सर्वप्रथम स्पष्ट करतो की मी मोदीबाबाचा डायहार्ड फॅन आहे
८ नोव्हेम्बर ला नोटाबन्दीने मोदीपर्वाचा महत्त्वाचा अध्याय सुरु झाला . आज सोनेबन्दीने दुसरा अध्याय तर ३१ डिसेम्बर नन्तर बेनामी प्रॉपर्टी वरील कारवाईन्र तिसरा अध्याय सुरु होइल ... या शुद्धिकरण यज्ञात किती आणि कुणाच्या आहुत्या पडणार आहेत , ते येणार्या भविष्यकाळात कळेलच ...
पण देशाला आर्थिक शिस्त लावण्याच्या मोहिमेवर निघालेल्या मोदींच्या मागे खम्बीरपणे उभे राहताना जे विचारतरंग मनात निर्माण झाले , त्यांचे प्रतिबिम्ब इथे देण्याचा अल्पसा प्रयत्न करतो ...
साम्यवादाचा जागतिक पातळीवर पराभव झाला असला तरी माक्ष्या मते हा पराभव साम्यवादाचे तत्त्व चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्याने झाला आहे. पण त्यामुळे मूळ साम्यवादाची संकल्पना त्याज्ज्य ठरत नाही . साम्यवादाचा आद्य पुरस्कर्ता प्रभू श्रीरामचन्द्र असून कॄष्ण, बुद्ध ,चाणक्य हे देखील काही प्रमाणात साम्यवादाची मूलभूत तत्त्वे मानणारे होतेच .
भांडवलदारी कॅपिटलिजम मुळे जरी विकासाची सूज आल्यासारखी वाटत असली तरी हा कथित विकास सर्वांगीण व सर्वव्यापी नव्हता हे खेदाने नमूद करावेसे वाटते ....
मोदी नी आपला प्रमुख पाठीराखा असलेल्या शेठ सावकार अन अपवर्डली मोबाइल / उच्च मध्यमवर्गाशी पंगा घेत अतिसामान्य गोरगरीब माणसाला केन्द्रस्थानी ठेवून सरकार चालविण्याचे मनसुबे रचलेले आहेत असे आतापर्ञन्त्च्या वाटचाली वरून वाटते ....
नोटाबन्दी मुळे अनेक दूरगामी फायदे होणार असले तरी आज चलनतुटवडा अन रोज निघणारे नवीन आदेश यामुळे जनता वैतागली आहे हे सत्य आहे . त्यातच आता सोनेबन्दीने आणि बेनामी प्रॉपर्टी वरील कारवाईने बिथरलेला समाजघटक पाहता येणार्या काळात मोदी सरकार अशी कोणती पावले उचलेल ज्यायोगे २०१९ मध्ये ४००+ बहुमताने मोदी निवडून येतील ? याबाबत खरोखरीच मला उत्सुकता आहे ....
आपणास काय वाटते?
वाचन संख्या
4115
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मलाही उत्सुकता आहे ....
मला नाही माहिती
तुमचा नक्की आय डी काय आहे
In reply to मला नाही माहिती by वरुण मोहिते
मोदी सरकार अशी कोणती पावले
येणार्या काळात मोदी सरकार
येणार्या काळात मोदी सरकार अशी कोणती पावले उचलेल ज्यायोगे २०१९ मध्ये ४००+ बहुमताने मोदी निवडून येतील ?मोदी सरकार जे करायचे ते करूदे.. पण काँग्रेसने राहुल गांधीला पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान उमेदवार जाहीर केले की भाजपाच्या ३५० जागा नक्की पकडा.२०१९ मध्ये
मला लेखाचे नाव, सुरवात आणि
आयला त्या केजरीवाल मुळे
याविषयी थोडे अधिक लिहू शकाल का?
हा नेहमीचाच डीफेंन्स मेकॅनिझम
In reply to याविषयी थोडे अधिक लिहू शकाल का? by मिल्टन
साम्यवाद म्हणजे Defective in
In reply to हा नेहमीचाच डीफेंन्स मेकॅनिझम by गंम्बा
जुना प्रतिसाद कॉपी-पेस्ट
In reply to हा नेहमीचाच डीफेंन्स मेकॅनिझम by गंम्बा
साम्यवादाचा पराभव होणार हे
सोनेबंदी काय आहे ? बातमीचा
आयकर खात्याचा जुनाच नियम आहे,
In reply to सोनेबंदी काय आहे ? बातमीचा by मराठी कथालेखक
मला समजले त्यानुसार, धाड
In reply to सोनेबंदी काय आहे ? बातमीचा by मराठी कथालेखक
साम्यवाद...... ?
साम्यावादात सरकार कडे
In reply to साम्यवाद...... ? by चौकटराजा
काहीसे अतिशयोक्तीपूर्ण
In reply to साम्यवाद...... ? by चौकटराजा
महत्वाची गोष्ट विसरलात?
In reply to साम्यवाद...... ? by चौकटराजा