East India Company- भाग-३

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
3 May 2016 - 12:08 am
गाभा: 

या भागात आपण चायना टी ट्रेड चा भारताशी असलेला संबंध बघु व इतर काही उरलेले मुद्दे घेऊन चायना ट्रेड चा हा विषय या भागात संपवु.

इंडियन प्रेसीडेन्सीज ने चायना ट्रेड साठी केलेली आर्थिम मदत

तिथे एकीकडे चायना टी ट्रेड मध्ये कंपनीची सातत्याने प्रगती होत होती. वर्षा/दशकागणिक खरेदीचा आकडा वाढतच चालला होता. तेव्हा आपण पाहीले तस "सिल्व्हर" च्या उभारणीसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरु होते. अशातच इकडे भारतात कंपनीला सर्वात मोठी लॉटरी लागली. कंपनीला अगोदर प्लासीच्या व नंतर बक्सर च्या १७६४ च्या लढाईतील विजयानंतर १७६५ मध्ये बंगाल बिहार ओरीसा या तीन राज्याच्या "दिवाणी" चे हक्क मुघल सम्राटाकडुन मिळाले. प्लासी विजयानंतर तब्बल ८ वर्षांनी कंपनी या भुभागाची "दिवाण" झाली. दिवानी मिलतेही डायरेक्टर्स खुशीसे दिवाने हो गए. हा भारतीय इतिहासातील प्रचंड मोठा टर्नींग पॉइंट आहे कारण याचे परीणाम फ़ार दुरगामीच नव्हे तर मुलगामी ही होणार होते. एक लक्षात घ्या जरी कंपनी जिंकली तरी दिल्लीचा मुघल सम्राट हाच (सो-कॉल्ड) राजा होता. व याने कंपनीला दिवाणी दिली होती. व या बदल्यात कंपनीने राजा ला ठराविक वार्षिक रक्कम ट्रीब्युट (मराठी प्रतीशब्द माहीत नाही ) देणे असे त्या वेळच्या परंपरेप्रमाणे ठरले. ( पुढे वॉरेन हॅस्टींग्ज ने दिल्ली बादशाहला ट्रीब्युट देण बंद करुन टाकल) तर या दिवाणी मिळाल्यानंतर कंपनीने या तीन्ही प्रांतांतुन केलेल्या अ-भुतपुर्व रेव्हेन्यु टॅक्स कलेक्शनने मोठी रक्कम जमा करण्यात आली. ( हा सर्वात कॉम्प्लेक्स व सर्वात महत्वाचा विषय रेव्हेन्यु आपण पुढील भागात घेऊ ) तर आता १७६५ नंतर या संपत्तीचा ओघ चायनाकडे टी पेमेंट करण्यासाठी वळविण्यास डायरेक्टर्सनी सुरुवात केली. भारत हा एक नवा कोरा हक्काचा फ़ायनान्शीयल सोर्स कंपनीला मिळाला होता. सुरुवातील डायरेक्टर्सनी बंगाल प्रेसीडेन्सीला २४ लाख रुपये दरवर्षी चायना ट्रेड साठी देण्याचे आदेश दिले. १७६५-६६ मध्ये बंगालहुन पहीले जहाज "आर्गो" चायनाकडे रवाना झाले. यातुन १९ लाख कॅन्टॉन ट्रेझरीत जमा करण्यात आले. पुढच्या वर्षी २४ लाख पाठवण्यात आले. रीतसर ड्रेन सुरु झाला. मात्र काही वर्षातच याचा परीणाम बेंगाल प्रेसीडेन्सी वर होऊ लागला. इथे तेव्हा कंपनीची वेगवेगळ्या भारतीय राजवटींशी छोटी मोठी युद्धे सुरु होती. बंगाल प्रेसीडेन्सीला आर्मीसाठी मेंटेनन्स साठी फ़ंड्स कमी पडत होते.त्यांनी डायरेक्टर्स कडे तक्रार केली. बंगाल प्रेसीडेन्सीने चायना ट्रेडसाठी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली व इतर दोन बॉम्बे व मद्रास प्रेसीडेन्सीज ना मदत करण्याची विनंतीही केली. (यांजकडे दिवाणी नव्हती बंगाल वरचढ होता) या नकाराने संतापलेल्या लंडनच्या इंडिया हाऊस मधील डायरेक्टर्सनी एक खरमरीत पत्र ११-११-१७६८ ला बंगाल प्रेसीडेन्सीला पाठवल त्यात ते म्हणतात

"You will incur our highest displeasure if you withhold any part of the supply for China, on pretence of not being able to furnish them, The enlargement of the Trade to China to its utmost Extent, is an object we have greatly at heart, not only from the Advantages in prospect, by gaining a Superiority and thereby discouraging Foreign Europeans from resorting to that Market; but also from a National Concern, wherein the revenue is very materially interested therefore to prevent all disappointments from the want of sufficient Stock in China for providing Cargoes for the Ships now bound thither." चायना ट्रेड चे त्यांच्या लेखी असलेले महत्व यातुन स्पष्ट होते.

या नविन रीसोर्समुळे अनेक वर्षांपासुन ब्रिटनमधुन जो सिल्व्हर चा ओघ चायनात जात होता तो कमी होत गेला ( ज्यासाठी कंपनीला देशबांधवांकडुन मोठा टीकेचा सामना करावा लागत असे तो ) १७६४ मध्ये ३०७४१० पौंड सिल्व्हर इंग्लंडतुन चायनात निर्यात झाले होते. १७६५-६६ मध्ये २९४२५६ पाउंड्स पर्यंत घसरुन १७६६-६७ मध्ये ९४६ पर्यंत खाली आला. अर्थात तो पुढे ही चालु राहीलाच होता मात्र इंडियामुळे प्रमाण नक्कीच घटले होते. पुढे बंगाल प्रेसीडेन्सीची अडचण मान्य करुन तिन्ही प्रेसीडेन्सींज नी मीळून वार्षिक २४ लाखाची डिपॉझीट दरवर्षी कॅन्टॉन ट्रेझरी त करावी असा आदेश डायरेक्टर्सनी बंगाल मद्रास बॉम्बे ला दिला.

