"इंटरेस्ट"
उद्योजक असताना ब्यांके कडूनं कर्ज घेतले..नियमाप्रमाणी क्वारट्रली "ईंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला.
यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."इंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाही..
यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना..
या वर त्याने एक गोष्ट सांगितली..
नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेंढी होती..
पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत..
एकदा अचानक पेशव्यांना पैशाची गरज लागली... खंडणी वसुलीसाठी स्वार शत्रू पक्षाकडे गेले होते.
पण त्यांच्या कडूनं काही खबर आली नव्हती..
सैन्याच्या पगाराचा दिवस जवळ येत चालला होता.व अधिकारी वर्ग चिंतेत होता...
पगाराचा दिवस आला व सकाळी कारभारी वर्ग पेशव्या कडे गेले व नाईका कडूनं पगाराची रक्कम कर्जाऊ घेण्याचे ठरले...नाईकांना निरोप गेला
व त्या प्रमाणे नाईक रक्कम कागद पत्रे घेऊन दरबारात आले..
पेशवे दस्त ऐवजावर सह्या करणार इतक्यात दूत दरबारात आला व स्वार स्वारगेट जवळ खंडणीची रक्कम घेऊन पोहोचले आहेत व कोणत्याही क्षणी शनवार वाड्यावर येतील अशी खबर पेशव्यांना दिली...
पेशव्यांचा जीव भांड्यात पडला व सोय झाली त्या मुळे त्यांनी नाईकांचे आभार मानले व कर्जाऊ रक्कम नको म्हणून सांगितले..
यावर नाईक म्हणाले "हरकत नाही श्रीमंत पण तिजोरीच्या बाहेर काढलेली रक्कम व्याजा सकटच तिजोरीत जाते असा आमचा नियम आहे त्या मुळे किमान १ दिवसाचे तरी व्याज द्यावेच लागेल...
यावर घासाघीस व तंटा झाला पण शेवटी नाईकांनी एका दिवसाचे व्याज वसूल केले अन मगच शनिवार वाडा सोडला.
याद्या
3157
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
या आधी झालेय हे अकुकाका.
=))
In reply to या आधी झालेय हे अकुकाका. by अभ्या..
माफ करा..ध्यानात राहिले नाहि.
डिलिट कसे करायचे माहित नाहि..
पेशवे होते म्हणून चालले, मोगल
नेहमीचा भरवशाचा सावकार
बारामतीकर
In reply to नेहमीचा भरवशाचा सावकार by रमेश आठवले
बरोबर
In reply to बारामतीकर by गॅरी ट्रुमन
हम्म
हे नाईक सावकार
भेंडी!!!!!!