आंब्याचा शिरा

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
2 Jun 2016 - 11:44 am

आंब्याचा सिझन संपत आला, तेव्हा लक्षात आलं, इतके दिवस आंब्याचे पदार्थ झालेच नाहीत फारसे! आंब्याचा शिरा सोपा आहे, ही फक्त आठवण! राहिला असेल अजून करायचा तर करा लगेच!

साहित्यः
एक वाटी रवा, एक वाटी आमरस, एक वाटी दुथ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर, एक वाटी पाणी. बदामाचे काप, बेदाणे मीठ.

कृती:
आंब्याचा रस काढून मिक्सरला फिरवून घ्या. एक वाटी रवा मंद गॅसवर भाजून घ्या. थोडा भाजला गेला तूप घालून भाजा. दूध, पाणी, साखर एकत्र करून उकळायला ठेवा. सगळे एकत्र करून घातले की शिरा छान मौ होतो...इति रेवती!
रव्यात चवीपुरते मीठ घाला. उकळलेले मिश्रण रव्यात मिसळा. आमरस मिसळा. गॅस मंद ठेवा. व्यवस्थित ढवळून घ्या. बेदाण्यातील काड्या काढून, स्वच्छ करून शिय्रात मिसळा. झाकण ठेवून एक वाफ काढा. दहा मिनिटांनी छान तूप सुटेल. बदामाच्या कापांनी सजवा. आंब्याच्या फोडी घालायच्या असतील तर शेवटी पाच मिनिटं आधी फोडी मिसळा, मिक्स करा.
आंब्याचा मस्त स्वाद येतो, त्यामुळे वेगळ्या स्वादाची गरज नाही.

aamras

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

2 Jun 2016 - 11:50 am | प्रीत-मोहर

मस्त रेसिपी. पण का कुणास ठौक हे वाचून एका तैंची फारफार आठवण आली ;)

अनन्न्या's picture

2 Jun 2016 - 11:54 am | अनन्न्या

मला आली त्याच का?

प्रीत-मोहर's picture

2 Jun 2016 - 10:08 pm | प्रीत-मोहर

हो हो अनन्यातै. त्याच त्या ;) त्या नै का . . .

इशा१२३'s picture

2 Jun 2016 - 11:54 am | इशा१२३

मस्त!
मलाही आठवण झाली बर तैंची.

सस्नेह's picture

2 Jun 2016 - 12:22 pm | सस्नेह

भापो !!!

स्रुजा's picture

3 Jun 2016 - 12:53 am | स्रुजा

लोल .. मला पण आली होती बरं का ;)

रेवती's picture

3 Jun 2016 - 1:52 am | रेवती

उचक्या लागल्या की हो!

पिलीयन रायडर's picture

9 Jun 2016 - 8:49 pm | पिलीयन रायडर

ताईंना जन्मभर उचक्या लागणारेत..

बरं आता मी इथे आलेय तर तू खाऊ घालणार ना हा शिरा मला!? ;)

पुण्यात एकीनी माझी जबाबदारी घेतली होती. इथे आता तू घे!

भोळा भाबडा's picture

2 Jun 2016 - 12:08 pm | भोळा भाबडा

आंब्याची पुरी
साहित्य
- दोन वाटय़ा मैदा
- एक चमचा डालडाचे मोहन
- अर्धा चमचा मीठ
- थोडा हापूस आंब्याचा रस
- एक चमचा साखर

कृती
- आंब्याचा रस काढून ठेवावा.
- मैद्याला तुपाचे मोहन चोळून घ्यावे. त्यात मीठ व थोडी साखर घालावी. मिक्सरमधून काढलेल्या आंब्याचा रस थोडा थोडा घालून पीठ भिजवावे. नंतर या पिठाच्या पुऱ्या लाटून तळाव्यात. केशरी रंगाच्या आंबट-गोड पुऱ्या चवीला छान लागतात.
ऑ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2016 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंब्याची पूरी, आंब्याची पोळी, आंब्याची खिचड़ी , यांच्याही रेशेप्या आल्या पाहिजेत.

