श्रीगणेश लेखमाला - 'एका गारुड्याची गोष्ट' : पुन:प्रत्यय

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in लेखमाला
12 Sep 2016 - 9:23 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

"तुम्ही साप काय पकडता? जीव वरती आला आहे का? कोणी सांगितले आहेत असले धंदे करायला?" अशा वाक्यांची सवय होती मला. मी पुण्याच्या मध्यवस्तीमधला, मध्यमवर्गीय घरातला मुलगा. आमच्या घरात साप काय, कुत्रासुद्धा कोणी पाळलेला मला माहीत नाही. त्यातून कुठला सरपटणारा प्राणी तर दूरच. लहानपणी एकदा पर्वतीजवळ साप जाळताना पाहिला होता, तेवढाच काय तो सापांविषयी अनुभव होता.

मी गारुडी बनायला पुणे युनिव्हर्सिटी जवाबदार आहे, रसायन अभियांत्रिकीचे माझे पहिले वर्ष रिचेकिंगचा निकाल उशिरा लागल्यामुळे युनिव्हर्सिटीकडून फुकट मिळाले. आत्ता बोलायला मला सोपे आहे, तेंव्हा मी जबरदस्त हादरलो होतो. पण कात्रज सर्पोद्यानने वाट दाखवली. (कसा तिकडे गेलो आणि सुरुवातीपासून काय काय केले, हे मी 'एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला!' या भागात लिहिले आहे.) तिकडे विलक्षण लोकांना भेटलो. तिकडे वेगळेच विश्व होते. सरपटणारा प्राणी म्हटले की समाजात अजूनही किळस किंवा भीती या दोन कॉमन समजुती आहेत. त्यामुळे जेव्हा काम चालू झाले, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी आईला सावध करायचा खूप प्रयत्न केला, पण पोरगा काही तरी वेगळे करतो आहे याच विचाराने तिने मला काम करू दिले.

दर आठवड्याला सापांचे खड्डे साफ कर, (सर्पोद्यानमध्ये बिनविषारी सापांसाठी वरून जाळी नसणारा आणि विषारी सापांसाठी वरून जाळी असणारे खड्डे आहेत.) सापांना दर आठवड्याला उंदीर खायला घाल (साप फक्त जिवंत भक्ष खातात.), उरलेले अर्धमेले उंदीर खड्ड्यातून बाहेर काढ अशी अनेक कामे केली. बिनविषारी साप - धामण, अजगर, दिवड (पाणसाप) आणि घोरपड यांचे खड्डे आत उतरून साफ करायला लागतात. विषारी सापांच्या खड्यात (साधारणपणे १० नाग आणि १० घोणस असतात.) ३-४ वेळाच उतरलो. खूप जबाबदारीचे काम असते, साधारणपणे कार्यकर्त्यांना ते दिले जात नाही. थोडीसुद्धा चूक महागात पडू शकते.

असाच एकदा दुपारी मी शिडी टाकून विषारी सापांच्या खड्ड्यात उतरलो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. नागांच्या पडलेल्या काती आणि उरलेले उंदीर, मी आजूबाजूचे घोणस चुकवत उचलत होतो. इतक्यात राजाभाऊंचा (सर्पोद्यानचे मॅनेजर, मला माहीत असणारे भारतातील (पडद्यामागचे) खूप मोठे सर्पतज्ज्ञ) बाहेरून आवाज आला, "आहेस तिकडेच थांब, मानही वळवू नकोस!!!" माझा क्षणात पुतळा झाला. इंडिअन अ‍ॅनिमेशनमधली कार्टून्स जशी फक्त डोळे फिरवतात, तसे मी डोळे फिरवून पहिले, तर एक नाग एका फांदीवरून माझ्या खांद्यावर उतरत होता. त्याच्या ध्यानीमनीही नव्हते, ती स्वारी निवांत होती. मी बाहेरून खड्ड्यात आलो असल्याने शरीराचे तापमान कमी होते (आणि मी तसा काही हॉट वगैरे नाहीच!), तेच त्या नागाला आवडले असावे. नॅनोसेकंदात, तो नाग खांद्यावरून उतरून खालच्या फांदीवर निघून गेला, तोपर्यंत मी श्वासही रोखून धरला होता. मी त्याचा आणि त्याने माझा आदर राखला होता. निसर्गाचे हेच तत्त्व मी पुढे काम करताना पाळत राहिलो.

