श्रीगणेश लेखमाला: फिरत्या चाकावरती..

मोदक's picture
मोदक in लेखमाला
5 Sep 2016 - 1:36 pm

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

सायकलिंग..

१
मी गेल्या दोन वर्षांपासून जसा वेळ मिळेल तशी सायकल चालवत आहे. अनेकदा महाबळेश्वर, कोकण सायकलीने पार केले. लांब अंतरे आणि घाट नेहमीच खुणावत असतात. रोजच्या वेळापत्रकात एक बदल म्हणून सायकलीने कचेरीतही जायला सुरुवात केली. गाडीने होणारा प्रवासाचा वेळ आणि सायकलने लागणारा वेळ यात फार फरक नसल्याचे आश्चर्यकारकरित्या लक्षात आले. गाडीच्या तुलनेत सायकलने लागणारा वेळ अगदी १०-१५ मिनिटे जास्त होता. सायकल घेणे, त्याची निगा राखणे, मोठ्या राइड्स वगैरे प्रकार नियमित सुरू झाले.

सुरुवातीला वाटणारे "६० किमी?? सायकलवर??" असे विचार आता "१५० किमी आहे का? ठीक आहे, एका दिवसात सहज जमेल" येथपर्यंत आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट सायकलिंगमुळे शक्य झाली, ती म्हणजे 'सहनशीलता वाढली..!!' रस्त्यावरून जाताना मोठाल्या गाड्यांनी कट मारून जाणे, दुचाकीवीरांनी उगाचच जवळून जाणे, रस्त्यावर लोकांनी चेष्टा करणे वगैरे गोष्टी सवयीच्या झाल्या. सायकल चालवताना अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये एकदा जोरदार आपटल्यामुळे 'उतारावर वेग नियंत्रणात राहिलाच पाहिजे' याचा नीट धडा मिळाला.

मात्र सगळेच लोक असे नसतात. टळटळीत उन्हात घाट चढताना कोणीतरी हात दाखवून "कीप इट अप..!!!" असे प्रोत्साहन देतात.

२

कुठेतरी थांबून विश्रांती घेताना मुद्दाम गाडी थांबवून "काही हवे आहे का?", "सगळे ठीक आहे का?" अशी चौकशी करतात.
एखादी मदत हवी असल्यास आवर्जून मदत करण्याची तयारी दाखवतात.

आम्हाला सायकलवर बघून लोकांच्या प्रामाणिक पण मजेदार प्रतिक्रिया बघून 'नक्की काय प्रतिक्रिया द्यायची' हे कळायचेच नाही. सायकल चालवताना एखादी गाडी शेजारी येऊन आमच्या गतीने चालायला लागली, की "सायकल चालवल्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात का..?" येथपासून ते "तुम्ही फक्त सायकल चालवता का? कामधंदा काही करत नाही का..?" असे कोणतेही प्रश्न येऊ शकतात, याचे अनेक मजेदार अनुभव आले.

सायकल राइडमध्ये अनेक मजेदार घटना आजूबाजूला घडत असतात.. त्यातल्या निवडक घटना येथे देत आहे.. तुम्हाला सायकल चालवताना किंवा गाडी चालवताना असे अनुभव आले असल्यास येथे जरूर लिहा. :)

************************************************************

असेच एकदा महाबळेश्वरहून परत येत होतो. पसरणी किंवा कोणताही घाट उतरणे हा कुठल्याही सायकलवीराचा एक आवडीचा प्रकार असतो. कारण एकच.. सगळा उतार असतो आणि भन्नाट वेगाने सायकल पळते.

पाचगणी, पसरणी, वाई सगळा रस्ता व्यवस्थित पार पडला. वाई ते सुरूर फाटा या आमच्या आवडीच्या रूटवर सायकली धावू लागल्या. मी थोडा पुढे होतो.. अचानक मागे मोठमोठ्याने हॉर्न वाजू लागला. बघितले, तर लांबवर एक टँकर होता. मी सायकल शक्य तेवढ्या बाजूला घेतली आणि त्याला जायला थोडी जागा मोकळी केली.

तरी त्याचा हॉर्न थांबेना.

सिंगल रोड असल्याने हॉर्न वाजवत असेल अशा विचाराने मी दुर्लक्ष केले, तरी टँकरचे पँ पँ पँ सुरूच होते. शेवटी मीच सायकल चालवता चालवता मागे वळून 'आता जा की पुढे..' अशा अर्थाचे हातवारे केले.

