बाप्पाचा नैवेद्यः कालाजाम
साहित्यः
२०० ग्राम खवा किसून घेणे
१ वाटी पनीर किसून घेणे
५ टेस्पून मैदा
दीड टेस्पून दूध
२ वाट्या साखर
दीड वाट्या पाणी
वेलचीपूड व वेलचीदाणे
१/४ टीस्पून लिंबाचा रस
पिस्ते
चांदीचा वर्ख
पाकृ:
एका बाऊलमध्ये पनीर चांगले मऊसूत मळून घ्या.
किसलेला खवा ही चांगला मळून घ्या.
आता मळलेले पनीर, खवा, मैदा, दूध व १/२ चमचा साखर एकत्र करून मळून घेणे.
तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या.
प्रत्येक गोळ्यात एक पिस्ता व वेलचीदाणे भरून गोल वळून घ्या.
गोळे हलक्या हाताने वळा, एकही भेग / चीर पडता कामा नये.
कढईत तूप गरम करायला ठेवावे.
एकीकडे पॅनमध्ये साखर + पाणी एकत्र करून पाक करायला ठेवावा.
साखर पूर्णपणे विरघळली की त्यात १/४ चमचा लिंबाचा रस घालून घेणे.
तूप गरम झाले की तयार गोळे त्यात सोडा. गोळे हळू-हळू वर आले म्हणजे तूपाचे तापमान योग्य आहे असे समजावे.
झारा गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व्ह गोळे समान तळले जातील.
कालाजाम करायचे आहेत म्हणून थोडे जास्त तळावे लागतात.
एकतारी पाक तयार झाली की त्यात वेलचीपूड घालून एकत्र करावे.
तळलेले जाम आता कोमट पाकात घालून मुरू द्यावे.
कालाजाम मुरायला साधारण ५-६ तास लागतात.
तयार कालाजामावर चांदीचा वर्ख लावून सजवावे.
कालाजाम तयार आहेत, बाप्पाला प्रसाद दाखवून सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा :)

वाचने
24155
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
वाह खुपच मस्त दिसतायत
ज्जे बात!
चांगले झालेत.गिलाबजामपेक्षा
वा, मस्तच!
वा! सानिका.
सुंदर ! नेत्रसुखद पाकृ
काहीही गं, तुझ्या पाकृ
In reply to सुंदर ! नेत्रसुखद पाकृ by अनन्न्या
हे जबरदस्तच!
वा कालाजाम!साजेशी पाककृती
वा कालाजाम!साजेशी पाककृती
मस्त ..
अहा!
सुंदर सादरीकरण आणि खूप चॅन
सुरेख !
वाह्ह
लाजवाब सानिका.
मस्तं.
आहा!!!! अप्रतिम दिसताहेत
लाजबाब !
अय्या.....
इश्श.काहिही ह.
In reply to अय्या..... by इरसाल
सानि अप्रतिम दिसतायत कालाजाम.
वा!
भारीच!!
ग्रेट दिसतायत कालाजाम!
मस्तच !!!
सुंदर सादरीकरण..!!
फारच सुंदर
सुरेख, आणि अप्रतीम
सानिकास्वप्निल ह्यांची
वा! अतिशय सुंदर दिसत आहेत!
अतिशय सुंदर कालाजाम...
धन्यवाद मिपाकरांनो ___/\___
मस्त
मस्त
स्वप्नील ने केले का कालाजाम
खल्लास!
सुंदर सादरीकरण आणि करण्याची
सानिका मस्त दिसतायेत कालाजाम.
फारच छान
मस्त..
भारी