सर्पोद्यानमध्ये काम सुरू केल्यावर काहीच दिवसांत मला समजून चुकले होते की मला प्राण्यांबरोबर काम करायला आवडते, आणि तोच माझा छंद झाला.

कात्रज सर्पोद्यानाच्या मागच्या बाजूला वन्य प्राणी-पक्षी अनाथालय आहे, ते अण्णा (निलीमकुमार खैरे) आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जीवतोड मेहनत घेऊन उभारले आहे. पुण्यात सकाळमध्ये 'कसबा पेठेमधून घुबड पकडून सर्पोद्यानात नेले', 'NDA रोडवरून हरणाचे पिल्लू कात्रजला नेण्यात आले' अशा बातम्या कॉमन असतात. ते प्राणी-पक्षी अनाथालयात जातात आणि त्यांना काही दिवस तिकडे ठेवून, त्यांच्यावर उपचार करून त्यांना (फॉरेस्ट खात्याची परवानगी घेऊन) परत दूर अभयारण्यात सोडण्यात येते. जे अपंग प्राणी-पक्षी जंगलात सोडता येत नाहीत, त्यांना अनाथालयातच योग्य काळजी घेऊन ठेवले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे अनाथालय असल्याने ते लोकांना बघायला उपलब्ध नाही. पुण्यात राहून कोरेगाव पार्कची पब्ज लोकांना माहीत असतात, पण या अनाथालयाबद्दल काहीच माहिती नसते. असो.

तिकडे कामाला लागलो आणि नवीन आयुष्य चालू झाले. तोपर्यंत डिस्कव्हरीवर आणि nat geoवर, 'स्टीव अर्वीनने काय अ‍ॅलीगेटर पकडली आणि ऑस्टिनने मंबा (black mamba) हेड कॅच केला' एवढ्यापुरतेच माझे ज्ञान मर्यादित होते. डिस्कव्हरीवरचे हे खूप सारे प्रोग्राम्स स्टुडिओ stunts असतात, हे मी स्वतः काम चालू केल्यावर मला समजले.

हरणाच्या, अस्वलाच्या पिल्लाला बाटलीने दूध पाज, मगरीच्या पिल्लांना चिकनचे तुकडे भरव अशा छोट्या छोट्या कामांनी सुरुवात झाली. पिंजरे साफ कर, झाडांना पाणी घाल, कासवाचा खड्डा हाताने घासून साफ कर अशी कष्टाची कामेही चालू झाली. फीडिंग डेच्या दिवशी तर चॉपर घेऊन मासामधून आतडी साफ करून, कोणाला पिल्लाला खिमा तर कोणाला गरुडाला बोटी दे असे चालू झाले. नॉनव्हेज खाणारा फक्त मी, इकडे तर चिकन मारण्यापासून, साफ करण्यात तरबेज झालो. 'जीवो जीवस्य जीवनम्' किंवा "ना कोई मारता है, ना कोई मरता है; ये मै नही बोलता, ये तो गीता मै लिखा है" (इती - मनोज वाजपेई, Aks) या उक्तीप्रमाणे अनेक प्राणी-पक्ष्यांना खाऊ-पिऊ घातले.
रीलीज डेला (प्राणी-पक्ष्यांना जंगलात परत सोडायचा दिवस) तर फुल धमाल असायची. एका ट्रकमध्ये कुठल्या पिंजर्‍यात माकडे, कशात तरस, कशात घारी, घुबडे, मोर, खूप सारे साप आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे! आमच्यासाठी सगळे प्राणी-पक्षी म्हणजे कोणी अंत्या (रानडुक्कर), कोण बबली (माकड), कोण राजा (तरस), कोण सोनू (गिधाड) असायचे. त्यांना जंगलात मुक्त होताना बघून भारी वाटायचे.