-दिलीप बिरुटे

संजय पाटिल's picture

2 Jun 2016 - 12:10 pm | संजय पाटिल

मस्त रेसीपी..
आंब्याची भजी, आंब्याची कढी.. अश्या विट आणनार्‍या रेसीपी नंतर एक तरी चांगला करून बघन्या सारखा पदार्थ..

अनन्न्या's picture

2 Jun 2016 - 12:11 pm | अनन्न्या

यातच कशाला.. माझ्या गरीब शिय्रावर उगाच अन्याय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2016 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त पाकृ, मस्त फोटो.

बाकी, आम्हाला का कोणाची आठवण येत नै ये ? की ते प्राह्वेट आहे ? :)

-दिलीप बिरुटे

भोळा भाबडा's picture

2 Jun 2016 - 12:13 pm | भोळा भाबडा

मँगो-केसर लस्सी
साहित्य -
- दही 200 मिली
- आंब्याचा रस – 1 कप
- दूध 3-4 कप
- केसर 12 ते 15 काड्या ( दुधात भिजवून )
- साखर 6 स्पून (आवडीनुसार कमी-जास्त )
- वेलची पूड 2 चिमुट
- बदाम, पिस्त्याची भरड सजावटीसाठी

कृती
- सर्वात अगोदर आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा .त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध,साखर, केसर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावे .
- तयार लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी . सर्व्ह करताना ग्लासेसमध्ये लस्सी ओतून घ्यावी व वरून बदाम पिस्त्याची भरड घालावी.
ऋ

त्रिवेणी's picture

2 Jun 2016 - 9:53 pm | त्रिवेणी

तै न चा शिरा झाला का?

सतिश गावडे's picture

2 Jun 2016 - 10:33 pm | सतिश गावडे

मस्त रेसिपी. पण का कुणास ठौक हे वाचून एका भौंची फारफार आठवण आली ;)

पैसा's picture

2 Jun 2016 - 11:26 pm | पैसा

आंब्याच्या अजून पाकृ येऊ देत!

अगं का त्रास देताय? अनन्या, तुला दुष्ट म्हटलं होतं मागे एकदा.............सिद्ध केलस स्वत:ला.
प्रिमोशी सहमत. एका तैंची फार्फार आठवण येतिये. कुठे गेल्या त्या?
सगळे एकत्र करून घातले की शिरा छान मौ होतो...इति रेवती!
धन्यवाद. एका मासिकातील सुचवणी आहे व बाईंचे नाव आठवत नाही. त्या महिलेस धन्यवाद.

स्रुजा's picture

3 Jun 2016 - 12:54 am | स्रुजा

मौ करायचा की मोकळा ते ठरव बघु आधी.

अगं त्या तैंना मऊ आणि मोकळा असा हवाय ना.
तू लाटलेली मऊ आणि गोल अशी पोळी हवी असल्यास देऊ शकशील का?
मऊसूत की गोल आधी ठरव असं म्हणशील का तू? ;)
काहीही हां स्रु!

म्हणेन आणि येईन तुमच्याकडे डिट्टेलवार रेसिपी विचारायला ;) मला शिर्‍याचा रेकॉर्ड मोडायचाय आता

मि थोडा वेगळ्यआ पध्द्तिने केला, पण एका वाटि रव्याला एक वाटि रस जास्त नाहि होणार ना?

अनन्न्या's picture

6 Jun 2016 - 6:19 pm | अनन्न्या

मस्त स्वाद येतो आंब्याचा

रमेश भिडे's picture

3 Jun 2016 - 12:54 am | रमेश भिडे

बराय!

पद्मावति's picture

3 Jun 2016 - 1:35 am | पद्मावति

मस्तं दिसतोय आंब्याचा शिरा.

