(आंब्याचे भरीत )

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in पाककृती
1 Jun 2016 - 8:39 pm

प्रस्तावना : खरे तर आम्ही आमची ही सीक्रेट रेसीपी येथे शेयर न करण्याचा निश्चय केला होता. पण श्रीश्री. अविनाश कुलकर्णी आंब्याची भजी ही रेसीपी टाकली आणि मग सुडरावांनी आंब्याची कढी ही रेसीपी टाकिली मग ते पाहुन आमच्यातल्या शेफच्या उत्साहाला भरीत आले , आपलं भरते आले आहे म्हणुन आम्ही शेवटी ही आमची आवडती रेसीपी शेयर करीत आहोत.

साहित्य:
१)आंबे ( शक्यतो हापुस तोतापुरी, पण दुसरे असले तरी हरकत नाही पण जास्त केसर असलेले आंबे शक्यतो वापरु नयेत)
२) ड्रायफ्रूट्स : काजु , बादाम , बेदाणे , पिस्ते , चारोळी वगैरे ,
३) मध ३-४ चमचे
४) जायफळ
५) साखर , काळीमिरीपुड , मीठ , जिरेपुड चवीपुरतेच .

कृती: सर्वप्रथम मस्तपैकी पिकलेले आंबे स्वच्छ धुवुन घ्यावेत. त्यांच्या सालीवर अगदी थोडेसे तुप लावावे , थोडेसे म्हणजे अगदी किंचित की ज्याने आंबे जरासे तुपकट दिसतील. आता आंब्या मध्ये आपण तंदुरला वापरतो त्या सळ्या कोयीच्या ह्या बाजुने व त्या बाजुने घुसवाव्यात. हे आंबे मंद धगधगत असलेल्या निखार्‍यांवर शेकायला घ्यावेत. निखारे पेटते असताना घेवु नयेत , आग विझली अन फक्त धगधगणारे निखारे राहिलेत की आंबे साल काळसर पडे पर्यंत शेकुन घ्यावेत . इथे निखारेच वापरणे अत्यंत आवश्यक आहे, आंबे भाजुन घेणे ह्या प्रक्रियेचा सेकंडरी उद्देश मुळ उद्देश आंब्याला एकप्रकारचा स्मोकी फेवर देणे हा आहे.
भाजलेले आंबे थोडे निवे पर्यंत वाट पहावी अन्यथा साल काढताना भाजण्याचा संभव आहे. ह्या दरम्यान फोडणीच्या वाटीत तुप गरम करुन घ्यावे . नेहमीच्या तिखटाच्या फोडणीची वाटी वापरु नये , वेगळी वाटी वापरावी . बर्‍यापैकी गरम झालेल्या तुपात बारीक केलेले काजु बादाम बेदाणे टाकावेत व व्यवस्थित तळुन घ्यावेत.
आता बर्‍यापकी थंड झालेया आंब्याच्या साली व कोयी काढुन टाकुन त्याच्या गर व्यवस्थित चॉप करुन घ्यावा. चॉप करत असताना त्यात उगाळलेले जायफळ बेतानेच घालावे. अगदी चवीपुरते काळीमिरिपुड , मीठ, जीरेपुड अन साखर घालायला हरकत नाही.
व्यवस्थित चॉप केल्यावर ह्या मित्रणावर रटरटत्या तुपातली गोडाची फोडणी घालावी की झाले यतार आपले आंब्याचे भरीत

सजावटः सजावटी साठी शक्यतो काचेचा बाऊल वापरावा त्यात आधी थोडेसे तुप सोडुन घ्यावे,आणि मगच आंब्याचे भरीत घ्यावे . आंब्याच्या भरीतावर मस्त पैकी चमचाभर मध सोडावा , बारीक खिसलेले बदाम आणि मोजक्याच चारो़या स्प्रिंकल कराव्यात . चवीपुरते हलकेसे मीरपुड टाकायला ही हरकत नाही.( चेरी टाकु नये, हे भरीत आहे , भेळ नाही ) आणि बाऊलच्या बाजुने नुकत्याच कापलेल्या करकरीत हाफुसच्या आयताकृती फोडी गोल करुन लावाव्यात . की झाले तयार आपले आंब्याचे भरीत

फोटो:

(फोटो फक्त पुन्यवंतांनाच दिसेल अशी तरतुद करण्यात आलेली आहे.)

अवांतरः
१) ही रीसीपी ज्याने त्याने आपालप्ल्या रिस्क वर करुन खावी. स्वयंपाक घरात असली रेसीपी करताना पाहुन गृहमंत्रालयाने काही कारवाई केल्यास मंडळ जबाबदार नाही.
२) एका हुच्चभ्रु हॉटेलात खल्लेल्या बेकड अ‍ॅप्पल डेसर्ट वरुन प्रभावीत.

