चुम्बकीय क्षेत्राचे आरोग्यावर परिणाम

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in काथ्याकूट
4 Jan 2017 - 10:53 am
गाभा: 

मोबाईल व विविध वायरलेस उपकरणाच्या वाढत्या वापरामुळे माणसे एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राच्या सतत सम्पर्कात येत आहेत. हा सम्पर्क आरोग्य द्रुष्ट्या घातक आहे की नाही यावर मत-मतान्तरान्चा गलबला आहे. या विषयाबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती कोणी देऊ शकेल ?

प्रतिक्रिया

जास्त वेळ जर फोनवर बोलायचे असेल तर वायर चे हेडफ़ोन्स वापरा . इंस्ट्रूमेंट कधीही १ सेमी. पेक्षा दूर धरण्याचा सल्ला लेखी स्वरूपात प्रत्येक मोबाइल हैंडसेट बनवनारी कंपनी देते.

Read section on safe radiation in the book that comes with any new purchased handset.

आपली ही पहिली जनरेशन आहे अजुन. खरे परिणाम अजुन ५०-६० वर्षानी स्पष्ट दिसतील.

मोबाइल वर बोलताना उजव्या बाजु ऐवजि डाव्या बाजुच्या कानाला पकडावा हे कितपत खरे आहे?

> उजव्या बाजु ऐवजि डाव्या बाजुच्या कानाला पकडावा
विशेष काहीही तथ्य नाही.

प्राध्यापक गिरीश कुमार (iit बॉंबे) हे माझे शिक्षक होते. ह्यांनी अक्खे आयुष्य ह्या विषयावर घालवले आहे आणि प्रॅक्टिकल उपाय सुचवले आहेत. मुंबई मध्ये त्यांच्या मुलीची कंपनी आहे जी तुमच्या घरी येऊन तुम्हाला फ्री मध्ये सल्ला देऊ शकते (फ्री आहे कि नाही आधी विचारून घ्या). बहुतेक वेळा भारतीय कंपन्या अत्याधिक पावर वापरून ट्रांसमित करतात. तुमच्या खिडकीतून तुम्हाला एखादा टॉवर दिसत असेल तर आधी त्याची पावर मोजून घ्या ती जर कायद्याच्या बाहेर असली तर आधी कंपनी आणि नंतर ट्राय कडे तक्रार करा.

त्यांचे खालील प्रेझेन्टेशन पहा :

https://www.ee.iitb.ac.in/~mwave/GK-Cell%20tower%20radiation%20hazards%2...

अनन्त्_यात्री's picture

5 Jan 2017 - 2:26 pm | अनन्त्_यात्री

जेव्हा ओव्हरहेड विजेच्या तारामधून वीज-प्रवाह वाहत असतो तेव्हाही एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राची निर्मिती होत असते. हे चुम्बकीय क्षेत्र काच, भिन्त, धातू , कापड वगैरे सर्व भेदून सन्क्रमित होत असते. भारतातील पॉवर ट्रान्स्मिशन /डिस्त्ट्रीब्युशन कम्पनीज वर अशा ओवरहेड तारा मानवी वस्तीतून नेण्यावर काही बन्धने (अन्तर / उन्ची वगैरे) आहेत काय ? असल्यास ती पाळली जातात की नाही याची पडताळणी कोण करतो?