अळु-वालाची आंबट गोड रसभाजी

लवंगी's picture
लवंगी in पाककृती
1 Oct 2008 - 6:33 am

आईची अजुन एक मला आवडणारी डिश ..

साहित्य - ३ वाट्या सोललेले वाल, ६-७ काड्या भाजीच अळु बारीक चिरलेल, १ बारीक चिरलेला छोटा कांदा , तेल, मीठ, गुळ, चिंच

मसाला - ४ पाकळ्या लसूण, १ काडी दालचिनी, ३ हिरव्या मिरच्या
कृती - पातेल्यात ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. कांदा शिजल्यावर अळु-वाल घालून चांगली वाफ आणावी. वाल शिजत आले की मीठ आणि वाटलेला मसाला घालावा. बोराएवढ्या चिंचेचा कोळ घालावा. थोडे पाणी घालावे. एक चांगली उकळी आणून त्यात थोडा गुळ घालावा. मंद आचेवर ५ मिनिट शिजवावे. ही भाजी आपल्या आवडी प्रमाणाने गोड तिखट आंबट करता येते. वरुन कोथिंबीर पेरावी.

प्रतिक्रिया

गणपा's picture

1 Oct 2008 - 1:41 pm | गणपा

+१
मस्त, लाळ गळतेय.. =P~

प्राजु's picture

1 Oct 2008 - 7:12 pm | प्राजु

वेगळीच भाजी आहे ही.
करून पहायल हवी..
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/