सर्वप्रथम स्पष्ट करतो की मी मोदीबाबाचा डायहार्ड फॅन आहे
८ नोव्हेम्बर ला नोटाबन्दीने मोदीपर्वाचा महत्त्वाचा अध्याय सुरु झाला . आज सोनेबन्दीने दुसरा अध्याय तर ३१ डिसेम्बर नन्तर बेनामी प्रॉपर्टी वरील कारवाईन्र तिसरा अध्याय सुरु होइल ... या शुद्धिकरण यज्ञात किती आणि कुणाच्या आहुत्या पडणार आहेत , ते येणार्या भविष्यकाळात कळेलच ...
पण देशाला आर्थिक शिस्त लावण्याच्या मोहिमेवर निघालेल्या मोदींच्या मागे खम्बीरपणे उभे राहताना जे विचारतरंग मनात निर्माण झाले , त्यांचे प्रतिबिम्ब इथे देण्याचा अल्पसा प्रयत्न करतो ...
साम्यवादाचा जागतिक पातळीवर पराभव झाला असला तरी माक्ष्या मते हा पराभव साम्यवादाचे तत्त्व चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्याने झाला आहे. पण त्यामुळे मूळ साम्यवादाची संकल्पना त्याज्ज्य ठरत नाही . साम्यवादाचा आद्य पुरस्कर्ता प्रभू श्रीरामचन्द्र असून कॄष्ण, बुद्ध ,चाणक्य हे देखील काही प्रमाणात साम्यवादाची मूलभूत तत्त्वे मानणारे होतेच .
भांडवलदारी कॅपिटलिजम मुळे जरी विकासाची सूज आल्यासारखी वाटत असली तरी हा कथित विकास सर्वांगीण व सर्वव्यापी नव्हता हे खेदाने नमूद करावेसे वाटते ....
मोदी नी आपला प्रमुख पाठीराखा असलेल्या शेठ सावकार अन अपवर्डली मोबाइल / उच्च मध्यमवर्गाशी पंगा घेत अतिसामान्य गोरगरीब माणसाला केन्द्रस्थानी ठेवून सरकार चालविण्याचे मनसुबे रचलेले आहेत असे आतापर्ञन्त्च्या वाटचाली वरून वाटते ....
नोटाबन्दी मुळे अनेक दूरगामी फायदे होणार असले तरी आज चलनतुटवडा अन रोज निघणारे नवीन आदेश यामुळे जनता वैतागली आहे हे सत्य आहे . त्यातच आता सोनेबन्दीने आणि बेनामी प्रॉपर्टी वरील कारवाईने बिथरलेला समाजघटक पाहता येणार्या काळात मोदी सरकार अशी कोणती पावले उचलेल ज्यायोगे २०१९ मध्ये ४००+ बहुमताने मोदी निवडून येतील ? याबाबत खरोखरीच मला उत्सुकता आहे ....
आपणास काय वाटते?
प्रतिक्रिया
1 Dec 2016 - 9:18 pm | मंदार कात्रे
मलाही उत्सुकता आहे ....
1 Dec 2016 - 9:18 pm | वरुण मोहिते
तुमचा नक्की आय डी काय आहे . तरी प्रतिसाद देतोय . मोदी परत जिंकणार आहेत .पण त्यानंतर हे लोकांना कळणार आहे कि कैच फरक झाला नाहीये ..तशी भारताची policy आहे जो माझा उद्धार करेल त्याला जय जय करणं. त्यामुळे दिवस मोदींचे सो जय जय .कधी इंदिरा गांधींचा कधी मोदींचा .
1 Dec 2016 - 9:22 pm | झपाटलेला फिलॉसॉफर
मी टफी , नाना , माई , विठा ,सचिन पगारे नाही ...
आपुन तो एक हीच अकेला है...मगर थोडासा हटेला है
1 Dec 2016 - 9:20 pm | संन्यस्त खड्ग
ज्जे बात
1 Dec 2016 - 9:26 pm | मोदक
येणार्या काळात मोदी सरकार अशी कोणती पावले उचलेल ज्यायोगे २०१९ मध्ये ४००+ बहुमताने मोदी निवडून येतील ?मोदी सरकार जे करायचे ते करूदे.. पण काँग्रेसने राहुल गांधीला पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान उमेदवार जाहीर केले की भाजपाच्या ३५० जागा नक्की पकडा.