प्रतिक्रिया

स्पा's picture

1 Jun 2016 - 8:50 pm | स्पा

lol

मुक्त विहारि's picture

1 Jun 2016 - 8:55 pm | मुक्त विहारि

आता हापूस आंब्याचा छूंदा, हापूस आंब्याचे लोणचे ह्या रेसीपी तर येतीलच पण त्याशिवाय, हापूस आंब्याची कोफ्ता करी, हापूस आंब्यांचे आमलेट, हापूस आंब्याची कांदा-लसूण घातलेली भाजी अशा रेसीपी पण यायची शक्यता आहे.

सतिश गावडे's picture

1 Jun 2016 - 9:02 pm | सतिश गावडे

छान रेसिपी. या विकांताला करुन पाहीन.

छान रेसिपी. या विकांताला करुन पाहीन.

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2016 - 1:35 pm | प्रसाद गोडबोले

धन्यवाद सूड !

अवांतर : मुंबईला असताना एकदा लीला हा पंचतारांकित हॉटेलात जेवायचा योग आला होता ( अर्थातच ऑफीसच्या कृपेने.) तेव्हा तिथे मी बेक्ड अ‍ॅप्पल डेसर्ट नावाची अफलातुन डीश खाल्ली होती . ती इतकी सुंदर होती कि आजही मला त्याची चव आठवते. मला व्यक्तिशः सफरचंद अजिबात आवडत नाहीत पण तरीही ती डिश प्रचंड आवडली !
मग त्यावरुन सुचले , आंबा तर आपल्याला आवडतोच त्याची अशी डिश बनवुन पाहता येईल का ! सफरचंदात बिया अत्यल्प असल्याने जास्त त्रास होत नाही , पण आंब्यात कोय काढताना चिगदाच होतो म्हणुन सरळ चॉप करुन घ्याचीच अ‍ॅडीशन केली !

तरीही वर पाककृती करताना वर वेल्दोड्याची बारीक पुड टाकायचे राहुनच गेले आहे !

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

वीकांताला केली की फोटो अपलोडवणेत येईल. नदीकाठाने भटकत आलात तर सांगा, म्हणजे तुमच्या रेसिपीचा तुम्हालाही आस्वाद घेता येइल.

आंबा करी (अंडा करी धर्तीवर) रेशीपी मिळेल काय?!
बाकी पाक्रु वट्ट पोर्णीमेला करुन पाहीन..!

सस्नेह's picture

1 Jun 2016 - 9:56 pm | सस्नेह

अंडे घालून करता का ?

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2016 - 1:15 pm | प्रसाद गोडबोले

मी शक्यतो केक आणि आयस्क्रीम वगळता रेसीपी मध्ये अंडे घालणे टाळतो. अंडे घातल्याने रेसीपीचा आस्वाद घेवु शकेल अशा लोकांच्या संख्येवर मर्यादा येते , शिवाय या रेसेपी मध्ये अंडे घालुन विशेष काही साधले जाऊल असे वाटत नाही .

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

आंब्यात अंडी घालणे म्हणजे जरा जास्तच पुढारल्यासारखे वाटत नाही का आपल्याला?

आनंदी गोपाळ's picture

2 Jun 2016 - 10:02 pm | आनंदी गोपाळ
डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2016 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे भरीत चीज घालून केले तर त्या पाकृचे चीज होईल काय ? =))

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2016 - 1:18 pm | प्रसाद गोडबोले

ह्म्म .

चीज हा माझ्यासाठी एक मोठ्ठे अननोन वेरीयेबल आहे. भारतात अत्यंत मोजक्या प्रकारचे चीज मिळते, बाहेरच्या देशात १७६० प्रकारचे चवींचे चीज मिळते तेव्हा तिकडे गेल्यावर त्यांचा चवीचा अभ्यास करुन कोणत्या प्रकारचे चीज वापरता येईल का ह्याचा जरुर विचार करेन.
बाकी भारतात मिळाणार रद्दाड चीज जीभेचे टेस्टबड्चे सेन्सेस नम्ब करते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणुन मी मुळातच चविष्ट अशा पाकऋतीत चीज घालण्याचे टाळतो :)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

रमेश भिडे's picture

1 Jun 2016 - 10:33 pm | रमेश भिडे

आंब्याचे भरीत ऐवजी एखादं मेक्सिकन किंवा युरोपियन उन्मादक नाव देऊन पुन: प्रकाशित केल्यास आणि एखादा फोटो टाकल्यास उत्तम पाककृती म्हणून प्रसिद्ध होईल असे खात्रीने वाटते.

आंबा थोडा भाजला तर वेगळी चव येईल. बाकी पदार्थ उत्तम आहेच.

अभ्या..'s picture

1 Jun 2016 - 11:00 pm | अभ्या..

आहाहहहहह, अप्रतिम
त्यात भीमसेनजींचा मेघमल्हार म्हणजे स्वर्गच.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Jun 2016 - 11:07 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

एवढे कष्ट घेण्यापेक्षा आंबा चोखून खाल्याला बरा.

अत्रन्गि पाउस's picture

1 Jun 2016 - 11:21 pm | अत्रन्गि पाउस

तद्न्य लोकांनी खालील पदार्थ करण्याच्या कृती शोधून प्लीज टाकाव्यात ...
-भरले आंबे
-आंबा आणि चिकन सॉसेजेस
-आंबा मुसल्लम
-पावम्भाजी
-आंबा टिक्का
-तंदुरी आंबा
-मसाला आंबा डोसा
-आंब्याचा शावर्मा
अजून आठवतील तसे टाकतो

आंबा हा आंबा म्हणूनच कसा खावा याचीही रेसिपी टाका आता कुणीतरी.

मुक्त विहारि's picture

2 Jun 2016 - 7:18 am | मुक्त विहारि

+ १

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2016 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

आदरणीय मुवी ,
स.न.वि.वि.

"आंबा हा आंबा म्हणूनच कसा खावा याचीही रेसिपी टाका आता कुणीतरी." ह्याच्या संदर्भाने उत्तर देत आहे.
आपण Ratatouille हा अप्रतिम अ‍ॅनिमेट्ड चित्रपट पाहिला आहे का ? ह्या चित्रपटात एक अप्रतिम डायलॉग आहे -

"Humans. There's something about them. They don't just survive. They discover. They create.JUST LOOK AT WHAT THEY DO WITH FOOD!” – REMY "

मनुष्यप्राण्याबद्दलचा सर्वात विशेष गुण म्हणजे आपण साध्या साध्या गोष्टीतुन नवनवीन गोष्टी बनवतो ! This is one of the very few things that separates us from rest of the animal world !

आंबा नुसता खाता येईलच की नाही कोण म्हणतय , पण त्यात जर आपण अजुन रंग भरु शकलो तर !! पाककला चित्रकले सारखी आहे , काही लोकांना नुसताच रिकामा कॅन्व्हास आवडेल तर काही लोकांना त्यावर अफलातुन कलाकृती पहायला आवडेल .

आमचा एक शेफ मित्र कायम म्हणतो की - गर्लफ्रेंड आणि फूड कसे सर्वांगसंपन्न असले पाहिजे , त्यांनी कसे पाचही विषयांना - शब्द स्पर्ष रस रूप गंध - सार्‍या विषयांना प्यँपर केले पाहिजे , नुसता आंबा किमान माझ्याबाबतीत तरी हे नाही करु शकत म्हणुन जरासा प्रयत्न केला आहे ! कदाचित काही लोकांना असे केलेले अजिबात आवडणार नाही ! आवडलेच पाहिजे अशी माझी सक्तीही नाही !!

असो .

कळावे.
लोभ आहेच , वृध्दिंगत व्हावा :)

आपला विनम्र
प्रगो !

नाखु's picture

2 Jun 2016 - 8:55 am | नाखु

पाकृचे तुम्हाला येते भरते !
वाचुनच आमची भूक मरते !!

ज्याने भाजला आंबा !
त्याच्या नावे (ठोका) बोंबा !!

आपले परम जग्नमित्र अगलतगल कुंथुनाथ यांच्या काव्यासंग्रहावरून प्रेरीत.

अता अवांतर : वैधानीक इशारा सिगरेट पा़कीटावरील सुचने समान आहे, हे ध्यानात घेतले आहे

अनिरुद्ध प्रभू's picture

2 Jun 2016 - 12:38 pm | अनिरुद्ध प्रभू

क्या बात है नाखु....

बाळ सप्रे's picture

2 Jun 2016 - 12:43 pm | बाळ सप्रे

फोटो छानच आलाय !!
;-)

स्वप्नज's picture

2 Jun 2016 - 1:38 pm | स्वप्नज

आभारी आहे. आपण 'पुन्यवंत' आहात याची दखल घेतल्या गेली आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

विशाखा पाटील's picture

2 Jun 2016 - 2:05 pm | विशाखा पाटील

धागा प्रगो नामक आयडीचा असताना स्वप्नज कसे धन्यवाद देतात बुवा!

अवांतर - भरीत म्हटले की तोंपासू. वांगे असो की आंबे, भरीत खाण्याशी मतलब. करून बघेन.

भागीदारीत चालवायला घेतलाय का आयडी?

त्रिवेणी's picture

2 Jun 2016 - 2:38 pm | त्रिवेणी

kadhi
आज करुन बघितले भरीत.मस्तच झाले होते.अनवट पाककृती बद्दल धन्यवाद.