भारतीय मालाचा टी फ़ंडींगसाठी वापर

जेव्हा इंडियन प्रेसीडेन्सीज ना सिल्वर पुरवठा करण अधिक अवघड होऊ लागल ( त्यांच्या स्वत"च्या प्रशासकीय युद्ध आदी गरजांमुळे ) तेव्हा भारतीय माल चायनात विकुन फ़ंड उभे करण्यावर भर दिला जाऊ लागला. भारतीय मालाची चायनात जबरदस्त मागंणी होती.( ब्रिटीश वुलन इ. च्या अगदी उलट मामला होता ट्रकींग वगैरेची गरज भारतीय मालाला नव्हती उलट प्रचंड मोठ्या प्रॉफ़ीट मार्जीन ने भारतीय माल चायनात विकला जात असे. भारतीय मालाची क्षमता दाखवणारा हा टेबल बघा.
1

कंपनीचा चायना ओपियम ट्रॆड

तस युरो-एशियन ट्रेडच्या अगोदर फ़ार पुर्वीपासुन भारत व इतर देशांतुन चायनात अफ़ु आयात केली जात असे. ही मागणी मर्यादीत होती व मुख्यत: औषधी उपयोगासाठी याचा वापर होत असे. यात नविन काहीच नव्हते. नविन होती कंपनीची पॉलीसी. तर सुरुवातीची साधी आवक जेव्हा चायनात वाढत गेली. व दक्षिण चीनच्या प्रांतात मोठ्या प्रमाणात जनतेत ओपियम-स्मोकींग चे प्रमाण वाढु लागले, तसा चिंग राजाने Yung Cheng ने १७२९ मध्ये ओपियम स्मोकींग वर एका फ़र्मान काढुन बंदी घातली. व औषधी वापरापुरती तीही लायसन्सनेच अफ़ु चा वापर करण्याची परवानगी दिली. मात्र आयातीवर बंदी नव्हती शिवाय यावर एक्साइज ड्युटी ही होती हे विशेष.( रेव्हेन्यु हवाच होता). पुढे जनतेत अ‍ॅडिक्शनचे प्रमाण वाढल्यावर मात्र कॅन्टॉन प्रशासनाने वापरासाठी मेडीकल परपज चा पुरावा दिल्याशिवाय अफ़ु आयात करण्यास बंदी घातली. पुढे १७८१ त युद्धात गुंतल्याने ब्रिटीश गुड्स ची चायनात निर्यात पुर्ण थांबली तेव्हा एकच मार्ग उरला तो म्हणजे ओपियम भारतातुन चायनात निर्यात करणे. भारतात तेव्हा अफ़ुचे उत्पादन बंगाल / पाटणा व माळवा इ. प्रांतात होत असे. ( माळव्याची अफ़ु मराठ्यांच्या ताब्यात होती हा प्रांत तेव्हा त्यांच्या अधिपत्याखाली होता ) तर वॉरेन हॅस्टींग्ज तेव्हा चा बंगाल चा गव्हर्नर होता त्याने १९८२ मध्ये Betsy आणि Nonsuch या दोन जहाजांतुन ३००० ओपियम चे चेस्ट्स चायनात पाठविले. यातील Betsy फ़्रेंच प्रायव्हेटीअर ने चायनाला पोचण्यापुर्वीच हायजॅक करुन टाकली. Nonsuch मात्र सैन्यसुसज्ज असल्याने ती उरलेले १६०० चेस्ट्स घेऊन तिथे पोहोचली. या सेलच्या रीसीट्स मधुन जहाजाच्या मालकाला ४१८५३ डॉलर्स च पेमेंट केल्यावर (नंतरच्या काळात कंपनी फ़क्त भाड्याने जहाजे घेत असे या शीपओनर्सची एक आक्रमक लॉबी कंपनी शेअरहोल्डर्स मध्ये होती) उरलेले ५८१४७ स्पॅनीश डॉलर्स कॅन्टॉन ट्रेझरीत जमा करण्यात आले. डिल भलतेच प्रॉफ़ीटेबल होते. मात्र डायरेक्टर्सला हा प्रकार फ़ार रीस्की वाटला त्यांनी बंगाल प्रेसीडेन्सीला लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात

"we have been informed that the importation of ophium to China is forbidden by the Chinese Government on very severe penalties. The ophium on seizure is burnt, the vessel on which it is brought to the port confiscated, and the Chinese in whose possession it may be found for sale punished with death. Under any circumstances it is beneath the Company to be engaged in such a clandestine trade; we therefore, hereby positively prohibit any more ophium being sent to China on the Company's account. ही बोलाची कढी होती फ़क्त शेवटचा शब्द मोलाचा होता. ऑन कंपनीज अकाउंट पुढे चायनात कधीही कंपनी अकाउंट वर माल गेला नाही "इनडायरेक्टली" पाठवण्यात आला.. एकेकाळचे फ़्री ट्रेडर्स भारतात "रुलर्स" व चायनात "स्मगलर्स" बनले होते. या पत्राला बंगाल प्रेसीडेन्सीने उत्तर देतांना कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्सला काळजी करु नका ऑपरेशन सेफ़ आहे असे उत्तर पाठवले होते.

