नास्तिक विचार मंच!!!!

Primary tabs

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
3 Jan 2017 - 9:17 pm
गाभा: 

मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच.
मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी /ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले .
असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे.
तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे.
इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

स्वामींचा एक दिवस दृष्टांत झाला. म्हणाले हो नास्तिक. मग काय...

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Jan 2017 - 10:19 pm | हतोळकरांचा प्रसाद

हहपुवा!! :):)

पुंबा's picture

4 Jan 2017 - 10:51 am | पुंबा

हाहाहा..

पैसा's picture

4 Jan 2017 - 12:34 pm | पैसा

मी कोण ते मलाच माहीत नाही. म्हसोबाला कौल लावून विचारते थांबा वाईच!

संजय क्षीरसागर's picture

3 Jan 2017 - 10:25 pm | संजय क्षीरसागर

देव ही केवळ मानवी कल्पना आहे हा उलगडा झाला आणि निरीश्वरवादी झालो !

इतकी साधी गोष्ट, पहिल्यांदा लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो . पण लोक्स त्यांच्या धारणांना सोडायला तयार नाहीत. पुन्हा त्यातनं इमोशनल इश्यूज व्हायचे आणि बरोबर असून एकटा पडायचो . मग म्हटलं जाऊं द्या झन्नममधे सगळं. आपला वेळ, पैसा आणि श्रम सगळेच वाचतायंत ना ? पब्लिकला काय करायचंय ते करू दे .

तिमा's picture

3 Jan 2017 - 10:46 pm | तिमा

आई-वडीलच पूर्ण नास्तिक होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच बुद्धिवादी विचारसरणी शिकवली. पुढे विज्ञान शाखेत गेल्यावर, आपले आई-वडील विज्ञान शाखेत न जाताही, किती हुशार आणि स्वतंत्र विचारांचे आहेत, हे कळले. त्यानंतर आयुष्यात कितीही संकटे आली तरी कधीही देवाचा धावा केला नाही आणि यापुढेही करणार नाही.
माझ्यासारखे विचार करणारे खूपच कमी आहेत, त्यामुळे आपण अत्यंत अल्पसंख्य गटात मोडतो, याची जाणीव आहे. पण अलिप्तपणे या बाकीच्या प्रवाहपतित लोकांचे निरीक्षण करायलाही फार मजा येते, हे नमूद करावेसे वाटते.

श्रीगुरुजी's picture

3 Jan 2017 - 10:51 pm | श्रीगुरुजी

'ना' धाग्याच्या शीर्षकाचे पहिले अक्षर आहे. त्यामुळे 'ना' अक्षरापासून अंताक्षरीचा शुभारंभ करीत आहे.

ना तुम हमे जाSSSने, ना हम तुम्हे जाSSSने
मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया

'या' अक्षर आलंय.

प्रान्जल केलकर's picture

4 Jan 2017 - 9:03 am | प्रान्जल केलकर

लाहोल मिळाकुवत
आपके इस गाणे पार पहिला गाणा हमाराच
गोर फर्माइये
गाणे के अलफाज है
या जणमावर

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबुन घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे

श्रीगुरुजी's picture

4 Jan 2017 - 9:49 am | श्रीगुरुजी

वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेलेSS तेSS दिन गेSलेS

'ले' अक्षर आलंय.

प्रान्जल केलकर's picture

4 Jan 2017 - 10:00 am | प्रान्जल केलकर

वल्लाह क्या केहेणे
अगला गाणा हमारी तर्फ से

लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची

सौख्यात वाढलेली
प्रेमात नाहलेली
कळिकळि फुलून ही चढते मंडपी वेल मायेची

संपताच भातुकली
चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदुखुदू हसते होऊनी नवरी लग्‍नाची

हे माहेर, सासर ते
ही काशी, रामेश्वर ते
उजळिते कळस दो घरचे चंद्रिका पूर्ण चंद्राची

पिलीयन रायडर's picture

3 Jan 2017 - 10:54 pm | पिलीयन रायडर

कधी आस्तिक नव्हतेच. देव आहे असं एक क्षणभरही वाटलं नाही आजवर. माझे आजोबा नास्तिक होते तो प्रभाव असेल. पण आजी आणि बाबांचे आईवडिल अत्यंत धार्मिक. मी नेमकी ह्याच आजोबांवर कशी गेले ते माहिती नाही. पण त्यांच्यामुळेच मी नास्तिक आहे हे नक्की.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Jan 2017 - 11:45 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

रायडर बाइ ,तुम्ही आस्तिक असाल असे वाटले होते ,पण तुम्ही चक्क नास्तिक आहात. वेलकम टु द क्लब बाय्दवे.

गॅरी ट्रुमन's picture

4 Jan 2017 - 9:24 am | गॅरी ट्रुमन

माझे आजोबा नास्तिक होते तो प्रभाव असेल. पण आजी आणि बाबांचे आईवडिल अत्यंत धार्मिक.

आस्तिक आणि धार्मिक (पक्षी पूजाअर्चा इत्यादी करणारे) या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरल्या जाणे या गोंधळामुळे बरेच 'कन्फ्युजन' तयार होते.

(आस्तिक असलेला पण धार्मिक नसलेला) ट्रुमन

पिलीयन रायडर's picture

4 Jan 2017 - 9:46 am | पिलीयन रायडर

खरंय.. पण जे धार्मिक असतात ते १००% अस्तिक असतातच ना.. त्यामुळे इथे ते नुसतेच अस्तिक नसुन, देवभोळे आणि काही बाबतीत कट्टरही होते हे सांगायला हा शब्द वापरलाय.

बाकी आस्तिक, नास्तिक, अज्ञेय, धार्मिक वगैरे संज्ञा मी बर्‍याच मोघम वापरते हे खरंय. म्हणायचा मुद्दा इतकाच की मी आस्तिकही नाही आणि धार्मिकही. नास्तिक आहे की अज्ञेयवादी हे अजुन माहित नाही. पण कुणी एक शक्ती हे सगळं ठरवुन कंट्रोल करतेय असं काही अजुन मला वाटत नाही. सगळ्यामागे कारण आहे, आपल्याला माहिती नाही इतकंच.

गॅरी ट्रुमन's picture

4 Jan 2017 - 10:12 am | गॅरी ट्रुमन

पण जे धार्मिक असतात ते १००% अस्तिक असतातच ना.

