व्हेज बिर्याणी (विदाऊट लेयर)

गौतमी's picture
गौतमी in पाककृती
28 Apr 2016 - 2:52 pm

ईथली पहिलीच रेसेपी आहे. आवडली तर नक्की सांगा.

लागणारा वेळ:

३० मिनिटे

लागणारे जिन्नस:

तर त्यासाठी आपल्याला लागेल :
१. आधीच तयार केलेला भात
२. फरसबी चिरून (भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मला त्या दिवशी ज्या मिळाल्या त्या मी वापरल्यात )
३. फ्लॉवरचे तुकडे
४. मटार १ वाटी
५. १ कांदा बारीक चिरून
६. १.टोमाटो बारीक चिरून
७. १ ते २ तमालपत्र
८. ६ ते ७ काळीमिरी दाणे
९. आलं -लसूण पेस्ट १ ते दीड चमचा
१०. लाल तिखट १ चमचा
११. १ ते दीड चमचा बिर्याणी मसाला (मी सुहाना चा वापरला )
१२. तेल
१३. हळद १/२ चमचा
१४. मीठ चवीनुसार
१५. थोडंस हिंग
१६. १ चमचा दही

1.

2.

क्रमवार पाककृती:

चला तर मग करूया सुरुवात.

प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात तेल घ्या. तेल गरम झाल कि त्यात तमालपत्र आणि कालीमिरीचे दाणे घाला.

3

ते थोडेसे तडकले कि मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांदा थोडा गुलाबीसर झाल कि मग त्यात टोमाटो परतून घ्या.

4

आता त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, थोडस हिंग आणि आलं - लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या.

5

आता त्यात सगळ्या भाज्या परतून घेऊया. भाज्या शिजतील इतपत पाणी घालून मग त्यात बिर्याणी मसाला घाला आणि झाकण ठेऊन भाज्या शिजू द्यात. पाणी पूर्ण आटवु नका. भाज्या शिजल्या कि त्यात १ चमचा दही आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.

6

आता तयार भात मिक्स करा आणि परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

7

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 3:26 pm | विजय पुरोहित

पाकृ चांगलीच आहे पण हा मसालेभाताच्या जवळ जाणारा जास्त वाटतोय. फोटो अपलोडसाठी साहित्य संपादक या आयडीला व्यनि करा.

गौतमी's picture

28 Apr 2016 - 3:55 pm | गौतमी

धन्यवाद सर्वांना....

नूतन सावंत's picture

28 Apr 2016 - 6:28 pm | नूतन सावंत

बिर्याणी आणि थर नाहीत?घाईत केली तरी थर हवेतच.आधीच तयार केलेला भात तयार भाजी मिश्रणावर पसरवून वाफ काढायची.
हाकानाका.

नूतन सावंत's picture

28 Apr 2016 - 6:29 pm | नूतन सावंत

मिपावर स्वागत.

उगा काहितरीच's picture

5 May 2016 - 8:38 pm | उगा काहितरीच

काहिही म्हणा पण बिर्याणी म्हणू नका. प्रकार चवीला चांगला असेल वाद नाही. पण "बिर्याणी" नाही...
-बिर्याणीप्रेमी.

वीणा३'s picture

6 May 2016 - 1:36 am | वीणा३

दिसतोय छान, करून बघेन.