साधा माणुस

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
27 Sep 2008 - 10:39 am

साधा माणुस

हे बरं आहे कि लोकं मला साधा म्हणतात
साधे असण्याचे बरेच फायदे असतात
मी मुद्दामुनच साधा रहातो
येडा बनुन बरेच पेढे खातो
आहो लोकं माझ्या साध्या बोलण्याला फसतात
माझ्या बेशरम कबुलीला ते प्रांजळपणा म्हणतात
मी स्वत:वरच टीका करतो
लोकं म्हणतात किती प्रामाणिक
आहो सांगुन फसवता येतं
काय पाहिजे आणिक..?
लबाडांचे पाय घेउन
मी साधेपणाने वावरतो
लबाडांच्या दुनियेत
मी असाच रहातो
मी असा रहातो
म्हणुन पोट भरतो
तुम्हिही भरा
नाहीतर मरा

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 5:42 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

आपला,
(साधा!) तात्या.

चतुरंग's picture

27 Sep 2008 - 7:49 pm | चतुरंग

(चतुर साधा) ;)
चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2008 - 7:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहिलं आहेत

(साधीसरळ) अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2008 - 8:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

15. झकास :)

-दिलीप बिरुटे
(साधा भोळा )

प्राजु's picture

27 Sep 2008 - 8:17 pm | प्राजु

साधे पणा मस्त आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

27 Sep 2008 - 9:04 pm | ऋषिकेश

:) एकदम भारी.. रचना आवडली
-(लबाड) ऋषिकेश

शितल's picture

27 Sep 2008 - 10:23 pm | शितल

साधे पणातील लबाड पणा आवडला :)

यशोधरा's picture

28 Sep 2008 - 10:04 am | यशोधरा

:)