हा अस्मादिकानी आज केला. फक्त रव्याऐवजी बारीक लापशी/गव्हाची भरड वापरली आहे.

shiraa

सस्नेह's picture

3 Jun 2016 - 12:22 pm | सस्नेह

करुन बघणार नाही. डायरेक्ट खायला येणार !

त्रिवेणी's picture

3 Jun 2016 - 1:20 pm | त्रिवेणी

शिरा

कुठे नेऊन ठेवलाय शिरा आमचा ?

हा झाला ब्रह्माण्ड भरुन शिरा! आता परत अंडं घालून कसा करायचा विचारु नका!

व्यापुनिया सारी धरणी!!

रेवती's picture

3 Jun 2016 - 3:45 pm | रेवती

शिरा संपला वाटते.

सस्नेह's picture

3 Jun 2016 - 4:12 pm | सस्नेह

कृपया उजवीकडे स्क्रोलावे.

रेवती's picture

4 Jun 2016 - 7:17 pm | रेवती

नाही ना स्क्रोलता येत. ट्रायून झालं.

अनन्न्या's picture

6 Jun 2016 - 6:17 pm | अनन्न्या

साष्टांग दंडवत स्विकारा!! आता परत कसली रेसिपी करून पाहू नको, मी देईन इकडे आल्यावर.

अनन्न्या's picture

9 Jun 2016 - 5:48 pm | अनन्न्या

सॉरी बरं का!!! मी आपली उगाच शोधत होते कढईत शिरा आहे का.

काय ग हे :)
दिसतोय मात्र छान.

विशाखा राऊत's picture

3 Jun 2016 - 3:14 pm | विशाखा राऊत

शिरा मस्तच पण त्रि काय ग हे? तुप सुटले दाखवायाला इतका मोठ्ठा फोटु

किसन शिंदे's picture

3 Jun 2016 - 4:24 pm | किसन शिंदे

मस्त रेसिपी. आज संध्याकाळीच करून बघतो.

सानिकास्वप्निल's picture

4 Jun 2016 - 9:59 am | सानिकास्वप्निल

आवडता शिरा :)
मी स्वाद आणखी एन्हॅन्स करण्यासाठी वेलची + जायफळपूड घालते.
फोटो कातिल आलाय.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jun 2016 - 4:18 pm | प्रभाकर पेठकर

वेलची आणि जायफळापेक्षा आंब्या बरोबर केशर घातल्यास शिर्‍याचा स्वाद आणि रंग उठावदार होऊन वरून काजू-बदाम घातल्यास शिरा 'शाही' होऊ शकेल.

विवेकपटाईत's picture

4 Jun 2016 - 7:14 pm | विवेकपटाईत

घरात आंबे आहेत. सौ. नागपूरला गेली आहे. काहीच कळत नाही काय करावे. तूर्त रात्री आंब्याचे जूस करायचे ठरविले आहे. सौ. आल्यावर शिरा करायला अवश्य सांगेन.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jun 2016 - 4:19 pm | प्रभाकर पेठकर

ज्यूस? आई ग!..... 'आमरस' म्हणा हो.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jun 2016 - 4:23 pm | प्रभाकर पेठकर

ज्यूस? आई ग!..... 'आमरस' म्हणा हो.

अनन्न्या's picture

6 Jun 2016 - 6:18 pm | अनन्न्या

@सूड, छान झालाय शिरा.

अनन्न्या, हा एकच शिरा माझा मुलगा आवडीने खातो.नेहमी सानिकाच्या रेसिपीने करते.आता लापशी रवा वापरून सूड स्टाईल करुन पहावा म्हणतेय. तेव्हा या रेसिपीने करेन.
त्रि चा शिरा नक्की रव्याचा आहे का विचार बरं का तिला ;)
मी तिने चुकून भगर वापरली असं काही बोलले का? ? =))))
शिरा आकाशाएवढा त्रि चाच.
मौ मोकळा ताईंना रेशिपी पुरवाच मग.आता सातासमुद्रापलिकडुन प्रयोग होणार तर ;)

त्रिवेणी's picture

6 Jun 2016 - 7:07 pm | त्रिवेणी

तू गप ग जळकुकड़ी अजया तै.माझा शिरा तुझ्या शिर्यापेक्षा छान झालाय.
आता उद्या किंवा परवा कढ़ी.