३

मला ओलांडून तो टँकर पुढे गेला, त्याचा वेग थोडा कमी झाला, त्या टँकरचा क्लीनर डाव्या बाजूने 'खतरोंके खिलाडी'सारखे स्टंट करत चालत्या टँकरमधून बाहेर उलट्या दिशेने लोंबकळला व मला मोऽऽठ्ठ्याने ओरडून विचारले,

"पाणी पायजे का??"

मी अवाक, चकित वगैरे झालो..

त्याला नको नको असा हात केला आणि हसत हसत पुन्हा पॅडल मारायला लागलो.

************************************************************

आमची एक भन्नाट कँपिंग ट्रिप... सगळे सायकलचे आवश्यक गिअर्स घालून तयार झालेलो आम्ही... वेगवेगळ्या सायकलवर लादलेले टेंट, एक दिवस राहण्याचे सामान, वाटेत खादाडी करायला लागेल म्हणून चिक्की, राजगिरा लाडू वगैरे खुराक आणि किरणच्या सायकल कॅरियरवर चक्क एक जिवंत कोंबडा - हो, जिवंत कोंबडा!! - रात्रीच्या जेवणाची सोय!

४
सकाळी आम्ही निघालो. बर्‍यापैकी ऊन असल्याने आरामात मजल दरमजल करत ताम्हिणी घाटाकडे कूच केले. एका ठिकाणी झकास खादाडी केली. पुन्हा सायकलवर प्रवास सुरू केला. वाटेत टाईमपास करत चाललो होतो. एका ठिकाणी त्या बिचार्‍या कोंबड्याला पाणीही पाजले.

थोड्या वेळाने किरण (कोंबड्यासह) पुढे गेला. मी आणि केदार पाणी प्यायला थांबलो होतो, तोच शेजारी पोर्शची चकाचक SUV येऊन थांबली. आम्ही मनातल्या मनात त्या गाडीला दाद दिली. भारी गाडी होती.

ड्रायव्हरशेजारची काच खाली झाली आणि अत्यंत सफाईदार इंग्लिशमधून प्रश्न आला.

"Are you guys doing BRM..?"

मी : No.. no.. we are just out on a ride.

पोर्शवाला : (आश्चर्याने..) In this summer??

मी : Yup.. its fun.

पोर्शवाला : You know guys... I really appreciate you for the passion you have. You are going on cycle in such heat is really commendable.

मी : (आता काय बोलावे या विचारात..) ...

पोर्शवाला : You guys are doing great job... Keep up the passion.

मी : Yup... thank you. Best of luck to you too...

मी आणि केदारने एकमेकांकडे पाहिले.. आमचा डोक्यात एकच विचार..

... आता हा हिरो पुढे जाणार आणि हेल्मेटपासून बुटांपर्यंत सगळे गिअर्स घातलेल्या किरणच्या सायकलला गाठणार आणि कॅरियरवरचा जिवंत कोंबडा बघून वेडा होणार...!!!!!!!!

५

************************************************************

मे महिन्याच्या टळटळीत उन्हातील दुपार. अमित आणि मी सातार्‍याला चाललो होतो. आमच्या अगदी पहिल्यावहिल्या मोठ्या सायकल ट्रिपपैकी एक ट्रिप..

पुण्यातून निघताना उशीर झाला. आम्ही अगदी आरामात साडेसात-आठला बाहेर पडलो. नंतर कापूरहोळजवळच सायकल पंक्चर झाली. आमच्याकडे पंक्चर किट होते, पण पंक्चर काढायचा फारसा अनुभव नव्हता. हे पंक्चर दोनदा काढावे लागले. पहिल्यांदा पंक्चर काढल्यानंतर पुन्हा ट्यूब चेक केली, तेव्हा कळले की आम्ही पंक्चर झालेल्या ठिकाणाच्या बरोब्बर शेजारी पंक्चरचा पॅच चिकटवला आहे.

..भर दुपारी शिरवळला पोहोचलो. श्रीराम वडापावकडे वडा, ताक, पोहे वगैरे प्रकार पोटात ढकलले. पुन्हा सातार्‍याकडे कूच केले. भर उन्हात सायकल चालवायला सुरुवात केली. पण उन्हाचा खूप त्रास होत होता. मला थोड्या अंतरावर डाव्या बाजूला एक डेरेदार झाड दिसले. त्याची झकास सावली पडली होती. शेजारी पाण्याचा एक नळही दिसत होता. काहीही विचार न करता मी आणि अमितने सायकली तिकडे वळवल्या. त्या सावलीत पोहोचलो, तोच लक्षात आले की तेथे एक झोपडी होती, एक मंदिरही होते. आम्ही आवारात पोहोचलो तर त्या झोपडीतून एक आज्जी बाहेर आल्या. एकदम थकलेल्या, वाकलेल्या, काठी घेऊन चालणार्‍या आज्जीबाई.

