दाब चिकन बिर्याणी

केडी's picture
केडी in पाककृती
15 Jun 2016 - 4:30 pm

Dab Chicken Biryani

दाब चिंगडी (ह्याची रेसिपी इथेच कोणीतरी टाकलेली आहे) हा एक बेंगाली पदर्थ. शहाळ्यात (दाब) च्या आत चिंगडी (श्रिम्प/प्रांन्स) शिजवलेलं हि एक पाककृती . वायझाग/विशाखापट्ण्म जवळील अर्राकू येथील आदिवासी, अश्याच पद्धतीची एक पाककृती बनवतात - बोन्गुलो चिकन. हिरव्या बांबू च्या आत मध्ये मसाला लावलेला चिकन कोळश्यावर भाजून.
हे दोन्ही प्रकार एकत्र करून, मी केलेला हा प्रयत्न. अर्थात हि पाककृती कोळश्यावर केली तर अजून चविष्ट होईल.

साहित्य
२ शहाळी ,आतील पाणी आणि मलई/खोबर काढून (वरचा भाग/झाकण पण ठेवून घेणे. नारळ पाणी सुद्धा जपून ठेवणे)
४०० ग्रॅम चिकन चे तुकडे (बोनलेस सुद्धा चालू शकतील, पण मग ब्रेस्ट ऐवजी थाय घेणे)
१०० ते २०० ग्रॅम बासमती तांदूळ (हा भिजवायचा नाहीये)
१ ते २ मोठे चमचे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला पावडर
१ ते २ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
१ मोठा चमचा हळद पावडर
२ मोठे चमचे आलं, लसुण, हिरवी मिर्ची ची पेस्ट
३ ते ४ हिरव्या मिरच्या
४ ते ५ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर
४ ते ५ मोठे चमचे चिरलेला पुदिना (ताजा नसेल तर वाळलेला चालेल)
२ मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून
२ ते ३ मोठे चमचे तूप (किंवा तेल)
६ ते ८ हिरवे वेलदोडे
२ काळे वेलदोडे
२ दालचिनी च्या काड्या
२ तमालपत्र
१ लिंबू
मीठ, चवीनुसार
मळून घेतलेल्या कणकेचे २ गोळे

सजावटीसाठी
तळलेला कांदा
तळलेले काजू

Ingredients

कृती
आलं, लसुण, हिरवी मिर्ची ची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना पाणी न वापरता मिक्सर मधून बारीक करून घ्या. चिकन स्वच्छ धुऊन त्याला लिंबाचा रस, १ चमचा मीठ आणि वाटलेला १ चमचा मसाला, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर लावून, चिकनच्या मिश्रणात उभा चिरलेला कांदा आणि १ चमचा तूप घालून सगळ व्यवस्थित कालवून घ्या. साधारण ३० मिनिटे ते १ तास हे मिश्रण मुरत ठेवा.

Chicken

तांदळाला, उरलेला वाटलेला मसाला, तूप, गरम मसाला, मिरची हळद पावडर, मीठ लावून, व्यवस्थित तांदूळ कालवून घ्या.
Rice1 Rice2

चिकन आणि तांदूळ मिश्रणाचे २ भाग करून घ्या. प्रत्येक शहाळ्यात एक भाग चिकन, निम्मा खडा मसाला (वेलदोडे, तमालपत्र, दालचिनी), आणि निम्म्या हिरव्या मिरच्या टाकून, मग एक भाग तांदूळ मिश्रण घालावं. तांदूळ भिजतील इतपत पाणी घालावे. जास्ती दाबून भरू नये! इथे पाण्यात थोडा शहाळ्याच पाणी मिसळून घातलत तर एक वेगळीच चव येते.
Coconut1

शहाळी वरच्या तुकड्याने बंद करून, वरून कणकेने शीलबंद करून घ्यावी जेणेकरून वाफ बाहेर पडणार नाही.