1 Dec 2016 - 10:24 pm | अनंत छंदी
२०१९ मध्ये निवड्णुक होणार नाही, निवडणुका लांबणीवर जातील.
1 Dec 2016 - 10:31 pm | निओ१
मला लेखाचे नाव, सुरवात आणि त्यांची समापती याची ताळमेळ लागत नाही आहे. नेमका ईश्यु काय आहे?
1 Dec 2016 - 10:36 pm | जानु
आयला त्या केजरीवाल मुळे कोणावर भरवसाच राहिला नाही भो...आता वाटत सगऴ बरोबर होणार आणि मग जाउदे घेउ उभारी....परत आशा धरु.
2 Dec 2016 - 10:31 am | मिल्टन
याविषयी थोडे अधिक लिहू शकाल का?
2 Dec 2016 - 10:43 am | गंम्बा
हा नेहमीचाच डीफेंन्स मेकॅनिझम आहे. काही अर्थ नाही कळुन घेण्यात.
मुळात तत्वच असे होते की ते डीझाइन्ड फॉर फेल्युअर होते. मानवी मुळ स्वभावाच्या विरुद्ध. पण हे मान्य कसे करणार?
3 Dec 2016 - 6:14 pm | ओम शतानन्द
साम्यवाद म्हणजे Defective in theory and Destructive in nature असे वाचलेले स्मरते , केरळ आणि प. बंगाल च्या अनुभवावरून हे सत्य असल्याचे सिद्ध होते
5 Dec 2016 - 11:52 am | मिल्टन
सहमत आहे. ओम शतानंद यांनी म्हटले आहे :"साम्यवाद म्हणजे Defective in theory and Destructive in nature" त्याच्याशीही सहमत आहे. ही पध्दत मानवी स्वभावाच्या विरूध्द का आहे यावर २०१४ मध्ये मिपावर हा प्रतिसाद लिहिला होता. तो इथे परत एकदा चिकटवतो. त्याच प्रतिसादात सरकारचे अस्तित्व कुठे हवे हे पण लिहिले आहे.
That's the point. हा मानवी स्वभाव झाला.कोणतीही गोष्ट करताना त्यातून स्वत:ला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फायदा झाला पाहिजे ही अपेक्षा ९९.९९% लोकांची असते.समाजाचे भले व्हावे म्हणून कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करणारे लोक फार थोडे असतात हे समोर दिसतेच.अशी निस्वार्थी भावना हृदयातून आली तरच त्याचा उपयोग आहे.ही गोष्ट मारून मुटकून करायची नाही.तेव्हा नुसत्या तोंडदेखल्या समतेला काही अर्थ नाही.ती भावना हृदयापासून यायला हवी.आणि अशी भावना हृदयापासून येणारे लोक फार थोडे असतात.
एक उदाहरण म्हणून मागे फेसबुकवर साम्यवाद का यशस्वी होऊ शकत नाही याचे एक अत्यंत चपखल उदाहरण वाचले होते ते इथे देतो.एका वर्गात ४० विद्यार्थी असतात.पहिल्या परिक्षेत विद्यार्थ्यांना ४० पासून १०० पर्यंत मार्क मिळतात आणि सरासरी मार्क असतात ७०.तेव्हा सगळे विद्यार्थी आपल्याला सारखे म्हणून शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके म्हणजे ७० मार्क देतात.यातून मुळात ७० पेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी नाखूष होतात तर ७० पेक्षा कमी मार्क मिळालेले विद्यार्थी खूष होतात.दुसऱ्या परिक्षेत विद्यार्थ्यांना मार्क मिळतात ३० ते ८० आणि सरासरी असते ५०. हे का होते? पूर्वी जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण जास्त अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क कमी करून ते इतरांनाच देणार आहेत.तर कमी मार्क मिळालेल्यांना वाटते की आपण तरी अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क वाढविणार आहेतच.परत शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके ५० मार्क देतात.तिसऱ्या परिक्षेत सरासरी आणखी कमी होते आणि सगळेच विद्यार्थी नापास होतात.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की आपल्याला काहीतरी मिळावे, आपल्याकडे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी असावे असे वाटणे हा मानवी स्वभाव झाला.साम्यवादात या मानवी स्वभावाला अनुसरून नसलेली वर्तणूक अपेक्षित असते. वर दिलेल्या उदाहरणात आपण अभ्यास करूनही मार्क इतरांना मिळणार हे माहित असूनही तितकाच अभ्यास करावासा वाटणारे किती विद्यार्थी असतील?