अफ़ु उत्पादनावरील संपुर्ण नियंत्रण व कंट्री ट्रेडर्स मार्फ़त अफ़ु ची विक्री

एक बॉलीवुड सिनेमा बहुधा कंपनी नावाचा रामगोपाल वर्माचा त्यात एक गाण आहे गंदा है पर धंदा है ये. ते या कंपनीला इथे फ़ार लागु होत. शिवाय एक जाहीरात होती बघा एका वर्ल्डकप क्रीकेट च्या सीझनमध्ये पेप्सीची बहुधा आठवली? तस कंपनीच अफ़ु ट्रेड विषयी होत. त्यांची पंचलाइन होती नथींग ऑफ़ीशीयल अबाऊट इट. तर या "इनडायरेक्ट" सप्लायची यंत्रणा बघु. कंपनीने एक मार्ग सुरु केला अगोदरच्या भागात पाहीलेल्या "कंट्री ट्रेडर्स" मार्फ़त. कंपनी या कंट्री ट्रेडर्स ना भारतातुन ओपियम खरेदी करण्यासाठी कर्ज देत असे. अट होती की चायनात अफ़ु विकल्यानंतर त्यांनी कंपनीचे कर्ज व्याजासहीत कॅन्टॉन ट्रेझरी त जमा करायचे. एक लक्षात घ्या "कंट्री ट्रेडर्स" म्हणजे कंपनी स्वत: नाही ते स्वतंत्र होते इंडिव्हीज्युअल ट्रेडर्स होते पकडले गेले तरी कंपनी हात वर करायला मोकळी होती. आता या व्यवहारात नुसती कंट्री ट्रेडर्स कडुन केलेली व्याजाची कमाई नव्हती. तर दुसरा अजुन एक डीप प्लॅन होता.

एकीकडे कंपनीने त्यांच्या ताब्यातील बंगाल व पाटणा मधले संपुर्ण अफ़ु उत्पादन ताब्यात घेण्यास टीपीकल ब्रिटीश शिस्तीत सुरुवात केली होती. अफ़ु उत्पादक शेतकर्‍यांना अ‍ॅडव्हान्सेस देणे सुरु केले व सुरुवातीला एकुण पिकाचा काही भाग पुढे हळुहळु बंगाल बिहारातील १०० % अफ़ु उत्पादन "कॉन्ट्रॅक्ट फ़ार्मींग" च्या व्यापक सखोल यंत्रणेतुन (ही पण विशेष बघण्यासारखी यंत्रणा आहे पण विस्तारभयास्तव टाळतो) स्वत"च्या ताब्यात घेणे सुरु केले. ही संपुर्ण अफ़ु कोलकाता येथे कंपनीच्या लिलावात कंट्री ट्रेडर्सना विकली जात असे.( १७७३ मध्ये अफ़ु उत्पादनावर पुर्ण नियंत्रण स्थापित झाल बेंगाल कौन्सील ने यापुढे कंपनीच केवळ अफ़ुची खरेदी करेल हा फ़तवाही काढला). वर पाहील्याप्रमाणे त्यासाठी फ़ायनान्सही होते. उदा.बजाज अ‍ॅटो जशी बाईक विकते व बजाज फ़ायनान्स ती बाईक घेण्यासाठी कर्ज देते व दोन्हीत बजाज कमाई करते तस काहीस समजा. या धंद्यात प्रॉफ़ीट मार्जीन प्रत्येक संबंधिताला टक्क्यात नव्हे तर पटीत होते. यातही पुन्हा अफ़ु उत्पादक शेतकर्‍यांची फ़ारच पिळवणुक करण्यात आली. त्यांना अगदी कमी कधी उलट मायनस मध्ये टाकुन उत्पादन उकळले जात असे. यात राजकीय दबावतंत्रही राबवले जात असे. हा प्रकार कॉटन नीळ इ. साठी ही होता.यातल्या नीळ संदर्भाती्ल चंपारण इथे फ़ार पुढे गांधींनी सत्याग्रह केला होता. नीळ म्हणजे इंडिगो ( इंडिगो चा वापर डायींग एजंट म्हणुन होता टेक्सटाइल इंडस्ट्रीजची ही महत्वाची ट्रेड कमॉडिटी होती) व या सर्व उत्पादीत अफ़ु साठी च विशाल मार्केट होत चायना. माध्यम होते कंट्री ट्रेडर्स. कलकत्याचे व इतरही अनेक भारतीय व्यापारीही यात सामील होते. या धंद्यात डोळेझाक करण्यासाठी कॅन्टॉन प्रशासनातील मॅन्डारीन्सना अधिकार्‍यांना तुफ़ान लाचलुचपत दिली जात असे तेही मजेत होते. याचा भीषण परीणाम चायनीज तरुणाईवर होऊ लागला होता. एक मोठी पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली होती. यात पुढे तर अफ़ु उत्पादनाच्या क्वालीटी व किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी जुनी पद्धत बंद करुन अधिक कठोर "एजन्सी सिस्टीम" ही सुरु केली. जे कंट्री ट्रेडर्स कर्ज घेत नसत त्यांना ही ओपियम विकल्यावर कॅन्टॉन मध्ये मिळालेले सिल्व्हरपेमेंट जमा करुन घेऊन बिल्स ऑफ़ एक्सचेंज इश्यु केले जात असे. पुढे अफ़ु उत्पादन वाढल्यावर चायनाच का ? इतरही एशियन कंट्रीजना दर्जेदार अफ़ु घेण्याचा हक्क आहे की नाही ? या सात्विक संतापाने डायरेक्टर्सनी बेंगाल कौन्सील ला फ़र्मान सोडले. की तुम्ही आता इतरही मलाया ,आर्चीपेलागो इ, या इस्टर्न आयलॅन्ड्स इथे देखील अफ़ु विकण्याचा आदेश दिला.

चायनात व्यसनाधीनतेचे प्रमाण चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचल्यावर १७९६ व १७९९ मध्ये चिंग राजवटीने अजुन कडक नविन नियम आणले. अफ़ुशी निगडीत सर्व संबंधीताना कडक शिक्षेची तरतुद केली गेली. कंपनीला आपला प्रॉफ़ीटेबल टी ट्रेड अफ़ु पासुन सुरक्षित ठेवायचा होता त्याविषयी फ़ार जागरुक असलेल्या कंपनीने अफ़ुची चोरी पकडली जाऊ नये म्हणुन जे कंपनी अगोदर कंट्री ट्रेडर्सना बिल्स इश्यु करत असे कर्ज वसुल करत असे ते कॅन्टॉन इथे करण्या ऐवजी आता जवळच्याच मकाऊ (पोर्तुगीजांच्या ताब्यातील बेट या सर्व एशियन भुभागात एकेक बेट अती महत्वाच बनल होत एकेका बेटावर एकेक युरोपिय देशाच नियंत्रण होत.) इथे आपला अजुन एक ट्रेझरी एजंट १८१२ त नेमला. आता अफ़ु चायनात विकणे कंट्री ट्रेडर्सनाही अवघड होऊ लागले होते. अफ़ुचा धंदा नसता तर मकाऊ ला एजंट नेमुन कंट्री ट्रेडर्स ला ही स्पेशल फ़ॅसीलीटी देण्याची काहीच गरज नव्हती.