Coconut2

ओवन १८० ला प्रि -हिट करून, शहाळी ओवन मध्ये ठेवावीत. साधारण एक ते दीड तास शहाळी ओवन मध्ये बेक करावी. (हि वेळ तुमच्या ओवन प्रमाणे ठरेल). अधून मधून चेक करत रहाणे. साधारण ६० ते ८० मिनिटांनी चिकन आणि तांदूळ शिजल्या च्या वासाने कळेल कि पाककृती तयार आहे.
Coconut3

शहाळी बाहेर काढून, १० मिनिटे ठेवावी. अलगद हाताने कणिक बाजूला करून, उघडावी (आता वाफ असल्याने जपून उघडावी), आणि बिर्याणी ताटात काढून वरून तळलेला कांदा व काजू पेरून पेश करावी!
Coconut4 Coconut5

ओवन ऐवजी, बार्बेक्यू किंवा कोळश्यावर शहाळी ठेवली तर चव अजून छान येईल! पाककृती चवीला छान आहेच, पण दिसते तेवढी अवघड अजिबात नाही! एकदा अवश्य करून बघा!

प्रतिक्रिया

उल्का's picture

15 Jun 2016 - 4:35 pm | उल्का

ऐकुन होते ह्या पाकृविषयी. छान चित्ररुपी लिहिली आहे. :)

कविता१९७८'s picture

15 Jun 2016 - 4:39 pm | कविता१९७८

मस्त

पगला गजोधर's picture

15 Jun 2016 - 5:30 pm | पगला गजोधर

साहित्य
२ शहाळी ,आतील पाणी आणि मलई/खोबर काढून (वरचा भाग/झाकण पण ठेवून घेणे. नारळ पाणी सुद्धा जपून ठेवणे)

पण तुम्ही शहाळ्याचे ओपनिंग १-२ इंच ठेवून आतली मलई काढली कशी ?
मलई पाहिजे म्हटल्यावर, आमचे नारळवाले आण्णा, नारळाचे उभे दोन तुकडे करून, मलई काढतात …

पिलीयन रायडर's picture

15 Jun 2016 - 5:56 pm | पिलीयन रायडर

हाच प्रश्न पडालाय. मागे दाब चिंगडीचे शाकाहारी व्हरजन बनवुन पाहु म्हणुन शहाळे आणायला गेले तर ते म्हणे की मलई हवी असेल तर नारळ फोडावा लागेल. तरी त्या बाईने शाळ्याचे तोंड जरा मोठे करुन दिले आणि म्हणे आता घरी जाऊन करा काय प्रयोग करायचेत ते. (ह्याच्यात मी भाजी करणारे म्हणल्यावर ती आधीच वेडी झाली होती!!)

पण रेसेपी मात्र लाजवाब आहे!

आदूबाळ's picture

15 Jun 2016 - 6:11 pm | आदूबाळ

पातळ मलईचं शहाळं घ्यायचं. लांब दांड्याचा चमचा तीनचतुर्थांश लांबीला वाकवून ती मलई काढून घ्यायची.

शाकाहारी जमलं कि पाक्रु टाका. तोवर इनो खातोय.

केडी's picture

16 Jun 2016 - 12:38 pm | केडी

....चिकन ऐवजी खालील भाज्या वापरा
१. मटार
२. गाजर, चिरलेला
३. बटाटे, सालं काढून उभे चिरलेले
४. फ्लावर
५. मुश्रूम, आवडत असल्यास

भाज्या कच्च्या वापरल्या तरी हरकत नाही, किंवा थोडा वेळ (एक मिनिट) गरम पाण्यातून उकळून (ब्लांच) करून घेणे (मश्रूम सोडून).ओवन मध्ये ५० मिनिटे ते एक तास पेक्षा जास्ती वेळ नाही लागणार. बाकी पाकृ लिहिल्या प्रमाणे. करून बघ.

केडी's picture

15 Jun 2016 - 6:38 pm | केडी

सुरी व चमच्याने सहज निघते. आणि जर ते करायच नसेल तर फक्त पाणीवाल शहाळ निवडा

पद्मावति's picture

15 Jun 2016 - 5:42 pm | पद्मावति

क्या बात है!!

बापरे! किती खटाटोप! पण छान.

बाबा योगिराज's picture

15 Jun 2016 - 6:07 pm | बाबा योगिराज

वो केदार भौ,
निस्ती जळजळ झाली.....!
आता मी येणार, पुण्याला जरूर येणार.

