कोलंबी घालून अळूची आमटी.
कोलंबी पुराणातला हा कितवा अध्याय बऱं?कितवाही असुंदेत.सगळ्याच अध्यायांसारखा स्वादिष्ट,चविष्ट.सौ.वसुमती धुरू यांच्या,एका पुस्तकात वाचलेला पण त्यात थोडा बदल करून केलेला प्रकार.शिवाय खोबऱ्यासह किंवा खोबऱ्याशिवाय करता येणारा.कोथिम्बिरीचीसुद्धा गरज नसणारा.माझ्या आवडीप्रमाणे कमीत कमी साहित्य लागणारा. अळू,मिरची,लसूण,मीठ,कोकमं,तेलआणि कोलंबी इतकंच हवं.यासाठी कोशाची कोलम्बीही वापरता येते.मी इथे पूर्ण सोलून घेतली आहे.साहित्य सांगितलं आहेच किती प्रमाण ते सांगते.
साहित्य:-
१. १५ ते २० अळूची पाने.
२. सात /आठ लसूणपाकळ्या.
३. आवडीनुसार हिरव्या मिरच्या.मी ५/६ घेते.
४. चवीनुसार मीठ.
५. चार/पाच कोकमं(तुम्ही चिंच वापरली तरी चालेल.)
६. एक टीस्पून तेल.
७. १०/१२ कोलंब्या(मोठ्या).लहान घेतल्या तर वाटीभर.
८. खोबरे हवे असेल तर अर्धी वाटी वाटूनघ्यायचे.(मी घातले नाही)
कृती:-
१. अळू सोलून देठीचे इंचभर तुकडे करून.पाने हातानेच तळहाताएवढे तुकडे करून घ्यावीत.
२. एका पातेल्यात अळू,मिरच्या, पाणी आणि थेंबभर तेल घालून शिजवून घ्यावा.
३. शिजलेले मिश्रण निथळून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
४. टोपात तेल घालून त्यावर लसूण ठेचून घालावा.
५. त्यावर कोलंबी घालून परतून घ्यावी.रंग बदलला की वाटलेला अळू घालावा.उल्रेले पाणी घालून हवेतर अजून पाणी घालून उकळू द्यावे.खोबरे घालणार असाल तर तेही घालावे.)
६.कोकमं आणि मीठ घालून दोन मिनिटांनी उतरावे.
गरमागरम भातावर वाढून आस्वाद घ्यावा.भाकरीसोबतही छान लागते,पण खरी लज्जत भातासोबतच.
वाचने
8034
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
ताई
चविष्ट दिसतंय.आम्ही अळूची खाऊ
कोलंबीच फतफत म्हणाव का? आळूच
छान आहे पाककृती.
दिसतय तर टेम्टींग..:)
अळुकोलंबीचं फदफदं!!
अळु आणि चिंगळा मस्त लागेल असे
विषा,सुस्वागतम्!
In reply to अळु आणि चिंगळा मस्त लागेल असे by विशाखा राऊत
मस्त
मस्त
.
मेले हसुन हसुन
In reply to . by चंपाबाई
तुम्ही वळू म्हणजे बीफ खाता का
In reply to . by चंपाबाई
हे कॉम्बिनेशन माहीत नव्हतं.
हो होतं ना!पण पालकाला एका
In reply to हे कॉम्बिनेशन माहीत नव्हतं. by गवि
पालक+कोलंबी
In reply to हे कॉम्बिनेशन माहीत नव्हतं. by गवि
पालक+कोलंबी
मुवि,वडीचा न भाजीचा अळू
In reply to पालक+कोलंबी by मुक्त विहारि
अळूवडीत,खिमा कोलंबी घालून अफलातून होते.
In reply to मुवि,वडीचा न भाजीचा अळू by नूतन सावंत
वाह!