प्रत्येक वेळी नाही. अनेकदा पक्के चोर लोक आपल्याच मनाला लागलेली टोचणी दूर करायला पूजाअर्चा वगैरे गोष्टींचा वापर करतात. त्यांना वाटते की आपण इतर ठिकाणी जे पाप करतो त्याची किंमत या पूजाअर्चांच्या माध्यमातून चुकवली की आपले काम झाले. असे लोक खरोखरच अस्तिक असतात का?अशा लोकांना अस्तिक समजले जाते आणि त्यामुळे अस्तिक लोक चोर असतात पण नास्तिक लोक सज्जन असतात असे चित्र उभे राहते.

दुसरे म्हणजे अनेक लोक पूजाअर्चा वगैरे घराण्याची परंपरा म्हणून चालू ठेवतात. एकतर ती परंपरा मोडायचे धैर्य त्यांच्यात नसते किंवा आपल्याच नातेवाईकांना काय वाटेल या विचाराने इच्छा नसूनही ते त्या परंपरा सुरू ठेवतात. असे लोक खरोखरच अस्तिक असतात का?

आपल्याला आजूबाजूला जे धार्मिक लोक दिसतात त्यात या दोन प्रकारच्या लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर असतो. याची आकडेवारी माझ्याकडे नाही आणि ती गोळा करण्याचे स्वारस्यही नाही पण एक जनरल गोष्ट लिहित आहे.

तेव्हा खरोखरच अस्तिक असलेले आणि धार्मिक असलेले लोक नक्की किती हा गणितातील वेन डायग्रॅमचाच प्रश्न झाला :)

लिहायचा उद्देश हा की जे धार्मिक असतात ते १००% अस्तिक असतातच असे नाही.

मराठी कथालेखक's picture

4 Jan 2017 - 2:01 pm | मराठी कथालेखक

तुमचं बरोबर आहे, पण तरीही इतका काथ्याकूट अनावश्यक वाटतो.
प्रॅक्टिकली जो जाहीर करतो की "मी नास्तिक आहे", तो नास्तिक. जो अस्तिक असल्याचं जाहीर करतो किंवा मंदिरात जातो वा पूजा वगैरे करतो तो अस्तिक...

गॅरी ट्रुमन's picture

4 Jan 2017 - 2:09 pm | गॅरी ट्रुमन

जो जाहीर करतो की "मी नास्तिक आहे", तो नास्तिक. जो अस्तिक असल्याचं जाहीर करतो किंवा मंदिरात जातो वा पूजा वगैरे करतो तो अस्तिक...

अहो पाकिस्तानचे पंतप्रधानही आपला देश दहशतवादविरोधात आहे असेच म्हणतात. खरोखर तशी परिस्थिती आहे का? माणूस म्हणेल लाख काही पण प्रत्यक्ष तशी परिस्थिती आहे की नाही हे पडताळून बघायला नको का?पडताळणी

मराठी कथालेखक's picture

4 Jan 2017 - 3:46 pm | मराठी कथालेखक

आता नास्तिक असल्याचा किंवा अस्तिक असल्याचा काय पुरावा शोधणार..
एखादा माणूस मंदिरात जातो आहे, तो अस्तिक आहे हे त्याने डिक्लेअर केलंय.. आता त्याच्या मनात तो खरंच देवाचं अस्तित्व मानतो की नाही हे सिद्ध कसं करणार ?
झालंच तर तो (किंवा विरुद्ध पक्षाचा म्हणजे नास्तिक माणूस तरी) खोटं का बोलेल ?
शिवाय त्याच्यामुळे मंदिरापुढची रांग वाढली , सकृतदर्शनी तरी अस्तिकांची संख्या जास्त दिसली आता त्याच्या मनात काय वेगळं आहे त्याने काय फरक पडणार ?
मी जर कमळाच्या पुढचं बटन दाबलंय आता माझ्या मी मनातून मी भक्त असलो काय किंवा विरोधक असलो काय , ते कळणार कुणाला आहे आणि त्याने फरक तरी काय पडणार आहे ? 'ऑफिशियली' मी भाजपचा समर्थकच ठरतो ना !!

विशुमित's picture

4 Jan 2017 - 12:15 pm | विशुमित

<<<सगळ्यामागे कारण आहे, आपल्याला माहिती नाही इतकंच.>>>

-- नास्तिकांना आपली बाजू मांडण्यासाठी हे एकच जबरदस्त वाक्य पुरेसे आहे..!! क्या बात क्या बात

सुबोध खरे's picture

3 Jan 2017 - 11:17 pm | सुबोध खरे

नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे.
कुणाला कधी आणि कुठे ?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Jan 2017 - 11:42 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
रामपुरी's picture

3 Jan 2017 - 11:21 pm | रामपुरी

"खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला"
हे असं भारतियांवर घसरण्याचं कारण समजलं नाही. म्हणजे इतर धर्मात/देशात काय चालतं हे माहितचं नाही की ही फक्त काडी आहे? माहीत नसेल तर अभ्यास वाढवा. आणि नेहेमी सारखी काडी असेल तर चालू द्या.

डब्लिन ला टेम्पल बार जवळ एका दुकानात छत्री विकत घेत होते. त्या विक्रेतीला ला विचारलं कि उघडून बघितली तर चालेल ना? त्यावर तिचे उत्तर होते कि नाही चालणार कारण काहीतरी वाईट घडेल...
सांगायचं उद्देश एवढाच कि अंधश्रद्धा भारताबाहेर पण तितक्याच आहेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2017 - 11:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

नास्तिक आणि आस्तिक दोघेही बहुदा आक्रस्ताळेपणे "मीच्च खरा" म्हणताना दिसतात. त्यापेक्षा अज्ञेयवादी (अग्नॉस्टिक) जास्त समंजसपणे आणि शास्त्रीय पद्धतीने विचार मांडणारे असतात असे निरिक्षण आहे. :)

पुंबा's picture

4 Jan 2017 - 10:58 am | पुंबा

अगदी मान्य. आस्तिकांचा भोळसटपणा आणि नास्तिकाचा अहंकार या दोन्हीपेक्षा अज्ञेयवाद्याचा चिकीत्सक खुलेपणा अधिक योग्य वाटतो. जाणीवपुर्वक अज्ञेयवाद स्विकारला आहे. आस्तिक म्हणून जी थेरं केली जातात त्यातल्या एकावरही विश्वास नाही, विज्ञानवादी विवेकनिष्ठा जीवनाचे खरे रूप समजण्यास पुरेशी आहे असे वाटते मात्र अध्यात्म पुर्णपणे निरुपयोगी संस्था आहे हे पटत नाही आणि देवाचे अस्तित्व संपूर्ण पुसून टाका हा नास्तिकांचा दुराग्रहही.

मार्कस ऑरेलियस's picture

4 Jan 2017 - 1:38 am | मार्कस ऑरेलियस

हिंदु तत्वज्ञानानुसार नास्तिक आणि निरीश्वरवादी ह्या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. नास्तिक म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणरा आणि निरीश्वरवादी म्हणजे पारलौकिक शक्तीचे अस्तित्व नाकारणारा !

