मुंबईतील सर्वांत चांगल्या शाळा (महाराष्ट्र बोर्ड)

साहना's picture
साहना in काथ्याकूट
27 Oct 2016 - 12:28 pm
गाभा: 

मुंबईतील सर्वांत चांगल्या शाळांचे लिस्ट आले आहे आणि एका मित्राने फोटो काढून पाठवला. २० पैकी १७ शाळा धार्मिक अल्पसंख्यांक शाळा असून २ भाषिक अल्पसंख्यांक आहेत. १९ शाळा "शिक्षणाचा अधिकार कायदा" पासून मुक्त आहेत. बहुतेक शाळा अनुदानित असून बहुतांशी सरकारी पैशावर चालतात पण बहुतेक सरकारी कायदे ह्यांना लागू होत नाहीत. राहिली एक शाळा महिंद्रा अकादमी. सादर शाळा महिंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी निर्माण केली होती पण "शिक्षणाचा कायदा" अंतर्गत त्यांना अश्या प्रकारच्या ऍडमिशनची परवानगी नसल्याने शाळेचा मूळ उद्धेश धोक्यांत आला होता. महिंद्रा अकादमीने काही बाही कारण काढून RTE इम्पलिमेन्ट करायला टाळाटाळ केल्याने त्यांना सध्या नोटीस लागू झाली आहे.

Image

प्रतिक्रिया

नमकिन's picture

28 Oct 2016 - 9:14 am | नमकिन

कायदे बनवताना मुद्दाम ठेवल्या जातात असे निरीक्षण आहे
फक्त इंग्रजी माध्यमाचाच विचार केलेला दिसतोय सूचीत.
मराठी माध्यम कायद्यात काहीच पळवाट काढू शकत नाहीं असे स्पष्ट रूप अधिक सूची पुरवा म्हणजे मराठी शाळा का कमी होत आहेत ते पण ठळकपणे स्पष्ट होईल