बाप्पाचा नैवेद्यः स्टफ्ड पिस्ता मोदक
साहित्यः
२०० ग्राम खवा किसून
१/२ वाटी + थोडीच जास्तं पिठीसाखर
पिस्त्यांची पूड आवडीप्रमाणे प्रमाण घ्यावे
१ चमचा वेलचीपूड
चांदीचा वर्ख सजावटीसाठी
पाकृ:
नॉन-स्टिक कढईत खवा मंद आचेवर परतायला घ्या.
हळू-हळू खवा मऊ होऊ लागेल.
त्यात आता पिठीसाखर मिसळा. पिठीसाखरेमुळे मिश्रण आधी पातळ होईल. (तुम्हाला हवे असल्यास या पायरीला यात केशरमिश्रीत दूध घालावे)
सतत परतत राहावे, हळू-हळू खव्याचे मिश्रण गोळा होऊ लागेल तसा गॅस बंद करावा.
मिश्रण एका ताटात काढून जरा थंड होऊ द्यावे.
हाताला सोसवेल इतके थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिक्स करावी.
खव्याच्या मिश्रणातला १/४ भाग वेगळा काढून त्यात पिस्तापूड मिक्स करावी व त्याचे लहान-लहान गोळे करावे.
आता पेढे-मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यात साध्या खव्याचा छोटा गोळा घ्यावा व त्यात पिस्त्याचा गोळा ठेवून मोदकाचा आकार ध्यावा.
तयार मोदकावर चांदीचा वर्ख लावून सजवावे.
बाप्पाला नैवेद्य दाखवून खावे :)

वाचने
11466
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आहेत मोदक.
अप्रतिम देखणी रेसिपी.बाप्पा
सानिका,तुझ्या पाककौशल्याला
साने कुणालाही हेवा वाटावा अशी
अशी सुगरण आमची मैत्रिण आहे
In reply to साने कुणालाही हेवा वाटावा अशी by कविता१९७८
सुरेख दिसत आहेत मोदक.
सुबक झालेत मोदक!
अग काय कहर आहेस तु , लोवे यु
सुरेख देखणी रेसिपी
आहाहा
क्लास!!!
क्लास..
खुप सुंदर मोदक सानि. फोटो
णॉक औट पञ्च आहे ही पाकृ!
ओहो
सुरेख दिसतायत मोदक!
मस्त मोदक!छानच दिसताहेत.
सुंदर दिसत आहेत मोदक!
मस्तच गं , अगदी तोपसू आहेत
वाह !
मोदक अप्रतिम आणि देखणे झालेत
माझ्या मनात
In reply to मोदक अप्रतिम आणि देखणे झालेत by दिपक.कुवेत