एक सल्ला हवा आहे म्हणून आज हे लिहितोय.....
आजकाल समाजात बरेच लोक जगाला दाखवण्यासाठी ( specially social media...whatsapp group etc. वर ) समाजशील...समजूतदार...सोशिक ई....रूप घेतात पण प्रत्यक्षात त्यांचे खरे रूप वेगळेच असते ( जे त्यांचा स्वार्थ असेल तेव्हा लगेच दिसून येते !!). आमच्या सोसायटीत सकाळी पाणी येते तेव्हा बरेचसे लोक पम्प लावून extra टाक्या भरून घेतात..त्यामुळे दुसऱ्यांना खूपच कमी पाणी मिळते ...कधी कधी मिळत ही नाही...मात्र हे पाणी खेचून घेणारे लोक सोसायटीच्या "whatsapp group " वर चर्चा करतांना मात्र खूप च सज्जनपणाचा/ समाजसेवाकाचा आव आणतात....जणू काही ते नाही च त्यातले...सोसायटी ऑफिस मध्ये तक्रार केली तर पदाधिकारी नाव घेऊन तक्रार करा म्हणून सांगतात...नावे सांगितली तरीही अश्या लोकांवर काही कारवाई होत नाही...आम्ही काही लोकांची नावे सांगितली ( मोठी सोसायटी आहे...जवळपास 300 घरे ...) तर सोसायटी पदाधिकारी म्हणतात की आम्ही त्या लोकांना तोंडी warning दिली आहे...परंतु आम्ही काही त्यांच्या घरात जाऊन त्यांना रोज सकाळी पम्प लावण्यापासून/अधिकचे पाणी खेचून घेण्यापासून रोखू शकत नाही..."sophisticated...decent" सोसायटीत तसे कुणी करू शकत नाही...( म्हणजे आम्ही तक्रार करणारे sophisticated...decent .. नाहीतच !!!!)...आम्ही काही लोकांनी त्या एक तासासाठी सोसायटीचा वीजपुरवठा बंद करायचे option सुचवून पाहिले पण ते option चांगले नाही...कारण प्रामाणिक लोकांना ही त्यांची चूक नसतांना त्रास होईल...
मीही त्या लोकांप्रमाणे पम्प लावून पाहिजे तितके पाणी खेचून घ्यावे हा एक उपाय आहे...परंतु तो मला पटत नाहीये.....समस्त मिपाकरांना विनंती आहे की अश्या ढोंगी लोकांना उघडे पाडण्यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय सुचवावा...
प्रतिक्रिया
5 Jul 2016 - 3:57 pm | सूड
ढोंगी लोकांना उघडं पाडायचंय की त्यांची चोरी उघड करायची आहे ते एकदा पक्कं करा.
5 Jul 2016 - 4:03 pm | गणामास्तर
सोसायटी हापिसात तक्रार करून काही साध्य होत नसेल तर स्वतः त्यांना समजावून पहा. नाहीचं सुधारले
तर मग असे काही तरी करा की त्यांना त्रास होईल. वेळप्रसंगी फटके द्यायला पुढे मागे पाहू नका.
5 Jul 2016 - 4:13 pm | मराठी कथालेखक
त्यांना उघडं पाडून तुमचा हेतू साध्य होईल का ?
तुमचा हेतू आहे कि तुम्हाला योग्य प्रमाणात पाणी मिळावे.
तुम्ही (आणि तुमच्यासारखे इतर) यांनी फक्त 'आम्हाला पुरेसे पाणि मिळत नाही' इतकीच तक्रार करत रहायचे, त्या तक्रारीचे निवारण सोसायटीच्या कमिटीने कसे करायचे (पंप लावणार्यांवर कारवाई, अधिक वेळ पाणी सोडणे, टँकर बोलावणे ई ई) हा त्यांचा प्रश्न आहे.
तुम्हीही पंप लावणे हा साधा सरळ उपाय आहे , त्यात न पटण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. पंप लावून तुम्ही फक्त गरजेपुरतेच पाणी भरणार असाल (वर म्हणताय तसे इतरांसारखे एक्स्ट्रा टाक्या न भरता) तर अपराधीपणा वाटण्याचे कारण नाही. सोसायटीची कमिटी जेव्हा सगळ्या पंपवाल्यांवर कारवाई करेल तेव्हा तुम्हीही पंप बंद करा.
