मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्य - स्टफ्फ्ड पिस्ता मोदक

सानिकास्वप्निल · · लेखमाला
बाप्पाचा नैवेद्यः स्टफ्ड पिस्ता मोदक . साहित्यः २०० ग्राम खवा किसून १/२ वाटी + थोडीच जास्तं पिठीसाखर पिस्त्यांची पूड आवडीप्रमाणे प्रमाण घ्यावे १ चमचा वेलचीपूड चांदीचा वर्ख सजावटीसाठी . पाकृ: नॉन-स्टिक कढईत खवा मंद आचेवर परतायला घ्या. हळू-हळू खवा मऊ होऊ लागेल. त्यात आता पिठीसाखर मिसळा. पिठीसाखरेमुळे मिश्रण आधी पातळ होईल. (तुम्हाला हवे असल्यास या पायरीला यात केशरमिश्रीत दूध घालावे) सतत परतत राहावे, हळू-हळू खव्याचे मिश्रण गोळा होऊ लागेल तसा गॅस बंद करावा. मिश्रण एका ताटात काढून जरा थंड होऊ द्यावे. हाताला सोसवेल इतके थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिक्स करावी. . खव्याच्या मिश्रणातला १/४ भाग वेगळा काढून त्यात पिस्तापूड मिक्स करावी व त्याचे लहान-लहान गोळे करावे. आता पेढे-मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यात साध्या खव्याचा छोटा गोळा घ्यावा व त्यात पिस्त्याचा गोळा ठेवून मोदकाचा आकार ध्यावा. तयार मोदकावर चांदीचा वर्ख लावून सजवावे. . बाप्पाला नैवेद्य दाखवून खावे :) . .

वाचने 11435 वाचनखूण प्रतिक्रिया 22

अभिजीत अवलिया 15/09/2016 - 07:50
मस्त आहेत मोदक. बाकी रेसिपीच्या नावावरून ती तुमची आहे का सानिकास्वप्निल ह्यांची हे कळले नाही.

कविता१९७८ 15/09/2016 - 08:58
साने कुणालाही हेवा वाटावा अशी तु सुगरण आहेस , इतके असुनही स्वत:च्या कौशल्याचा कुठेही गाजावाजा नाही. अशी सुगरण आमची मैत्रिण आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अतिशय चविष्ट नैवेद्य , बाप्पालाही पाहातच राहावेसे वाटले असेल या नैवेद्याकडे.

भुमी 15/09/2016 - 10:38
किती सुंदर ,सुबक आणि सोपी पाककृती..

स्वाती दिनेश 15/09/2016 - 12:12
मोदक फार म्हणजे फारच भारी झाले आहेत. बाप्पा घरी जाताना घेऊन जाणार हे तिकडे कैलासावर वाटायला, :) स्वाती

इरसाल 15/09/2016 - 17:01
"अखिल मिपारतीय मिपाकरीण लाळ गाळु " योजने अंतर्गत बनवलेल्या रेसीपी मुळे लाळग्रंथी सुकायला आल्यात.

सस्नेह 16/09/2016 - 10:17
असा लडिवाळ नैवेद्य मिळाल्यावर बाप्पा प्रसन्न होणार यात वादच नाही !

दिपक.कुवेत 16/09/2016 - 12:36
ह्यात तिळमात्र शंका नाहिच. अतिशय तोंपासू. पण एखाद दोन मोदक मधोमध उभे कापून हलके उघडे (हे नक्कि कसं म्हणू समजत नाहिये) ठेवले असते तर फोटो अधिक आकर्षक झाला असता.....अर्थात हे आपलं माझं मत.