एक सल्ला हवा आहे म्हणून आज हे लिहितोय.....
आजकाल समाजात बरेच लोक जगाला दाखवण्यासाठी ( specially social media...whatsapp group etc. वर ) समाजशील...समजूतदार...सोशिक ई....रूप घेतात पण प्रत्यक्षात त्यांचे खरे रूप वेगळेच असते ( जे त्यांचा स्वार्थ असेल तेव्हा लगेच दिसून येते !!). आमच्या सोसायटीत सकाळी पाणी येते तेव्हा बरेचसे लोक पम्प लावून extra टाक्या भरून घेतात..त्यामुळे दुसऱ्यांना खूपच कमी पाणी मिळते ...कधी कधी मिळत ही नाही...मात्र हे पाणी खेचून घेणारे लोक सोसायटीच्या "whatsapp group " वर चर्चा करतांना मात्र खूप च सज्जनपणाचा/ समाजसेवाकाचा आव आणतात....जणू काही ते नाही च त्यातले...सोसायटी ऑफिस मध्ये तक्रार केली तर पदाधिकारी नाव घेऊन तक्रार करा म्हणून सांगतात...नावे सांगितली तरीही अश्या लोकांवर काही कारवाई होत नाही...आम्ही काही लोकांची नावे सांगितली ( मोठी सोसायटी आहे...जवळपास 300 घरे ...) तर सोसायटी पदाधिकारी म्हणतात की आम्ही त्या लोकांना तोंडी warning दिली आहे...परंतु आम्ही काही त्यांच्या घरात जाऊन त्यांना रोज सकाळी पम्प लावण्यापासून/अधिकचे पाणी खेचून घेण्यापासून रोखू शकत नाही..."sophisticated...decent" सोसायटीत तसे कुणी करू शकत नाही...( म्हणजे आम्ही तक्रार करणारे sophisticated...decent .. नाहीतच !!!!)...आम्ही काही लोकांनी त्या एक तासासाठी सोसायटीचा वीजपुरवठा बंद करायचे option सुचवून पाहिले पण ते option चांगले नाही...कारण प्रामाणिक लोकांना ही त्यांची चूक नसतांना त्रास होईल...
मीही त्या लोकांप्रमाणे पम्प लावून पाहिजे तितके पाणी खेचून घ्यावे हा एक उपाय आहे...परंतु तो मला पटत नाहीये.....समस्त मिपाकरांना विनंती आहे की अश्या ढोंगी लोकांना उघडे पाडण्यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय सुचवावा...
वर्गीकरण
वाचन संख्या
3412
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ढोंगी लोकांना उघडं पाडायचंय
सोसायटी हापिसात तक्रार करून
त्यांना उघडं पाडून तुमचा हेतू
विरारमध्ये काही सोसायट्यांत
जे लोक पंप लाऊन टाक्या भरुन
पंप लाउन टाक्या भरुन घेतात
तुमची स्वतःची पाण्याची गरज
पंप लावा एकच उपाय
धन्यवाद ....
अंशतः तार्कीक उणीव
In reply to धन्यवाद .... by IT hamal
एक शंका,
प्रश्न नक्की काय आहे?
मला गेले चार महिने हाच त्रास
सोसायटी सेक्रेटरीला लेखी पत्र