सफर आडवळणावरील खेड्यांची....३

मेघनाद's picture
मेघनाद in भटकंती
11 May 2016 - 12:42 pm

सफर आडवळणावरील खेड्यांची....!

सफर आडवळणावरील खेड्यांची....२
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निघूया निघूया म्हणताना पुढच्या गावाला निघायला फारच उशीर झाला. मध्ये काही महिने मिपा वर येणच कठीण झालं होत, आता वेळ काढून परत काही लिहिण्याचा प्रयत्न करतोय, गोड मानून घ्या. आणि चुका दाखवून द्या.

तर मग दुसर्याच दिवशी सकाळीच माझ्या पुढच्या गावाला म्हणजेच माझ्या मामाच्या गावाला मिठगवाण्याला निघालो. सकाळी ६ वाजता हातीवले नावाच्या तिठ्यावर (मुंबई – गोवा महामार्ग) जैतापुरला जाणारी एसटी येते तीच पकडण्यासाठी धावपळ करून कसाबसा वेळेवर पोहोचलो. गावांमध्ये एकदा का तुमची एसटी चुकली कि एकदम ३-४ तासानीच दुसरी एसटी येते. गाडीत १५-२० जण आधीच बसलेली होती, काही प्रवासी मुंबईहून रात्रभराचा प्रवास करून थकल्यामुळे डुलक्या काढत होते. तर काही गावातलीच मंडळी त्यांच्या कसल्याश्या कामांसाठी बाहेर निघाली होती. ड्रायव्हर मोकळ्या सड्यावरच्या वार्याशी स्पर्धा करत एकामागे एक वळण मस्तपणे मागे टाकत होता.

सड्यावरून झोकात जाणारी एसटी
ST

कंडक्टर देखील दोन थांब्यांमध्ये डोळे मिटून आराम करत होता, पण थांबा आल्यावर मात्र त्याची लगबग बघण्यासारखी होती. एखादी बाय गाडीत चढायला / उतरायला वेळ लावत असेल कि हा लगेच हाक देणार “गे बायो चल कि पटकन”. त्यावर बाईचं उत्तर तय्यार “आर होय बाबा मी काय रव्हूक आले नाय हय”.

गुगल नकाशा
नकाशा

अशी सगळी मजा बघत मी एकदाचा मिठगवाणे ह्या गावी पोहोचलो. घरात गेल्यावर आजीने दिलेलं गुळ- पाणी खाऊन एवढ बर्र वाटल काय सांगू राव. सकाळी लवकरच पोहोचलो होतो त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न होतं. मामाच घर म्हणजे बाहेर ओटी (हॉल) मग माझघर डाव्या बाजूला स्वयंपाकघर आणि समोर व उजव्या बाजूला दोन खोल्या.

मामाच घर
मामाच घर

मागील बाजूस गाई-गुरांचा गोठा. गोठा असूनही इतका टापटीप कि त्यासाठी आमच्या मामासाहेबांना पुरस्कार देखील मिळालाय. स्वयंपाकघरातून चुलीचा धूर साऱ्या घरात पसरत होता त्याचबरोबर जेवणाचा खमंग सुगंध देखील. बाहेर ढग दाटल्याने सगळीकडे मळभ दाटली होती. समोरील शेतात हिरवीगार भाताची रोपं सळसळत होती. बघांव तिकडे बारीक हिरवगार गवत उगवलं होत. अस सगळीकडे चैतन्यमय वातावरण असताना घरात बसून राहण शक्यच नव्हत, मग काय निघालो कॅमेरा घेऊन.

बाहेर अंगणात आलो आणि हे साहेब दिसले, छान पोझेस पण दिल्या फोटोसाठी.

सरडा
सरडा

सरडा
सरडा

सरडा
सरडा

त्यानंतर सहज लक्ष गेल आणि फोटो घ्यावासा वाटला म्हणून हा फोटो काढला.

बल्ब

थोडं पुढे गेलो आणि गोठ्याच्या भिंतीवर हे मांजर दीमाखात बसलं होत, लगेच त्याचा पण फोटो काढून घेतला.

मांजर
मांजर

हि गोठ्यातली पारू (म्हैस ओ! माझ्या सहा वर्षाच्या मामेबहिणीने तिचं असं नामकरण केलंय).

म्हैस
म्हैस

गोठ्याच्या मागच्या बाजूला माझ्या दुसर्या मामाकडे जाणारी छोटीशी पायवाट आहे पावसाळ्यात ती वाट पण किती प्रेक्षणीय दिसतेय तुम्हीच बघा.

पायवाट
पायवाट

असाच एक सुंदर फोटो.
फोटो

लाल मुंगळ्यांच आंब्याच्या पानांपासून बनवलेलं घर.
मुंग्या

हा बघा शेतमळा, हीच ती हिरवीगार भाताची रोपं
मळा

शेतमळ्यात फुललेली रानफुलं, खूपच छान दिसत होती.
रानफुल

शेतमळ्यात फुललेली रानफुलं
रानफुल

गावातल्या महादेवाच्या देवळाकडे जाताना वाटेत हे भराडीदेवीचं देऊळ लागत, नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर लाभला आहे देवळाला.
देऊळ

देवळाच्या बाजूलाच गावातली प्राथमिक मराठी शाळा आहे. अंगणवाडी ते चौथी पर्यंतचे वर्ग ह्या शाळेत भरतात. शाळा अतिशय स्वछ आणि निटनेटकी ठेवलेली आहे. गावात देखील शाळेचं महत्व सर्वाना पटलेलं आहे त्यामुळे गावातले सर्व विद्यार्थी नियमितपणे शाळेत हजेरी लावतात.