इकडे अफ़ु च्या धंद्यातला डोळे फ़िरवणारा नफ़ा बघुन १९ व्या शतकात अमेरीकन फ़्री ट्रेडर्सही यात शिरले त्यांनी स्वतंत्र टर्कीश ओपियमची लिंक बसवली आणि इकडे पश्चिम भारतातुन मुंबईव इतर सेंटर्स वरुन पारशी व्यापार्‍यांनी ओपियमचा जोरदार सप्लाय सुरु केला. या दोघांमुळे कंपनीचा बेंगाल ओपियम ट्रेड धोक्यात येऊ लागला. बंगाल / पाटणा ओपियम ला माळवा अफ़ु पासुन वाचवण्यासाठी कंपनीने अनेक प्रयत्न सुरु केले. पारशी व्यापारी माळव्याची अफ़ु वापरत. पारशी व्यापार्‍यांनी यातुन मोठी माया जमविली.तर या धंद्यात थेट जमशेदजी जीजीभॉय सारखे नामांकितही गुंतलेले होते. चायनात ही माळव्याची अफ़ु पोहोचवण्यासाठी सिंध रुट चा वापर केला जात असे. पुढे जेव्हा एकमेव अफ़गाण वॉर करुन त्यात भीषण पराभव झालेले कंपनीचे सेनापती परतत होते तेव्हा त्यांनी सिंध प्रांतावर कब्जा करुन पराभवाचे शल्य कमी केले. या कारवाईमागे माळवाच्या अफ़ु चा या रुट ने चायनात होणारा नॉन कंपनी सप्लाय रोखणे ही एक महत्वाची प्रेरणा होती. माळवा अगोदर मराठ्यांच्या ताब्यात होते. तिसर्‍या व अखेरच्या १८१८ च्या निर्णायक अ‍ॅन्ग्लो मराठा वॉर नंतर माळव्या वर राज्य करणारे होळकर स्टेट कंपनीचे मांडलीक झाले. कंपनीच्या अ‍ॅन्ग्लो मराठा वॉर्स संदर्भात हिस्ट्री ऑफ़ ओपियम वॉर्स चा लेखक ब्रायन इंग्लीस म्हणतो. " Many factors contributed to the Company’s incessant wars with the Marathas, and controlling the opium trade was certainly among them. ‘The revenue from Bengal opium was being used to fi nance a war to secure the revenue from Malwa opium’

स्मगलर्सनी लिंटीन बेटावरुन स्थापन केलेली अफ़ुची नविन डिलीव्हरी सिस्टीम

१७९९ नंतर चायनात अफ़ुचे नियम कडक झाल्याने कंट्री ट्रेडर्स नी ओपियम डिलीव्हरीची नविन सिस्टीम बसवली. पर्ल नदी जवळ एक Lintin Island होते. कंट्री ट्रेडर्स आता आपल्या शीप्स अगोदर इथे या निर्जन सुरक्षित बेटावर आणु लागले. मग इथुन अफ़ु्चे चायनीज डीलर्स च्या बोटीमधुन स्मॉल स्टोअरशीप्स मधुन ( कंट्री ट्रेडर्स चा चायनीज काउंटरपार्ट तेथील इतर चायनीज व्यापारी होते हॉन्ग मर्चंट्सनी हा व्यवसाय कधीच केला नाही त्यांच्या सरकारी स्टेटसमुळे त्यांची हा व्यवसाय करायची हिंमत नव्हती) हा चोरुन लपवुन माल कॅन्टॉनला आणण्यात येत असे. मात्र माल कॅन्टॉनमध्ये आणण्यापुर्वी हे डिलर्स अगोदर स्वत: कॅन्टॉन ला जाऊन लोकल चायनीज व्यापार्‍याला गाठत त्यांच्याशी अगोदर मालाचा सौदा करत. सौदा जमला तर डिलर्स ना व्यापारी सिल्वरमध्ये पेमेंट करत व त्या बदल्यात डिलर्स कडुन ओपियम चीट्स घेत. नंतर मग चायनीज व्यापारी लिंटीन वर जाऊन सौद्याची ओपियम चीट दाखवुन माल ताब्यात घेऊन चोरट्या मार्गाने कॅन्टॉन किंवा चायनाच्या इतर मेनलॅन्ड मध्ये पाठवत. यासाठी एक डिलर्स दुसरे स्टोअरशीप्स चे ओनर्स अर्थातच चायनीज अधिकार्‍यांना तुफ़ान लाचलुचपत देत असत. या नविन लिंटीन सिस्टीममुळे यात भारतीय कंट्री ट्रेडर्स ही सुरक्षित झाले होते. ते फ़क्त लिंटीन पर्यंत माल पोहोचवु लागले. तिथुन पुढचा कार्यक्रम चायनीज डिलर्स, लहान चायनीज स्टोअरशीप ओनर्स ( ज्यांच्या जहाजातुन माल पुढे चायनात जात ते,) व शेवटी चायनीज व्यापारी या तिघांवर (या तिन्ही चायनीजांवर पुढील या धंद्याचा डर्टी पार्ट जो होता उदा. लाच देणे., माल सीमेच्या आत पोचवणे व शेवटी विकणे हा सोपवला होता.) आता कंट्री ट्रेडर सेफ़ व ह्या पपेट्स मार्फ़त धंदा चालवणारी कंपनी तर अजुनच सुरक्षित झाली. १८२० नंतर या सिस्टीममुळे बहार आली. थोर इतिहासकार मॉर्स याला लिंटीन पिरीयड म्हणतो एकीकडे लिंन्टीन सिस्टीम स्थापित झाली दुसरीकडे होळकरांकडुन माळवा प्रांतही ताब्यात आला. सेल भी प्रॉडक्शन भी फ़िर क्या कहने ? १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ओपियम चेस्ट पाठवले होते त्याची संख्या होती ३००० चेस्ट्स, १८२० मध्ये ती १०००० चेस्ट वर पोहोचली. कंपनीच्या मोनोपलीच्या अखेरच्या वर्षामध्ये थेट २०००० पेक्षा अधिक चेस्ट अफ़ु कंपनीमार्फ़त चायनात स्मगल्ड करण्यात आली.