अगदी कट्टर डाव्या विचारांमध्ये खाजगी मालमत्तेलाही विरोध असतो.सर्व काही समाजाच्याच मालकीचे असावे असे अजब तर्कट या विचारांमध्ये असते.आज माझ्या नावाने मुंबईत घर नाही म्हणून मला स्वत:ला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) ते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावासा वाटतो.का? कारण इतरांकडे जी गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही ही बोचरी जाणीव कुठेतरी असते.रेसमध्ये मागे पडलेले मला आवडणार नाही.पण साम्यवादी व्यवस्थेत कुठेतरी ही बोचरी जाणीव होणे (हा मानवी स्वभाव आहे) या प्रकारालाच कृत्रिमपणे अटकाव केलेला असतो.आणि अशी कृत्रिम पध्दत यशस्वी होऊ शकत नाही.म्हणून ही व्यवस्था लष्कर आणि हुकुमशाहीच्या बळाचा वापर करूनच टिकवावी लागते.ते बळही जिथे अपुरे पडते तिथे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही व्यवस्था कोसळते हे रशिया आणि पूर्व युरोपमध्ये आपण बघितले आहेच.
आता मानवी स्वभावाची दुसरी बाजूही लिहितो.जर unbriddled freedom मिळाले तर सशक्त वर्गाकडून अशक्त वर्गावर अन्याय होणे आणि सशक्त वर्गाला तसा तो करावासा वाटणे हा पण मानवी स्वभावच झाला.तेव्हा मी उजव्या गटातला असलो तरी सरकार या यंत्रणेची गरज मला नक्कीच मान्य आहे.तरीही सरकारने कुठे आपले अस्तित्व दाखवावे?
१. ज्या industries मध्ये खाजगीकरण करणे एक तर अयोग्य आहे (संरक्षण,पोलिस)
२. ज्या industries मध्ये खाजगीकरण करण्यासाठी लागणारे बिझनेस मॉडेल बनू शकत नाही अशा industries मध्ये.उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण.यात फायदा मिळवायचा तर फी वाढविणे आले.तसे झाल्यास फी परवडत नाही म्हणून अनेकांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आले.तेव्हा समाजाचे व्यापक हित म्हणून प्राथमिक शिक्षणात पूर्णपणे खाजगीकरण करणे योग्य नाही.
३. काही industries मध्ये त्या संस्थांना फायदा होतो त्यापेक्षा जास्त फायदा समाजाला होतो.याला अर्थशास्त्रात Positive externality म्हणतात.उदाहरणार्थ एखाद्या खाजगी कंपनीकडून रस्ता बांधून घेतला तर त्या कंपनीला त्या रस्त्यावरून मिळणाऱ्या टोलमधून उत्पन्न मिळेल.पण रस्ता बांधला म्हणून आजूबाजूच्या गावांचा तिथे जीवनावश्यक गोष्टी वेळेत पोहोचणे इत्यादी फायदा होईल.अशा परिस्थितीत अनेकदा संबंधित रस्त्याकडून मिळणारे उत्पन्न पाहिजे तितके (Return on equity: १६% किंवा अन्य काही) नसेल तर कंपन्या रस्ता बांधायला पुढे येणार नाहीत.तरीही समाजाला मिळणाऱ्या Positive Externalities चा फायदा लक्षात घेऊन सरकार त्या कंपन्यांना Viability Gap Funding करते आणि तसे करणे योग्यही आहे.
