एक मजेशीर जपानी गोष्ट भाषांतरीत करून सांगतो. सहज टाईमपास म्हणून. मुजीना नामक भूतप्रकाराची...
आजच्या टोकीयो शहराच्या बाहेर खूप पूर्वी एक जुना किल्ला होता. त्याला लागूनच एक मोठं तळं होतं. हा किल्ला तत्कालीन व्यापाराच्या महत्वाच्या मार्गावर येत असल्याने व तेव्हा रस्त्यावर लाईट्स नसल्याने जेव्हा जेव्हा कुणी या रस्त्याने प्रवास करीत असत ते ते सर्व लोक शक्यतो रात्रीपूर्वीच किल्ल्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत असत. कारण हा किल्ल्याभोवतीचा भाग झपाटलेला म्हणून प्रसिद्ध होता व खूपसे लोक येथे रात्रीच्या वेळीस प्रवास करताना गायब झाले होते...
एकदा एका अंधा-या रात्री एक व्यापारी तेथून प्रवास करीत होता. त्याला या भागाविषयी फारशी माहिती नव्हती व तो निवांत रमतगमत किल्ल्याकडे चाललेला होता...
अचानक त्याला तळ्याच्या काठाजवळ एक स्त्री जोरजोरात हुंदके देऊन रडताना दिसते. व्यापारी खूप दयाळू माणूस होता व तिचे सांत्वन करण्याच्या उद्देशाने जवळ जाऊन तो म्हणालाः
"मुली तू कोण आहेस? का रडते आहेस?"
पण यावर काहीच उत्तर न देता ती मुलगी अजुन जोरजोरात रडू लागते. तो परत तिच्याशी प्रेमाने व हळू आवाजात बोलून तिच्या रडण्याचे कारण विचारतो... पण व्यर्थ...
शेवटी तो तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतोः "मुली माझ्याकडे बघ!" यावर ती स्त्री हळूहळू त्याच्याकडे वळते व तिच्या चेह-यावरील हात बाजूला करते. मात्र तिच्या चेह-यावर कान-नाक-डोळे काहीच नसतात....
हे भयानक दृश्य पाहून व्यापारी किंचाळी फोडून तिथून वेगाने पळत सुटतो. पण जिकडे जिकडे तो जाईल तिकडे तिकडे किर्र काळोखच दिसत असतो त्याला!
अखेर बराच वेळ धावल्यानंतर त्याला एक छोटीशी झोपडी दिसते. झोपडीला बाहेरच एक दिवा लटकावलेला असतो. व्यापारी धावत जातो ते झोपडीच्या दारातच कोसळतो...
ही गडबड ऐकून आतून एक म्हातारा माणूस बाहेर येतो. तो व्यापा-यास प्रेमाने उठवून त्याला विचारतोः अरे काय झालं? इतका का घाबरलायंस? काही चोर लुटारू होते का?
व्यापारी धपापत्या श्वासाने उत्तर देतोः
नाही... त्या तिथे... तळ्याकडे... एक खूप भयानक बाई पाहिली मी...
यावर म्हातारा त्याला विचारतोः "भयानक म्हणजे कशी? अशी का?"
आता म्हाता-याचे ही नाक-कान-डोळे गायब होतात व तो खदाखदा हसू लागतो...
इकडे व्यापा-याच्या डोळ्यासमोर अंधार दाटत जातो...
प्रतिक्रिया
5 Sep 2016 - 1:34 pm | एस
हेहेहे. मज्जायं. ह्याचं आता कोकणी-बिकणी व्हेरिएशन करून लोकांना घाबरवणार. ;-)
5 Sep 2016 - 1:38 pm | क्षमस्व
आणि मग म्हणतील,
रात्रीस खेळ चाले।।।
5 Sep 2016 - 1:36 pm | प्रभास
5 Sep 2016 - 1:39 pm | प्रभास
इमेज टाकण्याचा प्रयत्न केला पण मुजीनाच्या चेह-यासारखाच ब्लँक झाला :)
5 Sep 2016 - 1:48 pm | क्षमस्व
जाऊ द्या।
मात्र कटप्पाने बहुबलीला का मारलं?
5 Sep 2016 - 1:56 pm | प्रभास
आमचे परममित्र बाहुबली ऊर्फ ब्योमकेश बक्षी ऊर्फ आत्मशून्य कुठे भेटले तर त्यांनाच विचारावे म्हणतो. ;)
हल्ली ते दिसत नाहीत मिपावर...
5 Sep 2016 - 2:01 pm | क्षमस्व
कुणी सांगेल का पत्ता?
6 Sep 2016 - 3:03 pm | bhavana kale
कटाप्पाला बाहुबलीचे नाक आणि डोळे दिसले नाही म्हणून....
6 Sep 2016 - 3:02 pm | bhavana kale
भाषा कशी बदलावी मिसळपाव वर ???
7 Sep 2016 - 4:05 pm | ज्योति अळवणी
छान आहे गोष्ट. पण अजून थोडी खुलवली असती तर मजा आली असती. वाचायला सुरवात केली आणि संपली.
8 Sep 2016 - 4:34 am | रुपी
9 Sep 2016 - 9:37 am | टर्मीनेटर
सह्मत.
ज्योति अलवनि - Wed, 07/09/2016 - 16:05
छान आहे गोष्ट. पण अजून थोडी खुलवली असती तर मजा आली असती. वाचायला सुरवात केली आणि संपली.