बाबा योगिराज's picture

15 Jun 2016 - 6:07 pm | बाबा योगिराज

वो केदार भौ,
निस्ती जळजळ झाली.....!
आता मी येणार, पुण्याला जरूर येणार.

केडी's picture

15 Jun 2016 - 6:39 pm | केडी

करूयात मस्त पार्टी!

मोदक's picture

15 Jun 2016 - 9:58 pm | मोदक

वाचतोय...

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2016 - 12:10 pm | टवाळ कार्टा

नक्की का? चायला जब्राट बिर्यानी आहे

कवा जाताव कळवुन जावा. जॉईन करु.

चतुरंग's picture

15 Jun 2016 - 10:07 pm | चतुरंग

शाकाहारी बिर्याणी देखील उत्तम होऊ शकेल असे वाटते!

(एक सूचना - सगळ्या साहित्याचे फोटो स्वतंत्रपणे काढून पदार्थाच्या पायर्‍यांचे फोटो थोडे नीटनेटके आणि स्वच्छ दिलेत ना तर वाचायला अतिशय सुंदर वाटतं. शेफ गणपाभौंच्या पाककृती या उदाहरण म्हणून बघू शकता. उदा. आंब्याचा बदामी हलवा.)

केडी's picture

16 Jun 2016 - 11:06 am | केडी

मी सविस्तर पाककृती माझ्या स्वतःच्या वेबसाइट वर इंग्रजीत टाकलेली आहे. मिपा वर बाहेरील दुवा टाकण्यास मनाई आहे, म्हणून आपल्याला व्यक्तिगत संदेश टाकून दुवा दिलेला आहे.आपल्याला वेळ मिळेल तेव्हा साईट ला भेट जरूर देणे!

चतुरंग's picture

16 Jun 2016 - 7:25 pm | चतुरंग

नक्कीच बघेन तुमची वेबसाईट! पुढीला पाकृसाठी शुभेच्छा! :)

रातराणी's picture

16 Jun 2016 - 1:28 pm | रातराणी

खतरनाक! पण भात आणि भाताचे प्रकार फारसे आवडत नाही त्यामुळे कुणी करून दिली तरच खाईन.

एस's picture

16 Jun 2016 - 4:17 pm | एस

तोंपासु पाककृती.

वेल्लाभट's picture

16 Jun 2016 - 5:10 pm | वेल्लाभट

मला सुरुवातीला हे शीर्षक म्हणजे आज्ञा किंवा आवाहन वाटलं. मग धागा उघडल्यावर उलगडा झाला. मी त्याचा उच्चार 'डाब' असा ऐकला होता.

पाकृ खलासच आहे, फोटो बिटो अफाटच. मला कल्पनाच आवडली शहाळ्यात घालून शिजवायची. करून बघणार मी हे.

आपण मृणालिनीच्या धाग्यावरच म्हणलं होतं. ह्येच्यावर भाताचा आयटम खतरी होणार म्हणून.
आलीच जबरी डिश.
भारीच

केडी's picture

17 Jun 2016 - 12:37 pm | केडी

.....एकदा हिरवा बांबू आणून त्यात चिकन शिजवून बघायचंय। जमलं तर त्याची पण छायाचित्रे टाकेन इथे।

आनंदी गोपाळ's picture

17 Jun 2016 - 5:30 pm | आनंदी गोपाळ

पोकळ बघून आणा ;)

(हलके घ्या. ओळखीपाळखीतील कुणा हौशी बागवानाकडे बांबूचे बन असू शकते.)

पैसा's picture

17 Jun 2016 - 6:03 pm | पैसा

मस्त पाकृ!

एकदम मस्त पाकृ. आता हे सुद्धा एकदा करुन बघायला पाहिजे, पण इथे शहाळे मिळत नाही. त्यामुळे पुढच्या भारतवारीची वाट बघायला लागेल.
हि माझ्या दाब चिंगरीच्या पाकृची लिंक. - http://misalpav.com/node/35136

स्वाती दिनेश's picture

21 Jun 2016 - 2:11 pm | स्वाती दिनेश

मस्त पाकृ!
स्वाती