बाकी हे वापराच्या पाण्यासाठी आहे की पिण्याच्या ? वापरायच्या पाण्याकरिता नलिकाविहिरिचे पाणी नाही का सोसायटीत ? नसेल तर नलिकाविहिर बनवण्यास सुचवा, तगादा लावा.
प्रश्न फक्त पिण्याच्या पाण्याचा असेल तर प्रश्न मोठा नाहीये. RO फिल्टर्स वापरुन तुम्ही विहिरेचे पाणी देखील पिण्यायोग्य बनवू शकता.
5 Jul 2016 - 4:29 pm | कंजूस
विरारमध्ये काही सोसायट्यांत टँकरने पाणी आणावे लागते त्यांच्याकडे प्रत्येक ब्लॅाकला पाण्याचा मीटर ला वलेला आहे.मिटररिडिंगमुळे प्रत्येकाचा पाण्याचा वापर न सांगताच कमी राहातो.बिनपाण्याची स्वत:चीच करतात लोक.
5 Jul 2016 - 4:45 pm | गंम्बा
जे लोक पंप लाऊन टाक्या भरुन घेतात ते नक्की काय चुक करतात? ते दुसर्यांना आडवतात का पंप लावायला?
पाण्याचा अभाव असेल तर प्रत्येकानी जमेल तसा प्रयत्न केला तर काय चुक? तुम्ही पण पंप लावा.
असा पंप लावणारा माणुस सज्जन नाही हे पटत नाही.
तसे तर तुम्ही जितके पाणी वापरतात त्याच्या १० टक्के पाणी पण दुष्काळी भागात मिळत नाही, तरी तुम्ही वापरता. मग तुम्ही काय दुर्जन ठरता का?
5 Jul 2016 - 5:20 pm | राजाभाउ
पंप लाउन टाक्या भरुन घेतात म्हणजे ? कुठ पंप लावतात हे नाही समजले. म्हणजे सोसायटीचे एक किंवा अनेक सामाइक हौद असतील ना ? त्या हौदाला तर ते पंप लाउ शकत नाहीत, मग पंप कुठे लावतात ? आणि जास्त पाणी कसे घेतात ? म्हणजे एक दिवस त्यांनी टाक्या भरुन घेताल्या आता दुसर्या दिवशी जेव्हड पाणी संपले असेल तेव्हडेच पाणी घेणार ना ?
सोसायटी ऑफिस मध्ये रितसर लेखी तक्रर द्या, त्यांच्या कडुन रितसर पोच पावती घ्या किंवा रजिस्टर पोष्टाने तक्रार पाठवा.
5 Jul 2016 - 6:08 pm | मार्मिक गोडसे
तुमची स्वतःची पाण्याची गरज किती आहे? तेव्हडे मिळते का? कदाचीत ती लोकं मोटार लावून कमी वेळेत त्यांच्या गरजे इतकेच पाणी भरत नसतील कशावरून ?
5 Jul 2016 - 7:55 pm | विवेकपटाईत
पंप लावा एकच उपाय
5 Jul 2016 - 8:15 pm | IT hamal
प्रतिसादाबद्दल आभार ....
-आमची स्वतंत्र घरांची सोसायटी आहे...प्रत्येकाला 1 सेपरेट टाकी आहे..500 लिटर ची....पण काही लोकांनी आपापल्या घरात अजून एक एक्सट्रा टाकी बसवून घेतलीय...आणि असे लोक इलेकट्रीक मोटार लावून दोन्ही टाक्या भरून घेतात...त्यामुळे इतर लोकांची एक टाकीही धड भारत नाही...कारण दुसऱ्यांच्या हिश्शयाचे पाणी असे लोक खेचून घेतात...त्यामुळे काहींना 1500-2000 लिटर पाणी मिळते तर काहींना धड 200 लिटर ही मिळत नाही त्यामुळे काहींना तर कधी कधी दुकानातून पाणी विकत घ्यावे लागते (पिण्याचे पाणी) कारण त्यांच्या टाकीत 100-150 लिटर पाणी येईपर्यंत सोसायटीच्या कॉमन टाकीतले पाणी संपून ही गेलेले असते ( कारण एक्सट्रा टाकीवाल्यांनी ते खेचून घेतलेले असते !!!)...