शाळेच्या पुढे दोन तळी आहेत, पाण्यात शेवाळ धरल्याने तळ्यांचा वापर बहुतेकदा पोहण्यासाठी केला जातो. जाता जाता अशीच काही मुले पोहण्याचा आनंद घेताना दिसली.

तळी
मुल

मूलं

तळी

गावातील मला आवडलेली काही ठिकाणं आणि हि त्यांची छायाचित्र.

गावातील रस्ता
रस्ता

मामाच्या घराचं कुंपण (स्थानिक भाषेत गडगा)
गडगा

महादेवाच्या देवळाबाजूचा ओढा
ओढा

ह्या गावतील अजून थोडी भ्रमंती आणि गावातील प्रतीष्ठित अश्या बारा वाड्यांच्या "श्रीदेव अंजनेश्वर" महादेवाच्या देवळाबद्दल माहिती देण बाकीच आहे. पुढील भागात देवळाच्या उत्सवाबद्दल आणि देवळाच्या इतिहासाबाद्ल माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

क्रमशः

प्रतिक्रिया

वा! सुंदर सुरू आहे सफर. पावसाळ्यात कोकणाची हिरवाई काय वर्णावी! अहाहा!

प्रचेतस's picture

11 May 2016 - 1:21 pm | प्रचेतस

सुंदरच आहे गाव.

सिरुसेरि's picture

11 May 2016 - 1:30 pm | सिरुसेरि

छान फोटो .. छान वर्णन .. उपुभाप्र..

कंजूस's picture

11 May 2016 - 1:34 pm | कंजूस

अरे वा! सडा म्हणजे काय? ( सड्यावरून झोकात जाणारी एसटी ). फोटो खासच.तळ्यात पोहोणारी मुलं मस्त.

सडा म्हणाजे ज्वालामुखीजन्य कातळी सपाट भाग.
सड्यावरील भटकंतीविषयी येथे लिहिले होते. प्रेरणा तुमचीच होती कंजूसकाका. :)

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 1:36 pm | बोका-ए-आझम

लेख पण मस्त. कोकणात जाऊन युगं झाली!

विअर्ड विक्स's picture

11 May 2016 - 3:01 pm | विअर्ड विक्स

चिरेबंदी घर नशीबवान आहात !!!!! चिरेबंदी घर , सागवानी लाकडाच्या गजाच्या खिडक्या, लाकडी फळांच्या माळा , आंबे साठवायची ओसरी … लहानपणाचे कोकण डोळ्यासमोर तरळले .

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 May 2016 - 5:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

असेच म्हणतो!! कोकणाशी संबंध कितीतरी पिढ्यांपुर्वी तुटला. पण अजुनही लाकडी गज, लाल कौले,ओटी/माजघर/स्वैपाकघर,पडवी, अंगण,परसु,गोठा अशी रचना असलेली घरे भुरळ घालतात मनाला.
आता हे सगळॅ दुर्मिळ होत चाललेय.

बापू नारू's picture

11 May 2016 - 3:14 pm | बापू नारू

खूपच मस्त वर्णन ,
कधी एकदाशी पावसाळा सुरु होतोय न weekends ला Bike वरून फिरायला जातोय अस झालय...

अजित@१२३'s picture

11 May 2016 - 3:47 pm | अजित@१२३

छान फोटो .. छान वर्णन

छान फोटो .. छान वर्णन +१११

सौंदाळा's picture

11 May 2016 - 7:14 pm | सौंदाळा

सहीच
खुप उशीराने आला हा भाग
पुभाप्र

संदीप चित्रे's picture

12 May 2016 - 1:57 am | संदीप चित्रे

तीनही लेख वाचले.
फोटोंवरून तर नजर हटत नाहीये.
पुढच्या लेखांची आणि फोटोंची वाट बघतोय.

मेघनाद's picture

13 May 2016 - 12:58 pm | मेघनाद

@कंजूस. @ मोदक, @बोका-ए-आझम, @ प्रचेतस: आणि सर्व दर्दी लेखक-वाचकांचे प्रतिसाद बघून एकदम छान वाटल, नव्याने हुरूप आलाय. नवीन कॅमेरा (canon 600d) घेतल्यानंतर प्रथमच निसर्गाची छायाचित्रे काढली आहेत. सर्वाना फोटो आवडले ह्यातच धन्य झालो.

अजून एक-दोन भाग होतील एवढ लिखाण आणि छायाचित्र बाकी आहेत, लवकरच पुढील भाग टाकायचा प्रयत्न करेन.

खूप आवडलं गाव. फोटो मस्त.

फोटो आणि वर्णन दोन्हीही खास आहे.

चलत मुसाफिर's picture

15 May 2016 - 3:23 pm | चलत मुसाफिर

पाने विणून घर बनवणारे हे मुंगळे (मला तरी) कोकण सोडून भारतात कुठेच आढळलेले नाहीत. जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती