सोलापूरचे कुणी आहे का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
30 Apr 2016 - 4:37 pm

नमस्कार,

कालच "मिळून सार्‍याजणी-दिवाळी अंक-२०१५" वाचला.

त्यातील "सौर उर्जा शेती" ह्या विषयावरील "आय.आय.टी की डोंबल" हा अरूण देशपांडे लिखित लेख वाचण्यात आला.

ही शेती अंकोले ह्या सोलापूर शहराजवळच्या गावांत आहे.

आज श्री. अरूण देशपांडे ह्यांच्या बरोबर प्राथमिक बोलणे झाले.

मी आणि आमची सौ. ५ ता.ला रात्री सोलापूरला पोहोचू.

६ ता.ला पूर्ण दिवस आम्ही अंकोल्याला सौर शेती बघायला जावू.ज्या मिपाकरांना आमच्या बरोबर ही सौर शेती बघण्यात रस असेल त्यांनी जरूर यावे.श्री.अरूण देशपांडे ह्यांनी पण असेच सुचवले आहे.

६ ला रात्री एखादा कट्टा सोलापूरकरांबरोबर करायला नक्कीच आवडेल.

कळावे,

लोभ आहेच, तो कट्ट्याच्या निमित्ताने अजून वाढेल, ह्यात शंका नाही.

समाजप्रकटनविचारमदत

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

30 Apr 2016 - 4:41 pm | सस्नेह

चिपळूण क्यान्सल का, मुवि ?

मुक्त विहारि's picture

30 Apr 2016 - 4:46 pm | मुक्त विहारि

सौर उर्जा आधारीत शेती बघायला जात आहे.

"सौर उर्जा शेती" ही संकल्पना मला तरी नविन आहे.

मुवि, मला पण देशपांडे यांच्या प्रकल्पाला भेट द्यायची आहे. पण सध्या वेळेअभावी जाता येणार नाही. तेव्हा तुम्ही शक्य असेल तेवढी माहिती गोळा करा आणि सांगा.

जरूर....

हा सौर शेती प्रकल्प फारच अभिनव आणि नैसर्गिक असल्याने, फोटो सकट माहिती देईन.

"जे जे आपणासी ठावे ते ते सांगत जावे आणि जे न ठावे त्याचे ज्ञान घेत जावे, असे आम्चे बाबा महाराज म्हणतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2016 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा सौर शेती प्रकल्प फारच अभिनव आणि नैसर्गिक असल्याने, फोटो सकट माहिती देईन.

नक्की आठवणीने लिहा. जेवढे वाचले आहे त्यावरून अधिक माहिती मिळविण्याची उत्सुकता वाढली आहे.

चाणक्य's picture

2 May 2016 - 3:18 pm | चाणक्य

अनिल अवचटांच्या 'कार्यरत' पुस्तकात अरून देशपांडे यांच्याबद्दल वाचण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट द्यायची ईच्छा आहे. मुवि, जरूर वृत्तांत टाका तुमच्या भेटीचा नंतर.

मुवि राव, वीकांत तरी ठरवा की :|

नावातकायआहे's picture

30 Apr 2016 - 8:43 pm | नावातकायआहे

ते मु वि आहेत ;-)

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2016 - 6:03 pm | टवाळ कार्टा

अभ्या जब्या डब्या

अजय देशपांडे's picture

30 Apr 2016 - 8:50 pm | अजय देशपांडे

मी मंगळवेढा या गावी राहतो ६ तारखेला किती वाजता अंकोली या गावी आहात

प्रचेतस's picture

30 Apr 2016 - 9:42 pm | प्रचेतस

काय सांगताय.
मंगळवेढ्याला यायचंय एकदा. पाहण्यासारखं बरंच काही आहे तिकडं.

अजय देशपांडे's picture

1 May 2016 - 6:00 pm | अजय देशपांडे

या कधीहि स्वागत आहे

उद्या श्री.अरूण देशपांडे ह्यांना फोन करून वेळ ठरवीन.

तुम्हाला व्य.नि. केला आहे.