तुम्ही येथे नास्तिक हा शव्द निरीश्वरवादी ह्या अर्थाने वापरलेला दिसत आहे म्हणुन खास तुमच्या माहीती साठी सांगतो कि हिंदु धर्माच्या तत्वज्ञाच्या मुळाशी असलेले सांख्य दर्शन हे आस्तिक दर्शन चक्क निरीश्वरवादी आहे !!

आणि ह्याच उलट नास्तिक दर्शनांपैकी जैन आणि बुध्द दर्शन स्विकारणार्‍या लोकांच्या कित्येक संप्रदायात पारलौकिक शक्तीचे अस्तित्व मान्य केले आहे ,. हीनयान संप्रदायात तर बुध्दाचीच पुजा अर्चा होते !

नास्तिक आणि निरीश्वरवादी असे दोन्हीही असलेले एकमेव दर्शन म्हणजे चार्वाक ! पण त्याला तत्वज्ञान म्हणायचे का हाच पहिला प्रश्न आहे ! लोल !!
( आजीवकांबद्दल तुर्तास तरी काही वाचनात आलेले नाही.)

सध्या अस्तित्वात असलेला भक्तिप्रधान हिंदु धर्म मुळात श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणीत अद्वैत वेदांत सिध्दांतावर आधारलेला आहे . अद्वैत संप्रदाय " तत्वमसि" अर्थात ते (ब्रह्म) तुच आहेस असे मत प्रतिपादन करतो आणि ह्या एनलाईटनमेन्टच्या परमोच्च अवस्थे प्रत पोहचण्यासाठी ज्ञान कर्म आणि राज ह्या तिन्ही योगांचा समुच्चय असलेला नवविधाभक्तिराजपंथ असा भक्तीयोग हा साधा सोप्पा मार्ग सुचवतो !!

ईश्वराचे अस्तित्व मान्य केले तरी भक्तियोगाच्या आधारे शेवटी ' तो तुच आहेस' हे समजुन घेणे हीच हिंदु धर्माची डोक्टराईन आहे. पहा : " अरे अरे ज्ञाना झालासे पावन | तुझे तुज ध्यान कळो आले | तुझा तुचि देव तुझा तुचि भाव | फिटला संदेह अन्य तत्त्वी ||" )

आता बोला तुम्ही टफि कंच्या साईडला ??

लीना कनाटा's picture

4 Jan 2017 - 6:38 am | लीना कनाटा

अरे अरे टफि झालासे पावन |
तुझे तुज ट्रोल कळो आले ||
तुझा तुचि आयडी,तुचि डुआयडी |
टाकली पिंक अन्य धागी ||

अनन्त्_यात्री's picture

4 Jan 2017 - 9:31 am | अनन्त्_यात्री

सांख्य दर्शन जितके आस्तिक व निरीश्वरवादी आहे तेवढीच न्याय व वैशेषिक दर्शने आस्तिक व निरीश्वरवादी आहेत असे वाचले होते. मार्कस, या विषयी अधिक विस्ताराने
लिहाल?

मार्कस ऑरेलियस's picture

4 Jan 2017 - 10:51 am | मार्कस ऑरेलियस

मार्कस, या विषयी अधिक विस्ताराने लिहाल?

माफ करा , पण माझा ह्या विषयाचा सखोल अभ्यास नाही .
प्रसाद प्रकाशनाने ह्या सर्व दर्शनांवर सविस्तर पुस्तके लिहिली आहेत . ती आपण पाहू शकता .

( अवांतर: एका अवलिया मिपा मित्राच्या घरी हि सर्वच्या सर्व पुस्तके पाहिल्याचे आठवते . योग्य वेळी ती वाचनास मागून घेतली जातील :D)

सुबोध खरे's picture

4 Jan 2017 - 9:45 am | सुबोध खरे

हे म्हणजे तुम्ही टफि ना गोल रिंगणात घेऊन कोपऱ्यात उभे रहा सांगितल्यासारखे आहे.
आता कोपरा कुठे आहे आणि कसा शोधायचा?

सस्नेह's picture

4 Jan 2017 - 1:24 pm | सस्नेह

याशिवाय पातंजल योग-दर्शनात प्रत्येक जीवाचे शुद्ध केवल रूप म्हणजे ईश्वर असे मत मांडले आहे, त्यावर टफिसाहेबांचे आस्तिक-नास्तिकपण काय म्हणते हे वाचावयास आवडेल.

प्रान्जल केलकर's picture

4 Jan 2017 - 9:12 am | प्रान्जल केलकर

असले झाटू आरोप करण्या आधी दुसऱ्या धर्मात पण बघा. देव मानत नाही म्हणजे धर्म पण मनात नाही. त्यामुळे आधी आपला धर्म साफ करू माग दुसऱ्याचा असले बालगंधर्व पुलावरल्या भुताचे विचार आम्हाला ऐकवू नका.
हिंदू धर्माची घाण साफ करण्यापेक्षा पार्श्वभागात दम असेल तर फक्त मुस्लिम धर्मातल्या बुरख्या वर बंदी आणून दाखवा. आस्तिक नास्तिक हे फादर सिस्टर्स ला पण सांगा. पास्टर लोक काय उच्छाद मांडतात ते बघा आधी फेसबुक वर नो कॉन्व्हर्जन (NO CONVERSION) नावाचा ग्रुप आहे तिथे जाऊन आधी ख्रिश्चन धर्मातल्या होलयु यु च्या करामती बघा माग हिंदू धर्मावर टीका करा

बुद्धीवाद म्हणजे नेमकं काय ?

गॅरी ट्रुमन's picture

4 Jan 2017 - 10:13 am | गॅरी ट्रुमन

बुद्धीवाद म्हणजे नेमकं काय ?

एखाद्याची बुध्दी कायम वादात असल्याचे लक्षण म्हणजे बुध्दीवाद

अनन्त्_यात्री's picture

4 Jan 2017 - 10:22 am | अनन्त्_यात्री

ज्ञानप्राप्ती फक्त बुद्धी व तर्काचा वापर करूनच होऊ शकते ही धारणा म्हणजे बुद्धीवाद.

गॅरी ट्रुमन's picture

4 Jan 2017 - 10:32 am | गॅरी ट्रुमन

ज्ञानप्राप्ती फक्त बुद्धी व तर्काचा वापर करूनच होऊ शकते ही धारणा म्हणजे बुद्धीवाद.

