प्रस्तावना : खरे तर आम्ही आमची ही सीक्रेट रेसीपी येथे शेयर न करण्याचा निश्चय केला होता. पण श्रीश्री. अविनाश कुलकर्णी आंब्याची भजी ही रेसीपी टाकली आणि मग सुडरावांनी आंब्याची कढी ही रेसीपी टाकिली मग ते पाहुन आमच्यातल्या शेफच्या उत्साहाला भरीत आले , आपलं भरते आले आहे म्हणुन आम्ही शेवटी ही आमची आवडती रेसीपी शेयर करीत आहोत.
साहित्य:
१)आंबे ( शक्यतो हापुस तोतापुरी, पण दुसरे असले तरी हरकत नाही पण जास्त केसर असलेले आंबे शक्यतो वापरु नयेत)
२) ड्रायफ्रूट्स : काजु , बादाम , बेदाणे , पिस्ते , चारोळी वगैरे ,
३) मध ३-४ चमचे
४) जायफळ
५) साखर , काळीमिरीपुड , मीठ , जिरेपुड चवीपुरतेच .
कृती: सर्वप्रथम मस्तपैकी पिकलेले आंबे स्वच्छ धुवुन घ्यावेत. त्यांच्या सालीवर अगदी थोडेसे तुप लावावे , थोडेसे म्हणजे अगदी किंचित की ज्याने आंबे जरासे तुपकट दिसतील. आता आंब्या मध्ये आपण तंदुरला वापरतो त्या सळ्या कोयीच्या ह्या बाजुने व त्या बाजुने घुसवाव्यात. हे आंबे मंद धगधगत असलेल्या निखार्यांवर शेकायला घ्यावेत. निखारे पेटते असताना घेवु नयेत , आग विझली अन फक्त धगधगणारे निखारे राहिलेत की आंबे साल काळसर पडे पर्यंत शेकुन घ्यावेत . इथे निखारेच वापरणे अत्यंत आवश्यक आहे, आंबे भाजुन घेणे ह्या प्रक्रियेचा सेकंडरी उद्देश मुळ उद्देश आंब्याला एकप्रकारचा स्मोकी फेवर देणे हा आहे.
भाजलेले आंबे थोडे निवे पर्यंत वाट पहावी अन्यथा साल काढताना भाजण्याचा संभव आहे. ह्या दरम्यान फोडणीच्या वाटीत तुप गरम करुन घ्यावे . नेहमीच्या तिखटाच्या फोडणीची वाटी वापरु नये , वेगळी वाटी वापरावी . बर्यापैकी गरम झालेल्या तुपात बारीक केलेले काजु बादाम बेदाणे टाकावेत व व्यवस्थित तळुन घ्यावेत.
आता बर्यापकी थंड झालेया आंब्याच्या साली व कोयी काढुन टाकुन त्याच्या गर व्यवस्थित चॉप करुन घ्यावा. चॉप करत असताना त्यात उगाळलेले जायफळ बेतानेच घालावे. अगदी चवीपुरते काळीमिरिपुड , मीठ, जीरेपुड अन साखर घालायला हरकत नाही.
व्यवस्थित चॉप केल्यावर ह्या मित्रणावर रटरटत्या तुपातली गोडाची फोडणी घालावी की झाले यतार आपले आंब्याचे भरीत
सजावटः सजावटी साठी शक्यतो काचेचा बाऊल वापरावा त्यात आधी थोडेसे तुप सोडुन घ्यावे,आणि मगच आंब्याचे भरीत घ्यावे . आंब्याच्या भरीतावर मस्त पैकी चमचाभर मध सोडावा , बारीक खिसलेले बदाम आणि मोजक्याच चारो़या स्प्रिंकल कराव्यात . चवीपुरते हलकेसे मीरपुड टाकायला ही हरकत नाही.( चेरी टाकु नये, हे भरीत आहे , भेळ नाही ) आणि बाऊलच्या बाजुने नुकत्याच कापलेल्या करकरीत हाफुसच्या आयताकृती फोडी गोल करुन लावाव्यात . की झाले तयार आपले आंब्याचे भरीत
फोटो:
(फोटो फक्त पुन्यवंतांनाच दिसेल अशी तरतुद करण्यात आलेली आहे.)
अवांतरः
१) ही रीसीपी ज्याने त्याने आपालप्ल्या रिस्क वर करुन खावी. स्वयंपाक घरात असली रेसीपी करताना पाहुन गृहमंत्रालयाने काही कारवाई केल्यास मंडळ जबाबदार नाही.
२) एका हुच्चभ्रु हॉटेलात खल्लेल्या बेकड अॅप्पल डेसर्ट वरुन प्रभावीत.
वाचने
14297
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
lol
चालू द्या...
छान रेसिपी. या विकांताला करुन
छान रेसिपी. या विकांताला करुन
धन्यवाद सूड !
In reply to छान रेसिपी. या विकांताला करुन by सूड
वीकांताला केली की फोटो
In reply to धन्यवाद सूड ! by प्रसाद गोडबोले
आंबा करी (अंडा करी धर्तीवर)
अंडे घालून करता का ?
अंहं
In reply to अंडे घालून करता का ? by सस्नेह
आंब्यात अंडी घालणे म्हणजे जरा
In reply to अंडे घालून करता का ? by सस्नेह
जरा हे पहा :
In reply to आंब्यात अंडी घालणे म्हणजे जरा by वपाडाव
हे भरीत चीज घालून करता येईल
चीज
In reply to हे भरीत चीज घालून करता येईल by डॉ सुहास म्हात्रे
आंब्याचे भरीत ऐवजी एखादं
आहाहहहहह, अप्रतिम
एवढे कष्ट घेण्यापेक्षा आंबा
आणखीन काही पदार्थ हवेत
आंबा हा आंबा म्हणूनच कसा खावा
+ १
In reply to आंबा हा आंबा म्हणूनच कसा खावा by एस
आदरणीय मुवी ,
In reply to + १ by मुक्त विहारि
आम्ची आंबोळी
वाह!!!!!
In reply to आम्ची आंबोळी by नाखु
फोटो छानच आलाय !! ;-)
आभारी आहे.
In reply to फोटो छानच आलाय !! ;-) by बाळ सप्रे
छान पाकृ!
In reply to आभारी आहे. by स्वप्नज
भागीदारीत चालवायला घेतलाय का
In reply to आभारी आहे. by स्वप्नज
आज करुन बघितले भरीत.मस्तच