विजय पुरोहित's picture

30 Apr 2016 - 9:49 pm | विजय पुरोहित

अभ्या डब्या... आहे सोलापुरात...

Shridhar Laxman Patil's picture

1 May 2016 - 1:46 pm | Shridhar Laxman...

शनिवारी असतं तर आलो असतो

नंदन's picture

1 May 2016 - 2:17 pm | नंदन

वीस वर्षांपूर्वी, एका शालेय विज्ञानप्रकल्पस्पर्धेसाठी अंकोलीत चार दिवस रहायचा, तेथील प्रयोग जवळून पहायचा योग आला होता. तो अनुभव अजून स्मरणात आहे. तुम्ही जाऊन आल्यावर, तुमची निरीक्षणं वाचायला आवडतील.

(थोडे अवांतरः अशोक सराफ याच नावाचे गृहस्थ तेव्हा तिथे देशपांडे यांच्यासह कार्यरत होते :))

माम्लेदारचा पन्खा's picture

1 May 2016 - 3:35 pm | माम्लेदारचा पन्खा

डोंबोलीकडून केंद्र सरकलं की काय म्हणतो मी...........

मुविकाका सोलापुरात तुमचा मुक्काम कुठे?
.
.
.

कारण मी थोड्या दिवसापूर्वी यु एस ला आलो आहे हो. ;)

उल्हासनगर ला काय काम रे अभ्या????

युएसए म्हणलो नाहीये कडू. युएस. यूएस.
फारीन काय फक्त तुमचा ठेकाय काय?

वैभव जाधव's picture

1 May 2016 - 7:05 pm | वैभव जाधव

आम्ही अलीकडे हावो,यु एस लै लांब. ठेका कसला च्यामारी. जायचं तिकडं जावा. उद्या मिल्की वे सोडून जातो म्हणालास तरी चालतंय.
-अभ्या.. चा 'मित्र' वैभ्या..

चांदणे संदीप's picture

2 May 2016 - 10:24 am | चांदणे संदीप

हे युएस सोलाप्रात कुठशीक येतंय...बगितल पायजेल राव!
(माह्यती पायजे बाबा...उद्या रस्ता इचारत इचारत जावा लागायचं!)
;) ;)

Sandy

सॅन्डीबाबा नकाशा काढून बग. सोलापूराचे दोन भाग/तालुके. एक दक्षिण एक उत्तर. उत्तर सोलापुराकडे येयाचं नीट. ;)

चांदणे संदीप's picture

2 May 2016 - 12:35 pm | चांदणे संदीप

उत्तर सोलापूर! =)) =))

चौथा कोनाडा's picture

2 May 2016 - 1:02 pm | चौथा कोनाडा

कडू !
:-)))
ही अस्स्ल सैराट शिवी बर्‍याच दिवसांनी वाचुन लै ग्वॉड वाटलं अभ्यादा !
:-)))

वैभव जाधव's picture

2 May 2016 - 2:06 pm | वैभव जाधव

कडूलिंब मधला कडू. आम्हाला दुसरा कडू माहिती नाही ;)

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 3:07 pm | विजय पुरोहित

हेच्च म्हणतो. असलं कायतरी भारी भारी अभ्या...लाच सुचू शकतं.

नूतन सावंत's picture

1 May 2016 - 8:16 pm | नूतन सावंत

सोलारपूरबद्दल श्री.अनिल अवचट यांनी काही वर्षांपूर्वी सकाळ दिवाळी अंकात लिहिला होता.तिथे जाऊन पहायला आवडलं असतं पण आधी ठरलेल्या कार्यक्रमांमुळे जमत नाहीय.तुम्ही भरपूर फोटोंसह वृत्तांत लिहाही विनंती.

संजय पाटिल's picture

1 May 2016 - 9:23 pm | संजय पाटिल

ताय, लै दीसान दीसला?

