ओशो...... कुछ तो गडबड है!

वैभव पवार's picture
वैभव पवार in काथ्याकूट
15 Oct 2016 - 3:39 pm
गाभा: 

बऱ्याच दिवसांपूर्वी ओशो नावाचा व्यक्ती माझ्या वाचनात आला. मी वाचत गेलो . विचार क्रांतिकारी वाटले . पण नंतर नंतर ते पोस्ट आणि ते ऑडिओ, विडिओ खूपच भन्ड (गप्पा) वाटायला लागले. ओशो अतिशय कलात्मक, मनोरंजनात्मक पद्धतीने प्रवचन देतो. पण त्याच्या चारित्र्य वर नेहिमी शंका येते. इथं कुणी नवसंन्यासी असेल तर खर काय खोट काय ते सांगा.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

15 Oct 2016 - 3:42 pm | श्रीगुरुजी

ओशो ही वाचण्याची नसून अनुभवण्याची गोष्ट आहे.

..)

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 4:33 pm | वैभव पवार

मी तर वाचुन बसलो , आता काय करावं!

अभ्या..'s picture

15 Oct 2016 - 4:38 pm | अभ्या..

मी तर वाचुन बसलो

उठण्यासाठी आता दुसरेच तत्वज्ञान हुडकावे लागेल. ;)

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 4:44 pm | वैभव पवार

???

अभ्या..'s picture

15 Oct 2016 - 4:47 pm | अभ्या..

ऊत्तिष्ठ, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत.

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 4:50 pm | वैभव पवार

?

अभ्या..'s picture

15 Oct 2016 - 4:53 pm | अभ्या..

सोयरे, शन्वार हाय आज, सांज्च्याला पार्टी हाय. मिटवूनच टाकू हे तत्वज्ञानाचा खटका.
काय म्हणता?

आरारारा...!!!

(इफ यु मीन्ट व्हाट आय अंडरस्टूड!)

अभ्या..'s picture

15 Oct 2016 - 5:06 pm | अभ्या..

ओह्ह्ह्ह, शो??

तुषार काळभोर's picture

15 Oct 2016 - 5:10 pm | तुषार काळभोर

ऊप्स!!

थोडा उशीर झाला राव वैभवराव तुम्हाला.
मिपाओशो पण नाहीत आपल्यात आता :(

महासंग्राम's picture

15 Oct 2016 - 3:57 pm | महासंग्राम

यकु ना ???

अनुप ढेरे's picture

16 Oct 2016 - 12:32 pm | अनुप ढेरे

नाही.

@अभ्या: काळ हा भासमान असतो. त्यामुळे उशीर वगैरे सगळं झूट असतं.

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 4:48 pm | वैभव पवार

चालायचच .... म्हणजे ओशो कॅरेक्चरलेस होताच!

टवाळ कार्टा's picture

15 Oct 2016 - 3:45 pm | टवाळ कार्टा

नवसंन्याशी माहीत नाही पण इथे एक आतबाहेर करणारे संन्यासी आहेत

विशुमित's picture

15 Oct 2016 - 4:07 pm | विशुमित

हा हा हा ...

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 4:52 pm | वैभव पवार

ननविनच प्रकार दिसतो हा.

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 4:56 pm | वैभव पवार

ननविनच प्रकार दिसतो हा.

संदीप डांगे's picture

15 Oct 2016 - 4:21 pm | संदीप डांगे

काय बोललं त्यापेक्षा कोण बोललं हे जोवर महत्वाचं असणार तोवर असेच लेख येणार,

काहीच आश्चर्य नाही! आणे दो!

पैसा's picture

15 Oct 2016 - 4:56 pm | पैसा

लोकांना व्हॉट्स अ‍ॅपवर बोलावता बोलावता व्हॉट्स अ‍ॅप छाप पोस्ट्स पण मिपावर यायला लागल्या का!

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 5:34 pm | वैभव पवार

संपादित.

कृपया व्यक्तिगत हल्ले टाळावेत.
-संपादक मंडळ

वैभव पवार's picture

16 Oct 2016 - 3:26 pm | वैभव पवार

ओके

मनिमौ's picture

15 Oct 2016 - 8:26 pm | मनिमौ

गेट वेल सुन

चित्रगुप्त's picture

15 Oct 2016 - 9:36 pm | चित्रगुप्त

नवसंन्यासी तर ठाऊक नाही पण हल्ली नवजिल्बीपाडूमिपाकर बरेच आढळू लागलेत.
.