"आज्जी.. आम्ही थोडा वेळ सावलीत थांबू का?" अमितने विचारले.

"बसा की बाळांनो" असे प्रत्युत्तर आले.

आम्ही झाडाच्या सावलीत असेल नसेल तितक्या गवतावर डोक्याखाली टेकायला एक दगड घेऊन आडवे झालो.

थोड्या वेळाने आज्जी बाहेर आल्या, एक मोठी गोधडी आम्हाला दिली आणि यावर झोपा असे सांगितले. आम्ही नको नको म्हणत असताना ती गोधडी आमच्याकडे देऊनच गेल्या.

माणुसकीचा अंश आज जर कुठे टिकून असेल.. तर तो खेड्याऽत..! असा काहीतरी अनुभव होता तो.

अचानक आज्जी पुन्हा अवतरल्या. "बाळांनो.. मला जरा १०० रुपये द्या. देवळाचे लाईटचे पैशे द्यायचे हायेत."

मी आणि अमित एकमेकांकडे बघतच राहिलो. नंतर देवळाकडे बघितले तर देवळाच्या आजूबाजूला कुठेही लाईटची वायर वगैरे काहीही दिसत नव्हते. झोपडीमध्येसुद्धा दिवे होते की नाही तेही कळत नव्हते.

शेवटी त्या आज्जींच्या हातावर ५० रुपये टिकवले आणि सातार्‍याच्या वाटेला लागलो.

************************************************************

हर्णे बंदर..

६

अमित, केदार, वर्धन, किरण आणि मी कोकणात सायकलने भटकत होतो. मुरूडच्या किनार्‍यावर एका ठिकाणी मुक्काम होता आणि मासे घेण्यासाठी हर्णे बंदरावर गेलो होतो. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मासे बघत निवांत फिरत होतो. तेथे चालणारे लिलाव, वाहतूक, बर्फाचे ट्रक, त्यातून त्या लहान क्रशरमध्ये जाणार्‍या बर्फाच्या लाद्या आणि नंतर लहान आकाराच्या बर्फाने भरले जाणारे क्रेट बघायला मजा येत होती.

शेवटी आम्हाला हवी तशी मासळी विकणार्‍या 'रिटेल' भागाकडे मोर्चा वळवला.

तेथे तर कोळीण मावशांची झुंबड उडाली होती. त्यात त्यांची बोलण्याची, माल खपवण्याची पद्धत एकदम रोखठोक आणि अंगावर येणारी होती. माशांचा विभाग असल्याने माल ठरवणे ते घासाघीस करणे वगैरे सगळे हक्क केदारकडे सोपवून आम्ही मजा बघत बसलो.

"ए भाऊ.. अरे भाऊ.. बघ, असला माल कुठे मिळणार नाही.."
"इतक्या पैशात कसा मिळेल असला मासा..?"
"नाय रे नाय.. इतक्या स्वस्त कसा होईल.."

वगैरे वाक्ये ऐकू येऊ लागली.

शेवटी केदारने बरोब्बर गाभोळीवाला मासा शोधून काढला, भाव ठरवला आणि तो बाकीच्यांसोबत गप्पा मारत बसला.

मासे कसे कापतात ते बघण्याची उत्सुकता असल्याने मी त्या कोळीण मावशीचे काम बघत बसलो.

"कुठून आलास रे..?" माशांचे खवले काढताना त्या मावशीने विचारले.

"पुण्यातून" मी सांगितले. "मावशी, आम्ही सायकलवरून आलो आहोत." मी उगाच कॅसेट वाजवली.

"असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ." मावशी शांतपणे मासे चिरता चिरता उद्गारली.

मी : "ऑ..?????"

"ओ मावशी.. वाईट दिवस नाही.. मजा म्हणून फिरतोय सायकलवरून." मी पडलेला चेहरा उचलत थोडी सारवासारव करायचा प्रयत्न केला.

"अस्सा अस्सा" त्या मावशीला काहीही फरक पडला नव्हता, ती एकाग्र चित्ताने माशांचे काम करत बसली होती.

************************************************************

तुम्हालाही प्रवासात असे अनेक अनुभव आले असतील. मजेदार, फजिती झाल्याचे किंवा कुणाचीतरी फजिती केल्याचेही.. असे अनुभव येथे जरूर लिहा.. :)

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

9 Sep 2016 - 2:26 pm | मी-सौरभ

तुमच्या असल्या सहली साठी सामान घेउन जाय्ला एखादा कार वाला लागला तर कळव. सायकल एवढी चालवणे आपल्यच्याने होणारे नाही.

