कुठलेतरी हँडल जोरदार फिरवूनच सकाळी उठावे लागते ब्वा. कुणाला ते ई.एम.आय चे असेल, कुणाला बॉसचे असेल अन्यथा कुणाला बिझनेसमध्ये टिकून राहायला आपले क्लाएंट जपायचे असेल!!

अप्पा जोगळेकर's picture

27 Jan 2017 - 5:44 pm | अप्पा जोगळेकर

अहो, तो त्यांचा छंद आहे. वाचले नाहीत का.
ते दळण आणायचा सुद्धा उत्सव करतात, कामाऐवजी सहलीला जातात. मला तर संक्षी म्हणजे जादूगारच वाटताहेत. खूप उलट्सुलट विचारु नका त्यांना नाहीतर जादूची छडी फिरवून उंदीर वगैरे करतील तुमचा आमचा.

संजय क्षीरसागर's picture

27 Jan 2017 - 5:55 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या क्लाएंटची गरज, त्यांनी दिलेली डेडलाईन इत्यादी विचारांचे हँडल जोरदार फिरवून तुम्ही सकाळी कसे उठत नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.

कारण मला इएमआयचं झेंगट नाही ! सकाळी खेळायला मजा येते म्हणून उठतो (याला विकल्प म्हणतात) आणि मन मानेल तेव्हाच काम करतो. तरीही (किंवा त्यामुळेच ) माझी सगळी कामं वेळेपूर्वीच संपलेली असतात. इथेच काही क्लायंटस आहेत आणि त्यांच्यासमोर लिहीतोयं, याशिवाय आणखी वेगळ्या पुराव्याची गरज नाही.

मी तर बा सकाळी एकच हॅण्डल फिरवायला उठतो...फ्लश चं !!
रच्याकने निसर्गाच्या हाकेला ओ देणं ह्याला ओझं म्हणावं की स्वछंदीपणा ???