१८२८ मध्ये ओपियम विकुन मिळणारी रक्कम संपुर्ण चहाच्या खरेदीसाठी पुरेशी होती. मोनोपलीच्या अखेरच्या वर्षात तर कंपनीकडे फ़क्त चहाच नाही तर पुर्ण चायना मालाच्या खरेदीसाठी आवश्यक जे सिल्वर होते त्याच्या दुप्पटीने सिल्व्हर ओपियम विक्रीच्या माध्यमातुन उपलब्ध होते. एकेकाळी सिल्वरपेमेंट साठी मारे मारे घुमने वाली कंपनी आता स्वावलंबी झाली होती. हे घडण्यास भारतीय योगदान कसे महत्वाचे होते याचा उल्लेख येणार हे कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स च १८०७ मधील कॅन्टॉन कौन्सील ला लिहीलेल पत्र बघा. डायरेक्टर्स म्हणतात.
So long as the balance of trade between India and China is as much in favor of the former, as the balance between England and China is in favor of the latter (which is the case at present) there cannot be any necessity to forward supplies of bullion from England for the service of Canton. There is no present appearance of this favorable state of the trade suffering any diminution.

अमेरीकेच्या फ़्री ट्रेडर्सचा चायना ट्रेड मधील प्रवेश

अमेरीकेला ब्रिटीशांपासुन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरीकन व्यापार्‍यांनी चायना ट्रेड मध्ये प्रवेश केला. त्याअगोदर १६५१ च्या नॅव्हीगेशन अ‍ॅक्ट नुसार ब्रिटीश अखत्यारीतील नॉर्थ अमेरीकन व्यापार्‍यांना युरो एशिया व्यापार करण्यास बंदी होती. कंपनीचा हा नविन स्पर्धक उत्साही आणि आक्रमक होता. इतरांप्रमाणेच अमेरीकेलाही कॅन्टॉन व हॉन्ग मार्फ़तच व्यवसायाची परवानगी होती. मात्र त्यांनी वेगळ्या शैलीने व्यापार करण्यास सुरुवात केली. इंग्लंडप्रमाणे अमेरीकेतही चहाची अतीप्रचंड मागणी होतीच. या अगोदरच्या काळात कंपनी इंग्लंडला माल नेत असे.आणि तिथुन मग तो अमेरीकेत री-एक्सपोर्ट केला जात असे. आता अमेरीकन स्वत: खरेदीसाठी चायनात आले. कंपनीत व अमेरीकन्स च्या खरेदीत फ़रक होता. कंपनी बहुतांश टक्के माल कॉन्ट्रॅक्टनेच खरेदी करत होती अमेरीकन्स मात्र दहा टक्के पेक्षाही कमी माल फ़क्त कॉन्ट्रॅक्ट करुन खरेदी करत बाकी पुर्ण माल ते ओपन मार्केट मधुन ऑन द स्पॉट खरेदी करत. अमेरीकेन्सचा कल ग्रीन टी खरेदी करण्याकडे होता. कंपनी ब्लॅक टी लाच पसंती देत असे. याला कारण होते १७८४ च्या कॉम्युटेशन अ‍ॅक्ट ने इम्पोर्ट ड्युटी घटवुन इंग्लंडमधील चहाच्या मागणीला जोरदार उत्तेजन दिले होते. मात्र कंपनीच्या फ़ेवरमध्ये हा कायदा पास करतांना सरकारने यात कंपनीसाठी काही अटीही घातल्या होत्या. याला कारण संपुर्ण इंग्लंडला चहा सप्लाय करण्याची जबाबदारी आता कंपनीवर होती त्यात ती कमी पडु नये याची खात्री असावी म्हणुन तर अटी अशा होत्या उदा.दरवर्षी किमान ४ लिलाव चहाच्या विक्रीसाठी लंडनला आयोजित करणे व किमान एक वर्ष पुरेल इतका साठा रेडी स्टॉक स्पेअर मध्ये कंपनी गोडाउन मध्ये ठेवणे. अशी अट असल्याने व दुसरी गोष्ट म्हणजे ग्रीन टी काही कालावधीनंतर खराब होत असे. मात्र ब्लॅक टी काही वर्षांपर्यंत टीकुन राहत असे. म्हणुन कंपनीचा मुख्य भर ब्लॅक टी च्या खरेदीवर होता. दोन दोन वर्ष जुनी गोडाउन मध्ये पडलेली ब्लॅक टी नंतर बाजारात विक्रीसाठी जात असे. यातही पुन्हा लिलावात न विकली गेलेली ब्लॅक टी ही गोडाऊन मध्ये जात असे. अशा रीतीने या कायदेकानुन मुळे तमाम ब्रिटीश जनतेला अमेरीकन्स च्या तुलनेत दोन दोन वर्ष जुनी ब्लॅक टी पिण्याची सवय जडली. याउलट अमेरीकन ट्रेडर्स वर कंपनीवर होते तसे कुठलेही असे स्टॉक करुन ठेवण्याचे बंधन नसल्याने त्यांचा चहा जेव्हा तो ग्राहकाच्या हातात शेवटी जाई तो फ़ार तर सहा महीने इतकाच जुना असे. अमेरीकन व इतर युरोपियन्स इंग्रजाच्या तुलनेत ताज्या चहाचे घोट घेत असत. यामुळे इंग्लंडमध्ये जेव्हा क्रॉफ़र्ड हा फ़्री ट्रेड चा समर्थक जेव्हा चहाचा व्यापार खुला करण्यासाठी प्रयत्न करत होता तो तेव्हा हा मुद्दा उचलुन कंपनीच्या "जुन्या" चहावर टीका करत असे. कंपनीच्या हेवी प्रॉफ़ीट मार्जीन्स वर ही इंग्लंडमध्ये कडक टीका होऊ लागली होती. ब्रिटनमार्फ़त अमेरीकेत जाणारा चहा कमी होत गेला. अमेरीकन एन्ट्री अगोदर कंपनी कॅन्टॉन मधली लार्जेस्ट बायर होती त्यांची बार्गेनींग पॉवर नं १ होती. मात्र अमेरीकनांनी हळुहळू आपला टक्का कॅन्टॉनमध्ये वाढवला तसा हॉन्ग मर्चंट्स चा कंपनीवरील डिपेंडस कमी होऊ लागला. कंपनी इथेही अडचणीत येऊ लागली. चहाची मार्केट मधली फ़र्स्ट चॉइस आता अमेरीकन करु लागले. अमेरीकनांनी पुढ पुढे तर अशी वेळ आणली की काही ठराविक ग्रीन टीच्या ग्रेडचा माल च कंपनीला मिळणे मुश्कील हॊउ लागले. मागे बोस्टनला अमेरीकनांनी कंपनीचा चहा पाण्यात बुडवला होता आता अमेरीकन ट्रेडर्स पुर्ण कंपनीलाच पाण्यात बुडवतात की काय अशी स्थिती निर्माण झाली. अर्थात तसे काही झाले नाही व्यापार चालु च राहीला. इकडे हॉन्ग मर्चंट्स ची मोनोपली हळुहळु तुटत होती. मागे म्हटल्याप्रमाणे बरेचसे अमेरीकन टर्कीश ओपियम च्या धंद्यातही होते व चहातही कार्यरत होते. तर त्यांचे ओपियम मुळे चायनीज ट्रेडर्स शी बेकायदेशीर संधान साधलेलेच होते. तर अफ़ु बरोबरच अमेरीकन्स नी चायनीज ट्रेडर्स बरोबर डायरेक्ट टी ट्रेड ही सुरु केला. चायनीज मर्चंट हॉन्ग मर्चंट्स ची ऑफ़ीशीयल लिंक तोडुन अमेरीकन मर्चंट्स ना डायरेक्ट चहा पुरवु लागले..मधला हॉन्गचा मोठा दुवा तुटल्याने मग किंमतीतही कपात होऊ लागली. कंपनीला मात्र हॉन्ग मर्चंट्स शिवाय पर्याय नव्हता. दुसर त्यांच्या सिस्टीम्स क्वालीटी कॉन्टॅक्टींग अ‍ॅडव्हान्सींग जरी चांगल्या होत्या तरी कालांतराने रीजीड झाल्या होत्या अमेरीकन ट्रेडर्स त्यामानाने फ़्री होते व ते सहज वेगाने लवचिकतेने सिच्युएशन बघुन निर्णय घेउ शकत होते. कंपनी मोठा हत्त्ती झाला होता. कंपनीच्या कॉस्ट्स ही जास्त होत्या. या सर्वांचा परीणाम अमेरीकन व्यापारी वर्चस्वात झाला.