सहमत आहे. खरोखरचा बुद्धीवाद असा असेल असे म्हणायला हरकत नसावी. स्वतःला बुद्दीवादी म्हणवून घेणारे मात्र त्यांची बुध्दी कायम वादात असल्याप्रमाणे वर्तन करतात. यातून होते असे की सर्व धार्मिकांना अस्तिक म्हटल्याप्रमाणे घोळ होतो तसाच घोळ इथेही होतो :)

(खरोखरचा बुद्धीवाद आणि फेसबुक-मिपा आणि इतर ठिकाणी स्वतःला बुद्धीवादी म्हणवून घेणार्‍यांचा बुद्धीवाद यांच्यात जमिन अस्मानाचा फरक आहे असे मानणारा) ट्रुमन

पण अशी धारणा म्हणजे स्वतःच्या बुद्धीप्रती असलेली अंधश्रद्धा नव्हे काय ?
मानव हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे असं म्हणतात. पण ही गोष्ट एखाद्या बुद्धीवादी हत्तीला माहिती नसेल तर तो त्याच्या बुद्धीला सर्वश्रेष्ठ समजेल.
थोडक्यात आपल्या बुद्धीच्या पलीकडेही काहीतरी असेल हा विचार बुद्धीवादामध्ये येत नाही का ?

अर्थात आपल्या बुद्धीच्या पलीकडे असेल ते सगळे दैवी असे मला म्हणायचे नाही.

गॅरी ट्रुमन's picture

4 Jan 2017 - 11:09 am | गॅरी ट्रुमन

आपल्या बुद्धीच्या पलीकडेही काहीतरी असेल हा विचार बुद्धीवादामध्ये येत नाही का ?

हाच फेसबुक-मिपा इत्यादीवर स्वतःला बुद्धीवादी म्हणविणार्‍या लोकांच्या बुध्दीवादाचा घोळ आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2017 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडासा पण कळीचा फरक...

"ज्ञानप्राप्ती फक्त बुद्धी व तर्काचा प्रामाणिक वापर करूनच होऊ शकते ही धारणा म्हणजे बुद्धीवाद."

प्रामाणिकपणाच्या अभावामध्ये बुद्धी व तर्काचा वापर करून बुद्धीभेद केला जातो, या अनुभवावर आधारलेली आपली एक छोटीशी भर. :) ;)

इल्यूमिनाटस's picture

4 Jan 2017 - 10:38 am | इल्यूमिनाटस

जिथे विज्ञान संपतं तिथे देव सुरु होतो
हे विश्व कसं निर्माण झालं याचं उत्तर विज्ञान देतं (ते ही वादातच आहे(बिग ब्यांग))
पण का निर्माण झालं याचं उत्तर विज्ञाना कडे नाही
मग पारलौकिक शक्तीला मानण्या खेरिज पर्याय उरत नाही

जेव्हा आयुष्य नॉर्मल चालू असतं तेव्हा मी नास्तिक असतो, पण कोणता मोठा प्रॉब्लेम आला की आपसूकच देवाचा धावा सुरु होतो

नास्तिक व्हायचे आहे पण जमत नाही

पण कोणता मोठा प्रॉब्लेम आला की आपसूकच देवाचा धावा सुरु होतो

तुमच्या प्रतिसादातल्या पहिल्या परिच्छेदाच्या हिशोबाने विज्ञानाकडची उत्तरं संपली की मगच देवाचा धावा सुरू केला पाहिजे.

जसजसे उन्चावर जावे तसतसे क्षितिज विस्तारत जाते, त्याप्रमाणे बुद्धी-वर्धनाच्या समप्रमाणात विविध घटनान्ची / विषयान्ची सन्ख्या / व्याप्ती व त्यामधील समब्न्ध व कार्य-कारण भाव आकलन-गम्य होत जातो. बुद्धिवाद म्हणजे बुद्धीप्रती असलेली अंधश्रद्धा नक्कीच नव्हे ...तर बुद्धी वर्धनक्षम असल्यामुळे अधिकाधिक ज्ञान आकलन-गम्य आहे ही धारणा.

ज्ञान हे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही ह्यावर प्रकाश टाकावा
मुळात ज्ञान मिळवायचे हा प्रामाणिक हेतू असल्यास, ते फक्त बुद्धीनेच मिळवायचे हा अट्टाहास कश्यासाठी ?
उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतातून ते मिळवल्यास त्यात काय वाईट आहे ?
बुद्धीने मिळते तेच ज्ञान असा काही नियम आहे का ?

हे सर्व प्रश्न प्रामाणिक आहेत. बुद्धीवादाची खिल्ली उडवण्याचा उद्देश नाही.

माझा पास.. मिपावरच मी पूर्वी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अजून कोणी दिलेली नाहीत, त्यामुळे लेखनसीमा.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Jan 2017 - 11:31 am | llपुण्याचे पेशवेll

ऐला, यावरून अनिता पाटील विचार मंचाची आठवण झाली. :)

त्यांचा 'विचार' मंच पण आहे?
अविचार मंचाबद्दल ऐकले होते!

संदीप डांगे's picture

4 Jan 2017 - 11:52 am | संदीप डांगे

सौ बात की एक बातः मी स्वार्थी आहे.

मराठी कथालेखक's picture

4 Jan 2017 - 1:04 pm | मराठी कथालेखक

मी नास्तिक /निरीश्वरवादी आहे.
कारण साधं आहे - वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगू लागलो तेव्हापासून 'इश्वर ही एक मानवनिर्मित संकल्पना आहे' हे समजले. त्यानंतर ती संकल्पना कवटाळायची की दूर सारायची हा निर्णय घेणे जास्त कठीण नव्हते.

पैले तुम अपना प्रॉब्लेम फिक्स करो ...नास्तिक किसको कहत है, आस्तिक माने क्या, धार्मिक क्या है ..?