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 10:12 pm | वैभव पवार

त्यांच्याशी मला काय घेण- देणं

कवितानागेश's picture

15 Oct 2016 - 10:00 pm | कवितानागेश

संपूकाका कुठे गेले?

जयन्त बा शिम्पि's picture

16 Oct 2016 - 12:25 am | जयन्त बा शिम्पि

ओशो ची नेमकी कोणती पुस्तके वाचलीत ? त्यातला कुठला भाग अतिरंजीत वाटला वा ' तुमच्या ' विचारांशी जुळला नाही ? तुम्हाला ओशो च्या चरित्राविषयी शंका आहे की त्यांच्या प्रवचनातील विचारांबाबत ? नीट खुलासा केला तर ज्यांना योग्य वाटेल त्यांना प्रतिसाद देणे सोयीचे होईल असे वाटते.

संदीप डांगे's picture

16 Oct 2016 - 12:55 am | संदीप डांगे

त्यांनी ठरवून टाकलं ना एकदा, ओशो चरित्रहीन. विषय संपला. :)

वैभव पवार's picture

16 Oct 2016 - 3:42 pm | वैभव पवार

स्तस्ोत :- न्यज चॅनल व काहि पर्सनल ब्लाॅग.
जिथे माझ्या वाचनात आणि ऐकण्यात असं आलं की, ओशोने हा सगळा धंन्दा मांडला होता . वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार व जिवन कथा रंजक करुन सांगायच्या आणि लोकाना भ्रमित करायच.म्हणे त्याचा स्टेज सेट करताना सुध्दा सायकाॅलोजिचा वापर केला जात होता. आणि संगिताची निवडही आशा पध्दतीची असायची की लोक संमोहीत होतील।
एका परदेशी बाईला ओशो रुम मधे घेवुन गेला होत तेव्हा तीने फडाफड ओशो मारलं होतं।
आणि एका जादुगाराने ही पोल खोल केली आहे म्हने कसा प्रकारे ओशोने सत्यसाई ला एक्सपोज करण्यासाठी एक प्रोग्राम बनवला होता. आणि कशी त्याची बिझनेस डिल फिसकटली होती। माझ्या कडे देण्यासाठी लिंक नही। पण लवकरच मी शोधुन इथेदेईल।

सानझरी's picture

16 Oct 2016 - 4:41 pm | सानझरी

नका देऊ हो लिंक.. ओशोंची पुस्तकं वाचण्याचे कष्ट करत नाही म्हणता तर लिंक शोधायला कशाला कष्ट. .
मीच सांगते.. Bhagwan the god who failed, Hugh Milne हे पुस्तक वाचा आणि ओशोला यथेच्छ शिव्या घाला.. Amazon.in वर 9 हजाराला हे पुस्तक उपलब्ध आहे.. हाकानाका..

सानझरी's picture

16 Oct 2016 - 4:44 pm | सानझरी

नका देऊ हो लिंक.. ओशोंची पुस्तकं वाचण्याचे कष्ट करत नाही म्हणता तर लिंक शोधायला कशाला कष्ट. .
मीच सांगते.. Bhagwan the god who failed, Hugh Milne हे पुस्तक वाचा आणि ओशोला यथेच्छ शिव्या घाला.. Amazon.in वर 9 हजाराला हे पुस्तक उपलब्ध आहे.. हाकानाका..

(खाली सही टाकायची राहीली)