ब्रिटीश फ़्री ट्रेडर्स चा वाढता प्रभाव आणि कंपनीच्या चायना ट्रेड च्या मोनोपलीचा शेवट

ब्रिटनमधले कंपनीच्या मोनोपली चे विरोधक असलेले ब्रिटीश ट्रेडर्स ज्यांना या चायनीज केक मध्ये वाटा हवा होता.ते अमेरीकन ट्रेडर्सचे विक्रीचे दर वारंवार तुलनेसाठी दाखवु लागले. व कंपनीच्या हाय रेट्स व ओल्ड स्टॉकवर टीका करु लागले. त्यांचे म्हणणे होते हा हत्ती आता कामाचा नाही. व्यापार सर्वांनाच खुला हवा. या मागणी मागे इंग्लंडमध्ये होत असलेल्या औद्योगिक क्रांती ची व राजकारणात होत असलेल्या सुधारणांची भक्कम पार्श्वभुमी होती. पुढे या सर्व दबावांची अखेर १८३३ मध्ये कंपनीची चायना ट्रेड ची मोनोपली कायमस्वरुपी संपवण्यात झाला. ब्रिटीश फ़्री ट्रेडर्स चे नविन युग सुरु झाले. यातलीच एक उदा. उदा. १८३२ मध्ये स्थापन झालेली Jardine Matheson & Co. यातला विलीयम जर्डाइन हा कंपनी शीप वर डॉक्टर म्हणुन नोकरीस लागला पण १८१७ त त्याने नोकरी सोडुन धंदा करण्याचे ठरविले व त्याला ज्युनियर असणारा मॅथीसनला सोबत घेऊन ही कंपनी स्थापन केली. हा त्या काळात एक "कॅन्टॉन रजीस्टर" नावाचे मासिक ही चालवत असे ज्यात तो आक्रमकपणे फ़्री ट्रेड चे समर्थन करत कंपनीवर टीका करत असे. पार्लीयामेंटने चायना ट्रेड ओपन करता बरोबर तयारीतच असलेल्या या कंपनीने आक्रमकतेने चायना ट्रेड सुरु केला सुरुवात चहा पासुन केली. मात्र शेवट ओपियम वर केला. दहाच वर्षात या कंपनीच्या डझनाहुन अधिक शीप्स व्यापार करु लागल्या. चायनातुन चहा व सिल्क निर्यात करुन व त्या बदल्यात शेकडो ओपियम चेस्ट्स चायनात ही कंपनी आणु लागली. अफ़ु बाबत एका भावी इन्व्हेस्टर ला लिहीलेल्या पत्रात जर्डाइन म्हणतो. "We have no no hesitation in stating to you openly that our principal reliance is on opium " त्यांना माहीत होते की हे चायनात बेकायदेशीर आहे. मात्र इस्ट इंडिया कंपनीने मागील इतक्या वर्षात सेट केलेली भ्रष्ट व्यवस्था छान रुजलेली होती. कामात काहीच अडचण नव्हती. जे प्रायव्हेट ट्रेडर्स सुरुवातीला कंपनीवर टीका करत होते ते स्वत:ही ओपियम ट्रेड मध्ये मग्न होउन गेले होते. डॉ. जर्डाइन या सर्व ब्रिटीश फ़्री ट्रेडर्स चा लीडर प्रवक्ता टाइप होता.. या डॉ. जर्डाइन चे पात्र बेंजामीन डिजराएली ने १८३७ साली एक कादंबरी लिहीली Sybil त्यात घेतले होते त्यात त्याचे वर्णन असे केले ‘a dreadful man! A Scotchman richer than Croesus, one McDruggy fresh from Canton, with a million of opium in each pocket, denouncing corruption and bellowing free trade.’ जर्डाइन पार्लीयामेंट मध्ये फ़्री ट्रेडर्स च्या वतीने अर्ज न्यायचा. तिथे आक्रमकपणे लॉबींग करायचा. कंपनीवर व तिच्या मोनोपलीवर त्यांचे दोष मर्यादा दाखवायचा, प्रखट टीका करायचा. व पुढे तर ओपियम ट्रेड हा ब्रिटीश सरकारने चायनावर बळाचा वापर करुन चायनाला कायदेशीर करायला भाग पाडावे व चायनाला त्याचे सर्व पोर्ट्स ओपन करायला लावावे ही मागणीही आक्रमकपणे सर्व ब्रिटीश फ़्री ट्रेडर्स च्या वतीने रेटु लागला. या सर्व बाबींचा परीणाम अखेर कंपनीची चायना ट्रेड ची मोनोपली १८३३ मध्ये कायमस्वरुपी संपण्यात झाला. त्यानंतरही कंपनी व्यापार करत होती मात्र ती इतर अनेक व्यापार्‍याप्रमाणेच एक अशी राहीली होती.