खरतर आस्तिक किंवा नास्तिक होण्यात काही तोटा नाही , पण कर्मकांड टाळति आला पाहिजे(टाळता)

एक उत्तरमीमांसा वगळता बारा दर्शनांपैकी सर्वच मूलतः निरीश्वरवादी आहेत. त्यातल्या लोकायत वगळता इतर दर्शनांनी ईश्वर या संकल्पनेच्या समान किंवा तिच्या जवळ जाणारी प्रतिपाद्ये काळाच्या ओघात आणि विशेषतः शंकराचार्यप्रणित अद्वैत विचाराचा उदय झाल्यानंतरच्या काळात स्वीकारल्याचं दिसतं. लोकायत हे दर्शन नास्तिक आणि निरीश्वरवादी असे दोन्ही आहे. ते सर्वात जुने तत्त्वज्ञान आहे. त्याच्या अभ्यासाची साधने विरोधकांनी नष्ट केल्यामुळे फारच दुर्मिळ आहेत. आणि लोकायत समजून घेण्यासाठी बहुतांशी त्यावर इतर दर्शनांनी केलेल्या टीकेचा (टीका म्हणजे भाष्य) आधार घ्यावा लागतो. 'किं त्वम् असि' या तत्त्वज्ञानाच्या चर्चेच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तत्त्वज्ञाला 'जड आणि चेतन' याचे त्याच्या तत्त्वज्ञानात असलेले उत्तर सांगावे लागते. जेव्हा इतर दर्शनांना जडामध्ये असलेल्या चेतनेचे स्वरूप आणि तिचा उगम सांगताना अतार्किक संकल्पनांचे इमले बांधावे लागतात, तेव्हा लोकायताने 'चेतन हे जडाचेच स्वभाववैशिष्ट्य आहे' असे इतक्या प्राचीन काळातही ठामपणे सांगितले. इतकेच नाही, तर लोकायताने म्हणजेच चार्वाकदर्शनाने तत्त्वज्ञानातील इतर मूलभूत प्रश्नांचाही सखोल अभ्यास केला. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'प्रमाण'. लोकायताने फक्त प्रत्यक्ष प्रमाण हेच एकमेव प्रमाण मानले. आणि तर्काच्या आधारावर केलेल्या अनुमानाला त्याच्या मर्यादांमध्ये मान्यता दिली. परंतु शब्दप्रमाणाला पूर्णपणे नाकारले.

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लोकायताला खरेतर आस्तिकशिरोमणी मानावे असे म्हटले आहे, कारण हे एकमेव तत्त्वज्ञान केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्याच वस्तूंना त्यांच्या अस्तित्वाच्या आधारे मान्यता देते. यावर दत्तप्रसाद दाभोलकर यांनी मात्र लोकायताने 'नास्तिकशिरोमणी' ही ओळख अभिमानाने मिरवावी असे प्रतिपादन केले.

कधीतरी भारतीय तत्त्वज्ञान आणि दर्शने यावर सविस्तर लेख लिहावा असे वाटते. लोकांमध्ये बरेच गैरसमज तर आहेतच, त्यांना बरीचशी मूलभूत माहितीदेखील नसते. आणि 'ऋणंकृत्वा घृतं पिबेत' सारखा तद्दन खोटारडेपणा चार्वाकांच्या नावावर खपवून मोकळे होतात. असो.

कधीतरी भारतीय तत्त्वज्ञान आणि दर्शने यावर सविस्तर लेख लिहावा असे वाटते. लोकांमध्ये बरेच गैरसमज तर आहेतच, त्यांना बरीचशी मूलभूत माहितीदेखील नसते.

फिर देर क्यूं?

प्रचेतस's picture

4 Jan 2017 - 9:44 pm | प्रचेतस

लेखाची वाट पाहातो आहे.

आनंदयात्री's picture

4 Jan 2017 - 10:20 pm | आनंदयात्री

>>कधीतरी भारतीय तत्त्वज्ञान आणि दर्शने यावर सविस्तर लेख लिहावा असे वाटते.

लवकर लिहा. वेळ काढा (हवी तर सुट्टीहि काढा). धन्यवाद.

मार्कस ऑरेलियस's picture

4 Jan 2017 - 11:22 pm | मार्कस ऑरेलियस

वाह ! चार्वाक मतावर वाचायला आवडेल ! पण साळुंखेंचे नाव घेतलेत म्हणुन सांगतो कि कोणताही अभिनिवेश टाळुन लिहिता आले तर लिहा.

त्याच्या अभ्यासाची साधने विरोधकांनी नष्ट केल्यामुळे फारच दुर्मिळ आहेत.

ह्या असल्या विधानांना काय ऐतिहासिक आधार आहे ते ही लिहा ! पुस्तके, ग्रंथालये जाळणे ही हिंदुंची बुध्दांची किंव्वा जैनांची कोनाचीच संस्कृती नाही ! ही जाळपोळ अन तोडाफोडीची संस्कृती 'बाहेरुन' आलेली आहे !

अद्वैत मताचे प्रतिपादन करताना आचार्यांनी प्रामुख्याने बौध्द मताचेच खंडन केलेले दिसले, चार्वाक मत त्यातंच्या काळाच्या आधीच लोप पावलेले दिसुन येते त्याच्या कारणांचीही चिकित्सा व्हावी !

अभ्यासपुर्ण लेखन वाचायला आवडेलच.

नक्कीच. डॉ. साळुंखेंचं नाव मुद्दाम घेतलं आहे. चार्वाक किंवा अन्य दर्शनांचाही अभ्यास करताना सर्वच संबंधित साधने विचारात घ्यायला लागतात आणि त्यांचा तौलनिक अभ्यास तटस्थपणे आणि चिकित्सक वृत्तीने करावा लागतो. मग ते डॉ. साळुंखे असोत, वा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन असत, वा मध्वाचार्य असोत वा आदिशंकराचार्य, वा अन्य कोणीही. अगदी 'नास्ति मृत्यु अगोचरः' चं 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत' सारखं विडंबन करणारे लोकही असोत. पण येथे लोकायत हे मुळात तत्त्वज्ञान म्हणविण्याच्या लायकीचेच नाही असा अभिनिवेश आणि पूर्वग्रह टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

असाच अभिनिवेश आपल्या तथाकथित परंपरा आणि संस्कृतीच्या तथाकथित श्रेष्ठत्त्वाबद्दल बाळगणेही वैचारिक एकारलेपणाचे लक्षण आहे. जगातल्या सर्वच चांगल्या-वाईट गोष्टी जगातल्या सर्वच ठिकाणी सर्वत्र आणि सार्वकालिक स्वरूपात अस्तित्त्वात असतात - होत्या - असतील. तेव्हा चांगलं ते इथलं आणि वाईट ते बाहेरून आलेलं असा अभिनिवेशही काही कामाचा नाही.

याची दुसरी बाजू म्हणजे अभिनिवेश जसा नको, तसा न्यूनगंडदेखील नको. तटस्थता अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन भारताला खंडन-मंडनस्वरूप चर्चांची अभिव्यक्त होण्याची जशी परंपरा लाभली आहे (सहिष्णुता) तशीच जेत्यांची विचारधारा जित समुदायावर लादण्याचीही (असहिष्णुता) आहे.

तेव्हा आपले पूर्वग्रह, अभिनिवेश, अहंकार किंवा न्यूनगंड इत्यादी वैयक्तिक बाबींचा परिणाम अभ्यासाच्या दिशेवर आज निष्कर्षांच्या सच्चेपणावर होऊ न देण्याची संपूर्ण जबाबदारी ही अभ्यासकावर असते. हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक.