मला वाटते इथे सुचवला गेलेला एक प्रॅक्टिकल उपाय ( आपण ही पम्प वापरावा ....कशाला इतरांची काळजी करत बसावे -:)...हाच ह्या प्रश्नावर बेस्ट उपाय आहे...प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद...
6 Jul 2016 - 3:21 pm | माहितगार
पाण्याचा वापर घरात जेवढ्या व्यक्ति आहेत त्यां प्रमाणात सहसा काँन्सस्टंट राहील जास्त स्टॉक कपॅसिटीमुळे एकदाच जास्त पाणी भरले जाईल पुन्हा पुन्हा जास्त पाणी सहसा भरले जाणार नाही.
मुख्य प्रश्न पाण्याच्या उपलब्धतेचा आहे. एकुण रहिवासी व्यक्तींच्या सरासरी वापरा पेक्षा पाण्याची उपलब्धता कमी असेल तर ती वाढवावयास हवी. उपलब्धता तत्काळ वाढवणे शक्य नसेल तर अधिक बचत = अधिक उपलब्धता हे तत्व ही लावता येते, उपयोग झाला की पाणि आपोआप बंद होईल अशा नळाच्या तोट्या सोसायटीतील सर्व घरात लावल्यास अंशतः तरी पाणी बचत साध्य व्हावी. सांडपाण्याचे पुर्नवापरासाठी उपलब्धता वाढवणारी यंत्रणेची सिमेन्सची जाहीरात पाहीली होती पाण्याची उपलब्धता इतर मार्गाने वाढत नसेल तर तुमच्या सोसायटीने अशा उपायांबद्दल विचार करावयास हवा.
महानगरीय जिवनात नळावरील भांडणे करण्यास फारसा वेळ उपलब्ध होण्याची शक्यता सहसा कमी असते. त्यामुळे उपलब्धता वाढवणार्या इतर पर्यायांचा विचार करणे उत्तम.
5 Jul 2016 - 9:28 pm | तुमचा अभिषेक
एक शंका,
जर सोसायटीतील सर्वांनीच पंप लावला तर पाण्याचे वाटप कसे होईल? समान ??
म्हणजे मग एण्ड ऑफ द डे समान वाटपच होणार असेल तर सारे जण पंपाचा खर्च फुकट करत राहणार ..
माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा स्वार्थ आहे. ईतरांवर कुरघोडी करायचा हा स्वभावच त्याचा एक दिवस नाश करणार. यात तुम्ही आम्ही सर्वच आलो
6 Jul 2016 - 3:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
ढोंगी लोकांना उघडे पाडायचे सोडा. तुम्हाला पाणी पुरेसे मिळेल कसे? याचा विचार करा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार्या कोणालातरी बोलवा आणि प्लान करा. प्रश्न बराच सुटेल.
6 Jul 2016 - 7:20 pm | नूतन सावंत
मला गेले चार महिने हाच त्रास होत होता.मी दर आठवड्याला सोसायटी सेक्रेटरीला देत होते.आमच्या सोसायटीत पाच विंग्स असून प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत.त्या सगळ्यांकडे व्यवस्थित पाणी येत होते.फक्त माझ्याच घरी प्रॉब्लेम होता.सोसायटीने नेमलेल्या प्लंबरने पाणी येते त्यावेळी येऊन परीक्षण करून सांगितले की,कोणीतरी या लाईनमध्ये पंप लावून पाणी खेचत आहे.यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने आता कारवाई केली नाही तर सेसेक्रेटरी व चेअरमन यांचा नावाने पोलिसतक्रार करेन असे लिहून दिल्यावर मात्र सूत्रे हलली.आणि आता पाणी येण्याच्या वेळी लाईट बंद केले जातात.त्यामुळे पंप लावणाऱ्या लोकांना पाणीचोरी करता येत नाही.
6 Jul 2016 - 7:23 pm | नूतन सावंत
सोसायटी सेक्रेटरीला लेखी पत्र देत होते,असे वाचावे.