४. बॅंकिंग किंवा इतर अनेक उद्योगांमध्ये सरकार असावे असे मला तरी वाटत नाही.तरीही या सगळ्या उद्योगांमध्ये मानवी स्वभावातून कोणाची पिळवणूक होत नाही हे बघण्यासाठी सरकारी regulators असलेच पाहिजेत.उदाहरणार्थ टेलिकॉममध्ये Telecom Regulatory Authority of India आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये Securities and Exchange Board of India आहे (सहाराला सेबीने कसा चाप लावला आहे हे आपण बघतच आहोत) किंवा बॅंकिंगमध्ये RBI आहे. याचा अर्थ सरकारने सगळे उद्योग चालवावेत असे नक्कीच नाही.शक्य तिथे खाजगीकरण जरूर झालेच पाहिजे.पण लोकांची लुबाडणुक नको म्हणून असे सरकारी पण स्वायत्त regulators असलेच पाहिजेत.
शक्य तिथे खाजगीकरण झाले पाहिजे असे मी का म्हणतो?
१. एखादा उद्योग "समाजाच्या" मालकीचा आहे असे आपण म्हणतो तेव्हा "समाज" म्हणजे नक्की कोण? जर एखादा बिझनेस माझ्या मालकीचा आहे तर त्या उद्योगाच्या यशासाठी मी जीव तोडून काम करेन आणि इतरांकडून करवून घेईन.पण "समाजाच्या" मालकीच्या उद्योगात असे कोण करणार? अर्थात सरकारी कंपन्यांमध्ये कोणी कामे करत नाही असे मी नक्कीच म्हणत नाही.पण शेवटी ज्यावेळी "extra mile" जायची गोष्ट येते तेव्हा खाजगी कंपन्यांमध्ये "माझी कंपनी" म्हणून जीव तोडून काम करणारे लोक असतातच.पण आपली नोकरी सुरक्षित आहे आणि जास्त काम केले तरी तितक्या प्रमाणावर परतावा आपल्याला मिळणार नाही या दोन गोष्टी कुठेतरी सरकारी कंपन्यांना अडसर ठरतात असे माझे मत आहे.ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही. याचे वर्णन करणारे एक चपखल वाक्य आहे--Everybody's business degenerates into nobody's business.
२. वर म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत लोकांची लुबाडणुक होऊ नये हे ठरवायची जबाबदारी कोणाची?तर ती सरकारची.कारण पोलिस सरकारच्या नियंत्रणात असतात.कायद्याची अंमलबजावणी करायचे mandate पण सरकारलाच असते.तेव्हा सरकारच उद्योग चालवणार (उदाहरणार्थ बॅंका), त्यात काही वरखाली झाले तर त्याचा सरकारच तपास करणार (सरकारी बॅंकांमध्ये गैरप्रकार करून कर्जे दिली जातातच) आणि परत सरकारच पुढील कारवाई करणार यात कुठेतरी conflict of interest आहे असे मला वाटते.समजा भविष्यात कुठल्या तरी सरकारी बॅंकेत मोठा घोटाळा झाला (तसे होतच असतात. अन्यथा सरकारला वरचेवर सरकारी बॅंकांमध्ये equity का टाकावी लागते? पण काही कारणाने त्यावर जास्त चर्चा होत नाही) तर त्याची जबाबदारी कोणाची? अर्थमंत्रालयाची म्हणजेच सरकारचीच.अशा परिस्थितीत सरकार त्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करेल का हा प्रश्न विचारायला नक्कीच स्कोप आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे बिझनेस करणारे, नियंत्रण ठेवणारे, तपास करणारे आणि अंमलबजावणी करणारे लोक एकच नकोत.त्यात conflict of interest आहे.
तेव्हा मला वाटते की जिथे शक्य होईल तिथे खाजगीकरण आणि सरकारी regulators चे अस्तित्व आणि आर्थिक मंदी आल्यास किनेशिअन इकॉनॉमिक्स प्रमाणे तेवढ्यापुरता हस्तक्षेप अशा स्वरूपाचे सरकारचे अस्तित्व उद्योगांमध्ये असावे. शेवटी It is not government's business to be in business. अगदी कट्टर डावे (किंवा थोडेही डावे) नकोतच पण त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेप अजिबात नको असे म्हणणारे कट्टर उजवे (ऑस्ट्रियन इकॉनॉमिक्सवाले) पण नकोत.
2 Dec 2016 - 11:40 am | सुबोध खरे
साम्यवादाचा पराभव होणार हे निश्चित होते कारण ते आदर्शवादी स्वप्नाळू तत्वज्ञान होते परंतु साम्यवादाच्या दट्ट्यामुळे भांडवलशाहीत कामगाराभिमुख सुधारणा झाल्या हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
जेंव्हा साम्यवाद आला त्या काळात भांडवलशाही अत्यंत जाचक आणि शोषक होती.