मार्कस ऑरेलियस's picture

5 Jan 2017 - 7:07 am | मार्कस ऑरेलियस

शब्दच्छल

जगातल्या सर्वच चांगल्या-वाईट गोष्टी जगातल्या सर्वच ठिकाणी सर्वत्र आणि सार्वकालिक स्वरूपात अस्तित्त्वात असतात - होत्या - असतील. तेव्हा चांगलं ते इथलं आणि वाईट ते बाहेरून आलेलं असा अभिनिवेशही काही कामाचा नाही

तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शब्दच्छल नसावा अशी विनंती आहे . कृपया हिंदू बुद्ध किंवा जैन धर्मियांनी प्रो ऍक्टिव्हली पराधर्माच्या दुसऱ्या तत्त्वज्ञानाच्या लोकांची पुस्तके जाळल्याचे , इतिहासाची साधने नष्ट केल्याचे पुरावे द्यावेत . किंवा चार्वाकाचे तत्वज्ञान विरोधकांनी नष्ट केले हे विधान मागे घ्यावे !

आणि महत्वाचे म्हणजे श्रीमदाद्यशंकराचार्यानी अखंड भारत वर्षात फिरून बौद्धादि नास्तिक मतांचे खंडन आधीच केलेले आहे । ज्यांना ते पटलेले आहे त्यांना परत शून्यातून सुरुवात करायची गरज आहे असे मला वाटत नाही , त्यांना फक्त रिव्हिजन करणे पुरेसे आहे ।

बाकी साळुंखेना सर्वपल्ली राधाकृष्णन , मध्वाचार्य , श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या पंक्तीत बसवले पाहून मौज वाटली ।

नेत्रेश's picture

5 Jan 2017 - 5:51 am | नेत्रेश

अमेरीकेतील व भारतातील बहुतांश वैज्ञानीक, डॉक्टर, उद्योजन हे आस्तिक आहेत.

जगातली १ नंबरची महासत्ता, विज्ञान, तंत्रज्ञान यात आघाडीवरचा देश असलेली अमेरीकाही मोठ्या अभीमानाने आपल्या सर्व चलनावर आपला ऑफीशीयल मोट्टो 'In God We Trust' छापते. (या मुळे देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही, फक्त माहीती साठी लिहीले आहे).

तळटीपः नास्तीकांचा व त्यांच्या मताचा पुर्ण आदर आहे.

संजय क्षीरसागर's picture

5 Jan 2017 - 10:04 am | संजय क्षीरसागर

भीती कमी होते. अज्ञात गोष्टींचा भार स्वतःवर घेण्यापेक्षा, पुन्हा अज्ञात संकल्पनेवर टाकणं सोयीचं आहे. म्हणून ते तसं म्हणतात.

अमीर त्याच्या मित्रांना म्हणतो, अनिश्चिततेत हृदयावर हात ठेवून म्हणा "ऑल इज वेल !" आणि पुढे सांगतो की हा मंत्र त्याला लहानपणी, गावातल्या वॉचमननी दिला होता. रात्री गस्त घालतांना भीती कमी व्हावी म्हणून वॉचमन तो मंत्र मोठ्यानं म्हणत असे. पण एक दिवस गावात चोरी होते! आणि मग पत्ता लागतो की वॉचमन अंध होता.

इन गॉड वी ट्रस्ट हा अंधांचा, अनिश्चितता दूर कराण्याचा, दिलासा आहे.

मराठी कथालेखक's picture

5 Jan 2017 - 12:26 pm | मराठी कथालेखक

बरोबर आहे.
ज्याला आपल्या पाठीशी कोणीतरी उभा आहे असे समजून आपल्या डोक्यावरील चिंतेचा भार कमी करता येतो, तशी गरज वाटते किंवा ते योग्य वाटतं त्यानं ते करावं.. प्रत्येकासाठी नास्तिक बनण्याचा आग्रह नाहीच.
पण अस्तिकांनी "देव माझ्यावर रागावलाय, मी देवाचा लाडका/की नाहीये" ई नकारात्मक विचार मनात येवू देवू नयेत ...किंवा "देवच काय ते बघून घेईल" अस म्हणत प्रयत्नांची कास सोडू नये.

आस्तिक व / अथवा ईश्वरवादी दर्शनान्चे ईप्सित ब्रह्मज्ञान्/मोक्ष्/निर्वाण / शून्यावस्थाप्राप्ती यापैकी एक होते. मग नस्तिक व निरीश्वरवादी अशा लोकायत दर्शनाचे ईप्सित काय होते? सांख्य दर्शन हे (आस्तिक असले तरीही) निरीश्वरवादी आहे. मग त्यात व लोकायत दर्शनात नेमका फरक काय? यावर विस्ताराने (व गरज पडल्यास फ्लो-चार्ट वगैरे वापरून) माहिती द्यावी. मला वाटते मार्कस व एस या दोघानी हे मनावर घ्यावे.

मराठी कथालेखक's picture

5 Jan 2017 - 12:45 pm | मराठी कथालेखक

नास्तिक काय किंवा अस्तिक काय.. मोक्ष वगैरे सगळ्या संकल्पना आहेत.
माझ्या मते आयुष्य हे एक टाईमपास आहे.

तुम्ही रेल्वे स्टेशनवर आलात तर तुमची गाडी येईपर्यंत तुम्ही काय करता ? टाईमपास ? मग तुम्ही पत्ते खेळा, पुस्तक वाचा , इतरांशी गप्पा मारा , मैत्री करा, भांडण करा किंवा झोप काढा..तुमची मर्जी. तुमची गाडी कधी येणार ते तुम्हाला माहित नाही. पण ती आली की तुम्हाला जावं लागेल हे तुम्हाला आणि इतरांना माहित आहे. प्रत्येकाचीच गाडी येणार आहे, पण कुणाची कधी येईल ते माहित नाही. बरं ही गाडी कुठे नेते ते ही कुणाला माहित नाही, कारण गाडीतून एकदा गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच फिरुन तिथे परत आला नाही.
आता तुम्ही गाडी येईपर्यंत पुस्तक वाचलत किंवा झोप काढलीत तर तुम्ही गाडीत बसून निघून गेल्यावर कुणी तुमची आठवण काढणार नाही. पण तुम्ही प्लॅटफॉर्मवर काही जणांशी मैत्री केलीत , मोठमोठ्याने गाणी म्हंटलीत, लोकांशी मारामारी केलीत , प्लॅटफॉर्म झाडून स्वच्छ केलात ई ई तर तुम्ही गेल्यावरही लोक तुम्हाला काही काळ लक्षात ठेवतील.