सचिन चौगुले's picture

9 Sep 2016 - 2:56 pm | सचिन चौगुले

मस्तच लिहिलय..:)

भम्पक's picture

9 Sep 2016 - 6:02 pm | भम्पक

लय भारि रे मोद्का, नेहेमीप्रमाणेच खास .....पण ते BRM म्हणजे काय रे भाऊ ...?

मोदक's picture

9 Sep 2016 - 7:03 pm | मोदक

धन्यवाद.. :)

ही लिंक बघा.. http://www.misalpav.com/node/28825

BRM - बाइक रेमटावणारी माणसे!

Brevet des Randonneurs Mondiaux. Brevets are long-distance, free-paced cycling events.

मोदक's picture

9 Sep 2016 - 8:28 pm | मोदक

हा हा.. खरे आहे..! :))

विद्याधर१९७४'s picture

9 Sep 2016 - 10:08 pm | विद्याधर१९७४

मोदकराव
एकदा अणुस्कुरा घाटात जा. फार छान आहे या दिवसात.

विद्याधर१९७४'s picture

9 Sep 2016 - 10:19 pm | विद्याधर१९७४

कोल्हापुरपासून सुमारे ५० किमि अन्तरावर घाट सुरू होतो.

आता आंबा घाटाचे प्लॅंनिंग सुरू आहे, आंबा घाटानंतर हा घाटही सर करण्यात येईल.

माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

बादवे, राजे सिद्दीच्या वेढ्यात असताना "टोपीकर अनुस्कुरा वाटेने सिद्दीला मिळाले" असे वाचले आहे. तो हाच घाट का?

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Sep 2016 - 9:58 pm | स्वच्छंदी_मनोज

बादवे, राजे सिद्दीच्या वेढ्यात असताना "टोपीकर अनुस्कुरा वाटेने सिद्दीला मिळाले" असे वाचले आहे. तो हाच घाट का?

>>>

एरिया तोच पण तो वायला आणि हा वायला. हा गाडीचा आणि तो जुना घाटवाट.
रच्याकने: हा घाट तसा फेमस आहे. विशाळगड वेढ्याच्या वेळेला टोपीकर याच घाटाने आले आणि मुघलांनी संभाजीला याच घाटाने संगमेश्वराहून पकडून वरघाटी नेले असे म्हणतात

मुकर्रबखानाने अणस्कुरा नव्हे तर मळेघाटाच्या निबिड अरण्यातल्या वाटेने संभाजीराजांना वरघाटी नेले.

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Sep 2016 - 1:35 pm | स्वच्छंदी_मनोज

मुकर्रबखानाने अणस्कुरा नव्हे तर मळेघाटाच्या निबिड अरण्यातल्या वाटेने संभाजीराजांना वरघाटी नेले.

>>> नवीन माहीती कळली. हा मळे घाट म्हणजे जुना वासोट्याच्या पायथ्याच्या मळदेव गावातून जाणारा काय? याचेच नाव रेडेखिंड पण ना?

प्रचेतस's picture

12 Sep 2016 - 7:46 pm | प्रचेतस

नाही.

हां संगमेश्वर- शृंगारपूर- निवडीवाडी (पायथा) ते मळे (घाटमाथा) असा जातो.
सध्याचं चांदोली अभयारण्य. आजही हा भाग प्रचंड दुर्गम आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Sep 2016 - 9:15 pm | स्वच्छंदी_मनोज

वोक्के. धन्यवाद. माहीतीबद्दल.
आजही हा भाग दुर्गम आहे हे खरेच आणी कोयना-चांदोली संरक्षीत अभयारण्यामुळे अजूनच डेंजर झालाय :)

लेख वाचायला वेळ झाला खरा...पण वाचल्याचे सार्थक झाले. अफ्फाट अनुभव आहेत एकेक. _/\_

विद्याधर१९७४'s picture

11 Sep 2016 - 7:24 pm | विद्याधर१९७४

तोच घाट असावा. साधारण ८ किमि चा आहे. कोल्हापुर कळे बाजार भोगाव अणुस्कुरा पाचल ओणि राजापुर असा मार्ग सिन्धुदुर्ग जिल्ह्याकडे जातो.

शिव कन्या's picture

11 Sep 2016 - 10:47 pm | शिव कन्या

सायकल म्हणजे 'हवाहवासा' एकांत.
खूप फायदे आहेत.
किस्से लक्षात राहण्यासारखे.