कोलंबी घालून अळूची आमटी

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
1 Jul 2016 - 11:06 am

कोलंबी घालून अळूची आमटी.

.

कोलंबी पुराणातला हा कितवा अध्याय बऱं?कितवाही असुंदेत.सगळ्याच अध्यायांसारखा स्वादिष्ट,चविष्ट.सौ.वसुमती धुरू यांच्या,एका पुस्तकात वाचलेला पण त्यात थोडा बदल करून केलेला प्रकार.शिवाय खोबऱ्यासह किंवा खोबऱ्याशिवाय करता येणारा.कोथिम्बिरीचीसुद्धा गरज नसणारा.माझ्या आवडीप्रमाणे कमीत कमी साहित्य लागणारा. अळू,मिरची,लसूण,मीठ,कोकमं,तेलआणि कोलंबी इतकंच हवं.यासाठी कोशाची कोलम्बीही वापरता येते.मी इथे पूर्ण सोलून घेतली आहे.साहित्य सांगितलं आहेच किती प्रमाण ते सांगते.

साहित्य:-
१. १५ ते २० अळूची पाने.
२. सात /आठ लसूणपाकळ्या.
३. आवडीनुसार हिरव्या मिरच्या.मी ५/६ घेते.
४. चवीनुसार मीठ.
५. चार/पाच कोकमं(तुम्ही चिंच वापरली तरी चालेल.)
६. एक टीस्पून तेल.
७. १०/१२ कोलंब्या(मोठ्या).लहान घेतल्या तर वाटीभर.
८. खोबरे हवे असेल तर अर्धी वाटी वाटूनघ्यायचे.(मी घातले नाही)

कृती:-
१. अळू सोलून देठीचे इंचभर तुकडे करून.पाने हातानेच तळहाताएवढे तुकडे करून घ्यावीत.
२. एका पातेल्यात अळू,मिरच्या, पाणी आणि थेंबभर तेल घालून शिजवून घ्यावा.
३. शिजलेले मिश्रण निथळून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
४. टोपात तेल घालून त्यावर लसूण ठेचून घालावा.
५. त्यावर कोलंबी घालून परतून घ्यावी.रंग बदलला की वाटलेला अळू घालावा.उल्रेले पाणी घालून हवेतर अजून पाणी घालून उकळू द्यावे.खोबरे घालणार असाल तर तेही घालावे.)
६.कोकमं आणि मीठ घालून दोन मिनिटांनी उतरावे.
गरमागरम भातावर वाढून आस्वाद घ्यावा.भाकरीसोबतही छान लागते,पण खरी लज्जत भातासोबतच.

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

1 Jul 2016 - 11:49 am | रुस्तम

बागेचं पुढे काय झालं? किती दिवस झाले नवीन भाग नाही. :(

चविष्ट दिसतंय.आम्ही अळूची खाऊ नुसती :)

कोलंबीच फतफत म्हणाव का? आळूच म्हणतो तस.

छान रेसिपी.

पद्मावति's picture

1 Jul 2016 - 1:50 pm | पद्मावति

छान आहे पाककृती.

स्मिता चौगुले's picture

1 Jul 2016 - 2:06 pm | स्मिता चौगुले

दिसतय तर टेम्टींग..:)

करुन खावून बघनेत येईल..

सूड's picture

1 Jul 2016 - 2:51 pm | सूड

अळुकोलंबीचं फदफदं!!

विशाखा राऊत's picture

1 Jul 2016 - 4:10 pm | विशाखा राऊत

अळु आणि चिंगळा मस्त लागेल असे वाटते. पुढच्या भारत वारीला खावुन बघेन हा ताई (अर्थात तुला भेटुन ;) )

नूतन सावंत's picture

2 Jul 2016 - 9:46 am | नूतन सावंत

विषा,सुस्वागतम्!

कविता१९७८'s picture

1 Jul 2016 - 5:43 pm | कविता१९७८

मस्त

उल्का's picture

1 Jul 2016 - 6:56 pm | उल्का

पालकपनीर सारखं दिसतंय अळुकोलंबी. :)
वेगळीच मस्त पाकृ!

चंपाबाई's picture

1 Jul 2016 - 8:05 pm | चंपाबाई

मी वळूची आमटी वाचले

कविता१९७८'s picture

1 Jul 2016 - 11:24 pm | कविता१९७८

मेले हसुन हसुन

नूतन सावंत's picture

2 Jul 2016 - 10:44 am | नूतन सावंत

तुम्ही वळू म्हणजे बीफ खाता का?

हे कॉम्बिनेशन माहीत नव्हतं. वेगळाच प्रकार. असंच पालकाचंही होईलसं वाटतं.

नूतन सावंत's picture

2 Jul 2016 - 9:45 am | नूतन सावंत

हो होतं ना!पण पालकाला एका कांदा आणि टॉमेटो बारीक चिरून आधी फोडणीत परतायचा.कोकमं नाही घालयाची.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2016 - 9:54 am | मुक्त विहारि

जबरदस्त काँबो.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2016 - 9:56 am | मुक्त विहारि

बर्‍याच वेळा खाल्ली आहे.

आता एकदा अळू बरोबर पण ट्राय करून बघायला हवी.

(स्वगत : आमच्या घरात अळू येतो तो फक्त अळू-वड्या साठी.अळूवड्यात पण खिमा किंवा कोलंबी घालून बघायला हवी.)

नूतन सावंत's picture

2 Jul 2016 - 10:42 am | नूतन सावंत

मुवि,वडीचा न भाजीचा अळू वेगवेगळा असतो.अळूवडीत,खिमा कोलंबी घालून अफलातून होते.बेसनातच वाटून मिसळायचे.

ओके...

आता एखाद्या रविवारी कोलंबीला अळूच्या संगे तळायला घेतो.

केडी's picture

2 Jul 2016 - 5:28 pm | केडी

पालक,वांगी ह्या भाज्या कोळंबी घालून केलेल्या खाल्या आहेत, अळूची हि पाककृती करून बघायलाच हवी!