- ओशोफॅन सानझरी

मारवा's picture

16 Oct 2016 - 5:05 pm | मारवा

अहो इतका खर्च का करावा ? इतके कष्ट तरी का घ्यावेत ?
शिव्याच द्यायच्या तर असेही देता येतातच की.
खरी मजा ओशोला डिकोड करण्यात आहे. अ‍ॅनालिसीस करण्यात आहे. एक्सप्लोअर करण्यात, खरे आव्हान त्यात आहे. (अर्थातच सेक्स आणि चरित्र वगळुन त्याविषयी न्युट्रल राहुन )
उदा. ओशोची एक्स्ट्रॉऑर्डीनरी कन्सीस्टन्सी, डेरींग हे पैलु.
किंवा त्यांनी केलेला जे कृष्णमुर्तीचा ब्रिलीयंट क्रिटीसीझम ( लगेज हॅज अराइव्ह्ड.... वाला )
त्यांचा अभुतपुर्व व्यासंग त्यांची लायब्ररी त्यांचे ग्रंथप्रेम त्यांच्या सिग्नेचर्स त्यांचा कलासक्तपणा. ओशो कम्युन चे डिझाइन इ.
त्यांच्या मेडिटेशनच्या उजेडात आणलेल्या शेकडो जुन्या पद्धती, कंटेपररी मॉडर्न लाइफस्टाइल चे भान ठेऊन सादर केलेल्या नव्या मेडिटेशन टेक्नीक्स.
त्यांच्या विविध आध्यात्मिक व्यक्तींवर त्यांच्या तत्वज्ञानावर केलेले विलक्षण भाष्य त्याची अफाट रेंज.
त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर , अराजकतावाद कितीतरी बाबी
फार इंटरेस्टींग माणुस सेक्स वगळुनही कितीतरी बाबी शिल्लक राहतात.
अन धुवायचच असेल तर एक कमी खर्चाचा मार्गही आहेच ना आपला जर्मन बेकरी जवळ उपलब्ध असे पुर्वी सचित्र अलबम सध्याच माहीत नाही.
असो.

सानझरी's picture

16 Oct 2016 - 5:26 pm | सानझरी

अहो sarcastically लिहीलंय हो मी ते.. मीही ओशोंची जबरदस्त फॅन आहे.. ओशोंची अनेक पुस्तकं वाचल्यावर निव्वळ कुतूहल म्हणून हे पुस्तक वाचलं आणि कपाटात सगळ्यात मागे ठेऊन दिलं. हे पुस्तक वाचूनही ओशों बद्दल आदर तसूभरही कमी झाला नाही.. ओशोंची सगळी पुस्तकं वाचण्यासाठी आयुष्य कमी पडणार..
ज्यांना टीकाच करायचीये त्यांना करू देत, आपलं काय जातंय.. आपण फकस्त 'अरेरे' म्हणू शकतो..

चित्रगुप्त's picture

16 Oct 2016 - 2:42 am | चित्रगुप्त

पण त्याच्या चारित्र्य वर नेहिमी शंका येते.

अमूक एकाचे चारित्र्य म्हणजे काय आणि त्याविशयी शंका येणे म्हणजे काय, हे धागाकर्त्याने जरा इसकटून सांगितले पाहिजे. ओशोंविषयी अशी कोणती माहिती, कोणत्या स्त्रोताद्वारे मिळाल्याने शंका येत आहे, हेही विशद करावे.

ओशो विषय गहन आहे. मात्र धागा लेखकाने त्यावर काहीच न लिहीता सरळ चारित्र्याला हात घातला.
समजा आहे ओशो चरीत्रहीन समजु या घटका भर आणि ठेऊ बाजुला.
तरीही तो मच मोअर दॅन दॅट आहे ना हो वैभव साहेब.
म्हणजे विषय वैभवशाली घेतला पण..... असो.
तर मला ओशो एक माणुस म्हणुन आवडतो बुवा फार. व्हेरी इंटरेस्टींग कॅरेक्टर रीअली ( कॅरेक्टर असो वा नसो त्याच्याशी फारसा मतलब नाही )

जयन्त बा शिम्पि's picture

16 Oct 2016 - 5:57 pm | जयन्त बा शिम्पि

ओशोंची " गीता प्रवचने " वाचलीत तरी, पुरेसे आहे. " आलं ज्ञानाचं तुफान " आणि अशी बरीच पुस्तके आहेत, ज्यात सेक्सचा काही संबंध नाही, परंतु त्यातला विचार, जेव्हढा ओशोंनी केला, तेव्हढा तर समजावून घेण्याचा प्रयत्न करा.
पण जेथे " नावडतीचे मीठ अळणीच असते " तेथे काय बोलावे ? ओशोच्या सेक्स संबंधी वाचायचा कोणी आग्रह तर करीत नाहीना ? पण मग " पहिला दगड त्यानेच मारावा, ज्याने आयुष्यात कधी ......... " अशी येशु ख्रिस्ताची गोष्ट आठवते. आणि ओशो काय आहे वा ओशोंचे विचार समजुन घेण्यासाठी, ओशोंचे भक्तच असायला हवे अशीही काही सक्ती नाही.