मधातील मेवा फळं

उल्का's picture
उल्का in पाककृती
15 Jun 2016 - 4:26 pm

'भुकेला कोंडा नि नीजेला धोंडा' असे म्हणतात. मला भूक लागल्यावर शोध लावलेला 'कोंडा' हा बघा!

Snack

त्याचं काय झालं?
काही वर्षांपूर्वी...एकदा मला प्रचंड भूक लागली होती. घरी एकटीच होते. एकटीसाठी काही बनवायला मूड नव्हता अणि भुकेमुळे धीरही धरवत नव्हता. फ्रिज पाहिला तर उरलंसुरलं शिळंपाकं काही शिल्लक नव्हतं. घरात सफरचंद आणि केळी होती.

मग एका मोठ्या वाडग्यात एक सरचंद आणि एक केळं कापलं. २ अक्रोड, ४ बदाम, २ अंजीर, २ खारका, २ खजुर हा सुका मेवा तुकडे करुन घातला. वरुन एक मोठा चमचा मध घातला. सर्व नीट एकत्र केलं आणि शांत चित्ताने चवीने खाल्लं. पोट तर भरलच पण पुढचे ३-४ तास अजिबात भूक लागली नाही.

पुढच्या वेळी करताना मी त्यात डाळिबाचे दाणे आणि चिकू पण घातला होता. (एकदा अंजीर आणि खारका जुन्या वाटत होत्या. तर मी त्याना थोडं तूपात परतवून घेतलं. चवीला जास्त चांगलं लागलं होतं.) तुमच्या आवडीनुसार फळं आणि मेव्यात आणि त्यांच्या प्रमाणात फेरफार करु शकता.

टीप : दात नसलेल्या वृद्ध व्यक्तिंना देताना सफरचंदाचा कीस करावा आणि मेव्याची पूड करावी. फक्त मधुमेह असल्यास मध कमी घालावा आणि त्याना चालतील अशी इतर फळं घालावीत.

करायला सोप्पं आणि तब्येतीला चांगलं! १० मिनिटांत तयार होतं. गॅसची गरज नाही. सर्व कापुन फ्रिज मध्ये डब्यात भरुन ठेवल्यास भूक लागल्यावर पटकन खाता येतं. आणि हो, गारंगार जास्तच मस्त लागतं चवीला. (सफरचंद नुसतं फ्रिजमध्ये उघड्यावर ठेवल्यास दुधाला एक वेगळाच वास येतो. तेव्हा ते नेहमी बंद दब्यात ठेवावे.)

मला आणि माझ्या मुलांना खूप आवडतं. तुम्हालाही आवडेल अशी आशा करते.

- उल्का कडले

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

15 Jun 2016 - 4:43 pm | कविता१९७८

मस्त

यशोधरा's picture

15 Jun 2016 - 4:49 pm | यशोधरा

वा! मस्त आहे हे!

Maharani's picture

15 Jun 2016 - 5:05 pm | Maharani

Paushtik

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 5:13 pm | प्रचेतस

हे आवडलं.

खरं तर मेवा फळं म्हणताच आधी करवंद, जांभळं, तोरणं, जामफळं हा रानमेवा डोळ्यांसमोर आला होता. त्या दृष्टीनं अंमळ निराशा झाली.

उल्का's picture

15 Jun 2016 - 5:45 pm | उल्का

तुम्ही स्वच्छंदपणे रानात गडावर फिरणारे म्हणून तुम्हाला मेवा वाचल्यावर प्रथम रान मेवा आठवला.
आम्ही कायम ह्या काँक्रीटच्या जंगलात राहणारे त्यामुळे ती शक्यता लक्षात्तच आली नाही. अंमळ चुकलंच.
काय नाव द्यावे समजत नव्हतं.
घरी काय म्हणतो माहित आहे? 'सफरचंदाचं' बस्स! पुढे काही न म्हणताच मला आणि मुलांना समजतं काय ते. :D

प्रचेतस's picture

15 Jun 2016 - 7:57 pm | प्रचेतस

=))

पद्मावति's picture

15 Jun 2016 - 5:39 pm | पद्मावति

वाह! सही आहे.

झटपट खाद्यप्रकार आवडला, शिवाय पौष्टिकही.

ह्याला बादशाही कोंडा म्हटलं पायजे..

अजया's picture

15 Jun 2016 - 6:24 pm | अजया

:)
झकास आहे!

स्रुजा's picture

15 Jun 2016 - 6:33 pm | स्रुजा

वाह, सहीये हे!

आम्ही सध्या असलाच कोंडा खाऊन दिवस ढकलतोय कसेबसे.
फारच कडाडून भूक लागल्याने फोटो काढेपर्यंत धीर धरवत नाही.

यशोधरा's picture

15 Jun 2016 - 9:13 pm | यशोधरा

=))

उल्का's picture

15 Jun 2016 - 9:29 pm | उल्का

सर्वांचे आभार.
@ कंजूस :) :D

बाबा योगिराज's picture

15 Jun 2016 - 9:40 pm | बाबा योगिराज

यात थोडं आईस क्रीम आणि चॉकोलेट सॉस टाकून पहा, आणि स्वर्ग सुखाचा अनुभव घ्या...!
:-)

मस्त आहे. पण मी हे जेवणाऐवजी नाही, जेवल्यानंतर खाणार :D

नूतन सावंत's picture

16 Jun 2016 - 6:47 pm | नूतन सावंत

ऊल्का,झकास पाककृती.
बाबा योगिराजांची सुचवणीही छान आहे.

मंदार कात्रे's picture

16 Jun 2016 - 8:05 pm | मंदार कात्रे

मधातून सुकामेवा गल्फ मध्ये पॅकबन्द बाटलीत मिळतो

मीदेखिल कोकणात घरी काजू मधात घालून खातो . खूप छान लागतात.

मागच्या आठवड्यात करुन खाल्ले. फक्त खारका नाही घातल्या, आणि काजू घातले. फारच चविष्ट लागलं! खूप आवडलं आणि मलाही नंतर चार-पाच तास भूक लागली नाही.

चंपाबाई's picture

21 Jun 2016 - 5:38 am | चंपाबाई

छान