देवळांचे अर्थकारण - भावना आणि तर्क

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
10 Sep 2016 - 7:52 pm
गाभा: 

प्रेषक- स्वामी विश्वरूपानंद |
लेखकाच्या पूर्वानुमतीने पुनर्प्रकाशित

भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.
मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.
भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात
आणि त्या भावना जर चांगल्या शब्दांत गुडाळलेल्या असतील तर आपण फारसा विचार न करता त्या लगेच घेतो.
*म्हणूनच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेले संदेश हे भावनेला हात घालणारे असतात आणि अनेकदा तर्कहीन असतात*.
*हिंदूंचे सण जवळ आले की भावनांनी ओथंबलेले संदेश व्हायरल होतात*.
*होळी, दिवाळी हे कॉमन*.
आता त्या पाठोपाठ *गणपती हा सण भावनेने ओथंबलेल्या संदेशांच्या पंगतीला आला आहे*.
महाराष्ट्रातील *सकल प्रदूषणाचा कर्ता एकटा गणपती बाप्पा आहे*, हे आपण मनावर ठासून घेत आहोतच.
आता त्यापाठोपाठ *एक गाव एक गणपती, गणपतीला फुलं मिठाई नको, लालबागचा राजाच नवसाला पावतो का*?
*खरं तर कोणताच गणपती नवसाला पावत नाही वगैरे वगैरे संदेश यायला लागले आहेत*.
गणपतीच्या अनुषंघाने एका मेसेजमध्ये *भारतातील देवळांच्या आणि देवांच्या कमाईवर सवाल* उठवला आहे.
तर प्रश्न चांगला आहे, लोकशाहीत अश्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळायलाच हवं.
प्रश्नकर्त्यांचा अधिकारच आहे तो. ह्यालाच लागून आलेला उपप्रश्न म्हणजे
*देवळांना पैसे द्यावेच का*?
तो पैसा भारतातील *गोर गरीब जनतेला, अडल्या नडल्यांना* देता येऊ शकत नाही का?
*अनेक संसार त्यात सावरले जाऊ शकतात* वगैरे वगैरे !
उद्देश चांगला आहे, असा आलेला मेसेजही भावनेच्या पाकात घोळवून काढलेला असल्यामुळे आकर्षक आहे.
पण म्हंटलं ना कि भावना आणि लॉजिक्स हि एकमेकांसोबत कधी जात नाहीत. इथेही तेच झालंय.
ज्या चांगल्या भावनेने आपण गणपतीच्या देणगीचा प्रश्न उचललाय त्याच चांगल्या भावनेने
भारतातल्या *आपल्या सर्वांच्या आवडत्या तीन गोष्टींच्या आर्थिक व्यापाकडे बघुयात* !
ह्यातली आपल्या सर्वांची पहिली आवडती गोष्ट म्हणजे ' *चित्रपट* ',
दुसरा नवीन लागलेला छंद म्हणजे ' *आय पी एल* '
आणि तिसरी जिव्हाळ्याची पूर्वापार चालत आलेली गोष्ट म्हणजे
' *मद्य अथवा दारू* '...
फिल्म फ्रॅटर्निटी वगैरे म्हणतात त्या चित्रपट सृष्टीने २०१५ साली १४०० करोडपेक्षा जास्त धंदा केला होता.
ह्यावर्षी सप्टेंबर पर्यंत १४०० करोडच्या आसपास धंदा केला आहे.
एकट्या 'सुलतान' चित्रपटाची कमाई ३५० कोटी रुपये आहे.
ह्या सर्वात साऊथ इंडियाचा एकही पिक्चर नाही,
'कबाली' हा ब्लॉकबस्टर नाही किंवा 'सैराट' सारख्या इतर प्रादेशिक चित्रपटांची गणना नाही.
शिवाय हा अधिकृत हिशोब आहे, अनधिकृत किती असेल त्याची कल्पना नाही.
ह्याआधीच्या वर्षांच्या कमाईचा हिशोब ह्यात नाहिये.
आपला दुसरा आवडता नवीन छंद म्हणजे 'आय पी एल'.
आयपीएलचा ह्यावर्षीचा टर्नओव्हर १२०० कोटी रुपयांच्या आजूबाजूला आहे.
सोनी मॅक्स चॅनलला ह्यावर्षी फक्त जाहिरातींमधून अपेक्षित असलेला रेव्हेन्यू होता १२०० कोटी रुपये.
शिवाय बी सी सी आयने प्रक्षेपणाचा केलेल्या कराराची किंमत आहे ८२०० कोटी रुपये.
ह्याही सर्व अधिकृतरित्या जाहीर झालेल्या फिगर्स, अनधिकृत काही असेल तर त्याची कल्पना नाही.
भारतातील तिसरा आवडता छंद म्हणजे 'दारू'.