पुण्यात जसा मी साप पकडायचो, तसे इतर प्राणी-पक्षीसुद्धा रेस्क्यू करायचो. (साप पकडायचे अनुभव मी १३ लेखांत लिहिले आहेत, शेवटी लिंक देतो आहे.) तुम्हाला वाटेल, पुण्यात लोकांना राहायला जागा नाही तिकडे हे प्राणी-पक्षी कुठून येतील? पण विश्वास ठेवा, तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा ठिकाणांहून मी प्राणी-पक्षी वाचवले आहेत.

एका रविवारी सकाळी मित्रमंडळ चौकातून (जो रस्ता सारसबागेकडून मुक्तांगणकडे जातो.) एक कॉल आला, "आमच्या बाथरूममध्ये असे काही तरी आहे, की जे मांजर नाही, साप नाही आणि पाल नाही, भला मोठा प्राणी आहे." पोहोचलो तिकडे, तर पहिल्या मजल्यावर बाथरूममध्ये ४ फुटी घोरपड! तिला पकडून पोत्यात घातली आणि त्या माणसाचे जरा बौद्धिक घेतले, मग जरा बरे वाटले.:)

याच काळामध्ये मला खारीचे एक पिल्लू सापडले. झाडावरून पडले होते बिचारे. त्याला - चिंक्याला - मी ड्रॉपरने दूध पाजून जगवले. बाहेर जाताना माझ्या पोलो शर्टमध्ये ते बसायचे आणि भूक लागली की हळूच शर्टातून वर यायचे. संध्याकाळची ६ची वेळ होती. मी सर्पोद्यानवरून परत घरी येत होतो. अहिल्याच्या चौकात (सातारा रोडचा गच्चून भरलेला चौक) एका पोलीस मामीने सिग्नलला बाजूला घेतले. मी आपला मामीला पिउशी-लायसन दाखवत होतो, इतक्यात चिंक्याने शर्टातून डोके बाहेर काढले. बहुतेक गाडी थांबली म्हणून त्याची समाधी भंगली असेल. त्या मामीने एक जोरदार किंचाळी मारली, ४-५ पोलीस माझ्याकडे पळत आले आणि चिंक्याला बघून तेही हसायला लागले. त्यानंतर त्या सिग्नलला मामा-मामी नेहमीच मला हात दाखवायचे. :) नंतर हा चिंक्या मोठा झाला, तसा मी त्याला तळजाईच्या जंगलात सोडून दिला.

याच काळात सापांबरोबर घोरपड, घुबड, घारी, ससाणे, शिक्रा, कोकिळा, कावळे, चिमण्या, पहाडी पोपट रेस्क्यू केले. उन्हाळ्यामध्ये तर dehydrationमुळे रस्त्यावर पडलेल्या खूप घारी मिळायच्या. पुण्यात सिटीत आधी वाडे होते, त्यांच्या अंगणात वडाची-पिंपळाची झाडे असायची. नंतर वाडे गेले, तशी झाडे गेली. या धावपळीचे गणित पक्ष्यांना कसे समजणार? त्यांना समजतच नसणार काय होते आहे ते...

अशाच इमारतीमधून मला कॉल यायचा की "रोज खिडकीसमोर घुबड बसते, आम्हाला अशुभ वाटते. त्या घुबडाला घेऊन जा....!" अशा वेळी त्या माणसांचीच चीड यायची. अंधश्रद्धेची सणक जायची. पण ज्या अंधश्रद्धा बदलणे शिक्षणाने साध्य झाले नाही, तिकडे मी लोकांना भाषण देऊन काही होणार नव्हते, याची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे ६-७ वर्षे शांतपणे काम करत राहिलो आणि प्राणी-पक्षी, साप वाचवत राहिलो. माझ्यासारखेच सर्पोद्यानचे अनेक कार्यकर्ते अजूनही हे काम करत आहेत, त्यामुळे प्राणी-पक्षी, साप जंगलात सोडले जात आहेत.