कमिशनर Lin आणि पहील्या ओपियम वॉर ची पुर्वपिठीका

१८३९ पर्यंत अफ़ु च्या आयातीचे प्रमाण फ़ारच वाढल्यावर मग चायनाने Lin Tse Hsu या कमिशनरची खास नेमणुक हा ओपियम चा वाढता ओघ रोखण्यासाठी केली. कारण तो पर्यंत चायनात ओपियम स्मोकर्स ची संख्या १२५ लाखा पर्यंत पोचली होती. प्रकरण फ़ार गंभीर झाले होते. सर्वात अगोदर लिन ने हा व्यापार थांबवावा यासाठी क्वीन व्हिक्टोरीया ला एक खरमरीत पत्र अपील करणारे लिहीले ज्यात तो म्हणतो.‘Even though the barbarians may not necessarily intend to do us harm, yet in coveting profit to an extreme, they have no regard for injuring others’, तो पुढे त्वेषाने विचारतो Let us ask . where is your conscience ? मात्र कमिशनर लिन चे पत्र राणी व्हिक्टोरीया पर्यंत पोहोचलेच नाही. लिन ने आक्रमक कारवाईला सुरुवात केली. नंतर त्याने जे चायनीज अधिकारी लाच घेऊन अफ़ु चायनात अलाउ करत त्यांच्यावरही कारवाई चौकशी करण्यास सुरुवात केली.

कॅन्टॉन परीसरातील सर्व विदेशी जहाजांची तपासणी सुरु झाली. २४ मार्च १८३९ ला लिन ने Lancelot Dent या अफ़ु च्या ब्रिटीश व्यापार्‍याला अटक करण्याचा आदेश काढला. त्याला फ़ॉरेन ट्रेडर्सनी विरोध केल्यावर संतापलेल्या लिन ने सर्व फ़ॅक्टरीज मध्ये व्यापार्‍यांना रोखुन धरले व तेथील चायनीज सर्व्हंट्स ना बाहेर काढुन घेतले. सहा आठवडे अशी फ़ॉरेन ट्रेडर्स ची नाकाबंदी केल्यावर त्यांनी निमुटपणे २०००० अफ़ु चे चेस्ट्स लिनकडे सोपवले. त्याने ते सर्व चेस्ट जप्त करुन नष्ट केले त्यातील ७००० चेस्ट्स जर्डाइन मॅथीसन कं चे होते लिंटीन बेटावर अगोदरच अफ़ु चा मोठा साठा केलेल्या इतर व्यापार्‍यामध्ये या कारवाईने भीतीची लाट पसरली.. फ़्रि ट्रेडर्स नी जर्डाइन च्या नेतृत्वात त्यांची बाजु मांडण्यासाठी लंडनला मंडळ पाठविले .त्यांनी मोठा आकांडतांडव केला. आमच्या प्रॉपर्टीवर व्यापार स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे असे म्हटले. पार्लीयामेंटमध्ये अर्ज करुन ब्रिटीश सरकार ने चायनावर बळाचा वापर करुन ओपियम ट्रेड कायदेशीर करुन घ्यावा व सर्व चायनीज पोर्ट सर्व ब्रिटीश ट्रेडर्ससाठी ओपन करण्यास चायनाला भाग पाडावे ही मागणी जोर धरु लागली. फ़्री ट्रेडर्स चा पार्लीयामेंट मध्ये विलीयम ग्लॅडस्टोन सारखे अनेक अफ़ु व्यापाराचे विरोधकही होते मात्र तरी वरील घडामोडी नंतर ब्रिटीश सरकारने अ‍ॅडमिरल जॉर्ज एलियट च्या नेतृत्वात ५४० गन्स असलेल्या १६ वॉरशीप्स चार आधुनिक आर्म्ड स्टीमर्स (स्टीमर्स ची सुरुवात होती) आणि ४००० सैनिक चायनाला पाठवले इथुन पुढे पहीले ओपियम वॉर चायना इंग्लंडमध्ये सुरु झाले. कंपनीच्या बंगाल प्रेसीडेन्सी ने या युद्धाला बंगालहुन शस्त्रसज्ज जहाजे पाठवुन, ४९ वी बंगाल इंजीनीयर्स व मद्रास सॅपर्स ची तुकडी इंग्लंड च्या सैन्याला मदतीला पाठवुन मोलाची मदत केली. हेवी बंबार्डमेंट नंतर ड्रॅगन शेवटी शरण आला. ऑगस्ट १८४२ ला नानकींग करारावर सह्या करण्यात आल्या. या तहानुसार चायनाला व्यापार्‍यांना नुकसान भरपाई म्हणुन २१ मिलीयन डॉलर्स देणे, कॅन्टॉन, अ‍ॅमॉय ,फ़ुझो, निन्गपो ( आठवा- जेम्स फ़्लीन्ट चा प्रयत्न ) आणि शांघाय ही पाच बंदरे विना अडथळा व्यापारासाठी खुली करणे, एकेकाळचा स्मगलर्स चा बेस असणार हॉंगकॉन्ग हे बेट ब्रिटनला लीज वर कॉलनी म्हणुन ट्रान्सफ़र करणे,इ. अनेक अपमानकारक एकतर्फ़ी अटी लाद्ण्यात आल्या. ओपियम अजुनही ब्रिटीश सरकारने ऑफ़ीशीयली बेकायदा ठरवल होत. मात्र जर्डाइन व फ़्री ट्रेडर्स बधले नाहीत शिवाय भारतातल्या तेव्हाच्या गव्हर्नर जनरल ने ही सरकारला बजावले की " Her Majesty,s Government should do nothing to place in peril our Opium Revenue " यामुळे अख्रेर ब्रिटीश गव्हर्मेंट ने अर्थातच सोयीस्कर माघार घेतली. आणि ओपियम ट्रेड सुरुच राहीला.व बहरतच राहीला.