'द हिंदू' च्या आकड्यानुसार भारतात दर वर्षी २० बिलियन लिटर दारू विकली जाते
आणि फक्त दारूचा वर्षभरातला व्यवहार होतो १ लाख कोटी रुपयांहून अधिक.
*गणपतीचा किंवा देवळांचा आर्थिक व्यवहार कॅम्पेअर करण्यासाठी मी ह्या तीनच गोष्टी वापरल्या आहेत*.
आणि ह्या वापरल्या आहेत कारण देवळातली किंवा गणपतीची देणगी जशी सर्वसामान्यांच्या खिशातून जाते त्याचप्रामाणे
हे सर्व आकडे आपणच आपल्या खिशातून कन्ट्रीब्युत केलेले असतात.
*चित्रपट, आयपीएल आणि दारू ह्यासोबत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईल्स, फूड चेन्स, सोनं, चांदी ह्या सर्वांची माहिती यात धरली जाऊ शकते*.
पण तेवढं खोलात जायची गरज नाही. कारण तुलनेसाठी ह्या तीनच गोष्टी पुरेश्या आहेत.
त्यातून हा सर्व रॉ डेटा आहे. अजून खोलात शिरलो तर अजूनही बरेच मोठे आकडे हाती येतील.
गंमतीचा भाग असा की ह्या सर्व गोष्टी आपण आता गरज ह्या सदरात टाकल्या आहेत.
पण त्याचवेळी देव हि देखील एक भावनिक गरज आहे हे आपण मान्य करत नाही.
*माझा देव हि माझी एक सपोर्ट सिस्टिम आहे*
आणि *तिचं सगुण स्थान टिकवून ठेवायला मलाच खिशात हात घालावा लागणारे हे आपण मान्य करत नाही*.
लालबागच्या राजाच्या पेटीचा जो काही कोट्यांमध्ये हिशोब आहे तो बाहेर काढायला आपण सरसावतो,
त्या पैशाच्या दानात किती लोकांचं कुटुंब चालू शकतं, किती शेतकरी आपलं घर सावरू शकतात हे हिशोब आपण हिरीरीने करतो.
*पण दारू पिताना एका बीअरच्या पैशात एका कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण सुटू शकेल हा हिशोब कुणी करायला जात नाही*
की *आय पी एलचं तीन चार हजाराचं तिकीट काढताना एखाद्या विद्यार्थ्याचा चार सहा महिन्यांचा अभ्यासाचा खर्च त्यातून भागू शकेल*
हा विचार केला जात नाही.
तीच गोष्ट चित्रपटांची.
१०० कोटीचा धंदा केलेला पिक्चरच्या रेव्हेन्यूमध्ये आपलं सहा सातशे रुपयांचं कन्ट्रीब्युशन असतं
आणि *तेही कुणाला तरी उपयोगी पडू शकेल हे आपल्याला मान्य करायचं नसतं*.
*येऊन जाऊन हिशोब सणांच्या आणि देवांच्या नावाखाली खर्च होणाऱ्या पैशाचा मागितला जातो*.
*लालबाग, सिद्धिविनायक किंवा अजून कोणतीही देवस्थाने ह्यांना मिळणारा पैसा हा सायलेन्सर तुटलेल्या बाईकसारखा आहे*,
*स्पीड २० चाच पण गोंगाट मात्र हा मोठा* !!!
सर्वात महत्वाचं म्हणजे दान धर्म आणि इतर हिशोब ह्यासर्वांवर मेसेजेस आपल्या सणाच्या वेळीच येताना दिसतात.
*एखाद्या खानाचा पिक्चर रिलीज होतोय, तो पाहू नका*,
*ते पैसे एखाद्या संस्थेला द्या*
किंवा *३१ डिसेंबरला दारू पिऊ नका ते पैसे एखाद्या कुटुंबाला द्या असं कधी वाचलंय*?
असं कधीच होणार नाही.
*कारण भावनेत घोळवलेली भाषा वापरून आपले सण त्याने निष्प्रभ होणार नाहीत*.
*ते काम फक्त होळी, गणपती, दिवाळी ह्यातच होऊ शकतं*.
*आपली श्रद्धास्थानं बुडवणं, त्यांच्यापासून आपल्याला लांब नेणं हे एक कारस्थान आहे*.
*लोकांचे आदर्श बुडाले कि देश सहज बुडवता येतो*.
*भावनिक खच्चीकरण अर्थात डिमोरलायझेशनची हि एक पायरी आहे आणि आपण स्वतः हुन त्यावर जाऊन बसतोय*.
त्यामुळे *दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ*.
*आपली बुद्धी गहाण टाकू नका आणि बुद्धिभेद करणाऱ्या एकाही मेसेजला बळी पडू नका*.
ज्याप्रमाणे समाजात तळागाळातल्या लोकांना हात देणं हे आपलं कर्तव्य आहे
त्याच प्रमाणे
*देव, देश आणि धर्म ह्यांना बळ देणं हे आपलं काम आहे आणि ते विसरता कामा नये*.

