Skip to main content

कावळे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 21/08/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वताचा मुलगा अमेरिकेत वेल सेटल्ड असताना...शेजाराच्याना "राहुल ला लागली का नोकरी? नाहि बरेच दिवस घरीच दिसतो म्हणुन विचारले..... . स्वताची मुलगी सुस्थळी पडल्यावर.." यमी च जमतय की नाहि? बघा हो..वय उलटुन गेले कि अवघड होते... . स्वताच्या मांडीवर नातवंड खेळवत बाजुच्या जोशी काका च्या सुनेला काहि कोम्पिकेशन्स आहेत हे माहित असताना..."काय रामभाऊ? पेेढे कधी देणार..३ वर्ष झालीत तुमच्या राहुल च्या लग्नाला........... . अश्या चोचा मारणारे कावळे आपल्याला समाजात..नात्यात नेहमी पहायला मिळतात...चोचा मारण्या साठी हे कावळे जखमा शोधत असतात..दिसली जखम मार चोच..कर घायाळ.... संवेदना हीन लोक्स
लेखनविषय:

वाचने 2627
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

प्रत्येकाचा मनात एक कावळा दडलेला असतोच. म्हणूनच श्राद्धात कावळ्याला प्रसन्न करावे लागते. शरीराच्या आत दडलेल्या कावळ्याच्या मुक्ती साठी.

In reply to by विवेकपटाईत

अलिकडचे काही टोचे पाहुन पटले. . मै भी कावळा ची टोपी घेतो बनवून आता.

चांगलं लिहिलंय ! असे सर्व कावळे मोकल्या मैदानावर नेऊन ओल्या फोकाने फोड़ून काढले पाहिजेत. -दिलीप बिरुटे

In reply to by पक चिक पक राजा बाबू

हो हो ! खूपच प्रमाण आहे त्यांचं, असं वाटतं. -दिलीप बिरुटे

मला वाटतं कोणतीही विसंगती दिसली कि त्याबाबतीत चौकस रहाणे वा चौकशी करुन , आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे हा मानवी स्वभाव असावा. रस्त्यात चालता चालता , समजा कुणी पाय घसरुन पडला, तर सहजपणे आपल्याला उत्सुकुता असते की जो कुणी पडला, त्याचा पाय घसरला कां ? कशावर ? केळ्याच्या सालीवर की तेलाच्या तवंगावर, की आणखी कशामुळे? कुणाचा धक्का लागला कां ? पडणारी व्यक्ती स्त्री कि पुरुष ? तरुण की व्रुध्द् ? मग पुढचा विचार , की त्या पडलेल्या व्यक्तीस मदत करावी की नको ? आपण करावी की आपणच कां करावी की इतरांवर सोपवुन आपण आपल्या मार्गाला लागावे ? तर असे चौकस रहाणे वेगळे आणि लेखात म्हटल्याप्रमाणे , मनात कुटील भाव ठेवुन चौकस रहाणे वेगळे. त्यात स्वभाव दोष हाच कळीचा मुद्दा आहे. आणि स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते, त्यानुसार , अशा प्रव्रुत्तीस , टीट फॉर टेट , नियमानुसार , सरळ झोडपुन काढावे.वाईट्पणा आला तरी चालेल.

नेमका कशाबद्दल जिलबी पाडलीये ते समजत नाहीये, चेपुवर टाकायचे स्टेट्स इथे टाकल्यासारखे वाटते !!!

थेट मिपावरच ! इअकडे तिकडे नाही उगा का वळा! म्हणून

कावळा !!!

काकयनी नाखु