लसणाचे लोणचे (पंजाबी स्टाईल)

आनंदी गोपाळ's picture
आनंदी गोपाळ in पाककृती
20 Jun 2016 - 9:20 am

पहिला पाऊस पडला की लोणच्याचा सीझन सुरू होतो. तर हे रविवारचा मुहूर्त काढून केलेले लसणाचे सोप्पे लोणचे.

01

साहित्य :

२०० ग्रॅम लसणाच्या पाकळ्या, सोलून.
व्हिनेगर : २ चमचे
मोहोरीचं तेल : ३ चमचे (इतर तेलं टाकलीत तर ती चव येत नाही)

हळद : १/२ (अर्धा) चमचा
मेथीदाणे : १ चमचा
लाल तिखट : १/२ चमचा
बडीशोप : १ चमचा
जिरेपूड : १/२ चमचा
कलौंजी : १ चमचा
मोहोरी डाळ : १ चमचा
हिंग : १/४ चमचा
मीठ : १ मोठा चमचा.

कृती :

लसणाच्या पाकळ्या ३-४ मिनिटे वाफवून घेणे. यासाठी एका भांड्यात पाणी उकळवून, त्यावर लसूण पाकळ्या जाळीत/चाळणीत ठेवाव्या, वर हलके झाकण ठेवावे. याने लसणाचा उग्रपणा कमी होतो, व लोणचे लवकर मुरते.

यानंतर लसूण स्वच्छ किचन टॉवेलवर पसरून ३-४ तास वाळू द्यावा, कोरडा व्हायला पाहिजे.

आता जाड बुडाच्या भांड्यात सरसोचे (मोहोरीचे) तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. सरसोच्या तेलाची स्ट्राँग चव आवडत असेल, तर फार गरम नाही केले तरी चालेल.

गॅस बंद करून त्यात लसूण व सर्व मसाले व मीठ घालून एकत्र करावे.

व्हिनेगर इतक्यात टाकू नये. वरील मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात व्हिनेगर, व मिठाची चव अ‍ॅडजस्ट करावी. व्हिनेगर ऐवजी लिंबाचा रस चालतो, पण परत चव बदलते..

02

अधिक टिपा :

पुरवून पुरवून खाण्याची गरज नाही. कोणत्याही सीझनला ताजे करता येईल. एंजॉय!

प्रतिक्रिया

गोपाळराव पहिला फोटो काय कातिल आलाय ओ, आर्टपीसच एकदम. स्टील लाईफ ची असाईनमेंट वाटतेय जणू.
बाकी लोणचे पण छानच

अत्रन्गि पाउस's picture

20 Jun 2016 - 2:25 pm | अत्रन्गि पाउस

+1

रातराणी's picture

21 Jun 2016 - 10:33 am | रातराणी

तंतोतंत!

उल्का's picture

20 Jun 2016 - 10:41 am | उल्का

तों पा सु.

अजया's picture

20 Jun 2016 - 10:58 am | अजया

लै भारी!

पद्मावति's picture

20 Jun 2016 - 12:06 pm | पद्मावति

फारच मस्तं!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

20 Jun 2016 - 2:37 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

छान फोटो व रेसिपी, आवडेश.

वाह ! तिखट लागतं का पण हे फार? आणि किती टिकतं?

आनंदी गोपाळ's picture

20 Jun 2016 - 9:28 pm | आनंदी गोपाळ

लोणचं टिकणं, हे टोटली मिठावर अवलंबून असतं. आमच्या घरी आम्ही गेल्या ७-८ वर्षांपासून कैरीचंही लोणचं अ‍ॅबसोल्यूटली बिना तेलाचं बनवतो. व ते किमान वर्षभर तरी टिकतंच टिकतं. ओला हात, कोरडा हात, विटाळ काऽहीऽही होत नाही त्याला.

अगदी सोप्पी रेस्पी म्हणजे, रेडिमेड मसाले मिळतात, त्या पाकिटावरची टु द टी फॉलो करायची. उदा. केप्र मसाल्यावर १ किलो कैरीला एक पाकिट मसाला व २०० ग्रॅम मिठ सांगितलं असेल, तर २०० ग्रॅम टाकलेच पाहिजे. ते केलंत, तर वर्षानंतरही कैरी अशी मस्त करकरीत लागते.

बीपी आहे, म्हणून लोणच्यात कमी मीठ टाकू नका, लोणचेच अर्धा किलो कैरीचे करा, अन कमी खा. ;)

विवेकपटाईत's picture

20 Jun 2016 - 7:34 pm | विवेकपटाईत

अस्सल पंजाबी लोणचे, फोटो इतके सजीव आहेत कि सरळ हात टाकून लोणचे खाण्याची इच्छा झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2016 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

बायकूनी वाचली आणी करायला घेतली!

अ वांट्रर - बगू(अता) कशे होते लोन च्ये! ;)

रेवती's picture

20 Jun 2016 - 8:25 pm | रेवती

मस्तच दिसतोय फोटू.

आनंदी गोपाळ's picture

20 Jun 2016 - 9:22 pm | आनंदी गोपाळ

ही आमच्या ताईसाहेबांची रेसिपी आहे. पुणे एनडीए क्वार्टर्समधल्या मल्टिक्कल्चरल वातावरणात शिकलेली. बाकी इथे पटाईतजींकडून ऑथेंटिक पंजाबी दिसण्याची पावती आली म्हणजे बरोबर जमलेय म्हणायचे.

स्रुजा, तिखट जास्त हवं असेल, तर लाल तिखट जास्त कडक घ्या, किंवा/आणि क्वांटीटी वाढवा. हाकानाका. पण हे असंच मस्त लागतं. थोडं मुरल्यावर लसणाची पाकळी असली टेस्टी बनते..

कमी तापवलेलं तेल अन कच्चाच लसूण (वापरायचाच) असेल, तर मात्र २-३ दिवस बाटली कडक उन्हात ठेवावी. नाहीतर मजा येणार नाही.

नूतन सावंत's picture

20 Jun 2016 - 9:23 pm | नूतन सावंत

सुरेख दिसतेय लोणचे.

मिपा वर आल्या आल्या पहिल्याच दिव्शि एक नम्बर रेसिपि भेत्लि ,
उद्या च कर्तु, आभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2016 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त लागते हे लोणचे !

पहिला फोटो स्टिल् लाईफचा अविष्कार आहे !

चंपाबाई's picture

21 Jun 2016 - 9:24 am | चंपाबाई

छान

पियुशा's picture

21 Jun 2016 - 10:09 am | पियुशा

जबराट तो. पा. सु. दिसतय एकदम !!

धनंजय माने's picture

21 Jun 2016 - 10:35 am | धनंजय माने

लसून उग्र वासामुळे मुळात आवडत नाही. पण पाकृ आणि छायाचित्रण सुरेख जमलं आहे.