*सम्पादित

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

10 Sep 2016 - 8:03 pm | अभ्या..

वॉव. मस्त. ३०० ची झाली सोय.

मंदार कात्रे's picture

10 Sep 2016 - 8:22 pm | मंदार कात्रे

३०० ची झाली सोय

+३३३

;)

तुषार काळभोर's picture

11 Sep 2016 - 11:02 am | तुषार काळभोर

माझा वाईच हातभार.

(कमी पडलं तर परत येतो, पंधरा-वीसची सोय नक्की करता येईल मला!

फेदरवेट साहेब's picture

10 Sep 2016 - 8:53 pm | फेदरवेट साहेब

खासखासखासखास, आहाहाहा झाली मनासारखी पाठ खाजवून !!!!

आता मी बसतो निवांत अन बघतो, माणसे कशी आमच्यासारखीच वसवस करतायत एकमेकांवर ते!, आमचं बरंय कुत्र्यांच्या जमातीत भगवे हिरवे निळे पांढरे रंग नाहीत ते. आमची भांडणे फक्त भादव्यात! बाकी अकरा महिने शांतता

(माणसांची मजा पाहत ग्रामपंचायतीच्या
पारावर विराजमान )
ढेल्या

चंपाबाई's picture

10 Sep 2016 - 10:43 pm | चंपाबाई

भादवा महिन्यात भूभू भांडण करतात की हनीमून करतात ?

तुला मिळाली नै का एखादी गोंडस भूभी ?

फेदरवेट साहेब's picture

10 Sep 2016 - 10:54 pm | फेदरवेट साहेब

हनिमून करिता भांडणे असतात चंप्या! तू बी येडाच हायस लगा, आधी भूभी मिळवायला भांडण मग श्रमपरिहार!. बाकी आमची भूभी कोण हे समजून घ्यायला तुला जव्हेरगंज ने लिहिलेला माझा चरित्रात्मक परिचय वाचावा लागेल, नाहीत समग्र ढेल्या लिलामृत नामे पोथी येते आहे त्या करता थांबावे लागेल, अर्थात त्याचा सासऱ्याला कावलेल्या लोकांना किती फायदा होईल ते ह्युमन ट्रायल अजून झाले नाहीयेत. :))

आदूबाळ's picture

10 Sep 2016 - 9:04 pm | आदूबाळ

हे "तर्क" काय प्रकरण आहे? तर्क म्हणजे guesswork ना?

सगळीकडे * का मारलेत?

संदीप डांगे's picture

10 Sep 2016 - 9:13 pm | संदीप डांगे

एकीच मारा पर सॉलिड मारा! :))

भाते's picture

10 Sep 2016 - 10:10 pm | भाते

लेखात * फक्त ८३ वेळा वापरले आहे. मग किमान शंभरी तरी पूर्ण करायची होती.

इरसाल's picture

10 Sep 2016 - 10:55 pm | इरसाल

अाज कोर्ट बोललं की फक्त हिंदुच्या सणाच्यावेळेसच सगळे/सगळ्या बंद्या अडचणी आठवु नका.

फेदरवेट साहेब's picture

11 Sep 2016 - 9:37 am | फेदरवेट साहेब

सार्वजनिक उत्सव हिंदू सण आहेत काय?

टवाळ कार्टा's picture

11 Sep 2016 - 9:26 am | टवाळ कार्टा

मंदिरांनी ते व्यवसाय करतात असे जाहीर करुंदेत, मग हरकत नाही

राजाभाउ's picture

12 Sep 2016 - 2:29 pm | राजाभाउ

+१
परफेक्ट

त्या लेखकाकडून लेख मिळवून इथे दिलाय तर त्यावर तुमचे मत ### मारून लिहून काढायला नको का अगोदर?अथवा त्यालाच सभासद होऊन इथे लिहायला सांगा.