जोपर्यंत पुण्यात होतो, तोपर्यंत हे काम करत राहिलो. साप किंवा वन्य प्राणी पकडणे हा माझा छंद कधीच नव्हता. जे काही केले, ते प्राणी किंवा साप वाचावे म्हणून केले. नंतर शिक्षणासाठी अमेरिकेला आलो. इकडे आल्यावर अभ्यासामुळे प्राण्यांबरोबर काम करणे जमले नव्हते. पण नुकतीच डिग्री मिळाली, आता परत अटलांटा झूमध्ये काम करायची इच्छा आहे. लवरकरच चालू करीन म्हणतो...

एकही फोटो टाकला नाही, कारण साप, प्राणी-पक्षी रेस्क्यू करताना मी एकही फोटो काढला नाही व राजाभाऊ म्हणतात की "साप पकडताना त्याच्याबरोबर फोटो काढला की आपणही लवकरच फोटोमध्ये जातो!":)

या दुव्यामध्ये माझे सापांविषयीचे तेरा लेख आहेत.
http://www.misalpav.com/node/26292

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 Sep 2016 - 10:08 am | पैसा

युनिव्हर्सिटीच्या गोंधळामुळे तुला एकाहून एक भारी अनुभव मिळलेत! नशीबच हे.

जिथे कुठे अशी अ‍ॅनिमल रेस्क्यूची कामे चालतात त्यांना असंख्य धन्यवाद! इथे गोव्यात तर मला तथाकथित पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचा अतिशय वाईट अनुभव आहे.

प्रीत-मोहर's picture

12 Sep 2016 - 12:11 pm | प्रीत-मोहर

+१

जॅक डनियल्स यांच्यासारखेच काही कार्यकर्ते आहे, जे जनावरांना रेस्क्यु करतात. आमच्याकडे अस काही जनावर आढळल तर सरळ मी खोतीगाव अभयारण्यातल्या लोकांना कॉल करते. ते येतात बिचारे वेळ काळ न बघता आणि घेउन जातात जनावरं.,

अमृत सिंग आणि निर्मल पण करतात हे काम. त्यांचा नंबर मिळवुन देते ग ताय तुला. त्याशिवाय साखळी केरीला विवेकानंद संस्था पण करते हे काम

जॅक डनियल्स's picture

13 Sep 2016 - 6:40 am | जॅक डनियल्स

अमृत सिंग आणि निर्मल सिंग कात्रज सर्पोद्यान मध्ये यायचे खूप चांगले काम करत आहेत दोघं. गोव्याचा निसर्ग अजूनही अश्या लोकांमुळे टिकून राहिला आहे. त्यांचे किंग कोब्रा रेस्कू चे किस्से सर्पोद्यानात प्रसिद्ध आहेत खूप.

काही लोक प्राणी पक्षी रेस्कू फेसबुक वरती फोटो काढण्यासाठी करतात आणि माझ्या मते ती तर चोरट्या शिकाऱ्यापेक्षा वन्यजीवांची जास्त वाट लावत आहेत. खूप माझे मित्र अश्या लोकांना शोधून काढतात आणि वाट लावतात.पण १९७२ चा वन्यजीव संरक्षण कायदा एवढा तकलादू आहे की जास्त काही करता येत नाही.

चाणक्य's picture

12 Sep 2016 - 10:15 am | चाणक्य

आधीची लेखमाला वाचली होतीच. सलाम तुला.

यशोधरा's picture

12 Sep 2016 - 10:16 am | यशोधरा

भारी लिहिलेय.

क्रेझी's picture

12 Sep 2016 - 10:23 am | क्रेझी

वाह!
तुमची लेखमाला वाचतांना जितकी मजा आली तितकंच छान हा लेख वाचतांना वाटलं.
आता लवकर झू मधल्या अनुभवांची शिदोरी आमच्यासाठी घेऊन या ही विनंती :)

जॅक डनियल्स's picture

13 Sep 2016 - 6:42 am | जॅक डनियल्स

हो, जसे काम चालू करीन तसे त्या वरती लिहीन. सध्या तरी नवीन विषयावर लिहायचा विचार चालू आहे.