अनेक लोकांना या प्लॅटफॉर्मवरचा वेळ कसा घालवावा याची नीट समज नाही , पण तुम्ही लोकांना स्वतःच्या कृतीतून , भाषणातून प्लॅटफॉर्मवरील वेळेचा उपयोग स्वतःसाठी तसेच इतरांसाठी जास्तीत जास्त आनंद निर्माण करण्यासाठी कसा घालवावा याची शिकवण दिलीत तर कदाचित तुमचा एक पंथ तयार होईल. अपरिपक्व अशा मोठ्या समूहास तुम्ही सांगा की "बाबांनो तुम्ही प्लॅटफॉर्मवर नीट वेळ घालवलात तर आलेल्या गाडीत तुम्हाला छान सुविधा मिळतील, आणि तुम्ही नंतर अशा ठीकाणी पोहोचाल की तुम्हाला तिथे खूप खूप आनंद मिळेल आणि मग तुम्हाला इतरत्र कुठे जायची गरज राहणार नाही (मोक्ष). पण तेच तुम्ही इथे नीट वागला नाहीत तर मात्र तुम्हाला असेच एका स्टेशनवरुन दुसर्‍या स्टेशनवर प्रवास करत रहावा लागेल...प्रत्येक स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर पुन्हा पुन्हा गाडीची वाट बघत रहावं लागेल. खरतर आता या स्टेशनवर येण्यापुर्वी देखील तुम्ही दुसर्‍या स्टेशनवर वाट पहात होतात, आणि मग तुमची गाडी येवून तुम्हाला या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर सोडून गेलीय... आता तुम्हाला यातलं काही आठवत नाही ही गोष्ट वेगळी. पण माझा अभ्यास खूप आहे. मी सांगतो हे असंच आहे. तुम्ही स्टेशनमास्तरला पाहिलं नाहीये. पण विश्वास ठेवा तो अस्तित्वात आहे. तो प्रत्येकाच्या गाड्याचे वेळापत्रक बनवत आहे"

सध्या इतके पुरे :)
मकले बाबा

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2017 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या मते आयुष्य हे एक टाईमपास आहे.
अगदी हेच एका धर्माचे तत्वज्ञान आहे, त्याच्या मते गाडीचे गंतव्यस्थान हेच स्थायी जीवन आहे :) ;)

मराठी कथालेखक's picture

5 Jan 2017 - 12:53 pm | मराठी कथालेखक

कोणता धर्म ?

संजय क्षीरसागर's picture

5 Jan 2017 - 1:24 pm | संजय क्षीरसागर

बाबांनो तुम्ही प्लॅटफॉर्मवर नीट वेळ घालवलात तर आलेल्या गाडीत तुम्हाला छान सुविधा मिळतील, आणि तुम्ही नंतर अशा ठीकाणी पोहोचाल की तुम्हाला तिथे खूप खूप आनंद मिळेल आणि मग तुम्हाला इतरत्र कुठे जायची गरज राहणार नाही (मोक्ष)

मोक्ष म्हणजे डेस्टीनेशनला मजा येईल हा वादा नाही. आत्ता, इथे, रोजच्या जगण्यात मजा येईल ही ग्वाही. मृत्यू सुद्धा तुम्हाला विचलीत करणार नाही ही निश्चिंतता. कारण तुम्ही विदेह आहात, हा अनुभव.

पण तेच तुम्ही इथे नीट वागला नाहीत तर मात्र तुम्हाला असेच एका स्टेशनवरुन दुसर्‍या स्टेशनवर प्रवास करत रहावा लागेल...प्रत्येक स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर पुन्हा पुन्हा गाडीची वाट बघत रहावं लागेल. खरतर आता या स्टेशनवर येण्यापुर्वी देखील तुम्ही दुसर्‍या स्टेशनवर वाट पहात होतात, आणि मग तुमची गाडी येवून तुम्हाला या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर सोडून गेलीय... आता तुम्हाला यातलं काही आठवत नाही ही गोष्ट वेगळी. पण माझा अभ्यास खूप आहे. मी सांगतो हे असंच आहे. तुम्ही स्टेशनमास्तरला पाहिलं नाहीये. पण विश्वास ठेवा तो अस्तित्वात आहे. तो प्रत्येकाच्या गाड्याचे वेळापत्रक बनवत आहे"

ही आस्तिकांची किंवा सो कॉल्ड धार्मिकांची चलाखी आहे. स्टेशन मास्तरचा धसका घालून सगळ्यांना लाईनत ठेवण्याचा तो प्रकार आहे.

बाकी, आयुष्य हा एक टाईमपास आहे, यात वाद नाही. टाईमपास म्हणजे स्वतःच्या मर्जीनं जगणं. असा टाईमपास करायचा ऑप्शन किती जणांकडे आहे ? तो निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे मोक्ष. तो मिळवायचा मार्ग म्हणजे अध्यात्म.

मराठी कथालेखक's picture

5 Jan 2017 - 2:36 pm | मराठी कथालेखक

टाईमपास म्हणजे स्वतःच्या मर्जीनं जगणं. असा टाईमपास करायचा ऑप्शन किती जणांकडे आहे ? तो निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे मोक्ष. तो मिळवायचा मार्ग म्हणजे अध्यात्म.

मोक्ष , अध्यात्म याबाबत माझा काही मुळातून अभ्यास नाही अ..फक्त ऐकीव माहिती आहे.
पण तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे
स्वतःच्या मर्जीने जगता येणे हे धेय्य --> हे धेय्य गाठणे म्हणजेच मोक्ष --> मोक्ष मिळविण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म
मग मला वाटतंय की निरिश्वरवादाशिवाय अध्यात्म अशक्य आहे.
कारण ईश्वर असला की त्याचे नियम आले, त्याने घालून दिलेले (!!) टार्गेट्स पुर्ण करणं आलं, झालंच तर तो शेकडो CCTV cameras मधून आपल्यावर लक्ष ठेवूण असणार.. मग कुठलं आलंय स्वातंत्र्य !!

ईश्वर ही सुद्धा एक धारणाच आहे , त्यामुळे `निरिश्वरवादाशिवाय अध्यात्म अशक्य आहे', हे बरोबरे !

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2017 - 11:14 am | ज्ञानोबाचे पैजार

मागेही एकदा कुठल्यातरी धाग्यावर लिहिले होते.

प्रत्येक वेळी आस्तिक नास्तिक, निरिश्र्वरवादी असली लेबले कशाला हवी आहेत? माझ्या मते या काही परस्पर विरोधी बाजू नाहीच आहेत. ही तर इश्वराच्या शोधाच्या मार्गावरील वेगवेगळी स्टेशन्स आहेत. आजचा आस्तिक हा उद्याचा नास्तिक असणार आहे आणि नास्तिक अज्ञेयवादी होणार आहे. आणि कदाचित पुढे अजुनही काही.