रविकिरण फडके's picture

11 Sep 2016 - 11:15 pm | रविकिरण फडके

टोपी घालून घ्यायला तुम्ही तयार असलात तर टोप्या घालणारेही मिळतीलच. आपण ह्या दोन्ही गटात नसू तर चिंता करावयाचे कारण नाही. चिंता करून काही होणारही नाही.
ज्यांना राहायचे आहे दर्शनाच्या रांगेत 8-10 तास त्यांना राहू दे उभे. आमचे काही म्हणणे नाही. ज्यांना टाकायचे आहेत शेकडो, हजारो, लाखो रुपये पेटीत, नाहीतर द्यायची आहे मोटारगाडी देवाला त्याचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून, त्यांना देऊ देत बाप्पाला मोटारगाडी. आमचे त्यावरही काही म्हणणे नाही. देणारे आणि घेणारे, दोघे राजी तर आमचे काय जातेय हो? बाकी, मिळालेल्या डबोल्याचे काय होते ते आयकर खाते पाहून घेईल.
आमचे फक्त एवढेच मागणे की तुमच्या भक्तीसाठी आम्हाला गृहीत / वेठीस धरू नका, कानठळ्या बसतील एवढ्या आवाजात 'गाणी' लावू नका, रस्ते अडवू नका, आणि हो, बाप्पा एवढा मोठा करू नका की पालिकेला फ्लायओव्हरची उंची वाढवायला लागेल बाप्पाला खालून जात यावे म्हणून.
पर्यावरण वगैरे काय, त्या अगदी किरकोळ गोष्टी हो तुमच्या भक्तीपुढे. ती भक्ती सिद्ध करायला मूर्ति भलीमोठी, उंचच उंच हवीच ना? पण तरीही, आमचे हे मागणे अगदी किरकोळ आहे तुमच्या नवसाला पावणाऱ्या देवासाठी, होय ना?
म्हणा...होय म्हाराजा!

किंबहुना उत्सवप्रियतेमुळे प्रचंड आर्थीक उलाढाल होते अ‍ॅण्ड इट्स मोस्ट वेलकम. मुख्य आक्षेप उत्सवांच्या नावाखाली निसर्ग आणि नागरी व्यवस्थांचा जो र्‍हास होतो त्यावर आहे. शिवाय कळत-नकळत होणारे मानवी मनाचे शोषण देखील समाजाला अत्यंत घातक अवस्थेला नेऊ शकतं. त्याचाही विचार व्हायला हवा.

बाकी सो कॉल्ड भारी कपडे मिरवत आरामात दारु रिचवत उत्सवांवर होणार्‍या खर्चावर बोट ठेवणारे उंटावरचे शहाणे डोक्यात जातात हे खरं आहे. मस्त मेजवान्या झोडत विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या चर्चा करायच्या व सणासुदीला नावं ठेवायची हौस फार दांडगी आहे विज्ञानवाद्यांमधे.

शाम भागवत's picture

12 Sep 2016 - 6:38 pm | शाम भागवत

सणासुदीला नावं ठेवायची हौस फार दांडगी आहे विज्ञानवाद्यांमधे.

विज्ञानवादी शब्द आला बॉ एकदाचा.
आता धाग्याची पन्नाशी नक्की होईल.

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 6:42 pm | फेदरवेट साहेब

बाकी सो कॉल्ड भारी कपडे मिरवत आरामात दारु रिचवत उत्सवांवर होणार्‍या खर्चावर बोट ठेवणारे उंटावरचे शहाणे डोक्यात जातात हे खरं आहे. मस्त मेजवान्या झोडत विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या चर्चा करायच्या व सणासुदीला नावं ठेवायची हौस फार दांडगी आहे विज्ञानवाद्यांमधे.

हे वाचून एक प्रश्न पडला.

आयडी स्वतःचा सार्थ करायचा विडा उचललाय का आपण??

अर्धवटराव's picture

12 Sep 2016 - 10:50 pm | अर्धवटराव

आम्हि आमच्या गुणानुरूपच आयडी घेतला आहे. आपणही तेच केलं आहे हि जमेची बाजु.

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 11:13 pm | फेदरवेट साहेब

नाही नाही मी माझ्या शारीरिक गुणांवर आधारित आयडी घेतलाय, म्हणजे चार पाय एक शेपूट दोन हलते कान वगैरे, बाकी माझ्या प्रश्नाचा रोख मानसिक आरोग्यावर आधारित होता, ते एक असो, माझा मुद्दा स्पष्ट झाला =))

अर्धवटराव's picture

12 Sep 2016 - 11:27 pm | अर्धवटराव

शेपुट तेव्हढं सांभाळा.