2 Dec 2016 - 4:26 pm | मराठी कथालेखक
सोनेबंदी काय आहे ? बातमीचा दुवा असेल तर कुणी देईल का ?
2 Dec 2016 - 4:29 pm | संदीप डांगे
आयकर खात्याचा जुनाच नियम आहे, काही विशेष बदल नाही, कोणीतरी फुकट पिल्लू सोडून दिलंय, नथिंग टू वरी!
3 Dec 2016 - 7:17 pm | हतोळकरांचा प्रसाद
मला समजले त्यानुसार, धाड टाकली तर सोन्याच्या जप्तीसाठी मार्गदर्शक कायदे स्पष्ट नव्हते. म्हणून नवीन टॅक्सेशन अमेंडमेंट मध्ये काही गोष्टी नव्याने सामाविष्ट केल्या आहेत. दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी सोने असेल तर जरी स्रोत माहित नसला तरी जप्त केले जाणार नाहीत. जर मर्यादेपेक्षा जास्त असेल तर चौकशीपूर्वी जप्त केले जाऊ शकते व स्रोत सांगितल्यावर खरे खोटे केले जाईल.
3 Dec 2016 - 7:24 pm | चौकटराजा
मुळात मानवी जीवन हे दोन स्वरूपाच्या गोष्टीनी बांधलेले असते. १.अन्न वस्त्र निवारा २. करमणूक, प्रेम, कौतुक.
त्यात धर्म , संस्कृति या दुय्यम गोष्टी घुसडल्या गेल्या आहेत. अन्न वस्त्र निवारा यांचा सबंध मुळात नैसर्गिक साधनांचे उपयुक्त साधनात रूपांतर करणे यात आहे.. त्यात मग व्यवसाय आला, संपत्तीची निर्मिती आली व वाटपाची पद्धत आली. या पातळीला
भांडवलशाही किंवा समाजवाद एका दुसर्या अर्थाने व्यक्तीवाद की समाजवाद या दोन पर्यायांचा संघर्ष सुरू होतो. भांडवलशाहीचे एक तत्व असे की सर्व माणसे इश्वराने निर्माण करताना देखील भेद केला आहे सबब साम्यवाद हे एक खूळ असून त्याला कोणताही नैसर्गिक आधार नाही. साहस शक्ती, कल्पकता ,उद्यमशीलता ई गुणांमुळे एखादा माणूस दुसर्यापेक्षा अधिक श्रीमंत होत असेल तर ते बरोबरच आहे. साम्यवादाचे याला उत्तर असे असते की साहस ही केवळ भांडवली अर्थव्यवस्थेतील संज्ञ्या आहे.
सरकार जर कल्पक असेल व त्याकडे पैसा असेल तर उदद्योगपतींची गरजच काय ? कल्पकता ही समाजातही असते ती काही फक्त एखाद्याच व्यक्तीची मक्तेदारी नाही.
आपल्याला चीनच्या प्रगतीमधे वरील उहापोहाला स्थान आहे असे आढळून येईल. चीनला प्रचंड लोकसंखेचा शाप नसता तर.......
तर काय झाले असते कल्पनाच केलेली बरी. साम्यावादात सरकार कडे निर्मिती सामग्री व कल्पकता असेल तर शिस्त ही साम्यवादातच जास्त असते याचे चीन हे उदाहरण ठरावे. आज वीज पाणी व वहातुक यात चीनचे अचाट प्रगति केलेली दिसतेय.
3 Dec 2016 - 8:16 pm | झपाटलेला फिलॉसॉफर
+१
5 Dec 2016 - 11:40 am | मिल्टन
हेच अगदी उलट पध्दतीनेही म्हणता येईल. जर कोणी कल्पक असेल आणि अशा व्यक्तीला पैशाची जोडणी करता येणे शक्य झाले तर सरकारची गरजच काय?