गॅरी ट्रुमन's picture

6 Jun 2016 - 9:53 pm | गॅरी ट्रुमन

कधीकाळी मी पाककृतींवरच्या धाग्यावर प्रतिसाद देईन असे आयुष्यात वाटले नव्हते. पण कालच आमच्या (पूर्वाश्रमीच्या) हिलरीने आंब्याचाच शिरा केला होता. मला तो भलताच आवडला. त्याचा फोटो इथे देत आहे.

Sheera

उल्का's picture

6 Jun 2016 - 10:00 pm | उल्का

सगळेच शिरा फोटो मस्त.
संपादक नीट करु शकत नाहीत का तो ब्रह्मांड्व्यापी फोटो?
आंबामय मिपा आणि आंबाशिरामय हा धागा! :)

कोण ते माझ्या ब्रम्हांडव्यापी शिर्यावर् जळतय(हलके घ्या).
काही mhanta काही म्हणून कौतुक नै माझ्या शिर्याचे.

रमेश भिडे's picture

7 Jun 2016 - 11:00 am | रमेश भिडे

टिपऱ्यांच्या शिऱ्या नंतर तुमचाच शिऱ्या!

आणि लोक जळाले तर जळू दे, त्यावर रवा भाजून घ्या ;)

उल्का's picture

7 Jun 2016 - 12:42 pm | उल्का

:ड :ड
जळत नाही काही, पण ब्र्ह्मांड व्यापल्यामुळे मिपाकराना दर्शनच झाले नाही म्हणुन हळहळताहेत सगळे.

त्रिवेणी's picture

7 Jun 2016 - 12:40 pm | त्रिवेणी

धन्यवाद
धन्यवाद काका.उदया कढ़ीच्या dhagyavar ही या ह.उद्या कढ़ी करुन फ़ोटो टाकनार आहे.

रमेश भिडे's picture

7 Jun 2016 - 6:13 pm | रमेश भिडे

या कोण म्हणे?

आणि ती कढी आपल्याला आवडत नै, तुम्हीच प्या!

उद्या कढी का? हे राम.तेवढे पदार्थ बघून घ्या ताई.
पळा=))))))

मदनबाण's picture

7 Jun 2016 - 6:04 pm | मदनबाण

आहाहा आणि आहाहा... ;)
त्रिवेणी तैं च्या शिर्‍यात मनसोक्त पोहुन घेतले ! ;)

कोकणात सुकवलेल्या रसाचा कडक असा लाडू मिळतो, एका वाटीत त्याचे छोटे तुकडे करुन मग दुधात व्यवस्थीत हाताने एकजीव करुन शिर्‍यात ओतावे... अंबा शिरा तयार ! :)

{शिरा प्रेमी } :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काला रे सैईया काला रे, तन काला रे मन काला रे ,काली जबां की काली गारी, काले दिन की काली शामे,सैया करते जी कोल बजारी :- Gangs of Wasseypur 2

जुइ's picture

7 Jun 2016 - 7:47 pm | जुइ

गेल्याच आठवड्यात हापुस आंब्याचा पल्प घालुन केला होता दिपक कुवेत यांच्या पाकृ प्रमाणे. आता असाही करुन पाहीन.

करुन पाहिला. उत्तम झाला होता अशी घरच्यांची शाबासकी मिळाली.
धन्स. :)

अनन्न्या's picture

12 Jun 2016 - 1:01 pm | अनन्न्या

तुम्ही करुन पाहिलत हेच मोठे बक्षीस

मुक्त विहारि's picture

12 Jun 2016 - 1:24 pm | मुक्त विहारि

रेसीपी बद्दल धन्यवाद...

प्रणित's picture

20 Jun 2016 - 2:31 am | प्रणित

Mango Shira