पहिला पाऊस पडला की लोणच्याचा सीझन सुरू होतो. तर हे रविवारचा मुहूर्त काढून केलेले लसणाचे सोप्पे लोणचे.
साहित्य :
२०० ग्रॅम लसणाच्या पाकळ्या, सोलून.
व्हिनेगर : २ चमचे
मोहोरीचं तेल : ३ चमचे (इतर तेलं टाकलीत तर ती चव येत नाही)
हळद : १/२ (अर्धा) चमचा
मेथीदाणे : १ चमचा
लाल तिखट : १/२ चमचा
बडीशोप : १ चमचा
जिरेपूड : १/२ चमचा
कलौंजी : १ चमचा
मोहोरी डाळ : १ चमचा
हिंग : १/४ चमचा
मीठ : १ मोठा चमचा.
कृती :
लसणाच्या पाकळ्या ३-४ मिनिटे वाफवून घेणे. यासाठी एका भांड्यात पाणी उकळवून, त्यावर लसूण पाकळ्या जाळीत/चाळणीत ठेवाव्या, वर हलके झाकण ठेवावे. याने लसणाचा उग्रपणा कमी होतो, व लोणचे लवकर मुरते.
यानंतर लसूण स्वच्छ किचन टॉवेलवर पसरून ३-४ तास वाळू द्यावा, कोरडा व्हायला पाहिजे.
आता जाड बुडाच्या भांड्यात सरसोचे (मोहोरीचे) तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. सरसोच्या तेलाची स्ट्राँग चव आवडत असेल, तर फार गरम नाही केले तरी चालेल.
गॅस बंद करून त्यात लसूण व सर्व मसाले व मीठ घालून एकत्र करावे.
व्हिनेगर इतक्यात टाकू नये. वरील मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात व्हिनेगर, व मिठाची चव अॅडजस्ट करावी. व्हिनेगर ऐवजी लिंबाचा रस चालतो, पण परत चव बदलते..
अधिक टिपा :
पुरवून पुरवून खाण्याची गरज नाही. कोणत्याही सीझनला ताजे करता येईल. एंजॉय!

वाचने
10727
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोपाळराव पहिला फोटो काय कातिल
अगदी असेच म्हणतो
In reply to गोपाळराव पहिला फोटो काय कातिल by अभ्या..
तंतोतंत!
In reply to गोपाळराव पहिला फोटो काय कातिल by अभ्या..
मस्त
लै भारी!
फारच मस्तं!
छान फोटो व रेसिपी, आवडेश.
वाह ! तिखट लागतं का पण हे फार
आणि किती टिकतं?
In reply to वाह ! तिखट लागतं का पण हे फार by स्रुजा
अस्सल पंजाबी लोणचे, फोटो
बायकूनी वाचली आणी करायला
मस्तच दिसतोय फोटू.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
सुरेख दिसतेय लोणचे.
मिपा वर आल्या आल्या पहिल्याच
मस्त लागते हे लोणचे !
.
जबराट तो. पा. सु. दिसतय एकदम
लसून उग्र वासामुळे मुळात आवडत