सस्नेह's picture

12 Sep 2016 - 10:51 am | सस्नेह

लेखमाला आवडली होतीच. हा लेखही छान. फोटो असते तर आणखी आवडले असते.

जॅक डनियल्स's picture

13 Sep 2016 - 6:45 am | जॅक डनियल्स

राजाभाऊ म्हणतात की "साप पकडताना त्याच्याबरोबर फोटो काढला की आपणही लवकरच फोटोमध्ये जातो!":)

हेच आम्ही सर्पोद्यान चे कार्यकर्ते पाळतो, त्यामुळे एक पण मोठा अपघात झाला नाही. त्यामुळे माझा एक पण फोटो नाही. आधीच्या लेखमालेत पण नेट वरचे किंवा मित्रांनी काढलेले फोटो टाकले होते.

मृत्युन्जय's picture

12 Sep 2016 - 11:03 am | मृत्युन्जय

लेखमाला आवडली होतीच पण गणेश लेखमालेतला हा लेखदेखील आवडला

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2016 - 11:25 am | स्वाती दिनेश

लेखमाला आवडली होतीच पण गणेश लेखमालेतला हा लेखदेखील आवडला.
हेच म्हणते.
स्वाती

प्रीत-मोहर's picture

12 Sep 2016 - 12:08 pm | प्रीत-मोहर

हेच म्हणते.

निओ's picture

13 Sep 2016 - 8:25 pm | निओ

+1

नेहमीप्रमाणे झक्कास लेख. --/\__

नीलमकुमार खैरे यांचे साप वगळता इतर प्राण्यांना पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून कसे पकडले आणि त्या एकंदर प्रकरणांमध्ये आलेले सरकारी व इतर प्राणीमात्रांचे अनुभव यांवर एक झकास पुस्तक संग्रही आहे त्यामुळे हे अनुभव विशेष भिडले.

जॅक डनियल्स's picture

13 Sep 2016 - 6:48 am | जॅक डनियल्स

धन्यवाद्कु ! कुठले पुस्तक आहे ते? मी पण ते मागवून घेतो.

.

एकाहून एक झकास अनुभव आहेत..!!

अद्द्या's picture

12 Sep 2016 - 1:57 pm | अद्द्या

"अशुभ असतो " असे लोक बघितले कि वाटतं हेच लोक अशुभ आहेत त्या प्राण्यांना / पक्ष्यांना .

असो ..

लेख मस्तच .. :)

रुस्तम's picture

12 Sep 2016 - 2:01 pm | रुस्तम

बाडीस

जॅक डनियल्स's picture

13 Sep 2016 - 6:54 am | जॅक डनियल्स

हो मला पण तेच वाटायचे ! चांगल्या चांगल्या (शिकलेल्या ! ) घरात भिंती वरती डिग्र्या बघून आणि त्यावर हे यांचे विचार ऐकून डोक्यात तीडीस जायची. शिंगी घुबड आणि गव्हाणी घुबड दिसायला फारच गोंडस असते. फक्त निशाचर म्हणून त्याला अशुभ बनवून टाकले आहे, या हिशोबाने सगळे गुरखे (नाईट क्लबचे डीजे, इंजिनीरिंगचे विद्यार्थी) अशुभ व्हायला पाहिजेत....

अद्द्या's picture

12 Sep 2016 - 1:58 pm | अद्द्या

"अशुभ असतो " असे लोक बघितले कि वाटतं हेच लोक अशुभ आहेत त्या प्राण्यांना / पक्ष्यांना .

असो ..

लेख मस्तच .. :)

मुक्त विहारि's picture

12 Sep 2016 - 3:02 pm | मुक्त विहारि

"पण नुकतीच डिग्री मिळाली, आता परत अटलांटा झूमध्ये काम करायची इच्छा आहे. लवरकरच चालू करीन म्हणतो..."