प्रतिक्रिया

वाचतोय. एकदोन ठिकाणी सालाच्या झालेल्या चुका वगळता लेख उत्तम आहे. पुभाप्र.

राघवेंद्र's picture

3 May 2016 - 1:57 am | राघवेंद्र

उत्तम माहिती. पु. भा. प्र.

विजय पुरोहित's picture

3 May 2016 - 12:00 pm | विजय पुरोहित

वाचतो आहे...
आवडतोय विषय. इतकी मेहनत घेत असल्याबद्दल धन्यवाद.
छान आहे उपक्रम.

शाम भागवत's picture

4 May 2016 - 8:07 am | शाम भागवत

साल जवळ येत चाललेय. त्यामुळे तिथेच मालिका थांबतीय की काय अशी भिती वाटतेय. पण त्यानंतरही ब्रिटीश व्यापार कसा चालू होता. तो फायदेशीर होता किंवा नाही हे वाचायला आवडेल. अगदी १९४७ सालापर्यंत.

तुमच्या अभ्यासाला
_/\_

अभ्या..'s picture

4 May 2016 - 9:17 am | अभ्या..

ट्रिब्युट मानवंदना.
अप्रतिम लेख, चांगले संदर्भ. आवडतंय वाचायला.

damn's picture

4 May 2016 - 12:10 pm | damn

अफ़ु उत्पादक शेतकर्‍यांना अ‍ॅडव्हान्सेस देणे सुरु केले व सुरुवातीला एकुण पिकाचा काही भाग पुढे हळुहळु बंगाल बिहारातील १०० % अफ़ु उत्पादन "कॉन्ट्रॅक्ट फ़ार्मींग" च्या व्यापक सखोल यंत्रणेतुन (ही पण विशेष बघण्यासारखी यंत्रणा आहे पण विस्तारभयास्तव टाळतो) स्वत"च्या ताब्यात घेणे सुरु केले.
...........
इतके सकस लेखन असताना कोणालाही विस्तार नक्कीच आवडेल.
कॉन्ट्रक्ट फार्मिंग वर सुद्धा detailed analysis येऊ द्या.

damn's picture

4 May 2016 - 12:10 pm | damn

अफ़ु उत्पादक शेतकर्‍यांना अ‍ॅडव्हान्सेस देणे सुरु केले व सुरुवातीला एकुण पिकाचा काही भाग पुढे हळुहळु बंगाल बिहारातील १०० % अफ़ु उत्पादन "कॉन्ट्रॅक्ट फ़ार्मींग" च्या व्यापक सखोल यंत्रणेतुन (ही पण विशेष बघण्यासारखी यंत्रणा आहे पण विस्तारभयास्तव टाळतो) स्वत"च्या ताब्यात घेणे सुरु केले.
...........
इतके सकस लेखन असताना कोणालाही विस्तार नक्कीच आवडेल.
कॉन्ट्रक्ट फार्मिंग वर सुद्धा detailed analysis येऊ द्या.

मराठी कथालेखक's picture

4 May 2016 - 12:44 pm | मराठी कथालेखक

छान लेख. कृपया आधीच्या भागांचे दुवे द्यावेत.

रॉजरमूर's picture

9 May 2016 - 12:52 am | रॉजरमूर
रॉजरमूर's picture

9 May 2016 - 12:54 am | रॉजरमूर

खूप छान.........!

अत्यंत रोचक माहिती मिळत आहे ,
पुढील भागाच्या प्रतीक्षेत .

बोका-ए-आझम's picture

9 May 2016 - 1:03 am | बोका-ए-आझम

पुनरागमन दणक्यात झालेलं आहे!

जेपी's picture

16 May 2016 - 9:28 pm | जेपी

वाचतोय

वाचूका's picture

24 Aug 2016 - 4:35 pm | वाचूका

अभ्यासपूण॓ लेख....

जयंत कुलकर्णी's picture

24 Aug 2016 - 6:18 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच !
मी अफूच्या युद्धाबद्दल लिहिणार होतो पण आपण त्याबद्दल लिहाल अशी आशा करतो नव्हे लिहाच...
जयंत कुलकर्णी.

जयंत कुलकर्णी's picture

24 Aug 2016 - 6:21 pm | जयंत कुलकर्णी

सवीस्तर लिहा असे म्हणायचे होते मला...