नाखु's picture

2 May 2016 - 2:51 pm | नाखु

आणि अता अद्ययावत माहीती बातमी :

स्टार माझावरून

fसोलापूर : महाराष्ट्र आहे की माफिया राज्य? असा प्रश्न राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. कारण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा पोलिस बंदोबस्तात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी भूमीमुक्ती आंदोलन सुरु केलं होत. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. माफियांच्या दहशतिमुळे शेतकरी आपल्याच शिवारात पोलिस बंदोबस्तात राहतो हे महाराष्ट्राला शोभणार नाही.

आपल्याच शेतात वावरताना पोलीस बंदोबस्तात राहण्याची अनिवार्यता अरुण देशपांडे यांच्यावर आली आहे. अरुण देशपांडे गेली 25 वर्षे अंकोली गावात वास्तव्याला आहे. इथं राहून ते कृषी आणि जलसाक्षरतेच काम करत आहेत.

वॉटर बँकेचा अभिनव उपक्रम अरुण देशपांडेंनी राबवला आणि त्याचा देशभर प्रचार केला. त्यांचा अंकोलीतला विज्ञानग्राम प्रकल्प पाहायला देशभरातून लोक येतात. त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून आंदोलनात पुढाकार घेतला. माफियांच्या दहशतीमुळे त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठ काढण्यासाठी 25 वर्षांपूर्वी मोहोळ तालुक्यातील 350 एकर जमीन एका ट्रस्टने घेतली. 1980 च्या सुमारास श्रीनिधी ट्रस्टने अंकोली, शेजबाभळगाव आणि कुरुल या गावच्या हद्दीतील सुमारे साडेतीनशे एकर जमीन नाममात्र किंमतीने विकत घेतली. आजही इथे विद्यापीठाचा एक दगडसुद्धा उभा राहिला नाही. उलट प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून बडे बिल्डर, शासकीय अधिकारी आणि गावगुंडांनी या जमिनी बळकावल्याच उघड झालं आहे. शिवाय सध्याचा भूमी अधिग्रहण कायदा भूमाफियांच्या मदतीला आला आहे.

नारायण पवार हे गावातले जेष्ठ नागरिक आहेत. विद्यापीठासाठी जमीन देण्याच्या प्रक्रियेत त्याकाळी पवार यांनीच पुढाकार घेतला होता. लोक जमिनी द्यायला तयार नव्हते. पवार यांनी पहिल्यांदा स्वतःची जमीन श्रीनिधी ट्रस्टला दिली. यामुळे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या जमिनी दिल्या. कारण विद्यापीठ झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुणाला नोकरी, गावाला पाणी आणि मुलभूत सुविधा पुरवण्याच आश्वासन ट्रस्टने दिलं होतं.

25 वर्षांचा काळ निघून गेला, विद्यापीठ तर उभारलं नाहीच. उलट या जमिनी आता विकण्यात आल्या आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून भूमाफियांनी या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. एक हजार रुपये प्रती एकराने घेतलेली जमीन 40 लाखाला विकली जातेय. यामुळेच गावकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी लढा सुरु केला आहे.

गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा लढा सुरु आहे. या जमिनी विकत घेण्यात आघाडीवर आहेत कोकण विभागाचे महसूल उपायुक्त भा. च. पाटील. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुन्हा दाखल केलाय. गेल्या वर्षी त्यांना ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केल्यावर अंकोलीची जमीन त्यांनी पत्नीच्या नावे घेतल्याच उघड झालं होत. आता शेतकऱ्यांनी आपल आंदोलन तीव्र केल्यावर भूमाफियांनी दहशत माजवली आहे. यामुळेच आंदोलनाच नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. हक्काच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची वेळ येते हेच महाराष्ट्राला शोभणारं नाही.

त्यांच्या उपक्रमाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल, मला कुठल्याही प्रकारे लेखी माहिती द्यायला, त्यांनी मनाई केली आहे.

त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल इथे माहिती देता येत नाही.

भीमराव's picture

12 May 2016 - 6:38 pm | भीमराव

काय राव मुवी तुम्ही पन, त्यांनाच घेऊन या की मिसळपावाच्या गाड्यावर, मग नंतर ते स्वतःच सांगतील बरच काही. आणि आपल्याला पन आजुन १ खंबीर मावळा भेटेल.