ह्या कामासाठी शुभेच्छा...

जॅक डनियल्स's picture

13 Sep 2016 - 6:54 am | जॅक डनियल्स

धन्यवाद !

टवाळ कार्टा's picture

12 Sep 2016 - 3:46 pm | टवाळ कार्टा

कहर...तो नागवाला किस्सा तर बाब्बौ...तुला मिपाशंकर म्हणायला हरकत नाही आता =))

टवाळ कार्टा's picture

12 Sep 2016 - 3:49 pm | टवाळ कार्टा

कहर...तो नागवाला किस्सा तर बाब्बौ...तुला मिपाशंकर म्हणायला हरकत नाही आता =))

विशुमित's picture

12 Sep 2016 - 3:53 pm | विशुमित

"मिपाशंकर" अगदी अगदी...!!

स्मिता श्रीपाद's picture

12 Sep 2016 - 3:52 pm | स्मिता श्रीपाद

सलाम तुम्हाला....तुम्हाला अटलांटा झूमध्ये काम करायला मिळो नी आम्हाला नवे लेख वाचायला मिळोत अशी गजानना च्या चरणी प्रार्थना

लेखमालेपासूनच तुमच्या कामाला हात जोडलेत! हा लेखही छान.

प्रचेतस's picture

12 Sep 2016 - 8:28 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.

साप किंवा वन्य प्राणी पकडणे हा माझा छंद कधीच नव्हता. जे काही केले, ते प्राणी किंवा साप वाचावे म्हणून केले

हे विशेष आवडले.

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 9:45 pm | पिलीयन रायडर

लेखमालेप्रमाणेच लेखही खुप आवडला!

मी-सौरभ's picture

13 Sep 2016 - 12:20 am | मी-सौरभ

झक्कास लेख आणि तो पण खूप दिवसांनी ☺

थोडा अजून लिहिता हो.

तुझा आणि जेडी चा पंखा

सौरभ

पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!!! आम्हाला तुमचे असेच अनुभव वाचायला मिळो.

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 10:21 am | विवेकपटाईत

लेख आवडला.

शिव कन्या's picture

13 Sep 2016 - 12:16 pm | शिव कन्या

Discovery , Nat geo हे studio stunts असतात ही नवी माहिती. बरे झाले कळले.

फार जाणिवेचे काम करताहात तुम्ही.
पुढील वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा.

किसन शिंदे's picture

13 Sep 2016 - 2:07 pm | किसन शिंदे

लेख आवडला जेडी भौ. बर्‍याच दिवसांनी लिहिलंत.

अभिजीत अवलिया's picture

14 Sep 2016 - 8:00 pm | अभिजीत अवलिया

लेखही खुप आवडला!

तुमचे धागे पुन्हा एकदा वाचले बरेच गैरसमज दुर झाले , आमच्या घरातल्या आवारात धन त्रेयादशिच्या रात्री भला मोठा नाग निघालेला तेव्हा कॉलनितल्या बाया हळदी कुन्कु वाहत होत्या दुरुन ;) वर काही जुणॅ जानते लोक म्हनलाए तुम्च्या घरात गुप्त धन आहे म्हणे , पण गर्दी पाहुन नाग बिथरला होता खर, जिक्डे रस्ता दिसेल तिथुन सुट्का करुन घ्यायचा प्रय्त्न करत होता प्ण लोक खरच कहर असतात कधी कधी :( काही जण मारा म्हणे त्याला मुक्ती मिळेल नवा जन्म :( माझ्या भावाने त्याला अगदी व्यवस्थित पकडुन गोणीत भरुन लांब सोडुन दिला :) असे किती तरी साप न नाग त्याने व्यवस्थित पकडुन लाम्ब सोडुन दिलेत तुम्चा लेख वाचुन मला खरच अभिमान वाटला त्याचा नायतर चिड्वायचो आम्ही त्याला :)

मस्त.. लेखमाला छानच होती, हाही लेख आवडला.