ही संक्रमणे सुध्दा याच क्रमाने होतील असेही काही नाही. आजचा कट्टर नास्तिक उद्या एखाद्या देवळाच्या रांगेत सापडू शकतो.

आपल्यातला प्रत्येकजण कधि ना कधितरी या आवस्थांमधून गेलेला असतोच. या प्रत्येक आवस्थेचे स्वतःचे महत्व आहे. त्यामूळे कुठलीच अवस्था श्रेष्ठ मानण्याचे कारण नाही की कुठली कनिष्ठ मानण्याचे.

दुसर्‍याच्या अवस्थेबद्दल ना त्याला हिणवायची गरज आहे ना करुणा दाखवण्याची. किंवा स्वतःच्या एखाद्या आवस्थेबद्दल ना अभिमान बाळगायची गरज आहे ना न्युनगंड बाळगण्याची.

स्वतःची आवस्था श्रेष्ठ मानून उगाच दुसर्‍याला आपल्या आवस्थे मधे ओढायचा प्रयत्न करणे चूकीचे आहे आणि स्वतःच्या आवस्थेबद्दल न्युनगंड बाळगून उगाच कुठल्यातरी स्वयंघोषीत महात्म्याच्या चरणी लोळण घेणे सुध्दा तितकेच चुक आहे.

कोणतीच आवस्था आयुष्यभर टिकणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. आणि हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग आपल्याला सध्या आपण ज्या आवस्थेत आहोत त्या आवस्थेचा मनमुराद आनंद लुटता येईल.

पैजारबुवा,

अहो पैजारबुवा, "अन्तिम" शोधाच्या मार्गावरील वेगवेगळी स्टेशन्स आहेत असे म्हणायचे होते का तुम्हाला? कारण "इश्वराच्या" शोधाच्या मार्गावरील......" म्हटले की उत्तर डोळ्यापुढे ठेऊन गणित सोडवायला बसल्यागत वाटते. "कोणतीच आवस्था आयुष्यभर टिकणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घेतले " तरी सन्क्रमणान्चा अभ्यासही आनन्ददायी असतोच की.

अनन्त्_यात्री's picture

5 Jan 2017 - 1:57 pm | अनन्त्_यात्री

भौतिकशास्त्रात सापेक्षता सिद्धान्ताचा विकास होण्यापूर्वी प्रकाशाच्या वेगमर्यादेने घातलेले कोडे समाधानकारकरीत्या सोडविता यावे यासाठी तसेच स्थल व कालाचे विभिन्नत्व आणि त्यापैकी प्रत्येकाचे केवलत्व प्रस्थापित करता यावे यासाठी "ईथर" नामक काल्पनिक द्रव्याचा "शोध" जसा तत्कालीन भौतिक शास्त्रज्ञाना लावावा लागला ...त्याप्रमाणेच ईश्वरवादातील अनेक तार्किक त्रुटिवर मात करण्यासाठी ईश्वरवाद्याना कर्म-सिद्धान्ताचा "शोध" लावावा लागला. फरक इतकाच की सापेक्षता सिद्धान्ताचा विकास झाल्यावर ईथर गरजेअभावी भौतिक शास्त्रातून हद्दपार केले गेले, मात्र कर्म-सिद्धान्त भलताच सोयिस्कर असल्यामुळे टिकून आहे व दीर्घायुष्यीही ठरेल.

संजय क्षीरसागर's picture

5 Jan 2017 - 2:19 pm | संजय क्षीरसागर

सापेक्षता सिद्धान्ताचा विकास झाल्यावर ईथर गरजेअभावी भौतिक शास्त्रातून हद्दपार केले गेले,

याच्यावर थोडा लाईट मारु शकाल काय?

संदीप डांगे's picture

5 Jan 2017 - 7:56 pm | संदीप डांगे

चला, किमान गाण्याच्या बेचव भेंड्यांपेक्षा हे बरंय!

मी कधी आस्तिक बनू पाहतो पण जमत नाही हे थोतांड आहे असे आतून वाटत राहते

नास्तिक असण्यात मिरवण्यासारखे काही नाही आणि आस्तिक असण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. हे आयुष्याकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत जे परिस्थिती, संस्कार आणि अभ्यास यांनी घडत असतात.

प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन सुखी व्हावं यासाठी धडपडत असते. नास्तिक व्यक्ती ही धडपड करताना स्वतःवरील श्रद्धेचा आधार घेते तर आस्तिक व्यक्ती याला इतर बाह्य गोष्टींवरील श्रद्धेची जोड देते.

मार्ग कोणताही असो मात्र या मार्गावरुन चालताना आपली स्वतःकडून आणि इतरांकडून फसवणूक होऊ नये याची काळजी घेतली की झालं.

मार्कस ऑरेलियस's picture

6 Jan 2017 - 8:37 am | मार्कस ऑरेलियस

नास्तिक व्यक्ती ही धडपड करताना स्वतःवरील श्रद्धेचा आधार घेते तर आस्तिक व्यक्ती याला इतर बाह्य गोष्टींवरील श्रद्धेची जोड देते

इतका संत साहित्याचा वाचन/ अब्यास करूनही तुम्हाला ईश्वर / परमात्मा हि " बाह्य " गोष्ट वाटते ?

अरेरे।

एकदम मुक्ताईचा संवाद आठवला

इतकी 1400 वर्षे तपस्या करून चांगदेव अजून ह्या पत्रा सारखेच कोरे राहिलेत कि =))))

सतिश गावडे's picture

6 Jan 2017 - 8:52 am | सतिश गावडे

=)

ज्याच्या अस्तित्वाबाबत आस्तिकान्चीही अशी गोची होते:
.
.
चारी (वेद) श्रमले,परन्तु न बोलवे काही
साही (दर्शने) विवाद करीता, पडली प्रवाही
.
.
नास्तिक तर त्याला मुदलातच नाकारतात.

तेव्हा ह्या दुपेडी धाग्याची कताई चर्चेच्या चरख्यातून कायमच करता येईल....

गामा पैलवान's picture

7 Jan 2017 - 9:45 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

ईश्वर ही सुद्धा एक धारणाच आहे , त्यामुळे `निरिश्वरवादाशिवाय अध्यात्म अशक्य आहे', हे बरोबरे !

निरीश्वरवाद हीसुद्धा एक धारणाच आहे ना? मग ती पकडून अध्यात्म कसं बरं साधलं जाईल?

आ.न.,
-गा.पै.