गेल्या काही वर्षातील आपले जीवनमान पूर्णपणे बदलणारे शोध कोणते होते? अर्थातच संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन, जी.पी.एस हे आताच्या काळातले तर विमाने, गाड्या, टेलिफोन हे त्यापूर्वीच्या काळातील शोध होते. यापैकी इंटरनेट, जीपीएस इत्यादी शोधांची सुरवात अमेरिकन संरक्षणविभागाच्या गरजांमुळे झाली ही सत्य परिस्थिती आहे. पण नंतरच्या काळात या तंत्रज्ञानाचा जितका विकास झाला किंबहुना अगदी चेहरामोहराच बदलून गेला त्यात सरकारचा वाटा किती? आणि जी काही प्रगती झाली त्यात आपलाही काहीतरी फायदा होईल हा हेतू त्यावर काम करणार्यांचा नव्हता का? आज गुगलमुळे आपले जीवनमान अगदी पूर्णच बदलून गेले आहे.पण सर्च इंजिन आणि मग त्याबरोबर इतर अनेक गोष्टी जोडून त्यातून बिझनेस मॉडेल बनविण्यावरच बंदी असती तर लॅरी पेज आणि सर्जी ब्रिनला गुगल ही मोठी कंपनी बनवायचा नक्की कोणता इन्सेन्टिव्ह राहिला असता? सरकारला जेवढे श्रेय देणे आहे तितके दिलेच पाहिजे.पण सरकार असताना उद्योगपतींची गरजच काय हे बोलणे नक्कीच अतिशयोक्तीपूर्ण झाले.
आमच्या फ्रिडमन साहेबांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे. राईट बंधूंचे विमानावर प्रयत्न सुरू होते त्याचवेळी अमेरिकन सरकारने कुणा एकाला (नाव विसरलो) विमानाच्या शोधावर काम करायला पैसे दिले होते.आणि अर्थातच त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. त्यावर फ्रिडमन साहेब म्हणतात की जर अपयश आले तर आपले पैसे बुडतील, आपले नुकसान होईल अशी भिती असेल तर माणूस अगदी झोकून देऊन काम करू शकतो. पण जर अपयश आले तर नुकसान अन्य कोणाचे अशी परिस्थिती असेल तर सामान्य माणसाला तितके झोकून देऊन काम करायचा इन्सेन्टिव्ह राहात नाही आणि त्यातून ही परिस्थिती येते. यात मुद्दामून सामान्य माणूस हे लिहिले आहे. कलाम साहेब, मंगळयानावर काम करणारे शास्त्रज्ञ इत्यादी निस्वार्थीपणे काम करणारे लोक असतातच. पण एकूण लोकसंख्येचा विचार करता स्वतःला काहीच नको जे काही करायचे ते इतरांसाठी (किंवा शास्त्राच्या विकासासाठी) असे मनापासून वाटणारे लोक आणि प्रत्यक्ष तसे करणारे लोक त्यामानाने बरेच थोडे असतात. तो व्हिडिओ मिळाल्यावर इथे देतोच.
मिल्टन फ्रिडमन साहेबांनी एका भाषणात म्हटलेले इथे देतो:
"Well first of all, tell me: Is there some society you know that doesn’t run on greed? You think Russia doesn’t run on greed? You think China doesn’t run on greed? What is greed? Of course, none of us are greedy, it’s only the other fellow who’s greedy. The world runs on individuals pursuing their separate interests. The great achievements of civilization have not come from government bureaus. Einstein didn’t construct his theory under order from a bureaucrat. Henry Ford didn’t revolutionize the automobile industry that way. In the only cases in which the masses have escaped from the kind of grinding poverty you’re talking about, the only cases in recorded history, are where they have had capitalism and largely free trade. If you want to know where the masses are worse off, worst off, it’s exactly in the kinds of societies that depart from that. So that the record of history is absolutely crystal clear, that there is no alternative way so far discovered of improving the lot of the ordinary people that can hold a candle to the productive activities that are unleashed by the free-enterprise system."
5 Dec 2016 - 11:43 am | मिल्टन
यात एक महत्वाची गोष्ट विसरलात का? म्हणजे सरकारच्या हातात दांडुका असेल आणि कोणालाही कधीही रट्टा घातला, तुरूंगात टाकले, गुलागमध्ये पाठविले तरी त्याला जाब विचारणारा कोणी नसेल तर लोकांमध्ये शिस्त गपगुमान येणारच. काय म्हणता?